Encorajamento
O encorajamento é uma das vocações mais lindas do cristão. A Bíblia transborda de palavras de ânimo: não temas, levanta-te, Eu sou contigo. Deus nos encoraja para encorajarmos outros.
Não temas
Deus diz repetidamente: não temas, Eu sou contigo. Ele fortalece, sustenta e caminha ao nosso lado em cada desafio.
मी तुले आज्ञा करी व्हती ना? खंबीर व्हय, हिंमत धर, भ्यावानं नही, घाबरानं नही; तु जाशी तिकडे तुना देश परमेश्वर तुनासंगे राही.
मी तुले आज्ञा करी व्हती ना? खंबीर व्हय, हिंमत धर, भ्यावानं नही, घाबरानं नही; तु जाशी तिकडे तुना देश परमेश्वर तुनासंगे राही.
तवय लोकेसनी उत्तर दिद्, "परमेश्वरना त्याग करीसनं अन्य देवनी पुजा करानी हाई आमनाकडतीन न घडो! कारण आमना देव यहोवा यानीच आमले अनी आमना पुर्वजसले मिसर देशमाईन, दास्यगृहामाईन बाहेर आणं; त्यानीच आमना नजरनासमोर मोठमोठा चमत्कार करात अनी ज्या वाटघाई आम्हीन परवास करा अनी ज्या लोकेसमाईन आम्हीन मार्गक्रमन करं तठे त्यानी आमनं रक्षण करं.
Deus está conosco
Se Deus é por nós, quem será contra nós? Tudo posso naquele que me fortalece. Ele nos encoraja pela sua presença.
ख्रिस्तनी अनं देवनी प्रिती
तर मंग ह्या गोष्टीसनाबद्ल आपण काय सांगानं? जर देव आपला बाजुतीन शे, तर मंग आपलाविरूध्द कोण?
कारण परत भय धराले पाहिजे असा दासपनाना आत्मा तुमले मिळना नही; तर ज्यानाद्वारा आपन "अब्बा, बापा," अशी हाक मारतस असा दत्तकपनाना आत्मा तुमले मिळेल शे.
आपलामाईन प्रत्येकजनसनी आपला शेजारीसना फायदा व्हवाकरता ज्यामा त्यासनं चांगलं व्हई अस त्यासना सुखकडे दखानं.
आते, जो धीर अनं उत्तेजन देस, तो देव तुमले अस देवाले पाहिजे की, तुम्हीन ख्रिस्त येशुप्रमाणे एकमेकसंगे एकसमान व्हवाले पाहिजे.
कारण तुमले सामर्थ्य भेटाले पाहिजे म्हणीसन तुमले काही अध्यात्मिक कृपादान देवाणं यानाकरता मी तुमले भेटासाठे उत्सुक शे; म्हणजे तुमना अनी मना ईश्वासतीन आपले एकमेकसले म्हणजे माले तुमनाबद्दल अनी तुमले मनाबद्दल समाधान व्हवाले पाहीजे.
जो ख्रिस्त माले सामर्थ्य देस त्यानाद्वारा मी सर्व परिस्थीतीना सामना करू शकस.
ज्या देवनी तुमनामा चांगलं कामनी सुरवात करी तो, ते काम येशु ख्रिस्तना परत येवाना दिनपावत पुरा करी हाऊ माले ईश्वास शे.
जर कोणी ख्रिस्तमा शे तर तो नवी उत्पत्ति शे; जुनं ते व्हई गयं; दखा, ते नवं व्हयेल शे.
ईश्वासतीन जगनं
यामुये आम्हीन हिम्मत सोडतस नही; आमनं बाहेरनं शरीर मरी जाई राहीनं, तरी अंतर आत्मा दिनदिनमा नवा व्हई राहीना.
कारण आमनावर थोडा येळकरता येनारं अनी धाकलं संकट हाई आमनाकरता मोठा प्रमाणमा सार्वकालिक गौरव लई येस;
हाई आत्मिक संपत्ती आमनामा शे ज्या आम्हीन मातीना भांडानामायक शेतस, हाई यानाकरता शे की महान सामर्थ्य देवकडतीन व्हस, आमनाकडतीन व्हस नही हाई समजाले पाहिजे. आमनावर चारीमेरतीन संकट वनात, तरी आम्हीन संपनुत नही; घोटाळामा पडनुत तरी निराश व्हयनुत नही; आमना पाठलाग व्हयना तरी बी त्यासनी आमना स्विकार करा; आम्हीन खाल पडनु तरी आमना नाश व्हयना नही. आम्हीन येशुनं मरण कायम आमना शरिरमा लिसन फिरतस कारण येशुनं जिवन आमना शरिरमा प्रकट व्हवाले पाहिजे. कारण आम्हीन जिवन जगी राहिनुत, ते येशुमुये मरणकरता कायमना सोपाई जाई राहीनुत, यानाकरता की येशुनं जिवन बी आमना मरेल शरिरमा प्रकट व्हवाले पाहिजे.
ख्रिस्तद्वारा देवसंगे मैत्री
आम्हीन प्रभुनं मानीसन लोकसले समजुत घालतस; देवले तर आम्हीन प्रकट शेतस; अनी तुमना मनमा बी प्रकट शेतस, अशी आशा आम्हीन धरतस. आम्हीन तुमना जोडे परत आमनी वाहवाह करतस नही, तर तुमले आमनाबद्दल अभिमान करानी येळ येवाले पाहिजेल म्हणीसन अस बोलतस; यानाकरता की जो मनमा नही तर तोंडवर अभिमान बाळगस त्याले तुमले उत्तर देता येवाले पाहिजे. आम्हीन येडा व्हयनुत तर ते देवनाकरता, अनी आम्हीन शुध्दीवर राहीनुत तर ते तुमनाकरता शेतस. ख्रिस्तनं प्रेम आमले आवरी धरस, आम्हीन अस समजतस की एक सर्वाकरता मरना, तर सर्व मरनात. अनी तो सर्वाकरता याकरता मरणा की ज्या जगतस त्यासनी यानापुढे स्वतःकरता नहीतर त्यानाकरता जो मरना अनी परत ऊठना त्यानाकरता जगानं.
आत्तेपाईन आम्हीन कोणले मनुष्यना समजनुसार वळखतस नही; अनी जरी आम्हीन ख्रिस्तले मनुष्यना समजनुसार वळखेल व्हतं तरी आते त्याले यानापुढे तसं वळखतस नही. जर कोणी ख्रिस्तमा शे तर तो नवी उत्पत्ति शे; जुनं ते व्हई गयं; दखा, ते नवं व्हयेल शे. हाई सर्व देवपाईन शे; त्यानी तुमले आमले जोडानं काम ख्रिस्तनाद्वारा करं, अनी एकमेकसले जोडानी सेवा आमले दिधी. म्हणजे जगमातील लोकसना पापे त्यासनाकडे नही मोजता, देव ख्रिस्तमा आपलासंगे जगले जोडी राहिंता; अनी त्यानी आमनाकडे लोकसले जोडानं वचन सोपी दिधं.
यामुये देव आमना कडतीन बोध करी लेवानामायक आम्हीन ख्रिस्तना बाजुतीन वकिली करतस; देवनासंगे जोडेल तुम्हीन व्हवाले पाहिजे, अशी मनी ख्रिस्तना कडतीन ईनंती करस. ज्याले पाप माहित नव्हतं, त्याले त्यानी तुमना आमनाकरता पाप अस कर; यानाकरता की आपण देवना नितीमान व्हवाले पाहिजेल.
जर तुमनी देवानी ईच्छा व्हई म्हणजे तुमना जोडे जे व्हई ते देवले मान्य व्हई, जर नही व्हई तर काही हरकत नही.
पौल देवना उपकार मानस
आपला परमेश्वर अनी प्रभु येशु ख्रिस्तना बाप जो देव, दया करनारा देवबाप अनी सर्वासले सांत्वना देणारा देव, तो धन्यवादित असो.
तो आमनावरला सर्व संकटमा आमले दिलासा देस, त्या मदतमुयेच आमले स्वतः देवकडतीन दिलासा मिळस, त्या मदतमुये ज्या कोणी, कोणता बी संकटमा शेतस त्यासले मदत कराले आम्हीन समर्थ व्हवाले पाहिजे,
Ânimo nas lutas
No mundo tereis aflições, mas tende bom ânimo — Eu venci o mundo. O Senhor é refúgio seguro em toda tribulação.
या गोष्टी मी तुमले यानाकरता सांगेल शेतस की मनाकडतीन तुमले शांती भेटी. जगमा तुमले तरास व्हई तरी धीर धरा; मी जगले जिंकेल शे.
या गोष्टी मी तुमले यानाकरता सांगेल शेतस की मनाकडतीन तुमले शांती भेटी. जगमा तुमले तरास व्हई तरी धीर धरा; मी जगले जिंकेल शे.
मी तुमले शांती दि ठेवस, हाई मनी स्वतःनी शांती ती तुमले देस, जसं जग देस तसं मी तुमले देस नही, तुमनं अंतःकरण अस्वस्थ अनी भयबीत व्हवाले नको म्हणीसन.
मी तुमले शांती दि ठेवस, हाई मनी स्वतःनी शांती ती तुमले देस, जसं जग देस तसं मी तुमले देस नही, तुमनं अंतःकरण अस्वस्थ अनी भयबीत व्हवाले नको म्हणीसन.
प्रितीनाठायी भय ऱ्हास नही; एवढंच नही तर पुर्ण प्रिती भयले काढी टाकस; भयमा शिक्षा ऱ्हास अनी भय धरणारा प्रितीमा पुर्ण व्हयेल नही.
Promessas de conforto
Vinde a mim os cansados e sobrecarregados. Lança sobre Ele tuas ansiedades, pois Ele cuida de ti.
अहो सर्वा कष्टी अनी वझामा दाबायेल लोकसहो, मनाजोडे या, म्हणजे मी तुमले विसावा दिसु.
ज्या शरिरना नाश करतस पण आत्माना नाश कराले समर्थ नही त्यासले घाबरू नका, तर आत्मा अनं शरीर ह्या दोन्हीसले नरकमा नाश कराले जो परमेश्वर समर्थ शे त्याले घाबरा.
त्यानावर तुम्हीन आपली सर्व चिंता टाका कारण तो तुमनी काळजी लेस.
तुम्हीन तारणबद्दल आते आनंद करतस जरी थोडा येळपावत, बराच परिक्षासमा पडीन तुम्हीन दुःख भोगात.
जर तुम्हीन चांगला गोष्टीस कराकरता तयार शेतस तर तुमनं वाईट करनारा कोण? अनी जर तुमले धार्मीकपणाबद्दल दुःख सहन करना पडनात, तरी तुम्हीन धन्य; त्यासना भयतीन भिऊ नका अनं घाबरू नका;
Encorajar uns aos outros
Encorajai-vos mutuamente e edificai-vos uns aos outros. Não desanimemos — a bondade do Senhor é nova a cada manhã.
म्हणीन तुम्हीन एकमेकसनं सांत्वन करा अनं एकमेकसनी मदत करा; अस तुम्हीन करीच राहिनात.
म्हणीन तुम्हीन एकमेकसनं सांत्वन करा अनं एकमेकसनी मदत करा; अस तुम्हीन करीच राहिनात.
प्रिती अनी चांगला कामे कराकरता उत्तेजन भेटी अस एकमेकसकडे ध्यान द्या. आपण काही लोकसना चालीरितीसना मायक आपलं एकत्र राहनं सोडू नका, तर एकमेकसले प्रोत्साहन देवानं अनी देव येणार शे तो दिन जोडे ई राहीना हाई तुम्हीन दखतस, म्हणीसन विशेषकरीन हाई करा.
तुमनी वागणुक पैसासना लोभवीना असाले पाहिजे, जोडे शे तितलामा तुम्हीन तृप्त असाले पाहिजे, कारण देवनी स्वतः म्हणेल शे, "मी तुले सोडाव नही अनं तुले टाकावं बी नही." यामुये आम्हीन हिम्मत धरीसन म्हणतस;
"परमेश्वर मना साहाय्यकर्ता शे, मी भिणार नही,
माणुस मनं काय करी?"
यामुये मना प्रिय भाऊ अनी बहिणीसवन, प्रभुमा तुमनं कष्ट व्यर्थ नही, हाई तुमले माहीत शे, म्हणीसन तुम्हीन स्थिर रहा, टिकी रहा, अनी प्रभुना काममा कायम वाढत जा.
शेवटला शब्द
सावध रहा, ईश्वासमा स्थिर रहा, मर्दमायक वागा; खंबीर रहा.
शेवटला शब्द
सावध रहा, ईश्वासमा स्थिर रहा, मर्दमायक वागा; खंबीर रहा.
कारण देवनी आपलाले भित्रापणना नही, तर सामर्थ्याना, प्रितीना अनं स्वतःवर ताबा ठेवाना आत्मा देयल शे.
येशुनी त्यासले सांगं, "मनामांगे या म्हणजे, लोकसले देवना राज्यमा कसं लयतस, हाई मी तुमले शिकाडसु." मंग त्यासनी लगेच जाळं तठेच टाकं अनी त्या त्याना मांगे निंघनात.
Deus chama pelo nome
Ao longo da Bíblia, Deus chamou seus servos pelo nome — Abraão, Moisés, Samuel, Paulo — encorajando cada um pessoalmente.
तवय रातले दृष्टांतमा देव याकोबनासंगे बोलना, "याकोब हे याकोब;"
अनी तो बोलना, मी आठे शे?
तवय परमेश्वरना देवदूतनी स्वपनमां माले सांगं, "याकोबा!" अनी मी बोलनु, "मी आठे शे."
तवय परमेश्वरना दूत अब्राहामले आकाशमाईन हाक मारीन बोलना, "अब्राहाम, अब्राहाम!" त्यानी सांगं, "काय आज्ञा?"
ते दखाकरता मोशे तिकडे वळना हाई परमेश्वरनी दखं अनी झुडूपमातीन देवनी त्याले हाक मारीन सांंगं, मोशे तवय तो बोलना, काय आज्ञा?
तठे दिमिष्क शहरमा हनन्या नावना कोणी एक शिष्य व्हता; त्याले प्रभु दृष्टांत दिसन बोलना, "हे हनन्या!"
तो बोलना, "हा, प्रभु मी शे."
तवय मरीया बोलनी, "मी प्रभुनी दासी, माले तुना वचनप्रमाणे व्हवो." अनी देवदूत तिनाकडतीन निंघी गया.
"पाच चिमण्या दोन नाणामा ईकातस का नही? तरी त्या चिमणीसमातीन एकले बी देव ईसरत नही. ईतलच नही तर तुमना डोकावरना सर्वा केस बी मोजेल शेतस. म्हणीन घाबरू नका; कारण बराच चिमण्यासपेक्षा तुमनं मोल अधिक शे!"