Encorajamento
O encorajamento é uma das vocações mais lindas do cristão. A Bíblia transborda de palavras de ânimo: não temas, levanta-te, Eu sou contigo. Deus nos encoraja para encorajarmos outros.
Não temas
Deus diz repetidamente: não temas, Eu sou contigo. Ele fortalece, sustenta e caminha ao nosso lado em cada desafio.
भिऊ नकोस, कारण मी तुझ्याबरोबर आहे. चिंतातुर होऊ नकोस, कारण मी तुझा देव आहे. मी तुला शक्ती देईन, आणि मी तुला मदत करीन, मी आपल्या विजयाच्या उचित उजव्या हाताने तुला आधार देईन.
जेव्हा तू पाण्यातून जाशील, मी तुझ्या बरोबर असेल; आणि नद्यातून जाशील त्या तुला पूर्ण झाकणार नाहीत.
जेव्हा तू अग्नीतून चालत जाशील, तू जळणार नाहीस किंवा ज्वाला तुला इजा करणार नाही.
तू माझ्या दृष्टीने मोलवान आणि विशेष आहेस, मी तुझ्यावर प्रीती करतो;
म्हणून मी तुझ्याबद्दल लोक आणि तुझ्या जिवाबद्दल दुसरे लोक देईन.
घाबरू नकोस, कारण मी तुझ्याबरोबर आहे; मी पूर्वेपासून तुझी संतती आणीन, आणि पश्चिमेकडून तुला एकत्र गोळा करीन.
घाबरू नकोस कारण तू लज्जित होणार नाहीस किंवा निराश होऊ नको कारण तू कलंकीत होणार नाहीस;
तू आपल्या तरुणपणाची लाज आणि आपल्या त्यागण्याची बदनामी विसरशील.
ज्यांनी विचारले नाही, त्यांना मी दर्शन देण्यास तयार झालो, जे शोधत नव्हते त्यांना मी सापडण्यास तयार झालो.
ज्या राष्ट्रांनी माझ्या नावाचा धावा नाही केला, त्यांना मी म्हणालो, मी इथे आहे! मी इथे आहे!
पण जे कोणी परमेश्वराची प्रतीक्षा करतात ते त्यांची नवीन शक्ती संपादन करतील; ते गरुडासारखे पंखांनी वर उडतील;
ते धावतील तरी दमणार नाहीत; ते चालतील तरी गळून जाणार नाहीत.
मी प्रभूची वाणी बोलताना ऐकली ती अशी, "मी कोणाला पाठवू; आमच्यासाठी कोण जाईल?" मग मी म्हणालो, "मी येथे आहे; मला पाठव."
मी तुला आज्ञा केली नाही का? बलवान हो, धीट हो, घाबरू नकोस, धैर्यहीन होऊ नकोस, कारण तू जाशील तिकडे तुझा देव परमेश्वर तुझ्याबरोबर असेल."
मी तुला आज्ञा केली नाही का? बलवान हो, धीट हो, घाबरू नकोस, धैर्यहीन होऊ नकोस, कारण तू जाशील तिकडे तुझा देव परमेश्वर तुझ्याबरोबर असेल."
तेव्हा लोकांनी असे उत्तर केले की, "परमेश्वर देवाला सोडून आम्ही दुसऱ्या देवांची सेवा कधीच करणार नाही; कारण परमेश्वर आमचा देव आहे; त्यानेच आम्हांला व आमच्या पूर्वजांना मिसर देशांच्या दास्यातून बाहेर आणले; आणि ज्याने आमच्या नजरेसमोर मोठमोठे चमत्कार केले, आणि ज्या वाटेने आम्ही गेलो व ज्या ज्या राष्ट्रामधून आम्ही मार्गक्रमण केले त्यामध्ये त्याने आमचे रक्षण केले,
शौर्य दाखवा. खंबीर पणाने वागा. त्या लोकांची भीती बाळगू नका! कारण प्रत्यक्ष तुमचा देव परमेश्वर तुमच्याबरोबर आहे. तो तुम्हास अंतर देणार नाही, तुमची साथ सोडणार नाही"
परमेश्वर तुमच्या सोबतीला तुमच्यापुढेच चालणार आहे. तो तुम्हास सोडून जाणार नाही, तुम्हास अंतर देणार नाही. तेव्हा भिऊ नको आणि निर्भय राहा."
Deus está conosco
Se Deus é por nós, quem será contra nós? Tudo posso naquele que me fortalece. Ele nos encoraja pela sua presença.
मग या गोष्टींविषयी आपण काय म्हणावे? जर देव आपल्या बाजूला आहे, तर मग आपल्या विरुद्ध कोण?
कारण तुम्हास पुन्हा भय धरण्यास दासपणाचा आत्मा मिळाला नाही; पण आपण ज्यायोगे ‘अब्बा-पित्या’ अशी हाक मारतो असा दत्तकपणाचा आत्मा तुम्हास मिळाला आहे.
आपल्यामधील प्रत्येक जणाने शेजार्याला जे चांगले असेल त्यामध्ये त्याच्या उभारणीसाठी संतुष्ट करावे.
आता, जो धीर व उत्तेजन देतो तो देव तुम्हास असे देवो की तुम्ही ख्रिस्त येशूप्रमाणे एकमेकांशी एकमनाचे व्हावे;
कारण तुम्ही स्थिर व्हावे म्हणून तुम्हास काही आत्मिक कृपादान दयावे ह्यासाठी मी तुम्हास भेटण्यास उत्कंठित आहे; म्हणजे आपल्या एकमेकांना तुमच्या व माझ्या, विश्वासाने, मला तुमच्याबरोबर उत्तेजन मिळावे.
आणि मला जो सामर्थ्य देतो त्याच्याकडून मी सर्वकाही करावयास शक्तीमान आहे.
आणि ज्याने तुमच्यात चांगले काम आरंभले तो ते येशू ख्रिस्ताच्या दिवसापर्यंत पूर्णतेस नेईल हा माझा विश्वास आहे.
म्हणून कोणी मनुष्य ख्रिस्तात असेल तर तो नवी उत्पत्ती आहे; जुने होऊन गेले आहे, बघा, ते नवे झाले आहे;
म्हणून आम्ही खचत नाही. पण जरी आमचे हे बाहेरील देहपण नाश पावत आहे, तरी आमचे अंतर्याम हे दिवसानुदिवस नवीन होत आहे.
कारण हे जे हलके दुःख केवळ तात्कालिक आहे ते आमच्यासाठी फार अधिक मोठ्या अशा सार्वकालिक गौरवाचा भार तयार करते.
पण आमचे हे धन आमच्याजवळ मातीच्या भांड्यात आहे, याचा अर्थ हा की, सामर्थ्याची पराकाष्ठा आमची नाही पण देवाची आहे. आम्हावर चारी दिशांनी संकटे येतात पण आम्ही अजून चिरडले गेलो नाही, आम्ही गोधळलेलो आहोत पण निराश झालो नाही. आमचा पाठलाग केला गेला, पण त्याग केला गेला नाही, आम्ही खाली पडलेले आहोत तरी आमचा नाश झाला नाही. आम्ही निरंतर आमच्या शरीरात येशूचे मरण घेऊन जात असतो; यासाठी की, आमच्या शरीरात येशूचे जीवनही प्रकट व्हावे. कारण आम्ही जे जिवंत आहोत ते येशूकरता मरणाच्या सतत स्वाधीन केले जात आहोत; म्हणजे आमच्या मरणाधीन देहात येशूचे जीवनही प्रकट व्हावे.
म्हणून आम्हास प्रभूचे भय कळले असल्यामुळे आम्ही मनुष्यांचे मन वळवतो पण आम्ही देवाला प्रकट झालो आहो; आणि मी अशी आशा धरतो की, आम्ही तुमच्या विवेकांत प्रकट झालो आहोत. कारण तुमच्याजवळ आम्ही आमची पुन्हा प्रशंसा करीत नाही, पण तुम्हास आमच्या बाबतीत अभिमानाला कारण देतो; म्हणजे, मनुष्याच्या अंतःकरणाविषयी नाही, पण त्याच्या बाहेरच्या स्थितीविषयी जे अभिमान मिरवतात त्यांच्यासाठी तुमच्याजवळ काही उत्तर असावे. कारण आम्ही वेडे झालो असलो तर देवासाठी आणि आम्ही समंजस मनाचे असलो तर तुमच्यासाठी आहोत. कारण ख्रिस्ताची प्रीती आम्हास आवरते कारण आम्ही असे मानतो की एक सर्वांसाठी मरण पावला तर सर्व मरण पावले, आणि सर्वांसाठी तो ह्यासाठी मरण पावला की, ह्यापुढे जे जगतील त्यांनी आपल्या स्वतःसाठी नाही, पण त्यांच्यासाठी जो स्वतः मरण पावला आणि पुन्हा उठला त्याच्यासाठी त्यांनी जगावे.
म्हणून ह्यामुळे, आम्ही कोणाला देहावरून ओळखीत नाही; हो, आम्ही ख्रिस्ताला देहावरून ओळखले आहे तरी आता ह्यापुढे ओळखीत नाही. म्हणून कोणी मनुष्य ख्रिस्तात असेल तर तो नवी उत्पत्ती आहे; जुने होऊन गेले आहे, बघा, ते नवे झाले आहे; हे देवाकडून झाले आहे. त्याने येशू ख्रिस्ताच्या द्वारे आपला स्वतःशी समेट केला आणि समेटाची सेवा आम्हास दिली; म्हणजे लोकांचे अपराध त्यांच्या हिशोबी न धरता, देव जगाचा ख्रिस्ताद्वारे स्वतःशी समेट करीत होता आणि समेटाचे वचन त्याने आमच्यावर सोपवले.
तर मग आम्ही ख्रिस्ताच्या वतीने वकील झालो आहो; जणू तुम्हास आमच्याद्वारे देव विनंती करीत आहे; ख्रिस्ताच्या वतीने आम्ही तुम्हास विनवणी करतो की, तुम्ही देवाशी समेट केलेले असे व्हा. कारण जो पाप जाणत नव्हता त्यास त्याने आपल्यासाठी पाप असे केले, म्हणजे आपण त्याच्याठायी देवाचे नीतिमत्त्व असे व्हावे.
कारण उत्सुकता असली म्हणजे ज्याच्या त्याच्याजवळ जसे असेल तसे ते मान्य होते, नसेल तसे नाही.
आपला प्रभू येशू ख्रिस्ताचा देव आणि पिता, जो दयाळू पिता व सर्व सांत्वन करणारा देव तो धन्यवादित असो. तो आमच्या सर्व संकटात आमचे सांत्वन करतो; यासाठी की, ज्या सांत्वनाने आमचे स्वतःचे देवाकडून सांत्वन होते. त्या सांत्वनाने आम्ही, जे कोणी कोणत्याही संकटात आहेत त्यांचे सांत्वन करण्यास समर्थ व्हावे.
Ânimo nas lutas
No mundo tereis aflições, mas tende bom ânimo — Eu venci o mundo. O Senhor é refúgio seguro em toda tribulação.
माझ्याठायी तुम्हास शांती मिळावी म्हणून मी या गोष्टी सांगितल्या आहेत. जगात तुम्हास क्लेश होतील; तरी धीर धरा, मी जगाच्या शक्तीला जिकले आहे."
माझ्याठायी तुम्हास शांती मिळावी म्हणून मी या गोष्टी सांगितल्या आहेत. जगात तुम्हास क्लेश होतील; तरी धीर धरा, मी जगाच्या शक्तीला जिकले आहे."
मी तुम्हास शांती देऊन ठेवितो; मी आपली शांती तुम्हास देतो जसे जग देते तसे मी तुम्हास देत नाही; तुमचे अंतःकरण अस्वस्थ किंवा भयभीत होऊ नये,
मी तुम्हास शांती देऊन ठेवितो; मी आपली शांती तुम्हास देतो जसे जग देते तसे मी तुम्हास देत नाही; तुमचे अंतःकरण अस्वस्थ किंवा भयभीत होऊ नये,
प्रीतीच्या ठायी भिती नसते. इतकेच नव्हे तर पूर्ण प्रीती भीती घालवून देते. भीतीमध्ये शासन आहे आणि भीती बाळगणारा प्रीतीमध्ये पूर्ण झालेला नाही.
Promessas de conforto
Vinde a mim os cansados e sobrecarregados. Lança sobre Ele tuas ansiedades, pois Ele cuida de ti.
अहो जे थकलेले व ओझ्याने लादलेले असे सर्व तुम्ही मजकडे या आणि मी तुम्हास विसावा देईन.
जे शरीराला वधतात पण आत्म्याचा वध करू शकत नाहीत त्यांना भिऊ नका, तर त्यापेक्षा आत्म्याला व शरीराला जो मारू शकतो व नरकात टाकू शकतो त्यास भ्या.
तू आपला भार परमेश्वरावर टाक,
म्हणजे तो तुला आधार देईल.
तो नितीमानाला कधी पडू देणार नाही.
मी जरी अंधकाराने भरलेल्या दरीत चालत असलो तरी,
मला कसल्याही संकटाचे भय वाटणार नाही,
कारण तू माझ्याबरोबर आहेस, तुझी आकडी आणि काठी माझे सांत्वन करतात.
मी जरी अंधकाराने भरलेल्या दरीत चालत असलो तरी,
मला कसल्याही संकटाचे भय वाटणार नाही,
कारण तू माझ्याबरोबर आहेस, तुझी आकडी आणि काठी माझे सांत्वन करतात.
परमेश्वर माझा प्रकाश आणि माझा तारणारा आहे.
मी कोणाचे भय बाळगू?
परमेश्वरच माझ्या जीवाचा आश्रय आहे,
मी कोणाची भीती बाळगू?
परमेश्वराची वाट पाहा;
मजबूत हो आणि तुझे हृदय धैर्यवान असो.
परमेश्वराची वाट पाहा.
जे तुम्ही परमेश्वरावर विश्वास करता,
बलवान व धैर्यवान व्हा.
परमेश्वर म्हणतो, "मी तुला बोध करीन आणि ज्या मार्गात, तू चालावे तो मी तुला शिकवीन.
तुझ्यावर माझी नजर ठेवून मी तुला बोध करीन.
देव आमचा आश्रय आणि सामर्थ्य आहे,
जो संकटात मदत करण्यास सिध्द असतो.
म्हणून जरी पृथ्वी बदलली,
जरी पर्वत डगमगून समुद्राच्या हृदयात गेले, तरी आम्ही भिणार नाही.
जरी त्यांच्या लाटा गर्जल्या आणि खळबळल्या,
आणि त्यांच्या उचंबळण्याने पर्वत थरथरले तरी आम्ही भिणार नाही.
मी जेव्हा घाबरतो,
तेव्हा मी तुझ्यावर भरंवसा ठेवीन.
मी देवाच्या मदतीने, त्याच्या वचनाची स्तुती करीन,
मी देवावर भरवसा ठेवला आहे; मी भिणार नाही.
मनुष्य माझे काय करील?
प्रभू, आमचा देव याची कृपा आम्हांवर असो.
आमच्या हातच्या कामाला उन्नती दे;
खरोखर, आमच्या हातच्या कामाला उन्नती दे.
मी आपली दृष्टी पर्वताकडे लावतो.
मला मदत कोठून येईल?
परमेश्वर जो आकाशाचा व पृथ्वीचा निर्माण करणारा
त्याकडून माझी मदत येते.
मी परमेश्वरास नेहमी माझ्यासमोर ठेवतो म्हणून मी त्याच्या उजव्या हातातून कधीही ढळणार नाही.
परमेश्वर पीडितांना आश्रयदुर्ग आहे,
संकटकाळी तो बळकट दुर्ग असा आहे.
जे तुझ्या नावाला ओळखतात, ते तुझ्यावर विश्वास ठेवतात.
कारण हे परमेश्वरा जे तुला शोधतात त्यांना तू टाकले नाही.
तुम्ही आपली सर्व चिंता त्याच्यावर टाका, कारण तो तुमची काळजी करतो.
आणि या कारणास्तव, आताच्या काळात, निरनिराळया प्रकारच्या परीक्षांमुळे तुम्हास थोडा वेळ भाग पडल्यास तुम्ही दुःख सोशीत असताही आनंदित होता.
आणि तुम्ही जर चांगल्याविषयी आवेशी झाला, तर कोण तुमचे वाईट करील? पण, नीतिमत्त्वाकरता तुम्ही सोसले तर तुम्ही धन्य! त्यांच्या भयाने भिऊ नका किंवा अस्वस्थ होऊ नका.
Encorajar uns aos outros
Encorajai-vos mutuamente e edificai-vos uns aos outros. Não desanimemos — a bondade do Senhor é nova a cada manhã.
म्हणून तुम्ही एकमेकांचे सांत्वन करा आणि एकमेकांची उभारणी करा; हे तुम्ही करतही आहात.
म्हणून तुम्ही एकमेकांचे सांत्वन करा आणि एकमेकांची उभारणी करा; हे तुम्ही करतही आहात.
आपण एकमेकांस समजून घेऊ व प्रीती आणि चांगली कामे करण्याकरिता एकमेकांना उत्तेजन देऊ. आपण कित्येकाच्या चालीप्रमाणे आपले एकत्र मिळणे न सोडता एकमेकास बोध करावा आणि देवाचा दिवस जवळ येत असताना अधीकाधीक उत्तेजन द्यावे.
आपले जीवन पैशाच्या लोभापासून दूर ठेवा व तुमच्याकडे जे आहे त्यामध्येच समाधान माना कारण देवाने असे म्हणले आहे, "मी कधीही तुला सोडणार नाही, मी कधीही तुला त्यागणार नाही" म्हणून आपण धैर्याने म्हणू शकतो,
"देव माझा सहाय्यकर्ता आहे, मी भिणार नाही.
मनुष्य माझे काय करणार?"
म्हणून माझ्या प्रिय बंधूनो व बहिणींनो प्रभूमध्ये स्थिर आणि अचल राहा. नेहमी स्वतःला प्रभूच्या कार्यासाठी वाहून घ्या कारण तुम्ही जाणता की प्रभूमध्ये तुमचे काम व्यर्थ नाही.
सावध असा, तुमच्या विश्वासात बळकट राहा. धैर्यशील व्हा. सशक्त व्हा.
सावध असा, तुमच्या विश्वासात बळकट राहा. धैर्यशील व्हा. सशक्त व्हा.
कारण देवाने आम्हास भित्रेपणाचा आत्मा दिला नाही तर सामर्थ्याचा, प्रीतीचा व संयमनाचा आत्मा दिला आहे.
दावीद शलमोनाला पुढे म्हणाला "बलवान हो आणि धैर्य धर. काम कर. कारण परमेश्वर देव म्हणजे माझा देव तुझ्यासोबत आहे, तेव्हा घाबरु नको. परमेश्वराच्या घराचे सर्व काम पुरे़ होईपर्यंत तो तुला सोडणार नाही व टाकणार नाही.
परमेश्वर तुझा देव, तुझ्यामध्ये आहे, तो तुला वाचवायला पराक्रमी असा आहे; तो हर्षाने तुझ्याविषयी आनंद करील,
तो त्याच्या प्रेमासोबत तुझ्याकडे शांती घेऊन येईल.
तो गायनाने तुझ्याविषयी आनंद करील.
कारण परमेश्वर असे म्हणतो की, तुमच्याविषयी माझ्या मनात ज्या योजना आहेत त्या मी जाणतो; त्या योजना तुमच्या हिताच्या आहेत आणि अनिष्टासाठी नाहीत, त्या तुम्हास भविष्य व आशा देणाऱ्या आहेत.
सर्व कष्टात फायदा आहे,
पण जेव्हा तेथे फक्त बोलतच राहिलात, ते दारिद्र्याकडे घेऊन जाईल.
येशू त्यांना म्हणाला, "माझ्यामागे या म्हणजे मी तुम्हास माणसे धरणारे करीन." मग ते लगेचच जाळी सोडून त्याच्यामागे चालू लागले.
Deus chama pelo nome
Ao longo da Bíblia, Deus chamou seus servos pelo nome — Abraão, Moisés, Samuel, Paulo — encorajando cada um pessoalmente.
रात्री देव स्वप्नात दर्शन देऊन इस्राएलाशी बोलला, तो म्हणाला, "याकोबा, याकोबा." त्याने उत्तर दिले, "काय आज्ञा?"
देवाचा दूत मला स्वप्नात म्हणाला, "याकोबा," मी म्हणालो, "काय आज्ञा आहे?"
परंतु तेवढ्यात, परमेश्वराच्या दूताने स्वर्गातून हाक मारून त्यास म्हटले, "अब्राहामा, अब्राहामा!" अब्राहामाने उत्तर दिले, "मी येथे आहे."
मोशे झुडूपाजवळ येत आहे हे परमेश्वराने पाहिले. तेव्हा झुडपातून देवाने त्यास हाक मारून म्हटले, "मोशे! मोशे!" आणि मोशे म्हणाला, "हा मी इथे आहे."
मग एलीने शमुवेलाला हाक मारून म्हटले, "माझ्या मुला शमुवेला." तेव्हा शमुवेल म्हणाला, "हा मी येथे आहे."
दिमिष्कांमध्ये येशूचा एक शिष्य होता त्याचे नाव हनन्या होते; प्रभू त्याच्याशी एका दृष्टांतात बोलला तो म्हणाला, "हनन्या." हनन्याने उत्तर दिले, "मी इथे आहे, प्रभू."
मरीया म्हणाली, खरोखर "मी प्रभूची दासी आहे, आपल्या म्हणण्याप्रमाणे मला होवो." मग देवदूत तिच्यापासून निघून गेला.
पाच चिमण्या दोन नाण्यांना विकतात की नाही? तरी त्यातील एकीचाही देवाला विसर पडत नाही. पण तुमच्या डोक्यावरील सर्व केसदेखील त्याने मोजलेले आहेत. भिऊ नका. पुष्कळ चिमण्यांपेक्षा तुमचे मूल्य जास्त आहे.