Ensinar
Ensinar é mandamento e dom. A Bíblia exorta pais, líderes e mestres a transmitir a verdade divina com fidelidade, paciência e sabedoria para as próximas gerações.
Ensinar a Palavra
Toda Escritura é útil para ensinar. Quem ouve as palavras de Jesus e as pratica é como o homem sábio que construiu sobre a rocha.
प्रत्येक शास्त्रलेख देवाच्या प्रेरणेने लिहिला असल्यामुळे तो शिकवण्यास, वाईटाचा निषेध करण्यास, चुका सुधारण्यास व योग्य जीवन जगण्याचे मार्गदर्शन करण्यास उपयुक्त आहे. यासाठी की, देवाचा मनुष्य तरबेज होऊन पूर्णपणे प्रत्येक चागंल्या कामासाठी सज्ज व्हावा.
जो कोणी माझ्या सांगण्याप्रमाणे आचारण करतो तो शहाण्या मनुष्यासारखा आहे, अशा शहाण्या मनुष्याने आपले घर खडकावर बांधले.
ख्रिस्ताचे वचन तुम्हांमध्ये भरपूर राहो. तुम्ही सर्व ज्ञानीपणाने एकमेकांस शिकवा व बोध करा; आपल्या अंतःकरणात देवाला स्तोत्रे, गीते व आत्मिक गीते कृपेच्या प्रेरणेने गा.
कारण ज्या गोष्टी पूर्वी लिहिण्यात आल्या त्या आपल्या शिक्षणासाठी लिहिण्यात आल्या; म्हणजे आपण धीराने व शास्त्रलेखाकडून मिळणार्या उत्तेजनाने आशा धरावी.
इस्राएलाचा राजा, दावीदाचा पुत्र शलमोन, याची ही नितीसूत्रे.
ज्ञान व शिक्षण शिकावे,
बुद्धीच्या वचनाचे ज्ञान मिळवावे,
सुज्ञतेचे शिक्षण घेऊन जे योग्य, न्यायी, आणि चांगले ते करण्यास शिकावे,
भोळ्यांना शहाणपण
आणि तरुणांना ज्ञान व दूरदर्शीपणा द्यावे,
ज्ञानी व्यक्तीने ऐकावे आणि त्याने ज्ञानात वाढावे,
बुद्धीमान व्यक्तीला मार्गदर्शन मिळावे,
ज्ञानी लोकांची वचने आणि त्याची गूढरहस्ये समजावी,
म्हणून म्हणी व सुवचने ह्यासाठी ही आहेत.
परमेश्वराचे भय ज्ञानाची सुरुवात आहे,
मूर्ख ज्ञान आणि शिक्षण तुच्छ मानतात.
Instruir as gerações
Ensina a criança nos caminhos de Deus. A geração que não conhece o Senhor perde a herança espiritual da fé.
आणि आपला देव परमेश्वर ह्यावर संपूर्ण अंत:करणाने, संपूर्ण मनाने व संपूर्ण शक्तीने प्रेम करा. मी आज दिलेल्या आज्ञा तुमच्या कायम लक्षात असू द्या. त्या आपल्या मुलाबाळांनाही शिकवा. घरी-दारी, झोपता उठता त्याविषयी बोलत राहा.
माझ्या मुला, तू तुझ्या वडिलांची शिकवण ऐक,
आणि तू तुझ्या आईचा नियम बाजूला टाकू नकोस;
ते तुझ्या शिराला सुशोभित वेष्टन
आणि तुझ्या गळ्यात लटकते पदक आहे.
माझ्या मुला, तुझ्या वडिलांची आज्ञा पाळ,
आणि तुझ्या आईची शिकवण विसरु नकोस.
ती नेहमी आपल्या हृदयाशी कवटाळून धर;
ती आपल्या गळ्यात बांधून ठेव.
जेव्हा तू चालशील, ते तुला मार्गदर्शन करील;
जेव्हा तू झोपशील, तेव्हा ते तुझे रक्षण करील;
आणि जेव्हा तू उठशील तेव्हा ते तुझ्याशी बोलेल.
कारण ती आज्ञा दिवा आहेत आणि शिक्षण प्रकाश आहे;
शिस्तीचा दोषारोप जीवनाचा मार्ग आहे.
ज्ञान आणि सुज्ञता संपादन कर;
माझे शब्द विसरु नकोस आणि माझ्या मुखातले शब्द नाकारू नकोस;
ज्ञानाचा त्याग करू नकोस ते तुझे राखण करील;
त्याच्यावर प्रीती कर आणि ते तुझे रक्षण करील.
ज्ञान हे सर्वात महत्वाची गोष्ट आहे म्हणून ज्ञान संपादन कर,
आणि आपले सर्वस्व खर्चून सुज्ञता मिळव.
ज्ञान हृदयात जतन करून ठेव आणि ते तुला उंचावेल,
जेव्हा तू त्यास आलिंगन देशील तर ते तुझा सन्मान करील.
शिस्त घट्ट धरून ठेव, ती सोडून देऊ नको;
ते सांभाळून ठेव, कारण ते तुझे जीवन आहे.
दुष्टांचे मार्ग आचरणात आणू नको,
आणि जे वाईट करतात त्यांच्या मार्गाने चालू नको.
तुझे अंतःकरण सुरक्षित ठेव आणि सर्व दक्षतेने त्याचे संरक्षण कर,
कारण त्यातूनच जीवनाचा झरा वाहतो.
वाकडे बोलणे तुझ्यापासून दूर ठेव,
आणि दूषित बोलणे सोडून दे.
तुझे डोळे नीट समोर पाहोत,
आणि तुझ्या पापण्या तुझ्यापुढे सरळ राहोत.
तुझ्या पावलांसाठी सपाट वाट कर;
मग तुझे सर्व मार्ग सुरक्षित होतील.
तू उजवीकडे किंवा डावीकडे दूर वळू नको;
तू आपला पाय वाईटापासून राख.
सुज्ञाची शिकवण जीवनाचा झरा आहे,
ते तुम्हास मृत्युपाशापासून दूर वळविल.
परमेश्वराचे भय ज्ञानाचा उगम आहे,
आणि परमपवित्र देवाला ओळखणे हीच सुज्ञता आहे.
अहो माझ्या लोकांनो, माझी शिकवण ऐका,
माझ्या तोंडच्या वचनाकडे लक्ष द्या.
मी शहाणपणाचे गीत गाईन;
मी पूर्वकाळच्या गुप्त गोष्टीबद्दल सांगेन.
ज्या आम्ही ऐकल्या आणि ज्या आम्हास समजल्या,
त्या आमच्या वाडवडिलांनी आम्हास सांगितल्या.
त्या आम्ही त्यांच्या वंशजापासून गुप्त ठेवणार नाही.
त्या आम्ही पुढील पिढीला परमेश्वराची स्तुत्य कृत्ये,
त्याचे सामर्थ्य आणि त्याने केलेले आश्चर्ये कृत्ये सांगू.
ती सर्व पिढी पूर्वजांना मिळाल्यानंतर जी दुसरी पिढी उदयास आली तिला परमेश्वराची आणि त्याने इस्राएलासाठी केलेल्या कामाची ओळख नव्हती.
Fidelidade no ensino
Quem ensina com fidelidade merece dupla honra. Cuidado com doutrinas falsas — permaneçam na doutrina de Cristo.
जे उपदेश करण्याचे व शिकविण्याचे काम करतात त्यांना व वडील मंडळीची चांगली सेवा करतात त्यांना दुप्पट मान देण्याच्या विशेष योग्यतेचे समजावे. कारण शास्त्रलेखात लिहिल्याप्रमाणे, "धान्याची मळणी करताना बैलाला मुसक्या बांधू नको" आणि "मजुराचा त्याच्या मजुरीवर हक्क आहे."
पण अमंगळपणाचा रिकामा वादविवाद टाळ कारण तो लोकांस देवापासून अधिकाधिक दूर नेतो. आणि अशाप्रकारे वादविवाद करणाऱ्यांची शिकवण कर्करोगासारखी पसरते. या लोकांमध्ये हूमनाय आणि फिलेत आहेत,
ख्रिस्ताच्या शिक्षणाला चिकटून न राहता जो पुढेपुढेच जातो त्यास देव प्राप्त झाला नाही. जो ख्रिस्ताच्या शिक्षणाला धरून राहतो त्यास पिता व पुत्र या दोघांची प्राप्ती झाली आहे.
मग सण अर्धा आटोपल्यावर येशू वर परमेश्वराच्या भवनात जाऊन शिक्षण देऊ लागला. तेव्हा यहूदी आश्चर्य करून म्हणू लागले, "शिकल्यावाचून याला विद्या कशी आली?" त्यावरून येशूने त्यांना उत्तर देऊन म्हटले, "माझी शिकवण माझी नाही तर ज्याने मला पाठविले त्याची आहे. जो कोणी त्याच्या इच्छेप्रमाणे करण्याची इच्छा बाळगील त्यालाही शिकवण देवापासून आहे किंवा मी आपल्या मनाचे बोलतो हे समजेल. जो आपल्या मनाचे बोलतो, तो स्वतःचाच गौरव करतो, परंतु आपणाला ज्याने पाठवले त्याचे गौरव जो पाहतो तो मनुष्य खरा आहे व त्याच्यामध्ये अनीती नाही.