Esperar em Deus
Esperar em Deus não é passividade — é confiança ativa no Senhor que age no tempo perfeito. Os que esperam nele não serão confundidos nem envergonhados.
Esperança em Deus
Descanse somente em Deus, ó minha alma, pois dele vem a minha esperança. Ele é rocha e salvação — não serei abalado.
हे माझ्या जिवा, तू केवळ देवासाठी निशब्द राहून प्रतिक्षा कर;
कारण माझी आशा त्याच्यावर लागली आहे.
परमेश्वरासमोर स्तब्ध राहा आणि धीराने त्याची वाट पाहा.
जर मनुष्य दुष्ट योजना आखतो, कोणी आपले वाईट मार्ग सिद्धीस नेतो,
तर काळजी करू नको.
कारण दुष्टकृत्ये करणारे नाश पावतील,
परंतु जे परमेश्वराची वाट पाहतात त्यांना देशाचे वतन मिळेल.
परमेश्वराची वाट पाहा आणि त्याचे मार्ग पाळ.
आणि तो तुला वर उचलणार म्हणजे तुला भूमी मिळेल.
जेव्हा दुष्ट छेदला जाणार तेव्हा तू पाहशील.
मी धीर धरून परमेश्वराची वाट पाहिली,
त्याने माझे रडणे ऐकले आणि माझ्याकडे आपला कान लावला.
मी परमेश्वराची वाट पाहतो, माझा आत्मा वाट पाहतो,
आणि त्याच्या वचनावर मी आशा ठेवतो.
पहाटेची वाट पाहणाऱ्या पहारेकऱ्यापेक्षा
माझा जीव प्रभूची अधिक वाट पाहतो.
तुझ्या विश्वासणाऱ्याची कधी निराशा होत नाही.
परंतु जे कारण नसताना विश्वासघात करतात, ते लाजवले जातील.
परमेश्वरा, खचित मी तुझी वाट पाहीन.
प्रभू माझ्या देवा, तू मला उत्तर देशील.
परमेश्वराची वाट पाहा;
मजबूत हो आणि तुझे हृदय धैर्यवान असो.
परमेश्वराची वाट पाहा.
Confiança na espera
O Senhor é bom para os que esperam nele. O olho não viu o que Deus preparou para os que o amam e o aguardam.
पण जे कोणी परमेश्वराची प्रतीक्षा करतात ते त्यांची नवीन शक्ती संपादन करतील; ते गरुडासारखे पंखांनी वर उडतील;
ते धावतील तरी दमणार नाहीत; ते चालतील तरी गळून जाणार नाहीत.
हे परमेश्वरा, आमच्यावर कृपा कर; आम्ही तुझी वाट पाहतो;
रोज सकाळी तू आमचा भुज हो, आमच्या संकटकाळी आमचा उद्धारक हो.
तर जो त्याची आशा धरतो त्याच्यासाठी जे त्याने तयार केले आहे,
ते प्राचीन काळापासून कोणीही ऐकलेले किंवा समजले नाही, हे देवा तुझ्याशिवाय कोण्याच्या डोळ्याने ते पाहिले नाही.
मी चुकीच्या बदल्यात परतफेड करीन असे म्हणू नकोस,
परमेश्वराची वाट पाहा आणि तो तुझे रक्षण करील.
यासाठी बंधूंनो, प्रभूच्या येण्यापर्यंत धीर धरा, लक्षात ठेवा की, शेतकरी आपल्या शेतातील मोलवान पिकाची वाट पाहतो. तो धीराने त्याची वाट पाहतो. पहिला व शेवटचा पाऊस मिळेपर्यंत वाट पाहतो. तुम्हीसुद्धा धीराने वाट पाहिली पाहिजे. तुमचे अंतःकरण बळकट करा कारण प्रभूचे दुसरे आगमन जवळ आले आहे.
तुम्ही सर्वकाळच्या जीवनासाठी आपला प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्या दयेची प्रतीक्षा करीत स्वतःला देवाच्या प्रीतीत राखा.
आपले नागरिकत्व तर स्वर्गात आहे; तेथून प्रभू येशू ख्रिस्त हा तारणारा येणार आहे; त्याची आपण वाट पाहत आहोत.