Espírito
O espírito humano é a parte mais profunda do nosso ser — onde Deus habita, onde a fé se ancora e de onde brota a verdadeira adoração. A Bíblia nos chama a viver pelo Espírito.
A natureza do espírito
O espírito está pronto, mas a carne é fraca. A batalha entre carne e espírito é constante e exige vigilância.
तुम्ही परीक्षेत पडू नये म्हणून सावध राहा आणि प्रार्थना करा. आत्मा उत्सुक आहे, परंतु देह अशक्त आहे."
"धन्य आहेत ते, जे आत्म्याने नम्र आहेत,
कारण स्वर्गाचे राज्य त्यांचे आहे.
दैहिक इच्छा आत्म्याविरुद्ध आहे व आत्मा देहाविरुद्ध आहे. ते आपसात विरोधी आहेत, यासाठी की ज्यागोष्टी तुम्ही केल्या पाहिजे त्या तुम्ही करू नये.
मी तुम्हाला सांगतो, आत्म्याच्या प्रेरणेने चला, मग तुम्ही देहवासना पूर्ण करणारच नाही.
परंतु आत्म्याचे फळ प्रीती, आनंद, शांती, सहनशीलता, दयाळूपणा, चांगुलपणा, विश्वासूपणा, सौम्यता व आत्मसंयमन; अशांविरुद्ध नियमशास्त्र नाही.
जर आपण आत्म्याच्या सामर्थ्याने जगतो, तर आत्म्याच्या प्रेरणेने चालावे.
मन दैहिक असणे म्हणजे मरण आहे; पवित्र आत्म्याने नियंत्रित मनाला जीवन व शांती लाभते,
O Espírito de Deus em nós
Vosso corpo é templo do Espírito Santo. Deus fortalece com poder no homem interior pelo seu Espírito.
तुमचे शरीर परमेश्वराने तुम्हाला दिलेल्या पवित्र आत्म्याचे मंदिर आहे आणि ते तुमच्यामध्ये राहतात, हे तुम्हाला माहीत नाही काय? तुम्ही स्वतःचे नाही; कारण तुम्हाला किंमत देऊन विकत घेतले आहे, म्हणून तुमच्या शरीराने परमेश्वराचे गौरव करा.
परंतु जो कोणी प्रभूशी जडला आहे तो आत्म्याने त्यांच्याशी एक झाला आहे.
एखाद्या व्यक्तीचे विचार त्या व्यक्तीच्या आत्म्याशिवाय इतर कोणाला समजतात का? त्याचप्रमाणे परमेश्वराचे विचार परमेश्वराच्या आत्म्याशिवाय कोणालाही माहीत नाहीत.
मी काय करावे? मी आत्म्याने प्रार्थना करेन, परंतु माझ्या बुद्धीनेही प्रार्थना करेन, मी आत्म्याने गीते गाईन व त्याचबरोबर बुद्धीनेही गीते गाईन.
मी प्रार्थना करतो की आपल्या गौरवशाली संपत्तीनुरूप आपल्या पवित्र आत्म्याचे सामर्थ्य देऊन त्यांनी तुम्हाला अंतर्यामी शक्तिसंपन्न करावे. ज्यामुळे ख्रिस्त विश्वासाद्वारे तुमच्या हृदयात राहतील व तुम्ही प्रीतीमध्ये खोल मुळावलेले व स्थिर व्हावे अशी मी प्रार्थना करतो,
माझे हे मागणे आहे, की तुम्ही त्यांना अधिक चांगल्या रीतीने ओळखावे म्हणून परमेश्वर, जे आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताचे गौरवशाली पिता, यांनी तुम्हाला ज्ञान व प्रकटीकरणाचा आत्मा द्यावा.
पुन्हा भीती बाळगावी असा दास्यतेचा आत्मा तुम्हाला मिळालेला नाही; याउलट असा आत्मा मिळाला आहे की ज्यामुळे तुम्ही दत्तकपुत्र झाला आहात आणि, "अब्बा, बापा" अशी हाक मारू शकता. कारण पवित्र आत्मा स्वतः आपल्या आत्म्याबरोबर साक्ष देतो की आपण परमेश्वराची मुले आहोत.
कारण पवित्र आत्मा स्वतः आपल्या आत्म्याबरोबर साक्ष देतो की आपण परमेश्वराची मुले आहोत.
पुन्हा भीती बाळगावी असा दास्यतेचा आत्मा तुम्हाला मिळालेला नाही; याउलट असा आत्मा मिळाला आहे की ज्यामुळे तुम्ही दत्तकपुत्र झाला आहात आणि, "अब्बा, बापा" अशी हाक मारू शकता.
जर ख्रिस्त तुम्हामध्ये आहे, आणि पापामुळे तुमचे शरीर मरण पावले; पण नीतिमत्वामुळे तुमचा आत्मा जिवंत राहील.
कारण ज्यांना परमेश्वराचा आत्मा चालवितो, ती परमेश्वराची लेकरे आहेत,
त्याच प्रकारे, पवित्र आत्माही आपल्या अशक्तपणात आपणास साहाय्य करतो. कारण प्रार्थना कशासाठी करावी हे आपल्याला समजत नाही, पण पवित्र आत्मा आपल्यासाठी शब्दाविना कण्हण्याने मध्यस्थी करतो.
आस्थेमध्ये कमी पडू नका, तर आपला आध्यात्मिक आवेश कायम राखा व प्रभूची सेवा करा.
तुम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवल्यामुळे आशेचे परमेश्वर तुम्हाला सर्व आनंदाने आणि शांतीने भरो, यासाठी की तुमच्यामध्ये असणार्या पवित्र आत्म्याच्या सामर्थ्यात विपुल आशेमध्ये तुम्ही वाढत जावे.
Vida no Espírito
Deus é Espírito e importa que os que o adoram o adorem em espírito e em verdade. O Espírito vivifica e transforma.
परमेश्वर आत्मा आहे आणि त्यांच्या भक्तांनी त्यांची उपासना आत्म्याने व खरेपणानेच करावयास पाहिजेत."
अशी वेळ येत आहे आणि आली आहे की खरे उपासक पित्याची उपासना आत्म्याने व खरेपणाने करतील. पिता अशाच प्रकारच्या उपासकांना शोधीत आहे. परमेश्वर आत्मा आहे आणि त्यांच्या भक्तांनी त्यांची उपासना आत्म्याने व खरेपणानेच करावयास पाहिजेत."
आपण जे सर्व, मुखावर आच्छादन नसलेले; ते आपण प्रभूचे वैभव प्रतिबिंबित करणारे आहोत. ते आपण वाढत जाणार्या तेजासह त्यांच्या प्रतिमेप्रमाणे बदलत जात आहोत. हे सर्व प्रभूपासून आहे जे आत्मा आहेत.
यास्तव, आपल्याला अशी अभिवचने मिळाली आहेत, म्हणून प्रिय मित्रांनो देहाला व आत्म्याला अशुद्ध करणार्या सर्व गोष्टींपासून आपण स्वतःला शुद्ध करू या आणि परमेश्वराविषयी आदरयुक्त भय बाळगून आपल्या पवित्रतेला सिद्ध करू या.
कारण परमेश्वराने आम्हाला भित्रेपणाचा आत्मा नाही, तर सामर्थ्य, प्रीती आणि आत्मसंयमनाचा आत्मा दिला आहे.
कारण परमेश्वराने आम्हाला भित्रेपणाचा आत्मा नाही, तर सामर्थ्य, प्रीती आणि आत्मसंयमनाचा आत्मा दिला आहे.
कारण जे काही मला झाले त्यातून, तुमच्या प्रार्थनेद्वारे आणि येशू ख्रिस्ताच्या पवित्र आत्म्याच्या पुरवठ्याने माझी सुटका होईल हे मला माहीत आहे.
आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा तुमच्या आत्म्यासोबत असो. आमेन.
Promessas do Espírito
Derramarei o meu Espírito sobre toda a carne. O Espírito revela, guia e capacita os filhos de Deus.
मी केलेली कान उघाडणी लक्षात घेऊन आणि पश्चात्ताप करा!
तेव्हा मी माझे विचार तुम्हाला कळवेन,
तुम्हाला माझ्या शिक्षणाची माहिती करून देईन.
मनुष्यास वाटते कि त्याचे सर्व मार्ग शुद्ध आहेत,
परंतु याहवेह त्याचा उद्देश पारखतात.
नाशापूर्वी गर्व
आणि अधःपातापूर्वी मग्रूरी येते.
गर्विष्ठांबरोबर राहून लूट वाटून घेण्यापेक्षा
दीनांबरोबर नम्रचित्त असणे बरे.
योद्धा असण्यापेक्षा शांत स्वभावी असणे बरे,
शहर जिंकून घेणार्यापेक्षा स्वतःवर ताबा ठेवणारा उत्तम.
मनुष्याचा आत्मा याहवेहचा दीप आहे.
तो मनुष्याच्या अंतःकरणावर प्रकाश टाकतो.
मग तो मला म्हणाला, "जरूब्बाबेलासाठी याहवेहचा हा संदेश आहे: ‘बलाने नव्हे, पराक्रमाने नव्हे, तर माझ्या आत्म्याने कार्यसिद्धी होईल,’ असे सर्वसमर्थ याहवेह म्हणतात.
सार्वभौम याहवेहचा आत्मा मजवर आहे,
कारण गरिबांना शुभवार्ता सांगण्यासाठी
याहवेहने माझा अभिषेक केला आहे.
भग्नहृदयी लोकांचे सांत्वन करण्यासाठी,
कैद्यांना सुटका जाहीर करण्यासाठी
व अंधकारातून बंदिवानांना मुक्त करण्यासाठी त्यांनी मला पाठविले आहे.
मी त्यांना अविभाजित हृदय देईन आणि त्यांच्यात नवीन आत्मा घालेन; मी त्यांच्यामधून त्यांचे दगडरुपी हृदय काढून त्यांना मांसमय हृदय देईन. तेव्हा ते माझे विधी आचरणात आणतील व काळजीपूर्वक माझे नियम पाळतील. ते माझे लोक होतील आणि मी त्यांचा परमेश्वर होईन.
या हाडांना सार्वभौम याहवेह म्हणतात: मी तुमच्यात श्वास घालेन आणि तुम्ही जिवंत व्हाल.
Cuidar do espírito
Cria em mim um coração puro e renova dentro de mim um espírito reto. O espírito quebrantado Deus não rejeita.
परमेश्वरा, माझ्यामध्ये शुद्ध हृदय निर्माण करा
आणि माझ्यात स्थिर असा आत्मा पुनर्स्थापन करा.
मला आपल्या समक्षतेतून दूर करू नका
व तुमचा पवित्र आत्मा मजमधून काढून घेऊ नका.
तुमच्या तारणाचा आनंद मला पुनरपि द्या
आणि स्वतःला सावरून घेण्यासाठी मला राजीपणाचा आत्मा द्या.
भग्न आत्मा हेच माझे अर्पण आहे,
हे परमेश्वरा, पश्चात्तापी आणि अनुतप्त हृदय
तुम्ही धिक्कारणार नाही.
याहवेह भग्नहृदयी लोकांच्या अगदी जवळ असतात
आणि जे पश्चात्तापी आत्म्याचे आहेत त्यांचे ते तारण करतात.
तुम्ही अधिपतींवर भरवसा ठेवू नका; ते केवळ मानव आहेत;
तारण करण्याचे सामर्थ्य त्यांच्याजवळ नाही.
कारण जेव्हा त्यांचे प्राण जातात, त्यांचे शरीर भूमीत परत जाऊन मिळते;
त्या दिवशी त्यांनी केलेल्या सर्व योजना नष्ट होतात.
कारण परमेश्वराचे वचन जिवंत व सक्रिय आहे. ते कोणत्याही दुधारी तलवारीहून अधिक तीक्ष्ण असून जीव आणि आत्मा, सांधे आणि मज्जा यांना खोलवर भेदून जाणारे व अंतःकरणातील विचार आणि वृत्ती यांचा न्याय करणारे आहे.
जसे शरीर आत्म्यावाचून निर्जीव आहे, तसा विश्वासही क्रियांवाचून निर्जीव आहे.
प्रिय मित्रांनो, प्रत्येक आत्म्यावर विश्वास ठेवू नका, परंतु ते आत्मे परमेश्वराकडून आलेले आहेत का याची परीक्षा करा, कारण पुष्कळ खोटे संदेष्टे जगामध्ये निघालेले आहेत.
ते आपल्यामध्ये राहतात व आपण त्यांच्यामध्ये राहतो, याचा पुरावा हा आहेः त्यांनी स्वतःचा पवित्र आत्मा आपल्याला दिला आहे.
तर तुम्ही दुष्ट असताना तुमच्या लेकरांना चांगल्या देणग्या देण्याचे तुम्हाला समजते, तर मग स्वर्गीय पित्याजवळ जे मागतात, त्यांना ते कितीतरी विपुलतेने पवित्र आत्मा देणार!"
त्यावेळी अग्नीच्या जिभांसारख्या दिसणार्या जिभा वेगवेगळ्या होऊन प्रत्येकावर एकएक अशा स्थिरावताना त्यांना दिसल्या. तिथे उपस्थितीत असलेले सगळे जण पवित्र आत्म्याने भरले आणि आत्म्याने हे करण्यास त्यांना समर्थ केल्यामुळे ते वेगवेगळ्या भाषेत व्या वचनातही बोलू लागले.
परमेश्वराने प्रथम आकाश व पृथ्वी निर्माण केली. आता पृथ्वी निराकार आणि रिकामी होती, खोलवर अंधार पसरला होता आणि परमेश्वराचा आत्मा पाण्यावर पाखर घालीत होता.
परंतु व्यक्तीमध्ये असलेला तो आत्मा,
आणि सर्वसमर्थाचा श्वासच आहे की जो शहाणपण देतो.
आयुष्याचा चांदीचा दोर तुटण्याआधी,
आणि सोन्याचे भांडे फुटण्याआधी;
झर्यावरील घागर फुटण्याआधी,
आणि विहिरीवरील रहाट मोडण्याआधी,
आणि माती जिथून आली तिथे जाण्याआधी,
आणि परमेश्वराने दिलेला आत्मा त्याकडे
परतण्याआधी आपल्या निर्माणकर्त्याचे स्मरण कर.
परमोच्च परमेश्वराने मला जी चिन्हे व चमत्कार दाखविले ते तुम्ही सर्वांना सांगण्यात मला आनंद होत आहे.
किती महान त्यांनी प्रकट केलेली चिन्हे,
किती थोर त्यांनी केलेले चमत्कार!
त्यांचे राज्य सदासर्वकाळचे आहे;
त्यांचे प्रभुत्व पिढ्यान् पिढ्या राहणारे आहेत.