Estudar a Bíblia
Estudar a Bíblia é mergulhar na mente de Deus. A Palavra é lâmpada para os pés, espada do Espírito e alimento para a alma. O cristão que estuda cresce em sabedoria e maturidade.
A importância do estudo
Os bereanos eram mais nobres porque examinavam as Escrituras diariamente. Estudar a Bíblia é mandamento e privilégio.
तेथील लोक थेस्सलनीकातल्या लोंकापेक्षा मोठया मनाचे होते; त्यांनी मोठ्या उत्सुकतेने वचनाचा स्वीकार केला आणि या गोष्टी अशाच आहेत की काय ह्याविषयी ते शास्त्रलेखात दररोज शोध करीत गेले.
तू सत्याचे वचन योग्य रीतीने सांगणारा असा आणि जे काम करतोस त्यामध्ये लाज वाटण्यासारखे काहीही कारण नसलेला देवास स्वीकृत असा कामकरी होण्याचा प्रयत्न कर.
तुला माहीत आहे की, तू आपल्या बाल्यावस्थेत असल्यापासूनच तुला पवित्र शास्त्राची माहिती आहे. ते ख्रिस्त येशूमधील विश्वासाच्याद्वारे तुला शहाणे बनवण्याचे व तारणाकडे घेऊन जाण्याचे सामर्थ्य आहे. प्रत्येक शास्त्रलेख देवाच्या प्रेरणेने लिहिला असल्यामुळे तो शिकवण्यास, वाईटाचा निषेध करण्यास, चुका सुधारण्यास व योग्य जीवन जगण्याचे मार्गदर्शन करण्यास उपयुक्त आहे. यासाठी की, देवाचा मनुष्य तरबेज होऊन पूर्णपणे प्रत्येक चागंल्या कामासाठी सज्ज व्हावा.
मी येईपर्यंत वाचणे, बोध करणे व शिकवणे, याकडे लक्ष्य लाव.
तुम्ही शास्त्रलेख शोधता, कारण तुम्ही असे मानता की, त्याद्वारे आपल्याला सार्वकालिक जीवन मिळेल आणि तेच शास्त्रलेख माझ्याविषयी साक्ष देणारे आहेत.
Meditar e guardar
Não se aparte a lei do Senhor da tua boca. Medita nela de dia e de noite para que cumpras tudo o que nela está escrito.
नियमशास्त्राचा हा ग्रंथ तुझ्या मुखातून निघून जाऊ नये म्हणून रात्रंदिवस त्याचे मनन कर, त्या जे काही लिहिले आहे ते सर्व तू पाळ. मग तुझी भरभराट होईल आणि तू यशस्वी होशील.
नून
तुझे वचन माझ्या पावलाकरता दिवा आहे,
आणि माझ्या मार्गासाठी प्रकाश आहे.
मेम
अहाहा, तुझे नियमशास्त्र मला किती प्रिय आहेत!
दिवसभर मी त्याच्यावर मनन करतो.
तुझ्या आज्ञा मला माझ्या शत्रूंपेक्षा ज्ञानी करतात,
कारण तुझे नियम नेहमी माझ्याजवळ आहेत.
माझ्या सर्व शिक्षकांपेक्षा मला अधिक बुद्धी आहे.
कारण मी तुझ्या कराराच्या निर्बंधाचे मनन करतो.
बेथ
तरुण मनुष्य आपला मार्ग कशाने शुध्द राखील?
तुझ्या वचनाचे पालन करण्याने.
मी आपल्या मनापासून तुझा शोध केला आहे;
तुझ्या आज्ञांपासून मला बहकू देऊ नकोस.
मी तुझ्याविरुध्द पाप करू नये
म्हणून तुझे वचन आपल्या हृदयात साठवून ठेवले आहे.
हे परमेश्वरा, तू धन्य आहेस;
मला तुझे नियम शिकव.
मी आपल्या मुखाने तुझ्या तोंडचे
सर्व योग्य निर्णय जे तू प्रकट केले ते जाहीर करीन.
तुझ्या आज्ञेच्या कराराचा मार्ग हीच माझी सर्व धनसंपत्ती
असे मानून मी त्यामध्ये अत्यानंद करतो.
मी तुझ्या नियमांचे मनन करीन,
आणि तुझ्या मार्गाकडे लक्ष देईन.
मी तुझ्या नियमांनी आनंदित होईन;
मी तुझे वचन विसरणार नाही.
मी जेव्हा तुझे न्याय्य निर्णय शिकेन,
तेव्हा मी मनःपूर्वक तुला धन्यवाद देईन.
Estudo diligente
Esdras preparou o coração para buscar e ensinar a lei. O estudo exige disciplina, constância e coração aberto.
पहिल्या महिन्याच्या पहिल्या दिवशी त्याने बाबेल सोडले. देवाचा चांगला हात त्याच्याबरोबर असल्यामुळे, तो पाचव्या महिन्याच्या पहिल्या दिवशी यरूशलेमेला पोहोंचला. एज्राने परमेश्वराच्या नियमशास्त्राचे मन:पूर्वक अध्ययन करून त्याचे पालन करण्यास, व इस्राएलांस त्यातील नियम व विधी शिकविण्यात आपले मन लावले.
आणि आपला देव परमेश्वर ह्यावर संपूर्ण अंत:करणाने, संपूर्ण मनाने व संपूर्ण शक्तीने प्रेम करा. मी आज दिलेल्या आज्ञा तुमच्या कायम लक्षात असू द्या. त्या आपल्या मुलाबाळांनाही शिकवा. घरी-दारी, झोपता उठता त्याविषयी बोलत राहा. त्या लिहून आठवणीसाठी हाताला चिन्हादाखल बांधा व कपाळावर चिकटवा. दरवाजाच्या खांबांवर व फाटकांवर त्या लिहून ठेवा.
राज्य करायला लागल्यावर त्याने स्वत:साठी नियमशास्त्राची एक नक्कल वहीत लिहून ठेवावी. याजक, लेवी यांनी आपल्याजवळ ठेवलेल्या पुस्तकातून ती करावी व जन्मभर त्याचे अध्ययन करावे. नियमशास्त्रातील सर्व आज्ञांचे त्याने पालन करावे व अशा रीतीने तो परमेश्वर देवाचे भय बाळगायला शिकेल. म्हणजे आपल्या प्रजेपेक्षा, भाऊबंदापेक्षा आपण कोणी उच्च आहोत अशी जाणीव त्यास स्पर्श करणार नाही. तो नियमांपासून विचलीत होणार नाही. अशाप्रकारे वागल्यास तो व त्याचे वंशज इस्राएलावर दीर्घकाळ राज्य करतील.
नीतिसूत्रांचे मोल
इस्राएलाचा राजा, दावीदाचा पुत्र शलमोन, याची ही नितीसूत्रे.
ज्ञान व शिक्षण शिकावे,
बुद्धीच्या वचनाचे ज्ञान मिळवावे,
सुज्ञतेचे शिक्षण घेऊन जे योग्य, न्यायी, आणि चांगले ते करण्यास शिकावे,
भोळ्यांना शहाणपण
आणि तरुणांना ज्ञान व दूरदर्शीपणा द्यावे,
ज्ञानी व्यक्तीने ऐकावे आणि त्याने ज्ञानात वाढावे,
बुद्धीमान व्यक्तीला मार्गदर्शन मिळावे,
ज्ञानी लोकांची वचने आणि त्याची गूढरहस्ये समजावी,
म्हणून म्हणी व सुवचने ह्यासाठी ही आहेत.
आज्ञांकितपणाचा आदेश
माझ्या मुला, माझ्या आज्ञा विसरु नकोस,
आणि माझी शिकवण तुझ्या हृदयात ठेव;
कारण त्यापासून दीर्घायुष्य, वयोवृद्धी
आणि शांती ही तुला अधिक लाभतील.
शिस्त घट्ट धरून ठेव, ती सोडून देऊ नको;
ते सांभाळून ठेव, कारण ते तुझे जीवन आहे.
कारण ती आज्ञा दिवा आहेत आणि शिक्षण प्रकाश आहे;
शिस्तीचा दोषारोप जीवनाचा मार्ग आहे.
Proteção e crescimento
Quem ignora a Palavra perece. Toda Escritura é útil — crescei na graça e no conhecimento do nosso Senhor.
माझे लोक ज्ञान नसल्याने नाश पावत आहेत.
कारण तुम्ही ज्ञानास नाकारले म्हणून
मी सुध्दा तुम्हास माझे याजक म्हणून नाकारीन.
माझे, तुमच्या देवाचे नियमशास्त्र
तुम्ही विसरलात म्हणून मी ही तुमच्या मुलांना विसरेन.
म्हणून तुम्ही नियमशास्त्र व विधी याकडे लक्ष दिले पाहीजे! ते अशा गोष्टी बोलत नाहीत कारण त्यांना प्रभात प्रकाश नाही.
येशू त्यांना म्हणाला, "खात्रीने, शास्त्रलेख आणि देवाचे सामर्थ्य तुम्हास माहीत नाही म्हणून तुम्ही अशी चूक करीत आहात.
कारण ज्या गोष्टी पूर्वी लिहिण्यात आल्या त्या आपल्या शिक्षणासाठी लिहिण्यात आल्या; म्हणजे आपण धीराने व शास्त्रलेखाकडून मिळणार्या उत्तेजनाने आशा धरावी.
तर प्रियजनहो, तुम्हास या गोष्टी तुम्हास पूर्वीपासून कळत आहेत, म्हणून तुम्ही अनीतिमान लोकांच्या भ्रांतीप्रवाहात सापडून आपल्या स्थिरतेतून ढळू नये ह्यासाठी जपून राहा. आणि आपला प्रभू व तारणारा येशू ख्रिस्त ह्याच्या कृपेत व ज्ञानात वाढत जा. त्यास आता आणि सर्वकाळपर्यंत गौरव असो. आमेन.
तुम्हास प्राप्त होणार्या कृपेविषयी ज्या संदेष्ट्यांनी संदेश सांगितले ते या तारणाविषयी विचार व शोध करीत होते. त्यांच्यामधील ख्रिस्ताचा आत्मा जेव्हा ख्रिस्ताच्या दुःखांविषयी व त्यानंतरच्या त्याच्या जिवंत उठण्याच्या गौरवी गोष्टींविषयी पूर्वीच सांगितले होते, तेव्हा त्याने कोणता किंवा कोणत्या प्रकारचा काळ दर्शवला याचा ते विचार करीत होते.