Falar
A Bíblia tem muito a ensinar sobre a arte de falar. As palavras têm poder de vida e de morte — podem edificar ou destruir, curar ou ferir, aproximar ou afastar.
O poder das palavras
A morte e a vida estão no poder da língua. A palavra branda desvia a ira, mas a palavra dura suscita o furor.
जिभेत जीवन आणि मृत्यूचे सामर्थ्य आहे.
आणि जे तिच्यावर प्रेम करतात त्यांना तिचे प्रतिफळ मिळते.
कोमल उत्तराने राग शांत होतो,
परंतु कठोर शब्द क्रोध वाढवितात.
सांत्वन करणारी जीभ जीवनदायी वृक्ष आहे,
पण विकृत जीभ आत्म्याला चिरडते.
समर्पक उत्तर देण्यात प्रत्येकाला आनंद वाटतो—
योग्य वेळी उपयुक्त सल्ला मिळणे किती महत्त्वाचे आहे!
उपयुक्त सल्लागार नसले की योजना विफल होतात;
परंतु अनेक सल्लागारांमुळे योजना यशस्वी होतात.
Falar com sabedoria
No muito falar não falta transgressão. A boca do justo fala sabedoria, e quem guarda os lábios guarda a si mesmo.
शब्द बहुगुणित करून पापाचा अंत होत नसतो;
पण सुज्ञ लोक त्यांच्या जिभेवर ताबा ठेवतात.
जो आपल्या जिभेवर नियंत्रण ठेवतो, तो स्वतःचे जीवन सुरक्षित ठेवतो,
परंतु जो विचार न करता बोलतो, त्याचा नाश होतो.
जर ते शांत राहिले तर मूर्खही शहाणे समजले जातात,
आणि जर त्यांच्या जिभेवर त्यांनी ताबा ठेवला, तर ते विवेकशील मानले जातात.
चहाडी करण्याने विश्वासघात होतो,
परंतु विश्वासपात्र मनुष्य गुपित उघड करीत नाही.
जे स्वतःसाठी बोलण्यास असमर्थ आहेत, त्यांच्यातर्फे बोल,
जे सर्व निराश्रित आहेत त्यांच्या हक्कासाठी तू बोल.
सुज्ञ व्यक्तीच्या मुखातील शब्द कृपेचे असतात,
पण मूर्खाचे ओठ त्याचाच नाश करतात.
Falar a verdade
Cada palavra ociosa será pesada no dia do juízo. Fale a verdade, edifique com a boca e confesse Cristo com os lábios.
मी तुम्हाला सांगतो की न्यायाच्या दिवशी प्रत्येकाला त्याच्या प्रत्येक निरर्थक शब्दाबद्दल जाब द्यावा लागणार आहे.
"तुझ्या भावाने किंवा बहिणीने पाप केले असेल, तर त्याची चूक त्याला समजावून सांग, परंतु हे तुमच्या दोघांमध्ये असू दे. त्यांनी तुझे ऐकले, तर तू त्यांना परत मिळविले आहेस.
आणि तुम्ही प्रार्थना करता, तेव्हा गैरयहूदी लोकांप्रमाणे निरर्थक बडबड करू नका, त्यांच्या पुष्कळ बोलण्यामुळे त्यांचे म्हणणे ऐकले जाईल असे त्यांना वाटते.
जे तुम्ही अंधारात सांगितले आहे, ते दिवसाच्या प्रकाशात ऐकले जाईल; जे तुम्ही आतील खोलीत कानात सांगितले, ते घराच्या धाब्यावरून जाहीर केले जाईल.
कारण अंतःकरणात जे भरलेले असते तेच मुखातून बाहेर पडते. चांगला मनुष्य त्याच्या अंतःकरणात ज्या चांगल्या गोष्टी साठविलेल्या आहेत त्या बाहेर काढतो, तर दुष्ट अंतःकरणाचा मनुष्य वाईट गोष्टी बाहेर काढतो.
"येशू प्रभू आहे," असे तुम्ही मुखाने जाहीर कराल व परमेश्वराने त्यांना मेलेल्यातून उठविले असा तुमच्या अंतःकरणात विश्वास धराल, तर तुमचे तारण होईल.
त्याच प्रकारे, पवित्र आत्माही आपल्या अशक्तपणात आपणास साहाय्य करतो. कारण प्रार्थना कशासाठी करावी हे आपल्याला समजत नाही, पण पवित्र आत्मा आपल्यासाठी शब्दाविना कण्हण्याने मध्यस्थी करतो.
Edificar com palavras
Não saia da boca nenhuma palavra torpe. Sejam prontos para ouvir, tardios para falar, e tardios para a ira.
आपल्या मुखाद्वारे अपायकारक शब्द बाहेर पडू देऊ नका. परंतु प्रसंगाला अनुसरून ऐकणार्यांसाठी उपयुक्त व त्यांच्या वृद्धीसाठी कारणीभूत होईल असे बोला.
माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो, हे लक्षात घ्या, प्रत्येकजण ऐकावयास शीघ्र, बोलावयास सावकाश व रागास मंद असावा.
आपण सर्वजण अनेक प्रकारे अडखळतो. जर कोणी बोलण्यात कधीही चुकत नाही, तर तो परिपूर्ण आहे व आपले सर्व शरीर ताब्यात ठेवण्यास समर्थ आहे.
वाईटाची फेड वाईटाने किंवा अपमानाची फेड अपमानाने करू नका. याउलट, वाईटाची फेड आशीर्वाद देऊन करा, कारण आशीर्वाद हे वतन मिळविण्यासाठी तुम्हाला पाचारण करण्यात आले आहे.
प्रिय लेकरांनो, आपण शब्दांनी किंवा कोरड्या बोलण्याने प्रीती करू नये, परंतु कृतीने आणि सत्याने प्रीती करावी.
याहवेहचे स्तवन करा, त्यांच्या नावाची घोषणा करा;
त्यांनी केलेली अद्भुत कृत्ये सर्व राष्ट्रात जाहीर करा.
माझे मुख तुमच्या स्तुतीने भरलेले असते,
दिवसभर तुमच्या वैभवाची घोषणा करतो.