Família de Deus
A família de Deus transcende laços de sangue. Em Cristo, somos adotados como filhos, irmãos uns dos outros e membros de uma família eterna — a Igreja.
Adotados por Deus
Recebemos o espírito de adoção pelo qual clamamos: Abba, Pai! Se filhos, também herdeiros — herdeiros de Deus e co-herdeiros com Cristo.
पुन्हा भीती बाळगावी असा दास्यतेचा आत्मा तुम्हाला मिळालेला नाही; याउलट असा आत्मा मिळाला आहे की ज्यामुळे तुम्ही दत्तकपुत्र झाला आहात आणि, "अब्बा, बापा" अशी हाक मारू शकता. कारण पवित्र आत्मा स्वतः आपल्या आत्म्याबरोबर साक्ष देतो की आपण परमेश्वराची मुले आहोत. ज्याअर्थी आपण मुले आहोत, त्याअर्थी आपण परमेश्वराचे वारस, ख्रिस्ताबरोबर सहवारस आहोत, जर आम्ही खरोखर त्यांच्या दुःखात सहभागी होतो, तर त्यांच्या गौरवात सुद्धा सहभागी होऊ.
परंतु काळाची पूर्णता झाल्यावर परमेश्वराने आपल्या पुत्राला पाठविले; ते स्त्रीपासून जन्मलेले, नियमांच्या अधीन असे जन्मले होते. जे आपण नियमांच्या अधीन होतो, त्या आपल्याला खंडणी देऊन सोडवावे आणि पुत्र म्हणून दत्तक घ्यावे. कारण तुम्ही त्यांचे पुत्र आहात, म्हणूनच परमेश्वराने त्यांचा आत्मा आमच्या हृदयात पाठविला आहे, त्याद्वारेच आपण, "अब्बा, पिता अशी त्यांना हाक मारतो." आता आपण दास नसून परमेश्वराची लेकरे झालो आहोत, जर लेकरे आहोत, तर परमेश्वराने आपल्याला त्यांचे वारसही केले आहे.
कारण आता आपण ख्रिस्त येशूंवरील विश्वासाच्याद्वारे परमेश्वराची लेकरे आहोत. ज्या आपण सर्वांनी ख्रिस्तामध्ये बाप्तिस्मा घेतला आहे, त्या आपण ख्रिस्ताला परिधान केले आहे. आता कोणी यहूदी किंवा गैरयहूदी, गुलाम किंवा स्वतंत्र, स्त्री किंवा पुरुष नाहीत, तर आपण सर्व ख्रिस्त येशूंमध्ये एक आहोत,
त्यांच्या आनंदास आणि इच्छेस अनुसरून येशू ख्रिस्ताद्वारे आपण दत्तकपुत्र व्हावे, ही त्यांची पूर्व योजना होती; त्यांच्या प्रिय पुत्राद्वारे आपल्याला मुक्तपणे दिलेल्या गौरवयुक्त कृपेची स्तुती व्हावी.
इफिसकरांसाठी प्रार्थना
या कारणासाठी मी पित्यासमोर गुडघे टेकतो, स्वर्गातील व पृथ्वीवरील प्रत्येक कुटुंबाला त्यांच्याद्वारे नाव देण्यात आले आहे.
परंतु ज्या सर्वांनी त्यांना स्वीकारले, त्यांच्या नावावर विश्वास ठेवला, त्यांना परमेश्वराची मुले होण्याचा अधिकार दिला— ज्या लेकरांचा जन्म ना वंशाने, ना मानवी इच्छेने किंवा पतीच्या इच्छेने, तर परमेश्वरापासून झाला.
A comunidade de fé
Não abandonem a congregação. Somos um corpo em Cristo, membros uns dos outros, chamados a amar e a servir.
आपण कित्येकांच्या सवयीप्रमाणे आपले एकत्रित मिळणे न सोडता एकमेकांना उत्तेजन द्यावे आणि तो दिवस जवळ येत असल्याचे तुम्हाला दिसते म्हणून तसे एकत्रित मिळून एकमेकांना अधिक उत्तेजन द्यावे.
तुम्ही धीराने शिस्त सहन करत आहात; परमेश्वर तुम्हाला पुत्राप्रमाणे वागवितात आणि लेकरांना शिस्त लावत नाही असा कोण पिता आहे? जर तुम्हाला शिस्त लावली नाही तर—सर्वांनाच शिस्तीला सामोरे जावे लागते—तुम्ही अनौरस आहात, तुम्ही या कुटुंबातील खरे पुत्र किंवा कन्या नाहीत. आपल्या सर्वांना शिस्त लावणारे मानवी पिता होते आणि त्यासाठी आपण त्यांचा मान राखतो, तर मग आपण आत्म्यांच्या पित्याच्या कितीतरी अधिक स्वाधीन होऊन जगावे! त्यांनी थोडे दिवस त्यांना योग्य वाटली तशी शिस्त लावली; परंतु परमेश्वर आपल्या हितासाठी शिस्त लावतात, म्हणजे आपण त्यांच्या पवित्रतेचे वाटेकरी व्हावे.
आपण ख्रिस्तामध्ये अनेक असलो, तरी एक शरीर आहोत व आपण सर्व एकमेकांचे अवयव आहोत.
जर एका अवयवाला दुःख झाले, तर त्याच्याबरोबर सर्व अवयवांना दुःख होते आणि एका अवयवांचा सन्मान झाला, तर सर्व अवयव आनंदित होतात.
या कारणाने तुम्ही आता परदेशी आणि परके नाही, तर परमेश्वराच्या लोकांबरोबर सहनागरिक आणि त्यांच्या कुटुंबाचे सदस्य झाला आहात. तुम्ही प्रेषित आणि संदेष्टे यांच्या भक्कम पायावर बांधलेले आहात, ज्याची मुख्य कोनशिला ख्रिस्त येशू आहेत. त्यांच्यामध्ये पूर्ण इमारत एकत्र जोडली जात असताना वाढत जाऊन प्रभूचे पवित्र मंदिर होत आहे. त्याचप्रमाणे तुम्हीही पवित्र आत्म्याद्वारे एकत्र बांधले गेले असताना परमेश्वराचे वसतिस्थान झाला आहात.
Quem é minha família?
Jesus disse: quem faz a vontade de Deus, esse é meu irmão e irmã. A família de Deus inclui todos os que creem.
यावर त्यांनी म्हटले, "कोण माझी आई आणि कोण माझे भाऊ?"
नंतर सभोवतालच्या समुदायाकडे नजर फिरवित ते म्हणाले, "ही माझी आई आणि माझे भाऊ आहेत! जो कोणी परमेश्वराच्या इच्छेप्रमाणे करतो तोच माझा भाऊ, तीच माझी बहीण आणि आई आहे."
आता दासाला कुटुंबात कायम राहता येत नाही, परंतु पुत्र तिथे सदासर्वदा राहतो.
येशूंनी त्यांना म्हटले, "परमेश्वर तुमचा पिता असता, तर तुम्ही मजवर प्रीती केली असती, कारण मी परमेश्वरापासून आलो आहे. मी स्वतः होऊन आलो नाही; परमेश्वराने मला पाठविले आहे.
विधवा, पाळक व दास याबाबत सल्ला
वडील मनुष्यास कठोरपणे बोलू नको, तर तो जणू काही आपला पिताच आहे, असे मानून आदराने त्यांना बोध कर. जसे भावांशी बोलावे तसे तरुणांशी बोल. वयस्कर स्त्रियांना मातेसमान वागणूक दे आणि तरूणींविषयी केवळ शुद्ध भावना बाळगून त्यांना बहिणींसमान वागणूक दे.
पित्याने आपण परमेश्वराची लेकरे म्हणून संबोधले जावे म्हणून पित्याने आपणावर किती मोठा अगाध प्रीतीचा वर्षाव केला आहे! आणि आपण तसे आहोतच! जग आपल्याला ओळखत नाही कारण जगाने त्यांना ओळखले नाही. प्रिय मित्रांनो, आपण आता परमेश्वराची लेकरे आहोत आणि आपण पुढे काय होऊ हे अजून आपल्याला ठाऊक झालेले नाही. परंतु जेव्हा ख्रिस्त प्रकट होतील तेव्हा जसे ख्रिस्त आहेत तसे आपण होणार, कारण जसे ते आहेत तसेच आपण त्यांना पाहू.
म्हणून शक्य होईल आणि जशी आपणास संधी मिळेल तसे आपण सर्वांचे भले करावे, विशेषकरून विश्वासणार्यांच्या कुटुंबाचे चांगले करावे.