Filho de Deus
Jesus é o Filho de Deus — a revelação suprema do Pai. Nele habita toda a plenitude da divindade e por Ele temos acesso ao Pai, à salvação e à vida eterna.
A revelação do Filho
O Filho é o resplendor da glória de Deus. Quem vê o Filho vê o Pai. Jesus é a imagem perfeita do Deus invisível.
पुत्र परमेश्वराच्या गौरवाचे प्रतिबिंब आणि त्याच्या व्यक्तिमत्वाचे हुबेहूब प्रतिरूप आहेत. ते आपल्या वचनाच्या महान शक्तीने सर्व गोष्टींना सुस्थिर ठेवतात. पापांची शुद्धी केल्यानंतर, ते स्वर्गामध्ये वैभवाच्या उजवीकडे बसले आहेत. अशा रीतीने ते देवदूतांपेक्षा अतिश्रेष्ठ झाले आणि जे नाव त्यांना बहाल केले ते देवदूतांच्या नावांहून अतिश्रेष्ठ आहे.
शब्दाने मानवी शरीर धारण केले व आमच्यामध्ये त्यांनी वास्तव्य केले. आम्ही त्यांचे गौरव पाहिले, ते गौरव एकमेव पुत्राचे, जो पित्यापासून आला व अनुग्रह व सत्याने परिपूर्ण होता त्यांचे होते.
परमेश्वराला कोणी कधीही पाहिलेले नाही, परंतु त्यांचा एकुलता एक पुत्र, जे स्वतः परमेश्वर आहेत आणि पित्याच्या निकट सहवासात राहतात, त्या पित्याने त्यांना प्रकट केले आहे.
येशूंनी त्यांच्या आरोपाला उत्तर दिले व म्हणाले, "माझा पिता या दिवसापर्यंत सतत कार्य करीत आहे आणि मी देखील कार्य करीत आहे." या कारणासाठी तर यहूदी पुढारी त्यांना जिवे मारण्यास अधिकच आतुर झाले; कारण त्यांनी शब्बाथ मोडला होता, एवढेच नव्हे, तर त्यांनी परमेश्वराला आपला पिता म्हणून स्वतःला परमेश्वरासमान केले होते.
Confissão e fé
Tu és o Cristo, o Filho do Deus vivo! Quem confessa que Jesus é o Filho de Deus, Deus permanece nele.
येशू कैसरीया फ़िलिप्पी प्रांतात आले, तेव्हा त्यांनी आपल्या शिष्यांना विचारले, "मानवपुत्र कोण आहे असे लोक म्हणतात?"
त्यांनी उत्तर दिले, "काहीजण म्हणतात बाप्तिस्मा करणारा योहान; काही एलीयाह म्हणतात; आणि आणखी काही यिर्मयाह किंवा संदेष्ट्यापैकी एक."
"परंतु तुमचे मत काय?" येशूंनी विचारले, "मी कोण आहे, असे तुम्ही म्हणता?"
शिमोन पेत्राने उत्तर दिले, "तुम्ही ख्रिस्त, जिवंत परमेश्वराचे पुत्र आहात."
येशूंचा बाप्तिस्मा झाल्याबरोबर ते पाण्यातून वर आले. त्याक्षणीच स्वर्ग उघडला आणि त्यांनी परमेश्वराचा आत्मा कबुतरासारखा आपल्यावर उतरतांना आणि स्थिरावताना पाहिला; आणि स्वर्गातून वाणी झाली, "हा माझा प्रिय पुत्र; त्याच्यावर मी संतुष्ट आहे."
येशू हे परमेश्वराचे पुत्र आहेत असे जर कोणी अंगीकृत करतात तर, त्यांच्यामध्ये परमेश्वर राहतात आणि ते परमेश्वरामध्ये राहतात.
परमेश्वराने आपल्यावरील प्रीती अशी प्रकट केलीः त्यांनी त्यांच्या एकुलत्या एका पुत्राला या जगात पाठविले यासाठी की, आपल्याला त्यांच्याद्वारे जीवन लाभावे. प्रीती हीच आहे: आपण परमेश्वरावर प्रीती केली असे नाही तर त्यांनी आपणावर प्रीती केली आणि आपल्या पापांसाठी त्यांच्या पुत्राला प्रायश्चिताचा बळी म्हणून पाठविले.
जो कोणी पापमय गोष्टी करतो ते सैतानापासून आहे, कारण सैतान प्रारंभापासूनच पाप करीत आला आहे. परंतु सैतानाची कृत्ये नष्ट करावी म्हणून परमेश्वराचे पुत्र प्रकट झाले.
ज्या कोणामध्ये परमेश्वराचा पुत्र वसतो, त्याच्यामध्ये जीवन आहे; ज्याच्यामध्ये परमेश्वराचा पुत्र वसत नाही, त्याच्यामध्ये जीवन नाही.
Vida no Filho
Deus enviou seu Filho ao mundo para que vivêssemos por Ele. O Filho dá vida, julga e reconcilia os pecadores com o Pai.
कारण परमेश्वराने जगावर एवढी प्रीती केली की त्यांनी आपला एकुलता एक पुत्र दिला, यासाठी की, जो कोणी त्यांच्यावर विश्वास ठेवतो, त्याचा नाश होऊ नये तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे.
कारण जसा पिता मेलेल्यास उठवून जीवन देतो, तसा पुत्रही त्याच्या मर्जीप्रमाणे ज्यांना पाहिजे त्यांना जीवन देतो. याशिवाय, पिता कोणाचाही न्याय करीत नाही, तर सर्व न्याय करण्याचे काम त्याने पुत्राकडे सोपविले आहे, यासाठी की जसा पित्याचा तसा सर्वांनी पुत्राचाही सन्मान करावा, जो पुत्राचा सन्मान करीत नाही तो, ज्याने पुत्राला पाठविले त्या पित्याचाही सन्मान करीत नाही.
मी निश्चित सांगतो, अशी वेळ येत आहे आणि आलेलीच आहे की त्यावेळी मेलेले लोक परमेश्वराच्या पुत्राची वाणी ऐकतील आणि जे ऐकतील, ते जिवंत राहतील. कारण ज्याप्रमाणे पित्यामध्ये जीवन आहे, त्याचप्रमाणे पुत्रामध्येही जीवन असावे अशी त्यांनी योजना केली आहे.
परंतु ज्या सर्वांनी त्यांना स्वीकारले, त्यांच्या नावावर विश्वास ठेवला, त्यांना परमेश्वराची मुले होण्याचा अधिकार दिला— ज्या लेकरांचा जन्म ना वंशाने, ना मानवी इच्छेने किंवा पतीच्या इच्छेने, तर परमेश्वरापासून झाला.
मी ख्रिस्ताबरोबर क्रूसावर खिळलेला आहे आणि मी जगतो असे नाही, तर ख्रिस्त माझ्यामध्ये जगतात. मी आता जे जीवन शरीरात जगतो ते मी परमेश्वराच्या पुत्रावर विश्वास ठेवून जगतो, ज्यांनी माझ्यावर प्रीती केली आणि स्वतःला माझ्यासाठी दिले.
परंतु काळाची पूर्णता झाल्यावर परमेश्वराने आपल्या पुत्राला पाठविले; ते स्त्रीपासून जन्मलेले, नियमांच्या अधीन असे जन्मले होते. जे आपण नियमांच्या अधीन होतो, त्या आपल्याला खंडणी देऊन सोडवावे आणि पुत्र म्हणून दत्तक घ्यावे. कारण तुम्ही त्यांचे पुत्र आहात, म्हणूनच परमेश्वराने त्यांचा आत्मा आमच्या हृदयात पाठविला आहे, त्याद्वारेच आपण, "अब्बा, पिता अशी त्यांना हाक मारतो."
आपण परमेश्वराचे शत्रू असताना, त्यांच्या पुत्राच्या मरणाद्वारे आपला समेट झाला, त्याअर्थी समेट झाल्यानंतर, कितीतरी अधिक त्यांच्या जीवनाद्वारे तारले जाऊ!
कारण आम्हासाठी एक बाळ जन्मले आहे,
आमच्यासाठी एक पुत्र दिला आहे,
आणि सत्ता त्यांच्या खांद्यावर असेल.
आणि त्यांना
अद्भुत सल्लागार, पराक्रमी परमेश्वर,
सार्वकालिक पिता, शांतीचा राजकुमार असे म्हणतील.