Filhos
Os filhos são herança do Senhor — bênção e responsabilidade sagrada. A Bíblia orienta sobre a criação dos filhos com amor, disciplina e instrução nos caminhos de Deus.
Herança do Senhor
Os filhos são herança do Senhor e o fruto do ventre é seu galardão. Bem-aventurado o homem que enche deles a sua aljava.
पाहा, मुले ही परमेश्वरापासून मिळालेले वतन आहे,
आणि पोटचे फळ त्याच्यापासून मिळालेली देणगी आहे.
तरुणपणाची मुले हे वीराच्या
हातातील बाणांसारखी आहेत.
ज्या मनुष्याचा भाता अशांनी भरला आहे, तो धन्य!
तो वेशीवर शत्रूंशी त्याची बोलाचाली होत असता,
ते फजीत होणार नाहीत.
जो प्रत्येकजन परमेश्वराचा आदर करतो,
जो त्याच्याच मार्गाने चालतो तो धन्यवादित आहे.
तू आपल्या हाताच्या श्रमाचे फळ खाशील, तू आनंदित होशील;
तू आशीर्वादित होऊन तुझी भरभराट होईल.
तुझी पत्नी तुझ्या घरात
फलदायी द्राक्षवेलीसारखी होईल;
तुझी मुले तुझ्या मेजाभोवती बसलेल्या
जैतूनाच्या रोपांसारखी होतील.
होय, खरोखर, जो मनुष्य परमेश्वराचा आदर करतो,
तो असा आशीर्वादित होईल.
जो प्रत्येकजन परमेश्वराचा आदर करतो,
जो त्याच्याच मार्गाने चालतो तो धन्यवादित आहे.
तू आपल्या हाताच्या श्रमाचे फळ खाशील, तू आनंदित होशील;
तू आशीर्वादित होऊन तुझी भरभराट होईल.
तुझी पत्नी तुझ्या घरात
फलदायी द्राक्षवेलीसारखी होईल;
तुझी मुले तुझ्या मेजाभोवती बसलेल्या
जैतूनाच्या रोपांसारखी होतील.
आमची मुले आपल्या तारुण्याच्या भरांत उंच वाढलेल्या रोपांसारखी आहेत.
आमच्या मुली राजवाड्याच्या कोपऱ्यातील कोरलेल्या खांबाप्रमाणे आहेत.
त्याचे वंशज पृथ्वीवर शक्तीमान होतील;
धार्मिक आशीर्वादित होतील.
देवाने त्यांना आशीर्वाद दिला, आणि त्यांना म्हटले, "फलद्रूप व्हा, बहुगुणित व्हा आणि पृथ्वी व्यापून टाका. ती आपल्या सत्तेखाली आणा; समुद्रातील मासे, आकाशातील पक्षी आणि पृथ्वीवर फिरणारा प्रत्येक सजीव प्राणी यांवर सत्ता चालवा."
परमेश्वराच्या आशीर्वादाने तुमची मुलेबाळे, तुमच्या भूमीचा उपज, व तुमची गुरेढोरे व त्यांची पिल्ले आशीर्वादीत होतील.
इतरांपेक्षा तुम्ही जास्त आशीर्वादीत व्हाल. प्रत्येक दांपत्याला मुले आणि मुली होतील. गाई वासरांना जन्म देतील.
Instruir e disciplinar
Instrui a criança no caminho em que deve andar, e quando envelhecer não se desviará dele. Disciplina é amor em ação.
मुलाने ज्या मार्गात चालावे त्याचे शिक्षण त्यास दे,
आणि जेव्हा तो मोठा होईल तेव्हा त्या मार्गांपासून तो मागे फिरणार नाही.
बालकाच्या हृदयात मूर्खता जखडलेली असते,
पण शिक्षेची काठी ती त्याच्यापासून दूर करील.
जर कोणी आपल्या मुलांना शिक्षा करत नाही तो त्यांचा द्वेष करतो,
पण जो कोणी आपल्या मुलांवर प्रेम करतो तो काळजीपूर्वक त्यांना शिस्त लावतो.
छडी आणि सुबोध ज्ञान देतात,
पण मोकळे सोडलेले मूल आपल्या आईला लाज आणते.
मुलाला शिक्षा करण्यास अवमान करू नको;
कारण जर तू त्यास छडीने मारले तर तो मरणार नाही.
मुलांनो, वडिलांचे शिक्षण ऐका,
आणि सुज्ञान समजण्यासाठी त्याकडे लक्ष द्या.
ही शलमोनाची नितीसूत्रे आहेत.
शहाणा मुलगा आपल्या वडिलांना सुखी करतो,
पण मूर्ख मुलगा आपल्या आईला दु:खी करतो.
मी आज दिलेल्या आज्ञा तुमच्या कायम लक्षात असू द्या. त्या आपल्या मुलाबाळांनाही शिकवा. घरी-दारी, झोपता उठता त्याविषयी बोलत राहा.
O amor de Deus por crianças
Deixai vir a mim as crianças. Jesus acolheu, abençoou e honrou as crianças como modelo de fé e humildade.
येशूने हे पाहिले तेव्हा तो रागवला आणि त्यांना म्हणाला, "लहान बालकांना माझ्याकडे येऊ द्या. त्यांना मना करू नका कारण देवाचे राज्य यांच्यासारख्यांचेच आहे.
वाईट असूनही जर तुम्हास आपल्या मुलांना चांगल्या गोष्टी देण्याचे कळते तर तुमच्या स्वर्गातील पित्याकडे जे मागतात, त्यांच्या गरजा तो किती चांगल्या प्रकारे भागवील?
येशू ज्ञानाने आणि शरीराने देवाच्या आणि मनुष्यांच्या कृपेत वाढत गेला.
जसा पिता आपल्या मुलांवर करुणा करतो,
तसा परमेश्वर आपला सन्मान करतात त्यावर करुणा करतो.
आपल्याला देवाची मुले हे नाव मिळाले ह्यात देव पित्याने आपल्याला केवढे प्रीतीदान दिले आहे पाहा आणि आपण तसे आहोत ह्यामुळे जग आपल्याला ओळखीत नाही कारण त्यांनी त्यास ओळखले नाही.
Bênção e promessa
O Senhor te abençoe e te guarde. Os filhos dos justos serão abençoados e suas gerações caminharão na retidão.
परमेश्वर तुला आशीर्वाद देवो व तुझे संरक्षण करो.
परमेश्वर आपला मुखप्रकाश तुझ्यावर पाडो, तुझ्याकडे पाहो व तुजवर दया करो.
परमेश्वर आपल्या प्रसन्नमुखासह तुजकडे पाहो व तुला शांती देवो.
देव तुला आकाशातले दव व भूमीची समृद्धी व भरपूर धान्य व द्राक्षरस देईल. लोक तुझी सेवा करोत व राष्ट्रे तुझ्यापुढे नमोत. तू तुझ्या भावांवर राज्य करशील. तुझ्या आईची मुले तुला नमन करतील. तुला शाप देणारा प्रत्येकजण शापित होईल आणि तुला आशीर्वाद देणारा प्रत्येकजण आशीर्वादित होईल."
कारण मी तहानलेल्या जमिनीवर पाणी ओतीन आणि मी कोरड्या जमिनीवर प्रवाह वाहतील.
मी तुझ्या संततीवर आपला आत्मा आणि तुझ्या मुलांवर आपला आशीर्वाद ओतीन.
पाण्याच्या प्रवाहाजवळ जसे वाळुंज, तसे ते गवतामध्ये उगवते.
आणि तुझ्या सर्व मुलांना परमेश्वर शिकवील; आणि तुमच्या मुलांची शांती महान असेल.
"मी तुला आईच्या उदरात घडवण्यापूर्वीच, मी तुला निवडले आहे,
आणि तू गर्भातून निघण्याआधीच मी तुला पवित्र केले आहे. मी तुला राष्ट्रांचा संदेष्टा असे केले आहे."
ते माझे लोक होतील आणि मी त्यांचा देव होईन. त्यांचे व त्यांच्यानंतर त्यांच्या वंशजानी त्यांच्या चांगल्यासाठी प्रत्येक दिवशी माझा आदर करावा म्हणून मी त्यांना एकच हृदय व एकच मार्ग देईन.
तू माझे अंतर्याम निर्माण केलेस;
तूच माझ्या आईच्या गर्भात मला घडवले.
मी तुला धन्यवाद देतो,
कारण तुझी कृत्ये भयचकीत आणि आश्चर्यकारक आहेत,
हे तर माझा जीव पूर्णपणे जाणतो.
मी गुप्तस्थळी निर्माण होत असता,
आणि पृथ्वीच्या अधोभागी विलक्षण प्रकारे
माझी घडण होत असता माझी आकृती तुला गुप्त नव्हती.
तू मला गर्भात पिंडरूपाने असताना पाहिलेस;
माझा एकही दिवस उगवण्यापूर्वी
ते सर्व तुझ्या पुस्तकात नमूद करून ठेवले होते.
मी गर्भातूनच तुझ्यावर सोपवून दिलेला होतो.
माझ्या आईच्या उदरात असतानाच तू माझा देव आहेस.
मी तरुण होतो आणि आता म्हातारा झालो आहे;
तरी नितीमान टाकलेला किंवा त्याच्या मुलांस भाकरी मागताना मी पाहिले नाही.
सारा दिवस तो दयाळूपणाने वागतो आणि उसने देतो,
त्याची संतती आशीर्वादित असते.
त्या आम्ही त्यांच्या वंशजापासून गुप्त ठेवणार नाही.
त्या आम्ही पुढील पिढीला परमेश्वराची स्तुत्य कृत्ये,
त्याचे सामर्थ्य आणि त्याने केलेले आश्चर्ये कृत्ये सांगू.
नातवंडे वृद्धांचा मुकुट आहेत,
आणि आईवडील आपल्या मुलांस वैभव आणतात.
जो कोणी मनुष्य चांगले करतो त्याच्या प्रामाणिकतेने चालतो,
आणि त्याच्या मागे त्याची मुले त्यास अनुसरतात आणि ते सुखी होतात.
Criação e obediência
Pais, criai vossos filhos na disciplina e instrução do Senhor. Filhos, obedecei a vossos pais — isto é justo e agradável a Deus.
मुलांनो, प्रभूमध्ये आपल्या आई-वडीलांच्या आज्ञा पाळा कारण हे योग्य आहे. "आपल्या वडिलांचा व आईचा मान राख, यासाठी की तुझे सर्वकाही चांगले व्हावे व तुला पृथ्वीवर दीर्घ आयुष्य लाभावे." अभिवचन असलेली हीच पहिली आज्ञा आहे.
आणि वडिलांनो, तुम्ही आपल्या मुलांना चिडीस आणू नका पण तुम्ही त्यांना प्रभूच्या शिस्तीत व शिक्षणात वाढवा.
मुलांनो, तुम्ही सर्व गोष्टींत आपल्या आई-वडीलांच्या आज्ञा पाळा कारण हे प्रभूला संतोष देणारे आहे.
वडिलांनो, तुम्ही आपल्या मुलांना चिडीस आणू नका; नाही तर, कदाचित ती निरुत्साही होतील.
आपल्या बापाचा व आपल्या आईचा मान राख म्हणजे त्यामुळे परमेश्वर तुझा देव जो देश तुला देत आहे त्या देशात तू चिरकाळ राहशील.
हा कठीण समय आहे म्हणून शिस्त सहन करा. ते असे दर्शवते की, देव तुम्हास मुलांसारखी वागणूक देत आहे; कारण असा कोणता मुलगा आहे ज्याला वडील शिस्त लावीत नाहीत? परंतु ज्या शिक्षेचे सर्व भागीदार झाले आहेत अशा शिक्षेवाचून जर तुम्ही आहा, तर तसे तुम्ही दासीपुत्र आहात आणि तुम्ही खरे पुत्र नाही.
पण जर एखाद्या विधवेला मुले किंवा नातवंडे असतील तर त्यांनी प्रथम आपल्या घरच्यांशी धार्मिकतेने वागायला व आपल्या वडिलांचे उपकार फेडायला शिकावे कारण हे देवाच्या दृष्टीने चांगले आहे.
स्त्री प्रसूत होते तेव्हा तिला वेदनांचे दुःख होते, कारण तिची प्रसूतीची घटका आलेली असते; पण बालक जन्मल्यावर जगात एक मनुष्य जन्मल्याचा जो आनंद होतो त्यामुळे तिला त्या क्लेशाची आठवण होत नाही.
परमेश्वर पुढे आपल्याला म्हणाला, शिवाय आपले शत्रू आपल्या मुलाबाळांना पळवतील असे तुम्ही म्हणालात ती आज जी तुमची मुले बरे किंवा वाईट जाणत नाहीत ती मात्र या देशात जातील आणि त्यांना मी तो देश देईन व ते देश ते हस्तगत करतील.