Filhos
Os filhos são herança do Senhor — bênção e responsabilidade sagrada. A Bíblia orienta sobre a criação dos filhos com amor, disciplina e instrução nos caminhos de Deus.
Herança do Senhor
Os filhos são herança do Senhor e o fruto do ventre é seu galardão. Bem-aventurado o homem que enche deles a sua aljava.
मुले, ही याहवेहकडून मिळालेला वारसा आहे,
प्रसवशील कूस, हे याहवेहकडून लाभणारे प्रतिफळ आहे.
तरुणपणी झालेली मुले,
शूरवीराच्या हातातील बाणांप्रमाणे आहेत.
ज्या पुरुषाचा भाता
अशा बाणांनी भरलेला आहे, तो धन्य!
असे पुरुष वेशीत आपल्या शत्रूशी न्यायालयात वाटाघाटी करतील,
तेव्हा ते लज्जित होणार नाहीत.
जे याहवेहचे भय बाळगतात,
आणि त्यांच्या आज्ञा पाळतात, ते धन्य!
तू आपल्या हातांनी केलेल्या श्रमाचे फळ खाशील;
तू सुखी होशील व तुझे कल्याण होईल.
तुझी पत्नी तुझ्या घरात
सफल द्राक्षवेलीसारखी होईल;
तुझी मुले तुझ्या मेजाभोवती
जैतुनाच्या रोपांसारखी होतील.
होय, याहवेहचे भय बाळगून त्यांच्यावर विश्वास ठेवणार्यांना
हाच आशीर्वाद असणार.
जे याहवेहचे भय बाळगतात,
आणि त्यांच्या आज्ञा पाळतात, ते धन्य!
तू आपल्या हातांनी केलेल्या श्रमाचे फळ खाशील;
तू सुखी होशील व तुझे कल्याण होईल.
तुझी पत्नी तुझ्या घरात
सफल द्राक्षवेलीसारखी होईल;
तुझी मुले तुझ्या मेजाभोवती
जैतुनाच्या रोपांसारखी होतील.
मग आमचे पुत्र, तारुण्यात जोपासलेल्या
परिपक्व रोपांसारखे होतील;
आमच्या कन्या, राजमहालाच्या सजावटीसाठी केलेल्या
कोरीव स्तंभासारख्या होतील.
त्यांची संतती पृथ्वीवर अतिथोर होईल;
नीतिमानाची पिढी आशीर्वादित होईल.
मग परमेश्वराने त्यांना आशीर्वाद दिला आणि ते त्यांना म्हणाले, "फलद्रूप व्हा, बहुगुणित व्हा आणि पृथ्वी व्यापून टाका; ती आपल्या सत्तेखाली आणा. समुद्रातील मासे, आकाशातील पक्षी आणि पृथ्वीवर संचार करणार्या प्रत्येक सजीव प्राण्यावर अधिकार गाजवा."
तुमची संतती, तुमच्या भूमीतील पिके आणि तुमच्या गुरांचे वत्स, तुमच्या कळपातील वासरे व कोकरे आशीर्वादित होतील.
तुम्ही इतर लोकांपेक्षा अधिक आशीर्वादित व्हाल; तुमच्यापैकी कोणीही पुरुष वा स्त्री निःसंतान राहणार नाही किंवा तुमच्या पशूंपैकी कोणीही वांझ राहणार नाही.
Instruir e disciplinar
Instrui a criança no caminho em que deve andar, e quando envelhecer não se desviará dele. Disciplina é amor em ação.
लहान मुलांनी जसे वर्तन केले पाहिजे, तसेच त्यांना वागावयास शिकवा,
म्हणजे मोठेपणी ती मुले त्या मार्गापासून दूर जाणार नाहीत.
बालकाचे मन मूर्खपणाने भरलेले असते,
परंतु अनुशासनाच्या छडीने त्याचा मूर्खपणा दूर करता येईल.
जे कोणी छडी आवरतात, ते त्यांच्या लेकरांचा द्वेष करतात,
परंतु जे त्यांच्या लेकरांवर प्रेम करतात, ते त्यांना काळजीपूर्वक शिस्त लावतात.
छडी व ताकीद यामुळे ज्ञान मिळते;
परंतु बालकाला बेशिस्त सोडल्यास, ते आपल्या आईला कलंकित करते.
मुलाला अनुशासन करण्यास संकोच करू नकोस;
जर तू छडीने त्यांना शिक्षा करशील तर ते मरणार नाहीत.
माझ्या मुलांनो, वडिलांचा बोध ऐका;
त्याकडे लक्ष द्या आणि समंजसपणा मिळवा.
शलोमोनाची नीतिसूत्रे:
शहाणा मुलगा त्याच्या पित्याला सुखी करतो,
परंतु मूर्ख मुलगा त्याच्या आईला दुःख देतो.
या ज्या आज्ञा मी आज तुम्हाला देणार आहे, त्या तुमच्या अंतःकरणात सदैव असाव्या. त्या तुमच्या मुलांवर बिंबवा. घरी बसले असताना, वाटेवर चालत असताना, झोपण्याच्या वेळी व झोपेतून उठल्यानंतर त्याबद्दल बोलत राहा.
O amor de Deus por crianças
Deixai vir a mim as crianças. Jesus acolheu, abençoou e honrou as crianças como modelo de fé e humildade.
जेव्हा येशूंनी पाहिले, तेव्हा ते रागावले व म्हणाले, "लहान बालकांना माझ्याजवळ येऊ द्या, त्यांना प्रतिबंध करू नका, कारण परमेश्वराचे राज्य त्यांच्यासारख्यांचेच आहे.
जर तुम्ही वाईट असूनही तुमच्या लेकरांना चांगल्या देणग्या देण्याचे तुम्हाला समजते, तर मग स्वर्गीय पित्याजवळ जे मागतात, त्यांना ते चांगल्या देणग्या किती विशेषकरून देतील?
आणि येशू ज्ञानाने व शरीराने परमेश्वराच्या व मनुष्याच्या कृपेत वाढले.
जशी पित्याची करुणा त्याच्या लेकरांवर असते,
तसे त्यांचे भय बाळगणार्यांसाठी याहवेह कोमलहृदयी व सहानुभूतीने भरलेले आहेत.
पित्याने आपण परमेश्वराची लेकरे म्हणून संबोधले जावे म्हणून पित्याने आपणावर किती मोठा अगाध प्रीतीचा वर्षाव केला आहे! आणि आपण तसे आहोतच! जग आपल्याला ओळखत नाही कारण जगाने त्यांना ओळखले नाही.
Bênção e promessa
O Senhor te abençoe e te guarde. Os filhos dos justos serão abençoados e suas gerações caminharão na retidão.
" ‘ "याहवेह तुम्हाला आशीर्वाद देवो
आणि तुमचे संरक्षण करो;
याहवेह आपला मुखप्रकाश तुमच्यावर पाडो
आणि तुमच्यावर कृपा करो;
याहवेह आपले मुख तुमच्याकडे लावो,
आणि तुम्हाला शांती देवो." ’
परमेश्वर तुला आकाशातील दव
आणि पृथ्वीची समृद्धी देतील,
भरपूर धान्य आणि नवीन द्राक्षारस देतील.
राष्ट्रे तुझी सेवा करोत,
आणि लोक तुझ्यापुढे नमोत.
तू तुझ्या भाऊबंदाचा धनी हो.
तुझ्या आईची मुले तुझ्यापुढे लवून तुला मुजरा करोत.
जे तुला शाप देतात ते सर्व शापित होवोत,
आणि जे तुला आशीर्वाद देतात ते सर्व आशीर्वादित होवोत."
कारण मी तहानलेल्या भूमीवर पाण्याचा वर्षाव करेन,
आणि शुष्क जमिनीला झरे देईन;
तुमच्या मुलाबाळांवर मी माझा आत्मा ओतेन
व तुमच्या वंशजांना आशीर्वाद देईन.
कुरणातील गवतासारखे ते उगवतील
वाहत्या झऱ्याच्या काठावरील वाळुंजाच्या वृक्षासारखे ते वाढतील.
तुझ्या सर्व लेकरांना याहवेह शिकवतील,
व त्यांना मोठी शांती प्राप्त होईल.
"मी तुला गर्भाशयात घडविण्याच्या पूर्वीपासून ओळखतो,
तुझा जन्म होण्यापूर्वीच मी तुला समर्पित केले आहे;
आणि राष्ट्रांकरिता माझा संदेष्टा म्हणून तुझी नेमणूक केली आहे."
मग ते माझे लोक होतील आणि मी त्यांचा परमेश्वर होईन. मी त्यांना एकनिष्ठ अंतःकरण व एकमात्र कार्य देईन, जेणेकरून ते नेहमी माझे भय धरतील आणि त्यांचे व त्यांच्यानंतर त्यांच्या मुलाबाळांचे सर्वदा कल्याण होईल.
माझ्या शरीरातील अंतरंगाची घडण तुम्हीच केली आहे;
माझ्या मातेच्या उदरात माझी देहरचना केली.
मी तुमची स्तुती करतो,
कारण तुम्ही मला भयपूर्ण व अद्भुत रीतीने निर्माण केले आहे;
तुमचे हे कार्य किती अद्भुत आहे,
हे मी पूर्णपणे जाणतो.
गुप्तस्थानी माझी निर्मिती होत असताना,
जेव्हा माझा सांगाडा तुमच्यापासून लपलेला नव्हता,
जेव्हा पृथ्वीच्या गर्भामध्ये माझी घडण होत होती.
तुमच्या नेत्रांनी मला पिंडरूपात पाहिले;
माझा एकही दिवस उगविण्यापूर्वी माझ्या
आयुष्याच्या प्रत्येक दिवसाची तुम्ही लेखी नोंद केली.
मी जन्मापासून तुमच्या संरक्षणाखाली आहे.
मी आईच्या उदरात असल्यापासून तुम्ही माझे परमेश्वर आहात.
मी तरुण होतो आणि आता प्रौढ झालो आहे,
तरी आजपर्यंत नीतिमानाला टाकलेला
किंवा त्याच्या संततीला भीक मागताना मी पाहिले नाही.
ते नेहमी इतरांना उदारतेने दान आणि उसने देतात;
त्यांची संतती आशीर्वाद असते.
आम्ही त्या त्यांच्या वंशजांपासून गुप्त ठेवणार नाही,
आम्ही भावी पिढीच्या लोकांपुढे,
याहवेहचे गौरव करू आणि
त्यांच्या सामर्थ्याचे आणि चमत्कारांचे वर्णन करू.
वयस्क माणसांची नातवंडे त्यांचे गौरवी भूषण आहेत;
आणि मुलांचे भूषण त्यांचे मातापिता आहेत.
नीतिमान मनुष्य निष्कलंकीतपणे चालतो;
त्याच्यामागे त्याच्या मुलाबाळांना आशीर्वाद प्राप्त होतात.
Criação e obediência
Pais, criai vossos filhos na disciplina e instrução do Senhor. Filhos, obedecei a vossos pais — isto é justo e agradável a Deus.
लेकरांनो, प्रभूमध्ये तुम्ही आपल्या आईवडिलांची आज्ञा पाळा, कारण हे योग्य आहे. "तुमच्या आई आणि वडिलांचा मान राखा" अभिवचन असलेली ही पहिली आज्ञा आहे. "यासाठी की तुमचे कल्याण व्हावे आणि तुम्हाला पृथ्वीवर दीर्घायुष्याचा लाभ घेता यावा."
पित्यांनो, तुम्ही आपल्या मुलांना प्रकोपित करू नका; याउलट प्रभूच्या शिक्षणात व बोधवचनात त्यांना वाढवा.
लेकरांनो, तुम्ही सर्व गोष्टीत आपल्या आईवडिलांची आज्ञा पाळा, कारण त्यामुळे प्रभूला संतोष होतो.
वडिलांनो, तुम्ही आपल्या मुलांना प्रकोपित करू नका, नाही तर त्यांचे धैर्य खचेल.
आपल्या वडिलांचा व आपल्या आईचा सन्मान करा, म्हणजे जो देश याहवेह तुमचे परमेश्वर तुम्हाला देत आहे, त्यात तुम्ही दीर्घकाळ राहाल.
तुम्ही धीराने शिस्त सहन करत आहात; परमेश्वर तुम्हाला पुत्राप्रमाणे वागवितात आणि लेकरांना शिस्त लावत नाही असा कोण पिता आहे? जर तुम्हाला शिस्त लावली नाही तर—सर्वांनाच शिस्तीला सामोरे जावे लागते—तुम्ही अनौरस आहात, तुम्ही या कुटुंबातील खरे पुत्र किंवा कन्या नाहीत.
परंतु विधवेला मुले अथवा नातवंडे असतील, तर त्यांनी प्रथम आपल्या कुटुंबीयांशी सुभक्तीने वागून व आपल्या पितरांचे उपकार फेडण्यास शिकावे, यामुळे परमेश्वराला अतिशय संतोष होतो.
जी स्त्री बाळाला जन्म देते तिला वेदना होतात कारण तिची वेळ आलेली असते; परंतु जेव्हा तिचे बाळ जन्मास येते तेव्हा ती तिच्या बाळाला या जगात जन्मलेले पाहून आनंद करते व सर्व यातना विसरून जाते.
जी बालके पारतंत्र्यात जातील असे तुम्ही म्हणता, ज्यांना त्यांचे बरेवाईटही कळत नाही, त्यांना मी तो देश बहाल करेन आणि ते त्याला आपल्या ताब्यात घेतील.