Sinais do fim dos tempos
A Bíblia descreve sinais que precederão a volta de Jesus. Guerras, falsos mestres, sinais cósmicos e a pregação do evangelho a todas as nações — tudo aponta para o fim dos tempos.
Sinais proféticos
Este evangelho do Reino será pregado em todo o mundo e então virá o fim. Os sinais dos últimos tempos já se manifestam.
जगमाधला सर्व लोकसकरता साक्ष व्हवाले पाहिजे म्हणीन देवराज्यनी हाई सुवार्ता सर्व जगमा गाजाडतीन; तवय शेवट व्हई.
मनुष्यना पोऱ्या येशु यानं परत येणं
"त्या दिनसमाधला संकटना मांगतीन लगेच सुर्य अंधकारमय व्हई, चंद्र प्रकाश देवाव नही, तारा आकाशमातीन नष्ट व्हतीन अनी आकाशमाधली शक्ती हाली जाई. तवय मनुष्यना पोऱ्यानं चिन्ह आकाशमा दखाई; अनी पृथ्वीवरला सर्व जातना लोके शोक करतीन त्या मनुष्यना पोऱ्याले आकाशना ढगसवर बशीसन, पराक्रमतीन अनी मोठा वैभवतीन येतांना दखतीन. तुतारीसना महानादनासंगे, मी मना दूतसले धाडसु, अनी त्या पृथ्वीना एक टोकपाईन दुसरा टोकपावत मना निवडेल लोकसले चाऱ्ही दिशाकडतीन गोया करसु."
यामुये, जागृत ऱ्हा, कारण कोणता दिनले तुमना प्रभु ई हाई तुमले माहीत नही. आखो, हाई समजी ल्या की, कोणता येळले चोर येवाव शे हाई जर घरमालकले माहीत ऱ्हातं, तर तो जागा ऱ्हाता अनी आपलं घर चोरले फोडु नही देता. यामुये तुम्हीन तयार ऱ्हा, तुमले वाटाव नही त्या येळले मनुष्यना पोऱ्या ई."
अनं ज्या आज्ञा मी तुमले देयल शेतस त्या त्यासले पाळाले शिकाडा अनी दखा युगना अंतपावत मी सदासर्वकाळ तुमनासंगे शे."
कोणलेच तो दिन अनी येळ माहीत नही
"अजुन त्या दिनबद्दल अनी त्या येळबद्दल कोणलेच माहीत नही, स्वर्गना देवदूतसले नही, देवना पोऱ्यालेसुध्दा नही; फक्त देवबापलेच माहीत शे.
Os últimos dias
Nos últimos dias virão tempos difíceis, homens amantes de si mesmos. Mas derramarei o meu Espírito sobre toda a carne.
शेवटला दिन
हाई समजी ले, शेवटला काळमा कठीण दिन येतीन, कारण माणुस स्वार्थी, पैसासना लोभ धरनारा, बडाईखोर, गर्विष्ट, निंदा करनारा, माय बापले नही माननारा, उपकारसले नही जाणनारा, अपवित्र, ममताहिन, क्षमा नही करनारा, चुगलखोर, असंयमी, क्रुर, चांगलास बद्दल प्रेम नही करनारा ईश्वासघात करनारा, गर्वतिन फुगेल, देववर प्रेम करापेक्षा सुखविलासनी आवड करनारा सुभक्तीनं बाहेरनं रूप दखाडीसन तिना स्वतःवर संस्कार नही असा लोकसपाईन बी दुर रहा.
परमेश्वर अस सांगस की, शेवटला दिनमा अस व्हई की,
मी आपला आत्मा सर्व लोकेसवर ओतसु.
तवय तुमना पोऱ्या अनं तुमन्या पोरी संदेश देतीन,
तुमना तरूण दृष्टांत दखतीन,
अनं तुमना वडील लोकसले स्वप्न पडतीन.
मी मना दाससवर अनं दासीसवर वर बी,
त्या दिनमा आत्मा ओतसु,
म्हणजे त्या मना संदेश जाहीर करतीन;
अनी मी वर आकाशमा चमत्कार,
अनी खाल पृथ्वीवर चिन्ह,
म्हणजे रक्त, अग्नी अनं धुरना ढग दखाडसु;
परमेश्वरना महान अनं प्रसिध्द दिन येवाना पहिले
सुर्य अंधारानामायक व्हई
अनं चंद्र रंगतनामायक लाल व्हई जाई;
तवय अस व्हई की, जो कोणी प्रभुना नावमा त्याना धावा करी तोच वाची.
अंतना समय
त्या येळले तुना लोकसना रक्षण करनारा मोठा अधिपती जो मीखाएल दूत शे तो उठी; कोणतंबी राष्ट्र व्हवापाईन कवयच वनं नही अश संकट त्या येळले ई; तुना लोकसपाईन ज्यासनं नावे वहीमा लिखेल दखाई त्या सर्वा त्या येळले मुक्त व्हतीन. जमीनमाधला मातीमा झोपेलसना मोठा समुदाय उठी; कितलाजन सर्वकाळना जीवन भेटाकरता अनी कितलाजन अप्रतिष्ठा अनं सर्वकाळना धिक्कार भेटाकरता उठतीन. ज्या सुज्ञ राहतीन त्या अंतराळना प्रकाशनामायक चमकतीन; बराच लोकसले धार्मिकताकडे आणनारा लोक युगानुयुग तारानामायक चमकतीन.
Esperança e prontidão
O dia do Senhor virá como ladrão. Mas nós não somos das trevas — estejamos sóbrios, vigiliando e esperando.
जे प्रभुनी शिकाडं तेच आम्हीन तुमले शिकाडतस, प्रभुनं येनं व्हवापर्यंत ज्या आपण जिवत राहसुत त्या आपण मरेलसना पहिले जावावुच नहीत. कारण, आज्ञाध्वनी आद्यदिव्यदूतसनी वाणी अनं देवना तुतारीना नाद व्हत असतांना प्रभु स्वतः स्वर्गामातीन उतरी; अनी ख्रिस्तमा ज्या मरेल शेतस त्या पहिले ऊठतीन; नंतर जिवत उरेल आपण त्यासनासंगे मेघारूढ व्हईन अंतराळमा लेवाई जासुत, अनी आम्हीन कायम परमेश्वरनासंगे राहसुत. म्हणीन ह्या वचनसघाई एकमेकसनं प्रोत्साहन करा.
यावरतीन आपण दुसरासनामायक झोपाले नको, तर जागं अनी सावध ऱ्हावाले पाहिजे. झोपणारा रातले झोपतस अनी पिणारा रातले पितस; पण ज्या आपण दिनना शेतस त्या आपण सावध ऱ्हावाले पाहिजे. ईश्वास अनी प्रितीनं चिलखत अनी तारणनी आशा, हाऊ टोप घाला. कारण आपलावर देवना क्रोध व्हवाले पाहिजे म्हणीसन नही, तर आपला प्रभु येशु ख्रिस्त ह्यानाद्वारा आपलं तारण व्हवाले पाहिजे म्हणीन आपले नेमेल शे.
जागृतीनी आवश्यकता
"तुम्हीन स्वतःले संभाळा! कदाचित अस नको व्हवाले की, गुंगीमा, दारूबाजीमा अनं संसारना चिंताना वझाखाल तुमना मने जड व्हई जातीन अनी तो दिन फाशीना फंदानामायक अचानक तुमनावर ई; कारण तो पृथ्वीवर राहनारा सर्व लोकसवर तसाच ई. परंतु तुम्हीन प्रत्येक येळले सावध राहिसन प्रार्थना करत राहा म्हणजे तुम्हीन या सर्व गोष्टीमाईन वाची जाशात अनं मनुष्यना पोऱ्यासमोर म्हणजे मनासमोर उभा ऱ्हावाकरता समर्थ ठरशात."
तरी मना प्रिय लोकसवन, हाई एक गोष्ट तुम्हीन ईसराले नको, कारण प्रभुले एक दिन हजार वरीसनामायक, अनी हजार वरीस एक दिननामायक शे. कित्येक लोक ज्याले उशीर म्हणीन म्हणतस तसा उशीर प्रभु आपला वचनबद्दल करस नही, तर तो तुमनं सहन करस; कोणा नाश व्हवाले पाहिजे अशी त्यानी ईच्छा नही, तर सर्वासनी त्यासना पापसपाईन फिराले पाहिजे. पण प्रभुना दिन चोरनामायक ई, त्या दिन आकाशमातील सर्व गोष्टी मोठा नाद करीसन नष्ट व्हतीन, सृष्टीमा जे व्हई ते जळीसन नष्ट व्हई, पृथ्वी अनी तिनावरल्या सर्व गोष्टी गायब व्हतीन. तर ह्या सर्व गोष्टी नष्ट व्हणारा शेतस म्हणीन पवित्र वागणुकमा अनं सुभक्तीमा राहिन देवना दिन येवानी वाट दखत अनं तो दिन लवकर येवाले पाहिजे म्हणीसन खटपट करत तुम्हीन कसं ऱ्हावाले पाहिजे? परमेश्वरना त्या दिनमुये आकाश जळीसन नष्ट व्हई जाई अनी सृष्टीमा जे व्हई ते तापीसन वितळी. तरी ज्यानामा धार्मीकता वास करस नवं आकाश अनं नवी पृथ्वी यासनी त्याना वचनसप्रमाणे आपण वाट दखी राहिनुत.
मी तुमले एक गुप्त गोष्ट सांगस; आपण सर्वाच मराऊत नही, पण आपण सर्व बदली जासुत, क्षणमा, शेवटला कर्णाना येळले कर्णा वाजी, मरेल त्या अविनाशी शरिरमा असा ऊठतीन, अनी आपण बदली जाऊत, कारण हाई जे विनाशी त्यानी अविनाशीपण परिधान करानं.
नवं आकाश अनी पृथ्वी
नंतर मी नवं स्वर्ग अनं नवं पृथ्वी दखी. पहिलं स्वर्ग अनी पहिली पृथ्वी ह्या नष्ट व्हयेल व्हतात अनी समुद्र बी राहिना नही. तवय मी पवित्र शहर, नवं यरूशलेम, देवपाईन स्वर्गमातीन उतरतांना दखं. ते नवराकरता सजाडेल नवरीनामायक व्हतं. अनी मी राजासनपाईन येल मोठा आवाज ऐका, तो असा दखा, "देवनं घर लोकससंगे शे, त्यासनासंगे देव राही, त्या त्याना लोक व्हतीन, अनी देव स्वतः त्यासनासंगे राही अनी तो त्यासना देव व्हई. तो त्यासना डोयासना अश्रु पुशी टाकी; यानापुढे मरण नही; शोक, रडणं, अनं कष्ट ह्या नही ऱ्हावाव कारण जुन्या गोष्टी व्हई गयात."