Sinais do fim dos tempos
A Bíblia descreve sinais que precederão a volta de Jesus. Guerras, falsos mestres, sinais cósmicos e a pregação do evangelho a todas as nações — tudo aponta para o fim dos tempos.
Sinais proféticos
Este evangelho do Reino será pregado em todo o mundo e então virá o fim. Os sinais dos últimos tempos já se manifestam.
सर्व राष्ट्रांना साक्ष व्हावी म्हणून राज्याची ही सुवार्ता सर्व जगभर गाजवली जाईल आणि मग शेवट होईल.
सांभाळत्या दिवसातल्या छळानंतर लगेच असे घडेल; सूर्य अंधकारमय होईल व चंद्र प्रकाश देणार नाही, आकाशातील तारे गळून पडतील, आकाशातील सर्व बळे डळमळतील, आकाश गुंडाळीसारखे गुंडाळले जाईल. तेव्हा मनुष्याच्या पुत्राच्या येण्याचे चिन्ह आकाशात दिसेल. तेव्हा जगातील सर्व वंश आपले ऊर बडवून घेतील. मनुष्याच्या पुत्राला आकाशांतल्या मेघांवर आरूढ होऊन सामर्थ्याने आणि मोठ्या गौरवाने येताना पाहतील. मनुष्याचा पुत्र कर्ण्याच्या मोठ्या नादात आपले देवदूत पृथ्वीभोवती पाठवून देईल. ते पृथ्वीच्या चारही कोपऱ्यातून, आकाशाच्या एका सीमेपासून दुसऱ्या सीमेपर्यंत निवडलेल्यांना गोळा करतील.
म्हणून तुम्ही जागृत असा, कारण तुम्हास माहीत नाही की कोणत्या दिवशी तुमचा प्रभू येत आहे, हे लक्षात ठेवा, चोर केव्हा येईल हे जर घराच्या मालकाला माहीत असते तर तो त्यासाठी तयारीत राहिला असता आणि त्याने चोराला घर फोडू दिले नसते. या कारणासाठी तुम्हीसुद्धा तयार असले पाहिजे. जेव्हा तुम्हास अपेक्षा नसेल तेव्हा मनुष्याचा पुत्र येईल.
आणि जे काही मी तुम्हास शिकविले आहे ते त्या लोकांस पाळायला शिकवा आणि पाहा, युगाच्या शेवटापर्यंत मी सदोदित तुमच्याबरोबर आहे."
त्या दिवसाविषयी किंवा त्या घटकेविषयी कोणालाही ठाऊक नाही. स्वर्गातील देवदूतांनाही नाही व पुत्रासही नाही. फक्त पित्याला ठाऊक आहे.
Os últimos dias
Nos últimos dias virão tempos difíceis, homens amantes de si mesmos. Mas derramarei o meu Espírito sobre toda a carne.
परंतु शेवटच्या काळामध्ये संकटाचा दिवस आपल्यावर येईल हे समजून घे. लोक स्वार्थी, धनलोभी, बढाईखोर, गर्विष्ठ, निंदा करणारी, आई-वडीलांची आज्ञा न मानणारी, अनुपकारी, अधार्मिक इतरांवर प्रीती न करणारी, क्षमा न करणारी, चहाडखोर, असंयमी, क्रूर, चांगल्याबद्दल प्रेम न बाळगणारी. विश्वासघातकी, उतावीळ, गर्वाने फुगलेली, देवावर प्रीती करण्यापेक्षा चैनीची अधिक आवड धरणारी अशी होतील; ते देवाच्या सेवेचे बाहेरचे स्वरूप चांगले राखतील परंतु त्याचे सामर्थ्य नाकारतील. त्यांच्यापासून नेहमी दूर राहा.
देव म्हणतो, "शेवटच्या दिवसात असे होईल,
मी मनुष्यमात्रावर आपल्या आत्म्याचा वर्षाव करीन,
तेव्हा तुमचे पुत्र व तुमच्या कन्या संदेश देतील.
तुमच्या तरूणांस दृष्टांत होतील व तुमच्या वृद्धास स्वप्ने पडतील.
आणखी त्या दिवसात मी आपल्या दासांवर
व आपल्या दासींवर आपल्या आत्म्याचा वर्षाव करीन,
म्हणजे ते संदेश देतील.
आणि वर आकाशात अद्भूते
व खाली पृथ्वीवर चिन्हे, म्हणजे रक्त, अग्नी व धूम्ररूप वाफ
अशी मी दाखवीन.
परमेश्वराचा महान व प्रसिद्ध दिवस येण्यापूर्वी
सूर्य अंधकारमय व चंद्र रक्तमय होईल.
तेव्हा असे होईल की जो कोणी परमेश्वराच्या नावाने त्याचा धावा करील तो तरेल."
ह्यानंतर मी माझा आत्मा सर्व देहावर ओतीन,
आणि तुमची मुले आणि तुमच्या मुली भविष्य सांगतील.
तुमच्यातील वृद्धांना स्वप्न पडतील.
तुमच्यातील तरूणांना दृष्टांत होतील.
आणि त्या दिवसात मी माझा आत्मा
दासांवर व स्त्री दासीवरसुद्धा ओतीन.
आणि मीखाएल जो मोठा अधिपती तुझ्या लोकांच्या संतानांसाठी उभा असतो तो त्या समयी उभा राहील; आणि राष्ट्र झाल्यापासून त्या वेळेपर्यंत कधी झाला नाही असा कष्टाचा समय होईल; आणि त्या वेळेस तुझे लोक सोडवले जातील, प्रत्येक जो पुस्तकात लिहिलेला सापडेल तो सोडवला जाईल. अनेक लोक जे मातीत निजलेले आहेत ते काही सार्वकालीन जीवनासाठी तर काही सार्वकालीन लज्जा आणि तिरस्कार मिळविण्यास उठतील.
जे सुज्ञ ते आकाशातील प्रकाशासारखे चकाकतील आणि जे पुष्काळास न्यायीपणाकडे वळवणारे सदासर्वदा ताऱ्याप्रमाणे चमकतील.
Esperança e prontidão
O dia do Senhor virá como ladrão. Mas nós não somos das trevas — estejamos sóbrios, vigiliando e esperando.
कारण प्रभूच्या वचनावरून आम्ही तुम्हास हे सांगतो की, आपण जे जिवंत आहोत व जे प्रभूच्या येण्यापर्यंत मागे राहू, ते आपण तोपर्यंत मरण पावलेल्यांच्या पुढे जाणार नाही. कारण आज्ञा करणाऱ्या गर्जणेने, आद्यदेवदूतांची वाणी आणि देवाच्या कर्ण्याचा आवाज येईल, तेव्हा प्रभू स्वतः स्वर्गातून उतरेल आणि ख्रिस्तात मरण पावलेले प्रथम उठतील. मग आपण जे जिवंत आहोत व मागे राहू, ते प्रभूला अंतराळात भेटण्यासाठी ढगात उचलले जाऊ आणि सर्वकाळ प्रभूबरोबर राहू.
म्हणून तुम्ही या वचनांनी एकमेकांचे सांत्वन करा.
ह्यावरून आपण इतरांप्रमाणे झोप घेवू नये, तर जागे व सावध रहावे. झोप घेणारे रात्री झोप घेतात आणि झिंगणारे रात्रीचे झिंगतात. परत जे आपण दिवसाचे आहोत त्या आपण सावध असावे; विश्वास व प्रीती हे उरस्त्राण व तारणाची आशा हे शिरस्राण घालावे. कारण आपल्यावर क्रोध व्हावा म्हणून नव्हे तर आपला प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्याद्वारे आपले तारण व्हावे म्हणून देवाने आपल्याला नेमले आहे.
परंतु तुम्ही स्वतःला सांभाळा, दारुबाजी आणि अधाशीपणा व या हल्लीच्या जीवनासंबंधीच्या चिंता यांनी तुमची अंतःकरणे भारावून जाऊ नये, तो दिवस पाशासारखा अकस्मात तुमच्यावर येईल. खरोखर, तो पृथ्वीवर असणाऱ्या सर्व लोकांवर येईल. यास्तव तुम्ही या सर्व होणाऱ्या गोष्टी चुकवायला व मनुष्याच्या पुत्रासमोर उभे राहायला सबळ असावे म्हणून सर्व प्रसंगी प्रार्थना करीत जागे राहा."
पण प्रियजनहो, ही एक गोष्ट तुम्ही विसरू नये की, प्रभूला एक दिवस हजार वर्षांसमान आणि हजार वर्षे एका दिवसासमान आहेत. कित्येक लोक ज्याला उशीर म्हणतात तसा उशीर प्रभू आपल्या वचनाविषयी करीत नाही. तर तो तुमच्याविषयी फार सहनशील आहे. कोणाचा नाश व्हावा अशी त्याची इच्छा नाही, तर सर्वांनी पश्चात्ताप करावा अशी आहे.
तरी चोर येतो तसा प्रभूचा दिवस येईल; त्यादिवशी आकाश मोठा नाद करीत नाहीसे होईल, सृष्टितत्त्वे तापून विरघळतील आणि पृथ्वी तिच्यावरील कामे जळून जातील.
या सर्व गोष्टी जर लयास जाणार आहेत म्हणून तुम्ही पवित्र आचरणात व सुभक्तीत राहून देवाचा दिवस येण्याची वाट पाहत व तो दिवस लवकर यावा म्हणून खटपट करीत तुम्ही कशा प्रकारचे लोक असावे बरे? देवाच्या त्या दिवसामुळे आकाश जळून लयास जाईल आणि सृष्टितत्त्वे अत्यंत तापून वितळतील. तरी ज्यामध्ये नीतिमत्त्व राहते, असे नवे आकाश व नवे पृथ्वी त्याच्या वचनाप्रमाणे आपण वाट पाहत आहोत.
पाहा! मी तुम्हास एक रहस्यमय सत्य सांगत आहे. आपण सर्व मरणार नाही. आपण सर्व बदलून जाऊ. क्षणात, डोळ्यांचे पाते लवते न लवते तोच, शेवटचा कर्णा वाजेल तेव्हा, कारण कर्णा वाजेल आणि मरण पावलेले अविनाशीपणात उठवले जातील आणि आपण बदलून जाऊ.
कराण पाहा! मी नवा स्वर्ग आणि नवी पृथ्वी निर्माण करणार,
आणि भूतकाळातील गोष्टींची आठवण होणार नाही, त्यातील एकही मनात येणार नाही.
पण तर जे मी तयार करणार त्यामध्ये तुम्ही सदासर्वकाळ आनंद व उल्लास कराल. पाहा! मी यरूशलेमेला हर्ष आणि तिच्या लोकांस आनंद असे अस्तित्वात आणीन.
"मी यरूशलेमविषयी हर्ष आणि माझ्या लोकांविषयी आनंद करेन सुखी होईन."
तिच्यात आक्रोश व रडणे पुन्हा ऐकू येणार नाही.
"कारण पाहा, तो दिवस येत आहे, तो भट्टीसारखा जळतो, आणि सर्व गर्विष्ठ आणि प्रत्येक दुष्ट धसकट बनतील. येणारा दिवस त्यांना जाळून टाकील, म्हणजे एकही फांदी किंवा मूळ शिल्लक ठेवले जाणार नाही." सेनाधीश परमेश्वर असे म्हणतो. "परंतु जे तुम्ही माझ्या नावाचे भय धरता त्या तुम्हासाठी न्यायीपणाचा सूर्य उगवेल. आणि त्याच्या पंखात निरोगी करण्याचा उपाय आहे. मग तुम्ही गोठ्यातून सुटलेल्या वासरांप्रमाणे, मुक्त व आनंदी व्हाल.
आणि मी नवे आकाश आणि नवी पृथ्वी ही बघितली कारण पहिले आकाश व पहिली पृथ्वी ही निघून गेली होती आणि समुद्रही राहिला नव्हता. आणि मी ती पवित्र नगरी, नवे यरूशलेम, देवाकडून स्वर्गातून खाली येत असलेली बघितली. ती वरासाठी साज चढवून सजविलेल्या वधूप्रमाणे दिसत होती; आणि मी राजासनातून एक मोठी वाणी ऐकली; ती म्हणालीः "पाहा, देवाचा मंडप मनुष्यांत आहे, तो त्यांच्याबरोबर वस्ती करील; ते त्याचे लोक होतील आणि देव स्वतः त्यांच्याबरोबर राहील तो त्यांच्या डोळ्यांतले सर्व अश्रू पुसेल; आणि ह्यापुढे मरण राहणार नाही; दुःख, आक्रोश, किंवा क्लेशही होणार नाहीत; कारण पहिल्या गोष्टी होऊन गेल्या आहेत."