Guardar o coração
Guardar o coração é o mandamento mais urgente de Provérbios. Sobre tudo o que se deve guardar, guarda o teu coração, porque dele procedem as fontes da vida.
Sobre tudo, guarda o coração
O coração é a nascente de tudo — pensamentos, desejos, decisões. Guardá-lo é proteger toda a vida espiritual e emocional.
सर्वापेक्षा अधिक तुझ्या हृदयाचे रक्षण कर,
कारण जे सर्वकाही तू करतो, ते त्यापासून निष्पन्न होते.
अठरावे सूत्र
माझ्या मुला, तुझे अंतःकरण मला दे
आणि तुझी दृष्टी माझ्या मार्गामध्ये प्रसन्न असावी,
सुज्ञान कल्याण प्रदान करते
माझ्या मुला, माझे शिक्षण विसरू नकोस,
परंतु माझ्या आज्ञा तुझ्या अंतःकरणात ठेव;
कारण ते तुझे आयुष्य अनेक वर्षापर्यंत वाढवतील,
आणि तुला शांती आणि समृद्धी देतील.
कारण अंतःकरणात जे भरलेले असते तेच मुखातून बाहेर पडते. चांगला मनुष्य त्याच्या अंतःकरणात ज्या चांगल्या गोष्टी साठविलेल्या आहेत त्या बाहेर काढतो, तर दुष्ट अंतःकरणाचा मनुष्य वाईट गोष्टी बाहेर काढतो.
Coração puro e renovado
Cria em mim um coração puro, ó Deus. Os puros de coração verão a Deus — e o Espírito renova nosso interior.
परमेश्वरा, माझ्यामध्ये शुद्ध हृदय निर्माण करा
आणि माझ्यात स्थिर असा आत्मा पुनर्स्थापन करा.
धन्य आहेत ते, जे शुद्ध अंतःकरणाचे आहेत,
कारण त्यांना परमेश्वराचे दर्शन घडेल.
हे परमेश्वरा, माझे परीक्षण करा आणि माझे अंतःकरण पारखून पहा;
माझे चिंताग्रस्त विचार बारकाईने तपासून पाहा.
बघा की एखादी वाईट प्रवृत्ती तर माझ्यात नाही,
आणि मग मला सार्वकालिक जीवनाच्या मार्गाने घेऊन जा.
याहवेह, माझी परीक्षा घ्या, माझे परीक्षण करा,
माझे मन आणि हृदयाची पारख करा.
कारण मी नेहमीच तुमच्या अतुलनीय करुणेची आठवण ठेवतो
आणि तुमच्या विश्वासूपणावर अवलंबून राहिलो.
जरी तुम्ही माझे हृदय पारखले आहे,
रात्रीच्या वेळी तुम्ही माझी झडती घेतली आहे,
तुम्ही मला पारखून पाहिले, तरी माझ्यात तुम्हाला दोष आढळला नाही;
माझ्या मुखाने मी अपराध केले नाही.
जरी लोकांनी मला लाच देण्याचा प्रयत्न केला,
तरी तुमच्या मुखातील वचनांच्या आदेशानुसार
मी त्यांच्या हिंसक मार्गापासून स्वतःला अलिप्त ठेवले.
माझ्या पावलांनी तुमचा मार्ग धरला आहेत,
माझी पावले कधी घसरली नाहीत.
हे परमेश्वरा, माझे अंतःकरण खंबीर आहे,
माझे अंतःकरण खंबीर आहे;
मी तुमची स्तुती करीत गायन आणि वादन करणार.
Guardar com a Palavra
Não vos conformeis com este mundo. A Palavra de Deus guardada no coração nos protege do pecado e nos direciona.
या जगाशी समरूप होऊ नका; तर आपल्या मनाच्या नवीनीकरणाने स्वतःचे रूपांतर होऊ द्या, यासाठी की परमेश्वराची जी उत्तम, ग्रहणीय व परिपूर्ण इच्छा, ती काय आहे, हे तुम्ही समजून घ्यावे.
शास्त्रग्रंथातील हे नियम नेहमी तुझ्या मुखात असू दे; दिवसा आणि रात्री त्यांचे मनन कर, त्यात लिहिलेल्या सर्व गोष्टींचे काळजीपूर्वक पालन करशील, तर तुझी भरभराट होईल आणि तू यशस्वी होशील.
तुम्हाला शोधण्याचा मी पूर्ण हृदयाने प्रयत्न केला आहे;
त्या आज्ञेपासून मला बहकून जाऊ देऊ नका.
मी तुमची वचने माझ्या हृदयात जपून ठेवली आहेत,
जेणेकरून मी तुमच्याविरुद्ध पाप करू नये.
याहवेह तुमच्या परमेश्वरावर तुमच्या पूर्ण हृदयाने, तुमच्या पूर्ण जिवाने आणि तुमच्या पूर्णशक्तीने प्रीती करा. या ज्या आज्ञा मी आज तुम्हाला देणार आहे, त्या तुमच्या अंतःकरणात सदैव असाव्या.
तेव्हा तो त्यांना म्हणाला: "आज मी ज्या नियमशास्त्रामधील आज्ञा तुमच्यापुढे जाहीर केल्या आहेत, त्याला हृदयात साठवून ठेवा आणि तुमच्या मुलाबाळांना काळजीपूर्वक रीतीने त्यांचे पालन करण्यास शिकवा.
Vigilância e paz
A paz de Deus guarda nossos corações em Cristo Jesus. Chegai-vos a Deus, purificai os corações — e Ele estará convosco.
कशाविषयीही चिंताक्रांत होऊ नका, तर सर्व परिस्थितीत, प्रार्थना व विनवणी करीत, उपकारस्तुतीसह आपल्या मागण्या परमेश्वराला कळवा. आणि परमेश्वराची शांती, जी आपल्या सर्व बुद्धीच्या पलीकडे आहे, ती तुमचे विचार आणि तुमची मने ख्रिस्त येशूंमध्ये राखील.
तुम्ही परमेश्वराजवळ या म्हणजे ते तुम्हाजवळ येतील. अहो पाप्यांनो, आपले हात धुवा आणि दुहेरी मनाचे जे आहेत त्यांनी आपली अंतःकरणे शुद्ध करावीत.
तसेच तुम्ही पण, धीर धरा आणि खंबीरपणे उभे राहा, कारण प्रभूचे येणे जवळ आले आहे.
ख्रिस्तामध्ये जिवंत असलेल्यांसारखे जगणे
यास्तव, ख्रिस्ताबरोबर तुम्ही उठविले गेला आहात, तर जिथे ख्रिस्त परमेश्वराच्या उजवीकडे बसले आहे, तेथील वरील गोष्टींकडे आपली मने लावा.