Homem de Deus
O homem de Deus é aquele que busca a justiça, a piedade, a fé e o amor. A Bíblia apresenta modelos de homens íntegros que andaram com Deus e marcaram a história.
Características do homem de Deus
O homem de Deus foge das paixões e segue a justiça, a piedade, a fé, o amor, a perseverança e a mansidão.
सदबोध
हे देवाच्या मनुष्या, तू या गोष्टींपासून दूर राहा. न्यायीपणा, सुभक्ती, विश्वास आणि प्रीती, सहनशीलता आणि लीनता यांच्या पाठीस लाग.
कोणीही तुझे तरुणपण तुच्छ मानू नये, तर बोलण्यात, वर्तणुकीत, प्रीतीत, (आत्म्यात) विश्वासात, शुद्धपणांत, विश्वास ठेवणाऱ्यांचा आदर्श हो.
सावध असा, तुमच्या विश्वासात बळकट राहा. धैर्यशील व्हा. सशक्त व्हा. प्रत्येक गोष्ट जी तुम्ही कराल ती प्रीतीत करा.
हे मनुष्या,
चांगले ते त्याने तुला सांगितले आहे.
आणि न्यायीपणाने वागने, दया व निष्ठा ह्यावर प्रेम करणे
आणि आपल्या परमेश्वरासोबत नम्रपणे चालने.
यांखेरीज परमेश्वर तुझ्याजवळ काय मागतो?
Exemplos bíblicos
Noé era justo e íntegro entre seus contemporâneos. Jó era homem reto que temia a Deus e se desviava do mal.
नोहा आणि तारू
या नोहासंबंधीच्या घटना आहेत; नोहा आपल्या काळच्या लोकांमध्ये नीतिमान आणि निर्दोष मनुष्य होता. नोहा देवाबरोबर चालला
ईयोबाच्या नीतिमत्तेची कसोटी
ऊस देशात एक पुरूष राहत होता त्याचे नाव ईयोब होते, तो सात्वीक व सरळ होता, तो देवाचा आदर करीत असे व वाईटापासून दूर राही.
देवाकडून पाठविलेला एक मनुष्य प्रकट झाला; त्याचे नाव योहान. तो साक्षीकरीता, त्या प्रकाशाविषयी साक्ष द्यावी म्हणून आला; यासाठी की सर्वांनी त्याच्याद्वारे विश्वास ठेवावा.
ज्या कोणाला समंजसपणा असतो त्याच्या मुखापुढे ज्ञान असते,
पण मूर्खाचे डोळे पृथ्वीच्या शेवटाकडे असतात.
Viver como filho de Deus
Quem faz a vontade de Deus é eleito. Medite na Palavra e ande nos caminhos do Senhor como verdadeiro discípulo.
पण जितक्यांनी त्याचा स्वीकार केला, म्हणजे त्याच्या नावावर विश्वास ठेवला, तितक्यांना त्याने देवाची मुले होण्याचा अधिकार दिला. त्यांचा जन्म रक्त किंवा देहाची इच्छा किंवा मनुष्याची इच्छा यापासून झाला नाही, तर देवापासून झाला.
आपल्याला हे माहीत आहे की, देव पापी लोकांचे ऐकत नाही, तर जो मनुष्य देवाचा उपासक आहे आणि जो त्याच्या इच्छेप्रमाणे करतो त्याचे तो ऐकतो.
बेथ
तरुण मनुष्य आपला मार्ग कशाने शुध्द राखील?
तुझ्या वचनाचे पालन करण्याने.
मी आपल्या मनापासून तुझा शोध केला आहे;
तुझ्या आज्ञांपासून मला बहकू देऊ नकोस.
मी तुझ्याविरुध्द पाप करू नये
म्हणून तुझे वचन आपल्या हृदयात साठवून ठेवले आहे.
हे परमेश्वरा, तू धन्य आहेस;
मला तुझे नियम शिकव.
मी आपल्या मुखाने तुझ्या तोंडचे
सर्व योग्य निर्णय जे तू प्रकट केले ते जाहीर करीन.
तुझ्या आज्ञेच्या कराराचा मार्ग हीच माझी सर्व धनसंपत्ती
असे मानून मी त्यामध्ये अत्यानंद करतो.
मी तुझ्या नियमांचे मनन करीन,
आणि तुझ्या मार्गाकडे लक्ष देईन.
मी तुझ्या नियमांनी आनंदित होईन;
मी तुझे वचन विसरणार नाही.
नीतिमान व अनीतिमान
आशीर्वादित आहे तो मनुष्य, जो दुष्टांच्या सल्ल्याने चालत नाही,
किंवा पापी जनांच्या मार्गात उभा राहत नाही,
आणि थट्टा करणाऱ्यांच्या सभेत बसत नाही.
परंतु परमेश्वराच्या शास्त्रात तो आनंद मानतो,
आणि त्याच्या नियमशास्त्रावर तो रात्र व दिवस ध्यान लावतो.
तो पाण्याच्या प्रवाहाजवळ लावलेल्या,
आपल्या ऋतुत फळ देणाऱ्या,
ज्याची पाने कधी कोमेजत नाहीत,
अशा झाडासारखा होईल व तो जे काही करेल ते साध्य होईल.
परंतु दुष्ट लोक असे नसतात, ते वाऱ्याने उडून जाणाऱ्या भुशासारखे असतात.
म्हणून दुष्ट लोक न्यायात व पापी न्यायींच्या सभेत उभे राहावयाचे नाहीत.
कारण परमेश्वर न्यायींच्या मार्गाला मंजूरी देतो.
परंतु दुष्टांचा मार्ग नष्ट होईल.
तर तुमचा जुना मनुष्य त्यास काढून टाकावा कारण तो तुमच्या पूर्वीच्या आचरणासंबंधी जो जुना कपटाच्या वाईट वासनांनी भरलेला असून त्याचा नाश होत आहे, यासाठी तुम्ही आत्म्याद्वारे मनात नवे केले जावे, आणि जो नवा मनुष्य, जो देवानुसार नीतिमान आणि खऱ्या पवित्रतेत निर्माण केलेला आहे. तो धारण करावा.