Homem
A Bíblia fala sobre o homem como criação de Deus — feito à sua imagem e semelhança, mas também frágil, mortal e necessitado de redenção.
Criado à imagem de Deus
Deus criou o homem à sua imagem. Mas pelo pecado, o homem caiu e passou a depender da graça para ser restaurado.
मग परमेश्वराने म्हटले: "आपल्यासारखी, आपल्या प्रतिरूपाची मानवजात आपण निर्माण करू या. समुद्रातील मासे आणि आकाशातील पक्षी, गुरे, सर्व वनपशू आणि जमिनीवर सरपटणार्या प्रत्येक प्राण्यांवर त्यांनी सत्ता चालवावी."
याप्रमाणे परमेश्वराने आपल्या प्रतिरूपाची मानवजात निर्माण केली.
त्यांनी आपल्या प्रतिरूपातच त्यांना निर्माण केले.
पुरुष व स्त्री असे त्यांनी निर्माण केले.
सायंकाळी याहवेह परमेश्वर बागेतून फिरत असल्याचा आवाज त्यांनी ऐकला आणि आदाम व त्याची पत्नी, याहवेह परमेश्वरापासून बागेतील झाडामागे लपली.
एका मनुष्याच्या द्वारे पाप जगात शिरले आणि पापाद्वारे मरण जगात आले; सर्व लोकांमध्ये मरण पसरले, कारण सर्वांनी पाप केले आहे.
असे लिहिले आहे: "पहिला मानव आदाम जिवंत प्राणी झाला." शेवटचा आदाम जीवन देणारा आत्मा आहे. प्रथम आत्मिक आले नाही तर शारीरिक, त्यानंतर आत्मिक आहे. पहिला मानव भूमीच्या धुळीतून आला; दुसरा मानव स्वर्गापासून होता. जसा मानव मातीचा होता, बाकीचेही त्याच्यासारखे मातीचे आहेत आणि जो स्वर्गातील मनुष्य जसा आहे, तसेच जे स्वर्गातील तेही आहेत. आणि आता ज्याप्रमाणे आपण शारीरिक मनुष्याचे प्रतिरूप धारण केले आहे, तसेच आपण स्वर्गीय मनुष्याचे प्रतिरूप धारण करू.
Fragilidade humana
O homem nascido de mulher é de poucos dias e cheio de inquietação. Deus conhece nossa fragilidade e cuida de nós.
"स्त्रीपासून जन्मलेल्या मानवाचे जीवन,
अल्पकालीन व त्रासाने भरलेले आहे.
‘मनुष्य परमेश्वरापेक्षा नीतिमान असू शकतो काय?
बलवान मनुष्य त्याच्या उत्पन्नकर्त्यापेक्षा अधिक शुद्ध असू शकतो काय?
"मानव तो काय की तुम्ही त्याला इतके महत्त्व द्यावे,
व आपले चित्त त्याच्यावर ठेवावे,
परंतु एका ठिकाणी एकाने अशी साक्ष दिली आहे:
"मनुष्य तो काय की तुम्ही त्याची आठवण ठेवावी,
आणि मानवपुत्र कोण की त्याची काळजी करावी?
याहवेह मनुष्याचे मार्ग निर्धारित करतात.
तर मग स्वतःचे मार्ग कोण समजू शकेल?
Renovação e chamado
Despojados do velho homem e revestidos do novo, somos chamados a buscar a justiça, a piedade e o amor.
फसवणुकीच्या इच्छेने भ्रष्ट होत आलेला जुना मनुष्य काढून टाकणे, हे तुम्ही शिकला आहात; तुमची मनोवृत्ती नवी केली जावी; आणि खरे नीतिमत्व व पवित्रता यामध्ये परमेश्वरासारखा उत्पन्न केलेला नवा स्वभाव तुम्ही परिधान करावा.
कारण ते स्वतःच आपली शांती आहेत, त्यांनी दोन गटास एक केले आणि त्यांना विभक्त करणारी शत्रुत्वाची भिंत पाडली. त्यांनी आपल्या देहाने नियमशास्त्राला त्यांच्या आज्ञापालन व विधीसहित दूर केले. यात त्यांचा उद्देश हा होता की या दोघांमधून स्वतःसाठी एक नवा मनुष्य उत्पन्न करून शांती प्रस्थापित करावी.
परंतु हे परमेश्वराच्या माणसा, तू या सर्व गोष्टींपासून पळ आणि नीतिमत्व, सुभक्ती, विश्वास, प्रीती, सहनशीलता आणि लीनता यांच्या पाठीस लाग.
मी बालक होतो, तेव्हा माझे बोलणे, विचार करणे, विवाद करणे बालकासारखे होते. परंतु जेव्हा मी प्रौढ झालो, तेव्हा लेकरांसारखे वागणे मी सोडून दिले आहे.
कारण तुझे मार्ग याहवेहच्या दृष्टीसमोर आहेत,
आणि ते तुझ्या सर्व मार्गांचे परीक्षण करतात.
अंतःकरणाच्या योजना मानव करतो,
परंतु जिभेचे योग्य उत्तर याहवेहपासून येते.
A confiança errada
Maldito o homem que confia no homem. O homem de duplo ânimo é instável em todos os seus caminhos.
याहवेह असे म्हणतात:
"जो मनुष्यावर विश्वास ठेवतो,
जो मर्त्य मनुष्यापासून सामर्थ्य मिळवितो
आणि ज्याचे अंतःकरण याहवेहपासून दूर गेले आहे, तो शापित असो.
अशा व्यक्तीने आपल्याला प्रभूपासून काही मिळेल अशी आशा अजिबात धरू नये. असा मनुष्य दुहेरी मनाचा असून ज्या सर्वगोष्टी तो करतो त्यात अस्थिर असतो.
वडील मनुष्यास कठोरपणे बोलू नको, तर तो जणू काही आपला पिताच आहे, असे मानून आदराने त्यांना बोध कर. जसे भावांशी बोलावे तसे तरुणांशी बोल.