Honestidade
A honestidade é virtude cristã fundamental. Deus é Deus de verdade e nos chama a viver com integridade, transparência e retidão em todos os nossos relacionamentos e negócios.
Integridade diante de Deus
O Senhor abomina a balança falsa, mas o peso justo é seu prazer. A integridade dos justos os guia pelos caminhos retos.
यथार्थ नसलेल्या तराजूचा परमेश्वरास वीट आहे,
पण तंतोतंत वजनात त्यास आनंद आहे.
सरळांचा सात्विकपणा त्यांना मार्गदर्शन करतो,
पण विश्वासघातक्यांचा वाकडा मार्ग त्यांचा नाश करतो.
सरळांचा सात्विकपणा त्यांना मार्गदर्शन करतो,
पण विश्वासघातक्यांचा वाकडा मार्ग त्यांचा नाश करतो.
मग धर्म, निती व सात्विकता तुला समजेल,
आणि प्रत्येक चांगला मार्ग कळेल.
योग्य व न्याय करणे हे यज्ञापेक्षा
परमेश्वरास अधिक मान्य आहेत.
तुझे डोळे नीट समोर पाहोत,
आणि तुझ्या पापण्या तुझ्यापुढे सरळ राहोत.
आम्ही लज्जास्पद गुप्त गोष्टी आम्ही सोडल्यात; आम्ही कपटाने वागत नाही किंवा आम्ही देवाचे वचन फसवेपणाने हाताळीत नाही तर देवाच्या दृष्टीसमोर खरेपण प्रकट करण्यास आम्ही आपणांसमोर सर्व लोकांच्या सद्सदविवेकबुद्धीला पटवितो.
आम्ही ‘प्रभूच्या दृष्टीने जे मान्य,’ इतकेच नव्हे तर ‘मनुष्यांच्याही’ दृष्टीने जे मान्य, ते करण्याची खबरदारी घेतो.
Praticar a honestidade
Falai a verdade, pagai o que deveis, não negueis ao próximo o bem. A honestidade prática é testemunho do evangelho.
एकमेकांशी खोटे बोलू नका कारण तुम्ही जुन्या मनुष्यास त्याच्या कृतींसहित काढून टाकले आहे
म्हणून सर्वांना त्यांचे देणे द्या; ज्याला कर त्यास कर, ज्याला जकात त्यास जकात, ज्याला आदर त्यास आदर, ज्याला मान त्यास मान.
या कारणास्तव तुम्ही करही देता कारण याच गोष्टींत ठाम राहणारे ते देवाचे सेवक आहेत.
वाईटाबद्दल वाईट अशी कोणाची फेड करू नका. सर्व लोकांच्या दृष्टीपुढे चांगल्या गोष्टींवर लक्ष ठेवा.
ज्यांचे हित करणे योग्य असून ते जेव्हा तुझ्या अधिकारात असल्यास,
ते करण्यापासून माघार घेऊ नकोस.
अन्यायाने मिळवलेल्या मोठ्या मिळकतीपेक्षा,
न्यायाने कमावलेले थोडेसे चांगले आहे.
दुष्टाईने गोळा केलेली संपत्ती ही कवडी मोलाची असते.
पण धार्मिकता मरणापासून दूर ठेवते.
Confissão e transparência
Confessai as vossas ofensas uns aos outros. Quem confessa e deixa o pecado encontra misericórdia e restauração.
एखाद्याने आपले पाप लपवले तर त्याची उन्नती होत नाही,
पण एखाद्याने त्याच्या पापांची कबुली दिली आणि ते सोडून दिले तर त्याच्यावर दया दाखवण्यात येईल.
म्हणून एकमेकांकडे आपल्या पापांची कबुली द्या आणि एकमेकांसाठी प्रार्थना करा. यासाठी की, तुम्ही बरे व्हावे. नीतिमान मनुष्याची प्रार्थना सामर्थ्ययुक्त व परिणामकारक असते.
माझ्या बंधूंनो, मुख्यतः शपथ वाहू नका; स्वर्गाची, पृथ्वीची किंवा दुसरी कशाचीही शपथ वाहू नका. तुम्ही दोषी ठरू नये म्हणून तुम्हास होय म्हणायचे तर होयच म्हणा. तुम्हास नाही म्हणायचे तर नाहीच म्हणा.
पण जे ज्ञानीपण वरून येते ते प्रथम शुद्ध, त्याशिवाय शांतीशील, सहनशील आणि विचारशील असते. ते दयेने व चांगल्या फळांनी भरलेले असते; ते निःपक्षपाती व निर्दोष असते.
जर आम्ही म्हणतो की, आमची देवाबरोबर सहभागिता आहे पण पापाच्या अंधारामध्ये आम्ही जगतो तर आम्ही खोटे बोलत आहोत व सत्याला अनुसरत नाही.
प्रिय मुलांनो, आपण शब्दाने किंवा जीभेने नव्हे, तर कृतीने व खरेपणाने प्रीती करावी.
Coração puro
Bem-aventurados os puros de coração, porque verão a Deus. A honestidade começa no interior e se manifesta nas ações.
जे अंतःकरणाचे शुद्ध ते धन्य आहेत,
कारण ते देवाला पाहतील.
परमेश्वरासमोर स्तब्ध राहा आणि धीराने त्याची वाट पाहा.
जर मनुष्य दुष्ट योजना आखतो, कोणी आपले वाईट मार्ग सिद्धीस नेतो,
तर काळजी करू नको.
जो मनुष्य दया करतो आणि उसने देतो,
जो प्रामाणिकपणे वागून आपला व्यापार करतो त्याचे चांगले होते.
तू सत्याचे वचन योग्य रीतीने सांगणारा असा आणि जे काम करतोस त्यामध्ये लाज वाटण्यासारखे काहीही कारण नसलेला देवास स्वीकृत असा कामकरी होण्याचा प्रयत्न कर.
आणि कोणी दिवा लावल्यावर तो भांड्याने झाकत नाही किंवा पलंगाखाली ठेवत नाही तर आत येणाऱ्यांना उजेड दिसावा म्हणून तो दिवठणीवर ठेवतो.
दुष्ट मनुष्य आपल्या पापी बोलल्याने पाशात पडतो,
पण नीतिमान संकटातून निसटतो.
जो कोणी खरे बोलतो तो जे काय योग्य आहे ते सांगतो,
पण खोटा साक्षीदार लबाड सांगतो.
कुटिल मनुष्य संघर्ष निर्माण करतो,
आणि निंदा करणाऱ्या जवळच्या मित्रांना वेगळे करतो.