Honestidade
A honestidade é virtude cristã fundamental. Deus é Deus de verdade e nos chama a viver com integridade, transparência e retidão em todos os nossos relacionamentos e negócios.
Integridade diante de Deus
O Senhor abomina a balança falsa, mas o peso justo é seu prazer. A integridade dos justos os guia pelos caminhos retos.
खोट्या तराजूंचा याहवेह तिरस्कार करतात,
परंतु अचूक वजनांमुळे त्यांना संतोष होतो.
नीतिमानाचा प्रामाणिकपणा त्यांचे मार्गदर्शन करतो,
परंतु दुटप्पीपणा विश्वासघातकी लोकांचा नाश करतो.
नीतिमानाचा प्रामाणिकपणा त्यांचे मार्गदर्शन करतो,
परंतु दुटप्पीपणा विश्वासघातकी लोकांचा नाश करतो.
तेव्हा कोणते योग्य व कायदेशीर,
आणि निष्पक्ष आहे—प्रत्येक सन्मार्ग तुला समजेल.
अर्पणापेक्षा मनुष्याच्या न्याय्य व
रास्त वागण्याने याहवेहला अधिक संतोष होतो.
तुझ्या डोळ्यांनी तू समोरच पाहा;
तुझी नजर एकटक सरळ बघेल असे लक्ष ठेव.
आम्ही सर्व गुप्त व लज्जास्पद गोष्टींचा त्याग केला आहे; आम्ही खोटेपणा करीत नाही आणि परमेश्वराचे वचन विकृत करीत नाही. याउलट, सरळपणाने सत्य प्रकट करून परमेश्वरासमोर प्रत्येक मनुष्याच्या सदसद्विवेकबुद्धीने आपणास पटवितो.
फक्त प्रभूंच्या दृष्टिकोनातून नव्हे तर मानवाच्या दृष्टिकोनातूनही जे योग्य आहे ते करण्याकरिता आम्ही श्रम घेतो.
Praticar a honestidade
Falai a verdade, pagai o que deveis, não negueis ao próximo o bem. A honestidade prática é testemunho do evangelho.
एकमेकांशी लबाडी करू नका, कारण तुमचा जुना मनुष्य त्याच्या कृतींसह तुम्ही काढून टाकला आहे.
प्रत्येकाला त्याचे जे काही देणे असेल, ते द्या: जर कर द्यायचे तिथे कर द्या, महसूल असेल तर महसूल द्या. आणि जिथे सन्मान तिथे सन्मान, जिथे आदर तिथे आदर द्या.
याकारणास्तव तुम्ही करही देता; कारण अधिकारी परमेश्वराचे सेवक आहेत आणि त्यांना पूर्णवेळ सेवा करणे आवश्यक आहे.
वाईटाने वाईटाची फेड करू नका. सर्वांच्या दृष्टीने जे योग्य आहे ते करा.
ज्यांचे भले करण्याचे तुझ्या आटोक्यात असले,
तर ते करण्यास नाकारू नकोस.
अप्रामाणिक मार्गाने मिळविलेल्या अफाट संपत्तीपेक्षा
प्रामाणिकपणे मिळविलेले थोडकेच बरे.
दुष्टाईने मिळविलेल्या संपत्तीस कायमचे मूल्य नसते
परंतु धार्मिकता मृत्यूपासून सोडविते.
Confissão e transparência
Confessai as vossas ofensas uns aos outros. Quem confessa e deixa o pecado encontra misericórdia e restauração.
जो कोणी त्याचे पाप झाकून ठेवतो, तो समृद्ध होत नाही,
परंतु जो अपराध कबूल करून ते करण्याचे सोडून देतो त्याला कृपा प्राप्त होते.
यास्तव एकमेकांजवळ आपली पापे कबूल करा व एकमेकांसाठी प्रार्थना करा, म्हणजे तुम्ही निरोगी व्हाल. नीतिमान माणसाची प्रार्थना प्रबळ व परिणामकारक असते.
या सर्वांपेक्षा, माझ्या बंधू आणि भगिनींनो, ना स्वर्गाची, ना पृथ्वीची किंवा दुसर्या कोणत्याच गोष्टींची शपथ वाहू नका. जे काही तुम्हाला म्हणावयाचे ते साधे "होय" किंवा "नाही" असावे. नाही तर तुम्ही दोषी ठरविले जाल.
परंतु स्वर्गातून येणारे ज्ञान हे सर्वप्रथम शुद्ध, नंतर शांतिप्रिय, विचारशील, विनयी, दयामयी व चांगली फळे यांनी भरलेले, अपक्षपाती आणि प्रामाणिक असते.
जर आम्ही असे म्हणतो की, आमची त्यांच्याबरोबर सहभागिता आहे आणि तरीसुद्धा अंधारात राहतो तर आम्ही खोटे बोलतो आणि खरेपणाने जगत नाही.
प्रिय लेकरांनो, आपण शब्दांनी किंवा कोरड्या बोलण्याने प्रीती करू नये, परंतु कृतीने आणि सत्याने प्रीती करावी.
Coração puro
Bem-aventurados os puros de coração, porque verão a Deus. A honestidade começa no interior e se manifesta nas ações.
धन्य आहेत ते, जे शुद्ध अंतःकरणाचे आहेत,
कारण त्यांना परमेश्वराचे दर्शन घडेल.
याहवेहसमोर निश्चिंत राहा
व धीराने त्यांची वाट पाहा;
जेव्हा लोकांना त्यांच्या मार्गात यश मिळते,
त्यांच्या दुष्ट योजना सफल होतात, तेव्हा तू संतापू नकोस.
ज्यांचे अंतःकरण उदार असून ते मुक्तपणे उसने देतात त्यांचे भले होते,
जे आपला व्यवहार न्यायाने करतात.
तू सत्यवचन नीट सांगणारा, लाज वाटण्यास कोणतेही कारण नसलेला, परमेश्वराच्या पसंतीस उतरलेला कामकरी, असा तू स्वतःस परमेश्वराला सादर करण्याचा प्रयत्न कर.
"कोणी दिवा लावून मातीच्या भांड्याखाली मापाखाली किंवा खाटेखाली ठेवीत नाही! जे आत येणारे आहेत त्यांना दिव्याचा प्रकाश मिळावा म्हणून दिवठणीवर ठेवतात.
दुष्ट माणसे त्यांच्या वाईट बोलण्याने जाळ्यात सापडतात,
आणि निर्दोष मनुष्य संकटातून बाहेर पडतो.
प्रामाणिक साक्षीदार सत्य बोलतो,
परंतु खोटा साक्षीदार लबाड बोलतो.
विकृत मनुष्य कलहास चेतावणी देतो,
आणि निंदानालस्ती जिवलग मित्रांना सुद्धा विभक्त करते.