Incentivo
A Bíblia é fonte inesgotável de incentivo. Em cada página, Deus nos encoraja a não temer, a perseverar e a confiar que Ele está conosco e é maior que qualquer adversidade.
Deus é por nós
Se Deus é por nós, quem será contra nós? O Senhor fortalece, sustenta e guia seus filhos em cada batalha e desafio.
अशा गोष्टींना प्रतिसाद म्हणून काय म्हणावे? जर परमेश्वर आपल्या पक्षाचे आहेत तर आमच्याविरुद्ध कोण असू शकेल?
भिऊ नका, कारण मी तुम्हाबरोबर आहे;
हिंमत खचू देऊ नका, कारण मी तुमचा परमेश्वर आहे.
मी तुम्हाला समर्थ करेन व तुम्हाला मदत करेन;
मी माझ्या नीतिमत्तेच्या उजव्या हाताने तुम्हाला उचलून धरेन.
पण जे याहवेहवर आशा ठेवतात
ते नवे सामर्थ्य प्राप्त करतात,
ते त्यांच्या पंखांनी गरुडाप्रमाणे वर झेप घेतील;
ते धावतील पण दमणार नाहीत,
ते चालतील पण क्षीण होणार नाहीत.
जे मला शक्ती देतात त्यांच्याद्वारे सर्वकाही करण्यास मी समर्थ आहे.
खंबीर व्हा आणि हिंमत धरा. त्यांना भिऊ नका वा घाबरू नका, कारण याहवेह तुमचे परमेश्वर तुमच्याबरोबर जातील; ते तुम्हाला कधीही सोडणार नाही किंवा त्यागणार नाही."
कारण परमेश्वराने आम्हाला भित्रेपणाचा आत्मा नाही, तर सामर्थ्य, प्रीती आणि आत्मसंयमनाचा आत्मा दिला आहे.
Esperança e perseverança
A tribulação produz perseverança, a perseverança produz caráter, e o caráter produz esperança que não decepciona.
इतकेच केवळ नव्हे तर क्लेशातही आनंद करतो, कारण आपणास माहीत आहे की दुःख हे धीर उत्पन्न करते. धीरामुळे, चारित्र्य; आणि चारित्र्यामुळे, आशा. आशेमुळे आपण लज्जित होणार नाही, कारण आपणाला दिलेल्या पवित्र आत्म्याद्वारे परमेश्वराची प्रीती आपल्या अंतःकरणात ओतली गेली आहे.
तुमचा विश्वास सोडू नका, त्याचे मोठे प्रतिफळ तुम्हाला मिळणार आहे.
तुम्हाला जे काही सोसावे लागणार आहे त्याची भीती बाळगू नका. तुमची परीक्षा व्हावी म्हणून सैतान तुमच्यापैकी कित्येकांना तुरुंगात टाकणार आहे आणि दहा दिवस तुम्हाला छळ सहन करावा लागेल. परंतु तुम्ही मरेपर्यंत विश्वासू राहा आणि मी तुम्हाला विजयाचे मुकुट म्हणून जीवन देईन.
"मी या सर्वगोष्टी तुम्हाला सांगितल्या, ते यासाठी की माझ्यामध्ये तुम्हाला शांती मिळावी. या जगात तुम्हाला त्रास सहन करावा लागेल. परंतु धीर धरा! कारण मी जगावर विजय मिळविला आहे."
यास्तव, आम्ही कधीही निराश होत नाही. आमची बाह्य शरीरे अशक्त होत असली, तरी आम्ही अंतर्यामी दिवसेंदिवस नवीन होत आहोत. आमची संकटे अति हलकी व क्षणिक आहेत तरी त्यामुळे सदासर्वकाळचे गौरव प्राप्त होणार आहे की ज्याची तुलना आम्ही करू शकत नाही. म्हणून ज्यागोष्टी दृश्य आहेत त्यावर आम्ही आपले लक्ष केंद्रित करत नाही, परंतु जे अदृश्य आहे त्यावर करतो, कारण जे दृश्य आहे ते तात्पुरते आहे, परंतु जे अदृश्य आहे ते सार्वकालिक आहे.
"जर तुम्हाला शक्य असेल?" येशू म्हणाले, "जो विश्वास ठेवतो त्याला सर्वकाही शक्य आहे."
Deus cuida de nós
Entrega o teu caminho ao Senhor. Lança sobre Ele as tuas ansiedades, porque Ele tem cuidado de nós diariamente.
तू आपला जीवनक्रम याहवेहच्या स्वाधीन कर;
त्यांच्यावर भरवसा ठेव, म्हणजे ते तुझ्यासाठी हे करतील:
ज्याला याहवेह प्रिय वाटतात,
त्या मनुष्याची पावले याहवेह स्थिर करतात;
जरी तो अडखळला, तरी तो खाली पडणार नाही,
कारण याहवेह त्याला आपल्या हाताने सावरतील.
तू आपला भार याहवेहवर टाक
आणि ते तुला आधार देतील;
नीतिमानाला ते कधीही
विचलित होऊ देणार नाही.
संकटसमयी मी याहवेहकडे आरोळी मारली,
आणि त्यांनी ती ऐकली.
असंख्य मला चहूबाजूंनी वेढतील,
तरी मला मुळीच भीती वाटणार नाही.
Futuro e promessas
Eu sei os planos que tenho para vocês — planos de paz e não de mal, para dar-lhes futuro e esperança.
याहवेह असे जाहीर करतात, "कारण मी तुमच्यासाठी केलेल्या योजना मला माहीत आहेत, त्या योजना तुमच्या भल्यासाठी आहेत, वाईटासाठी नाहीत, तुम्हाला आशा व उज्वल भविष्यकाळ देण्याच्या त्या योजना आहेत.
महाप्रतापी योद्धा जे रक्षणकर्ता आहेत,
ते याहवेह तुझे परमेश्वर तुझ्यासह आहेत.
त्यांना तुझ्यामुळे अत्यंत आनंद होतो;
तुझ्यावरील प्रीतीमुळे ते तुजवर दोषारोपण करणार नाहीत.
त्याऐवजी तुझ्याबद्दल ते गीत गाऊन उल्हास व्यक्त करतील."
येशूंनी त्यांच्याकडे पाहिले आणि म्हटले, "मानवाला हे अशक्य आहे, परंतु परमेश्वराला सर्वगोष्टी शक्य आहेत."
तरी शास्त्रलेखानुसार:
"जे डोळ्यांनी पाहिले नाही,
जे कोणत्याही कानावर पडले नाही,
माणसाच्या मनात आले नाही,"—
त्या सर्वगोष्टी परमेश्वरावर प्रीती करणाऱ्यांसाठी त्यांनी सिद्ध केल्या आहेत—
परंतु शम्माह त्या शेताच्या मध्यभागी उभा राहिला, त्याचा बचाव त्यांनी केला आणि पलिष्ट्यांना मारून टाकले आणि याहवेहने त्या दिवशी मोठा विजय मिळवून दिला.