Intimidade com Deus
A intimidade com Deus é o maior privilégio do cristão. Ele nos convida a nos aproximar, a conhecê-lo profundamente e a desfrutar de comunhão diária com o Criador do universo.
Aproximar-se de Deus
Chegai-vos a Deus e Ele se chegará a vós. Deus deseja intimidade, não religiosidade. Ele busca os que o buscam de todo coração.
तुम्ही देवाच्या जवळ या म्हणजे तो तुमच्याजवळ येईल. अहो पाप्यांनो, तुम्ही हात शुद्ध करा; अहो द्विमनाच्या मनुष्यांनो, अंतःकरणे शुद्ध करा.
अहो सर्व तान्हेल्यांनो, पाण्याजवळ या! आणि ज्याच्याजवळ पैसा नाही,
सर्व या, विकत घ्या आणि खा! या, पैश्याशिवाय व मोलाशिवाय मद्य आणि दूध घ्या.
जी भाकर नव्हे तिच्यासाठी तुम्ही चांदी का तोलून देता?
आणि ज्याने समाधान होत नाही त्यासाठी श्रम का करता?
माझे लक्षपूर्वक ऐका आणि जे चांगले आहे ते खा व मिष्टान्नात तुमचे जीवन आनंदीत होवो.
तुम्ही कान द्या आणि माझ्याकडे या! ऐका, म्हणजे तुमचे जीवन जिवंत राहील!
मी खरोखर तुमच्याबरोबर सर्वकाळचा करार करीन, विश्वासाची कृती करून दावीदाशी करार केला.
पाहा, मी त्यास राष्ट्रात साक्षी, लोकांचा अधिपती व सेनापती याप्रमाणे ठेवले आहे.
पाहा, तू राष्ट्र ओळखत नाहीस अशा राष्ट्राला तू बोलावशील आणि ज्या राष्ट्राला तुझी ओळख नाही ते तुजकडे धाव घेतील.
कारण परमेश्वर तुझा देव, इस्राएलाचा पवित्र प्रभू, ज्याला तू गौरविले आहे याच्याकरता तुजकडे धाव घेतील.
परमेश्वर सापडेल त्याकाळी त्यास शोधा; तो जवळ असतानाच त्यास बोलवा.
त्यांनी हाक मारण्या पूर्वीच मी त्याना उत्तर देईन, आणि ते बोलत असताच मी त्यांचे ऐकेन.
मला हाक मार आणि मी तुला उत्तर देईन. ज्या तुला समजत नाही अशा महान, गहन गोष्टी मी तुला दाखवीन.
कारण परमेश्वर असे म्हणतो की, तुमच्याविषयी माझ्या मनात ज्या योजना आहेत त्या मी जाणतो; त्या योजना तुमच्या हिताच्या आहेत आणि अनिष्टासाठी नाहीत, त्या तुम्हास भविष्य व आशा देणाऱ्या आहेत.
Sede de Deus
Como a corça deseja as correntes de água, assim a minha alma suspira por ti, ó Deus. A intimidade nasce do desejo profundo.
जशी हरिणी पाण्याच्या प्रवाहासाठी धापा टाकते,
तसा हे देवा, माझा जीव तुझ्यासाठी धापा टाकतो.
माझा जीव देवासाठी, जिवंत देवासाठी तहानेला आहे.
मी केव्हा देवासमोर येऊन हजर होईन?
हे देवा, तू माझा देव आहेस; मी कळकळीने तुझा शोध घेईन;
शुष्क आणि रूक्ष आणि निर्जल ठिकाणी माझा जीव तुझ्यासाठी तान्हेला झाला आहे;
माझा देहही तुझ्यासाठी आसुसला आहे.
म्हणून मी तुझे सामर्थ्य आणि गौरव पाहण्यासाठी
मी आपली दृष्टी पवित्र मंदिराकडे लावली आहे.
कारण तुझी कराराची विश्वसनियता ही जीवनापेक्षा उत्तम आहे;
माझे ओठ तुझी स्तुती करतील.
म्हणून मी जिवंत आहे तोपर्यंत मी तुला धन्यवाद देईन;
मी आपले हात तुझ्या नावात उंच करीन.
माझा जीव मज्जेने आणि चरबीने व्हावा तसा तृप्त होईल;
माझे तोंड आनंदी ओठाने तुझी स्तुती करतील.
मी आपल्या अंथरुणावर तुझ्याविषयी विचार करतो
आणि रात्रीच्या समयी त्यावर मनन करतो.
कारण तू माझे सहाय्य आहे,
आणि मी तुझ्या पंखाच्या सावलीत आनंदी आहे.
माझा जीव तुला चिकटून राहतो;
तुझा उजवा हात मला आधार देतो.
पण जे माझ्या जिवाचा नाश करण्याचा शोध घेतात
ते पृथ्वीच्या खालच्या भागात जातील.
त्यांना तलवारीच्या अधिकारात दिले जाईल;
त्यांना कोल्ह्यांचा वाटा म्हणून देतील.
परंतु राजा देवाच्या ठायी जल्लोष करेल;
जो कोणी त्याची शपथ घेईल तो त्याजवर गर्व करेल,
पण जे कोणी खोटे बोलतात त्यांचे तोंड बंद होईल.
Unidade com o Pai
Jesus orou pela unidade dos seus com o Pai. A intimidade com Deus inclui confissão, perdão e alegria na comunhão.
तू जे गौरव मला दिले आहे, ते मी त्यांना दिले आहे, यासाठी की, जसे आपण एक आहोत तसे त्यांनी एक व्हावे; म्हणजे मी त्यांच्यामध्ये आणि तू माझ्यामध्ये; यासाठी की, त्यांनी एक होऊन पूर्ण व्हावे आणि, त्यावरून जगाने समजून घ्यावे की, तू मला पाठवले आणि जशी तू माझ्यावर प्रीती केली तशी त्यांच्यावरही प्रीती केली.
परमेश्वर तुझा देव, तुझ्यामध्ये आहे, तो तुला वाचवायला पराक्रमी असा आहे; तो हर्षाने तुझ्याविषयी आनंद करील,
तो त्याच्या प्रेमासोबत तुझ्याकडे शांती घेऊन येईल.
तो गायनाने तुझ्याविषयी आनंद करील.
जर आपण आपली पापे कबूल करतो, तर तो विश्वासू व न्यायी आहे म्हणून आपल्या पापांची क्षमा करील आणि आपल्याला सर्व अनीतीपासून शुद्ध करील.