Jovens
Deus tem planos maravilhosos para os jovens. A Bíblia os convida a consagrar a juventude ao Senhor, crescer em sabedoria e ser exemplo para todos em fé, palavra, conduta e amor.
Ninguém despreze a tua mocidade
Paulo exortou Timóteo: sê exemplo dos fiéis na palavra, no procedimento, no amor, no espírito, na fé e na pureza.
कोणालाही तुझे तरुणपण तुच्छ लेखू देऊ नकोस. तर तू विश्वासणार्यांसाठी बोलण्यात, वर्तणुकीत, प्रीतीत, विश्वासात, शुद्धपणात कित्ता हो.
तसेच, तरुणांनी आत्मसंयमी व्हावे, म्हणून त्यांना प्रोत्साहित कर.
लेकरांनो, प्रभूमध्ये तुम्ही आपल्या आईवडिलांची आज्ञा पाळा, कारण हे योग्य आहे. "तुमच्या आई आणि वडिलांचा मान राखा" अभिवचन असलेली ही पहिली आज्ञा आहे. "यासाठी की तुमचे कल्याण व्हावे आणि तुम्हाला पृथ्वीवर दीर्घायुष्याचा लाभ घेता यावा."
लेकरांनो, प्रभूमध्ये तुम्ही आपल्या आईवडिलांची आज्ञा पाळा, कारण हे योग्य आहे. "तुमच्या आई आणि वडिलांचा मान राखा" अभिवचन असलेली ही पहिली आज्ञा आहे.
Lembrar do Criador na juventude
Lembra-te do teu Criador nos dias da tua mocidade. A sabedoria ganha cedo produz frutos duradouros na vida inteira.
तुझ्या तारुण्याच्या दिवसात
तुझ्या निर्माणकर्त्याचे स्मरण कर,
आणि जोपर्यंत कष्टाचे दिवस येत नाहीत
आणि अशी वर्षे येत नाहीत जेव्हा तुम्ही म्हणाल,
"मला त्यांच्यामध्ये काही संतोष नाही"—
तुझ्या तारुण्याच्या दिवसात
तुझ्या निर्माणकर्त्याचे स्मरण कर,
आणि जोपर्यंत कष्टाचे दिवस येत नाहीत
आणि अशी वर्षे येत नाहीत जेव्हा तुम्ही म्हणाल,
"मला त्यांच्यामध्ये काही संतोष नाही"—
जोपर्यंत सूर्य आणि प्रकाश,
आणि चंद्र आणि तारे अंधकारमय होत नाहीत,
पावसानंतर ढग परत जात नाहीत;
जेव्हा घराचे पहारेकरी थरथर कापतील,
आणि बलवान पुरुष वाकून जातील,
दळण करणार्या थोडक्या आहेत म्हणून काम थांबवतील,
आणि खिडक्यांमधून पाहणार्यांची नजर अंधुक होईल;
जो तू तरुण आहेस, तो तू तारुण्यात आनंदी राहा,
तुझ्या तारुण्याच्या दिवसांत तुझे हृदय तुला आनंद देवो.
तुझे हृदय जे काही इच्छिते
आणि तुझे नेत्र जे काही पाहतात त्याप्रमाणे कर,
परंतु हे लक्षात असू दे
की परमेश्वर या सर्वांनुसार तुझा न्याय करेल.
म्हणून तू आपल्या मनातून चिंता नाहीशी कर
आणि आपल्या देहातील वाईट गोष्टी काढून टाक,
कारण तारुण्य आणि जोश निरर्थक आहेत.
मूर्ख आणि संभाव्य संकटाचा इशारा न समजणारा राजा असण्यापेक्षा, गरीब परंतु सुज्ञ तरुण असणे चांगले.
Força e promessa
Os jovens renovam suas forças quando esperam no Senhor. Deus levanta jovens com visões e sonhos para transformar o mundo.
तरुण थकतात व कंटाळतात,
तरुण पुरुष देखील ठेचाळतात व पडतात;
पण जे याहवेहवर आशा ठेवतात
ते नवे सामर्थ्य प्राप्त करतात,
ते त्यांच्या पंखांनी गरुडाप्रमाणे वर झेप घेतील;
ते धावतील पण दमणार नाहीत,
ते चालतील पण क्षीण होणार नाहीत.
"आणि त्यानंतर,
मी माझा आत्मा सर्व लोकांवर ओतेन.
तुमचे पुत्र व तुमच्या कन्या भविष्यवाणी सांगतील,
व तुमचे वृद्ध स्वप्ने पाहतील,
तुमचे तरुण दृष्टान्त पाहतील.
माझ्या दासांवर म्हणजेच, स्त्री आणि पुरुष दोघांवरही,
त्या दिवसांत मी माझा आत्मा ओतेन.
परमेश्वराने या चार तरुणांना सर्वप्रकारच्या साहित्याचे ज्ञान आणि समज दिली. दानीएलला सर्व प्रकारची स्वप्ने व दृष्टान्त समजत असत.
राजाने नेमून दिलेल्या वेळेनंतर प्रमुख अधिकार्याने त्यांना बाबेलचा राजा नबुखद्नेस्सरपुढे त्याच्या सेवेसाठी प्रस्तुत केले. राजा त्यांच्यासोबत बोलला आणि त्या सर्वांमध्ये दानीएल, हनन्याह, मिशाएल व अजर्याह यांच्यासारखे कोणीही सापडले नाही; म्हणून त्यांना राजाच्या सेवेसाठी निवडण्यात आले.
तरुणांचे भूषण त्यांचे बळ आहे.
वृद्धांचे भूषण त्यांचे पांढरे केस आहेत.
अगदी लहान मुलेसुद्धा खरोखरच प्रामाणिक आणि निर्दोष आहेत
ते त्यांच्या कृत्यांवरून ओळखली जात नाहीत काय?
Guardar o caminho
Como purificará o jovem seu caminho? Guardando-o segundo a tua Palavra. A Escritura na juventude guarda do pecado a vida inteira.
तरुण मनुष्य शुद्ध मार्गावर कसा चालत राहील?
ते तुमच्या वचनानुसार आचरण करूनच.
मी तुमची वचने माझ्या हृदयात जपून ठेवली आहेत,
जेणेकरून मी तुमच्याविरुद्ध पाप करू नये.
प्रभू याहवेह, केवळ तुम्हीच माझे आशास्थान आहात;
तारुण्यापासून मी तुमच्यावर भरवसा ठेवला आहे.
युवक व युवतींनो,
वृद्ध व बालके.
तुम्ही सर्व याहवेहचे स्तवन करा,
कारण केवळ त्यांच्याच नामाला महिमा मिळो;
त्यांचे ऐश्वर्य पृथ्वी आणि आकाशाहून महान आहे.
इस्राएलचा राजा दावीदाचा पुत्र शलोमोनाची नीतिसूत्रे:
सुज्ञान आणि शिक्षण मिळविण्यासाठी;
अंतर्ज्ञानाचे शब्द समजून घेण्यासाठी;
समंजसपणाने शिक्षणाचा स्वीकार करण्यासाठी,
जे योग्य आहे आणि न्याय्य आणि वाजवी आहे ते करण्यासाठी;
जे साधे भोळे आहेत त्यांना समंजसपणा देण्यासाठी,
तरुणांना ज्ञान आणि विवेकबुद्धी देण्यासाठी—
माझ्या मुला, ऐक आणि सुज्ञ हो
आणि तुझे अंतःकरण योग्य मार्गात स्थिर कर:
जे अतिमद्यपान करतात
किंवा जे आधाशीपणे मांस खातात त्यांची संगत करू नको,
कारण मद्यपी व खादाड गरीब होतात,
आणि गुंगीत असणार्यांना फाटके कपडे घालावे लागतील.
आपल्या वडिलांचे ऐक ज्याने तुला जीवन दिले,
आणि तुझी आई वृद्ध झाल्यावर तिचा तिरस्कार करू नको.
Coragem e vocação
Deus chamou jovens como Jeremias e Josué para grandes missões. A juventude não é desculpa — é oportunidade de servir poderosamente.
मी म्हटले, "अहो सार्वभौम याहवेह, पाहा, मला तर बोलताही येत नाही; मी केवळ एक कोवळा तरुण आहे."
परंतु याहवेह मला म्हणाले, " ‘मी कोवळा तरुण आहे,’ असे म्हणू नकोस. मी तुला जिथे पाठवेन, तिथे तुला जावे लागेल आणि मी जे तुला सांगेन, ते तुला बोलावे लागेल. त्यांना भिऊ नकोस, मी तुला संकटातून सोडविण्यासाठी तुझ्यासह आहे," याहवेह असे जाहीर करीत आहेत.
याहवेह असे जाहीर करतात, "कारण मी तुमच्यासाठी केलेल्या योजना मला माहीत आहेत, त्या योजना तुमच्या भल्यासाठी आहेत, वाईटासाठी नाहीत, तुम्हाला आशा व उज्वल भविष्यकाळ देण्याच्या त्या योजना आहेत. मग तुम्ही माझ्याकडे याल व माझी प्रार्थना कराल, तेव्हा त्या मी ऐकेन. तुम्ही माझा शोध कराल, मनापासून माझा शोध कराल, तेव्हा मी तुम्हाला सापडेन." याहवेह जाहीर करतात, "मी तुम्हाला आढळेन व तुमच्या दास्यातून तुम्हाला परत आणेन, तुम्हाला ज्या सर्व राष्ट्रातून व ठिकाणाहून इतर देशात बंदिवासात पाठविले, तर तुम्हाला त्याच ठिकाणी परत आणेन," असे याहवेह जाहीर करतात.
"मात्र तू खंबीर हो आणि फार धैर्यवान हो. माझा सेवक मोशेने तुम्हाला दिलेले सर्व नियम पाळण्याची काळजी घे; त्यापासून उजवीकडे किंवा डावीकडे वळू नको, म्हणजे जिथे तू जाशील तिथे तू यशस्वी होशील. शास्त्रग्रंथातील हे नियम नेहमी तुझ्या मुखात असू दे; दिवसा आणि रात्री त्यांचे मनन कर, त्यात लिहिलेल्या सर्व गोष्टींचे काळजीपूर्वक पालन करशील, तर तुझी भरभराट होईल आणि तू यशस्वी होशील. मी तुला आज्ञापिले नाही का? खंबीर हो आणि धैर्यवान हो. भिऊ नको; निराश होऊ नको, कारण तू जिथे जाशील तिथे याहवेह तुझे परमेश्वर तुझ्याबरोबर असतील."
त्याच प्रकारे तुम्ही जे तरुण आहात, तुमच्या वडीलधार्यांच्या अधीन राहा. तुम्ही सर्वजण एकमेकांबरोबर नम्रता परिधान करून राहा, कारण,
"परमेश्वर गर्विष्ठांचा विरोध करतात
परंतु नम्रजनावर कृपा करतात."
परमेश्वराच्या पराक्रमी हाताखाली स्वतःला नम्र करा, म्हणजे ते तुम्हाला योग्य वेळी उंच करतील.
प्रिय मुलांनो मी तुम्हाला लिहितो,
कारण तुम्ही पित्याला ओळखता.
वडिलांनो मी तुम्हाला लिहितो,
कारण तुम्ही त्यांना ओळखता जे सुरुवातीपासून आहेत.
तरुणांनो मी तुम्हाला लिहितो,
कारण तुम्ही सशक्त आहात
आणि परमेश्वराचे वचन तुम्हामध्ये राहते,
आणि तुम्ही त्या दुष्टावर विजय मिळविला आहे.
दिवस आहे तोपर्यंत आपली वागणूक सभ्य असू द्या. दंगलीत, मद्याच्या धुंदीत, लैंगिक अनैतिकतेत, कामासक्तीत, कलहात व मत्सरात आपला वेळ व्यर्थ दवडू नका.
मनुष्याने त्याच्या तारुण्यात जू वाहणे
त्याच्या हितासाठी आहे.