Ler a Bíblia
Ler a Bíblia é essencial para a vida cristã. A Escritura é lâmpada para os pés, alimento para a alma e espada do Espírito. O cristão que lê a Bíblia é transformado pela Palavra.
A importância de ler
Meditar na Palavra dia e noite traz prosperidade e bom sucesso. Ler a Bíblia ilumina o entendimento e fortalece a fé.
नियमशास्त्राचा हा ग्रंथ तुझ्या मुखातून निघून जाऊ नये म्हणून रात्रंदिवस त्याचे मनन कर, त्या जे काही लिहिले आहे ते सर्व तू पाळ. मग तुझी भरभराट होईल आणि तू यशस्वी होशील.
नून
तुझे वचन माझ्या पावलाकरता दिवा आहे,
आणि माझ्या मार्गासाठी प्रकाश आहे.
तुझ्या वचनाच्या उलगड्याने प्रकाश प्राप्त होतो;
त्याने अशिक्षितास ज्ञान प्राप्त होते.
मेम
अहाहा, तुझे नियमशास्त्र मला किती प्रिय आहेत!
दिवसभर मी त्याच्यावर मनन करतो.
तुझ्या आज्ञा मला माझ्या शत्रूंपेक्षा ज्ञानी करतात,
कारण तुझे नियम नेहमी माझ्याजवळ आहेत.
माझ्या सर्व शिक्षकांपेक्षा मला अधिक बुद्धी आहे.
कारण मी तुझ्या कराराच्या निर्बंधाचे मनन करतो.
बेथ
तरुण मनुष्य आपला मार्ग कशाने शुध्द राखील?
तुझ्या वचनाचे पालन करण्याने.
मी आपल्या मनापासून तुझा शोध केला आहे;
तुझ्या आज्ञांपासून मला बहकू देऊ नकोस.
मी तुझ्याविरुध्द पाप करू नये
म्हणून तुझे वचन आपल्या हृदयात साठवून ठेवले आहे.
A Escritura é inspirada
Toda a Escritura é útil para ensinar, corrigir e instruir em justiça. Examine as Escrituras — nelas encontramos a vida eterna.
प्रत्येक शास्त्रलेख देवाच्या प्रेरणेने लिहिला असल्यामुळे तो शिकवण्यास, वाईटाचा निषेध करण्यास, चुका सुधारण्यास व योग्य जीवन जगण्याचे मार्गदर्शन करण्यास उपयुक्त आहे. यासाठी की, देवाचा मनुष्य तरबेज होऊन पूर्णपणे प्रत्येक चागंल्या कामासाठी सज्ज व्हावा.
तुम्ही शास्त्रलेख शोधता, कारण तुम्ही असे मानता की, त्याद्वारे आपल्याला सार्वकालिक जीवन मिळेल आणि तेच शास्त्रलेख माझ्याविषयी साक्ष देणारे आहेत.
कारण ज्या गोष्टी पूर्वी लिहिण्यात आल्या त्या आपल्या शिक्षणासाठी लिहिण्यात आल्या; म्हणजे आपण धीराने व शास्त्रलेखाकडून मिळणार्या उत्तेजनाने आशा धरावी.
या संदेशाची वचने वाचणारे, ती ऐकणारे व त्यामध्ये लिहिलेल्या गोष्टी पाळतात ते धन्य आहेत कारण काळ जवळ आला आहे.
मी येईपर्यंत वाचणे, बोध करणे व शिकवणे, याकडे लक्ष्य लाव.
Estudar com diligência
Os bereanos eram mais nobres porque examinavam as Escrituras diariamente. O estudo dedicado da Bíblia produz maturidade espiritual.
तेथील लोक थेस्सलनीकातल्या लोंकापेक्षा मोठया मनाचे होते; त्यांनी मोठ्या उत्सुकतेने वचनाचा स्वीकार केला आणि या गोष्टी अशाच आहेत की काय ह्याविषयी ते शास्त्रलेखात दररोज शोध करीत गेले.
एज्राने परमेश्वराच्या नियमशास्त्राचे मन:पूर्वक अध्ययन करून त्याचे पालन करण्यास, व इस्राएलांस त्यातील नियम व विधी शिकविण्यात आपले मन लावले.
या लेवींनी देवाच्या नियमशास्त्राचा ग्रंथ वाचला. त्याचा अर्थ स्पष्टकरून लोकांस समजेल असा उलगडून सांगितला आणि ज्याचे पठण चालले होते ते लोकांस समजावे म्हणून त्यांनी हे विवरण केले.
येशू त्यांना म्हणाला, "खात्रीने, शास्त्रलेख आणि देवाचे सामर्थ्य तुम्हास माहीत नाही म्हणून तुम्ही अशी चूक करीत आहात.
मी आज दिलेल्या आज्ञा तुमच्या कायम लक्षात असू द्या. त्या आपल्या मुलाबाळांनाही शिकवा. घरी-दारी, झोपता उठता त्याविषयी बोलत राहा. त्या लिहून आठवणीसाठी हाताला चिन्हादाखल बांधा व कपाळावर चिकटवा.
ज्ञानार्जनाचे फायदे
माझ्या मुला, जर तू माझी वचने स्वीकारशील
आणि माझ्या आज्ञा तुझ्याजवळ संग्रह करून ठेवशील,
ज्ञानाचे ऐकशील.
आणि ज्ञानाकडे तुझे मन लावशील.
जर तू विवेकासाठी आरोळी करशील,
आणि तुझा आवाज त्यासाठी मोठ्याने उच्चारशील;
जर तू रुप्याप्रमाणे त्याचा शोध घेशील,
आणि जसे तू गुप्तधन मिळविण्याचा प्रयत्न करतो तसेच ज्ञानाचा शोध घेशील;
तर तुला परमेश्वराच्या भयाची जाणीव होईल,
आणि देवाविषयीचे ज्ञान तुला सापडेल.
कारण परमेश्वर ज्ञान देतो,
त्याच्या मुखातून सुज्ञता आणि ज्ञान येतात.