Língua
A língua tem poder de vida e de morte. A Bíblia compara a língua ao leme de um navio e à faísca que incendeia uma floresta. Dominar a língua é prova de maturidade espiritual.
O poder da língua
A morte e a vida estão no poder da língua. Quem a domina é varão perfeito, capaz de controlar todo o corpo.
जीवन किंवा मरण ही जीभेच्या अधिकारात आहेत;
आणि ज्या कोणाला ती प्रिय आहे तो तिचे फळ खातो.
कारण पुष्कळ गोष्टीत आपण सर्वजण अडखळतो. कोणी जर बोलण्यात चुकत नसेल तर तो पूर्ण मनुष्य आहे; तो आपले सर्व शरीरही नियंत्रणात ठेवण्यास समर्थ आहे.
पहा, आपण घोड्यांच्या तोंडांत लगाम घालतो की, त्यांनी आपले ऐकावे; आणि त्याद्वारे आपण त्यांचे सर्व शरीर वळवतो. तारवेही बघा; ती इतकी मोठी असतात आणि प्रचंड वार्याने लोटली जातात, पण ती चालवणार्या सुकाणदाराची इच्छा असते तिकडे एका लहान सुकाणूने पाहिजे तिकडे वळवता येतात. त्याचप्रमाणे जीभ एक लहान अवयव आहे आणि मोठ्या गोष्टींची फुशारकी मारते. पहा, लहानशी आग किती मोठे रान पेटवते. आणि जीभ एक आग आहे, एक अनीतीचे भुवन आहे. जीभ ही सर्व अवयवात अशी आहे की, ती सर्व शरीराला अमंगळ करते, सृष्टीक्रमाला आग लावते; आणि नरकाने पेटलेली अशी आहे.
कारण प्रत्येक जातीचे पशू व पक्षी आणि सरपटणारे व जलचर प्राणी, कह्यात येतात आणि मनुष्याने कह्यात आणले आहेत. पण कोणीही मनुष्य आपली जीभ कह्यात आणू शकत नाही. ती अनावर व अपायकारक असून, ती प्राणघातक विषाने भरलेली आहे.
आपण तिचाच उपयोग करून परमेश्वर पित्याचा धन्यवाद करतो; आणि देवाच्या प्रतिमेप्रमाणे निर्माण झालेल्या मनुष्यांना तिनेच शाप देतो. एकाच मुखातून स्तुती आणि शाप बाहेर निघतात. माझ्या बंधूंनो, या गोष्टी अशा होऊ नयेत. झर्याच्या एकाच मुखातून गोड पाणी व कडू पाणी निघते काय? माझ्या बंधूंनो, अंजिराचे झाड जैतुनाची फळे देईल काय? किंवा द्राक्षवेल अंजीरे देईल काय? तसेच खाऱ्या पाण्यातून गोड पाणी निघणार नाही.
Palavras sábias
A língua branda quebra até ossos. A palavra certa no tempo certo é como maçãs de ouro em salvas de prata.
धीर धरल्याने राज्य करणाऱ्याचे मन वळते,
आणि मऊ जीभ हाड फोडते.
कोणी असा असतो की, तलवार भोसकावी तसे अविचाराचे भाषण करतो,
पण सुज्ञाची जिव्हा आरोग्य आणते.
सत्याची वाणी सर्वकाळ टिकेल,
पण लबाड बोलणारी जिव्हा क्षणिक आहे.
जेव्हा पुष्कळ वाचाळता असते, तेथे पापाला कमतरता नाही,
परंतु तो जे काही बोलतो ते काळजीपूर्वक आहे, तो सुज्ञ आहे.
मूर्ख जर गप्प बसला तर त्यास सुध्दा शहाणा समजतात;
जेव्हा तो त्याचे मुख बंद करतो, तेव्हा त्यास बुद्धिमान समजतात.
Disciplinar a fala
Quem guarda a boca e a língua guarda a sua alma de angústias. A religião sem controle da língua é vã.
जर एखादा मनुष्य स्वतःला धार्मिक समजतो आणि तरी स्वतःच्या जीभेवर ताबा ठेवत नाही, तर तो स्वतःच्या अंतःकरणाला फसवतो. त्या व्यक्तीची धार्मिकता निरर्थक आहे.
आयुष्याची क्षणभंगुरता
मी ठरवले "मी जे बोलेन त्याकडे लक्ष देईन,
म्हणजे मी माझ्या जीभेने पाप करणार नाही."
सुख पाहण्यासाठी आयुष्याची इच्छा धरतो आणि दिवसाची आवड धरतो तो मनुष्य कोण आहे?
तर वाईट बोलण्यापासून आवर,
आणि तुझे ओठ खोटे बोलण्यापासून आवर.
नितीमान मनुष्याचे मुख ज्ञान बोलते,
आणि न्याय वाढवते.
त्याच्या हृदयात त्याच्या देवाचे नियमशास्त्र असते,
त्याचे पाय कधी घसरणार नाहीत.
तेव्हा मी तुझ्या न्यायाबद्दल सांगेन,
आणि तुझी स्तुती दिवसभर करीन.
हे परमेश्वरा, माझ्या मुखातून निघणारा एकही शब्द
तुला पूर्णपणे माहित नाही असे मुळीच नाही.
हे परमेश्वरा, जे कोणी आपल्या ओठाने खोटे बोलतात,
आणि आपल्या जिभेने फसवतात त्यापासून माझा जीव सोडीव.
परमेश्वर सर्व खुशामत करणारे ओठ आणि मोठ्या गोष्टी करणारी जीभ कापून टाको.
हे ते आहेत जे असे म्हणतात, "आम्ही आपल्या जीभेने विजयी होऊ,
जेव्हा आमचे ओठ बोलतील, तेव्हा आमच्यावर धनी कोण होणार?"
प्रभू, त्यांना नाश कर, आणि त्यांच्या भाषेत गोंधळ निर्माण कर.
कारण मी शहरात हिंसा आणि भांडणे पाहिली आहेत.
Toda língua confessará
Ao nome de Jesus todo joelho se dobrará e toda língua confessará que Jesus Cristo é Senhor, para glória de Deus Pai.
ह्यामुळे देवाने त्यास सर्वांहून उंच केले आहे आणि सर्व नावांहून श्रेष्ठ नाव ते त्यास दिले आहे. ह्यात हेतू हा की, स्वर्गात, पृथ्वीवर व पृथ्वीखाली प्रत्येक गुडघा येशूच्या नावाने टेकला जावा, आणि हे देवपिताच्या गौरवासाठी प्रत्येक जीभेने येशू ख्रिस्त हा प्रभू आहे असे कबूल करावे.
प्रीती सर्वोत्कृष्ट दान होय
मी मनुष्यांच्या आणि देवदूतांच्या भाषेत बोललो पण माझ्याठायी प्रीती नसली, तर मी वाजणारी थाळी किंवा झणझणणारी झांज असा आहे.
आणखी मी तुम्हास सांगतो की. जो प्रत्येक व्यर्थ शब्द लोक बोलतील त्याचा हिशोब ते न्यायाच्या दिवशी देतील. कारण तू आपल्या बोलण्यावरून न्यायी ठरशील आणि आपल्या बोलण्यावरूनच दोषी ठरशील."
आदामाच्या वंशजांनी बांधलेले ते नगर व तो बुरूज पाहण्यासाठी म्हणून परमेश्वर खाली उतरून आला. परमेश्वर देव म्हणाला, "पाहा, हे सर्व लोक एक असून, एकच भाषा बोलतात आणि ही तर त्यांची सुरुवात आहे! लवकरच, जे काही करण्याचा त्यांचा हेतू आहे ते करणे त्यांना मुळीच अशक्य होणार नाही. चला आपण खाली जाऊन त्यांच्या भाषेचा घोटाळा करून टाकू. मग त्यांना एकमेकांचे बोलणे समजणार नाही." मग परमेश्वराने पृथ्वीभर त्यांची पांगापांग केली आणि म्हणून नगर बांधण्याचे काम त्यांनी थांबवले. त्यामुळे त्या ठिकाणाचे नाव बाबेल पडले, कारण तेथे परमेश्वराने सर्व पृथ्वीच्या भाषेचा घोटाळा केला आणि परमेश्वराने त्यांना तेथून सर्व पृथ्वीच्या पाठीवर पांगविले.
Este artigo te tocou? Faça uma oração!
+581 estão orando agora.
Junte-se à corrente de oração.