Língua
A língua tem poder de vida e de morte. A Bíblia compara a língua ao leme de um navio e à faísca que incendeia uma floresta. Dominar a língua é prova de maturidade espiritual.
O poder da língua
A morte e a vida estão no poder da língua. Quem a domina é varão perfeito, capaz de controlar todo o corpo.
जिभेत जीवन आणि मृत्यूचे सामर्थ्य आहे.
आणि जे तिच्यावर प्रेम करतात त्यांना तिचे प्रतिफळ मिळते.
आपण सर्वजण अनेक प्रकारे अडखळतो. जर कोणी बोलण्यात कधीही चुकत नाही, तर तो परिपूर्ण आहे व आपले सर्व शरीर ताब्यात ठेवण्यास समर्थ आहे.
घोड्यांनी आज्ञा पाळावी म्हणून आम्ही त्याच्या तोंडात लगाम घालतो व त्याद्वारे संपूर्ण प्राण्याचे शरीर वळवू शकतो. किंवा तारवांचे उदाहरण घ्या, ही तारवे खूप मोठी असतात व प्रबळ वार्यांनी ती लोटली जातात, तरी चालकाची इच्छा असते तिकडे ती अगदी लहानशा सुकाणाने वळविता येतात. त्याचप्रमाणे, जीभ ही शरीराचा लहान अवयव आहे, परंतु ती मोठ्या गोष्टींची फुशारकी मारते. विचार करा, मोठ्या जंगलाला पेटविण्यासाठी आगीची एक लहान ठिणगी पुरेशी आहे. जीभ सुद्धा आग आहे, आपल्या शरीराच्या अवयवांमध्ये ती दुष्टतेचे जग आहे. ती संपूर्ण शरीराला भ्रष्ट करते, एखाद्याच्या जीवनाला आग लावते आणि स्वतः नरकाच्या अग्नीने पेटलेली आहे.
सर्वप्रकारचे प्राणी, पक्षी आणि सरपटणारे प्राणी आणि समुद्रातील प्राणी वश झाले आहेत आणि त्यांना मनुष्यप्राण्याने वश केले आहे. परंतु कोणताही मनुष्यप्राणी जिभेला वश करू शकत नाही. ती चंचल दुष्ट, प्राणघातक विषाने पूर्णपणे भरलेली आहे.
या जिभेने आपल्या प्रभू आणि पित्याची आपण स्तुती करतो, आणि याच जिभेने ज्याला परमेश्वराच्या प्रतिमेप्रमाणे बनविले आहे अशा मनुष्यप्राण्याला शाप देतो. याप्रकारे स्तुती आणि शाप एकाच मुखातून निघतात. प्रिय बंधू आणि भगिनींनो, असे असू नये. एकाच झर्यातून दोन्ही प्रकारचे ताजे पाणी आणि खारट पाणी वाहू शकते काय? माझ्या बंधूंनो व भगिनींनो, अंजिराचे झाड जैतुनाची फळे आणि द्राक्षवेल अंजीर उत्पन्न करू शकेल काय? नाही, तसेच खार्या पाण्याचा झरा ताजे पाणी देणार नाही.
Palavras sábias
A língua branda quebra até ossos. A palavra certa no tempo certo é como maçãs de ouro em salvas de prata.
सहनशीलते द्वारे शासकाचे मन वळविता येते,
कारण मृदू जिव्हा हाडे मोडू शकते.
निष्काळजीपणाने बोललेला शब्द तलवारीसारखा वेध घेतो,
पण सुज्ञ मनुष्याचे बोलणे आरोग्यदायी असते.
सत्याची वाणी काळाच्या कसोटीला उतरते;
लबाड जिव्हा ही क्षणिक आहे.
शब्द बहुगुणित करून पापाचा अंत होत नसतो;
पण सुज्ञ लोक त्यांच्या जिभेवर ताबा ठेवतात.
जर ते शांत राहिले तर मूर्खही शहाणे समजले जातात,
आणि जर त्यांच्या जिभेवर त्यांनी ताबा ठेवला, तर ते विवेकशील मानले जातात.
Disciplinar a fala
Quem guarda a boca e a língua guarda a sua alma de angústias. A religião sem controle da língua é vã.
जे स्वतःला भक्त समजतात परंतु आपल्या जिभेवर ताबा ठेवीत नाहीत, ते स्वतःलाच फसवितात व त्यांची भक्ती व्यर्थ आहे.
मी स्वतःशी म्हणालो, "मी आपले आचरण जपणार
आणि माझी जीभ पापापासून जपणार;
अनीतिमान लोक माझ्याभोवती असतील,
तेव्हा मी माझ्या मुखाला मुसक्या बांधीन."
तुमच्यापैकी जो जीवनावर प्रीती करतो
आणि अनेक चांगले दिवस पाहण्याची अपेक्षा करतो,
तर तू आपली जीभ वाईटापासून
आणि आपले ओठ असत्य बोलण्यापासून राखावे.
नीतिमान आपल्या मुखाने ज्ञानाच्या गोष्टी बोलतो,
त्याची जीभ जे न्याय्य आहे ते उच्चारते.
परमेश्वराचे नियम त्याच्या अंतःकरणात असतात;
त्याची पावले घसरणार नाही.
माझी जीभ तुमच्या नीतिमत्वाची घोषणा करणार
आणि दिवसभर तुमची उपासना करीत राहणार.
हे याहवेह, माझ्या जिभेवर शब्द येण्यापूर्वीच,
ते सर्व तुम्हाला माहीत असतात.
हे याहवेह,
असत्य बोलणार्या ओठांपासून
व कपटी जिव्हेपासून माझा बचाव करा.
खुशामत करणारे सर्व ओठ,
आणि प्रत्येक गर्विष्ठ जीभ याहवेह कापून टाको.
ते बढाई मारतात आणि म्हणतात,
"आम्ही आमच्या जिभेने प्रबल होऊ; आमचे ओठ आमचे संरक्षण करतील,
आम्हावर धनी कोण?"
प्रभू, दुष्टांमध्ये फूट पाडा, त्यांच्या शब्दांना गोंधळात टाका,
कारण शहरात मला हिंसा आणि कलह दिसतात.
Toda língua confessará
Ao nome de Jesus todo joelho se dobrará e toda língua confessará que Jesus Cristo é Senhor, para glória de Deus Pai.
म्हणून परमेश्वराने त्यांना अत्युच्च स्थानी ठेवले
आणि सर्व नावांपेक्षा जे श्रेष्ठ नाव ते त्यांना दिले;
यासाठी की येशूंच्या नावाने प्रत्येक गुडघा टेकला जावा,
स्वर्गात, पृथ्वीवर आणि पृथ्वीच्या खाली,
परमेश्वर पित्याच्या गौरवासाठी प्रत्येक जीभ कबूल करेल
की येशू ख्रिस्त हेच प्रभू आहेत.
जर मी मनुष्यांच्या आणि देवदूतांच्या भाषेमध्ये बोलत असलो, पण माझ्याठायी प्रीती नसली, तर मी वाजणारी थाळी किंवा झणझणणार्या झांजेसारखा आहे.
मी तुम्हाला सांगतो की न्यायाच्या दिवशी प्रत्येकाला त्याच्या प्रत्येक निरर्थक शब्दाबद्दल जाब द्यावा लागणार आहे. कारण तुमच्या शब्दांवरूनच तुम्ही निर्दोष ठराल, किंवा तुमच्या शब्दांवरूनच तुम्ही दोषी ठराल."
परंतु जेव्हा मानव बांधत असलेले शहर आणि बुरूज पाहण्यास याहवेह खाली आले, तेव्हा याहवेह म्हणाले, "हे सर्व एक असून त्यांची भाषा ही एकच आहे, जर ही योजना साध्य झाली तर मानवांना असाध्य असे काहीही राहणार नाही. चला, आपण खाली जाऊ आणि त्यांच्या भाषेत वेगवेगळ्या भाषांची सरमिसळ करू, म्हणजे त्यांना एकमेकांचे बोलणे समजणार नाही."
अशा रीतीने याहवेहने सर्व पृथ्वीभर मानवांची पांगापांग केली आणि त्यांचे शहर बांधण्याचे काम थांबले. म्हणून त्या शहराला बाबिलोन म्हणतात, कारण याहवेहने मानवांना गोंधळात पाडून अनेक भाषा दिल्या आणि सर्व पृथ्वीभर त्यांची पांगापांग केली.
Este artigo te tocou? Faça uma oração!
+581 estão orando agora.
Junte-se à corrente de oração.