Livramento
Deus é o grande Libertador. Através da Bíblia, vemos Deus livrando seu povo de inimigos, de perigos e da morte. Quem clama ao Senhor, Ele ouve e liberta.
Deus ouve e livra
Clamaram ao Senhor na sua tribulação, e Ele os livrou das suas angústias. O Senhor é refúgio e a salvação dos que nele confiam.
नितीमान आरोळी करतो आणि परमेश्वर ते ऐकतो,
आणि तो तुम्हास तुमच्या सर्व संकटातून वाचवेल.
जेव्हा तो माझा धावा करील तेव्हा मी त्यास उत्तर देईन;
संकटसमयी मी त्याच्याबरोबर राहीन;
मी त्यास विजय देईन आणि त्याचा सन्मान करीन.
मी परमेश्वराविषयी म्हणेन की, "तो माझा आश्रय आणि माझा किल्ला आहे,
माझा देव, ज्यावर मी विश्वास ठेवतो."
कारण तो तुला पारध्याच्या पाशातून
आणि नाश करणाऱ्या मरीपासून तुला सोडवील.
आमचा देव आम्हास तारणारा देव आहे;
मृत्यूपासून सोडविणारा प्रभू परमेश्वर आहे.
कारण तू माझे जीवन मृत्यूपासून सोडवले आहे;
तू माझे पाय पडण्यापासून राखले,
यासाठी की, मी जीवनाच्या प्रकाशात
देवापुढे चालावे.
त्या गरीब व गरजवंताना बचाव करा. त्यांच्या दुष्टांच्या हातातून त्यांना सोडवा.
परमेश्वरा, मला वाचवायला हर्षित हो.
परमेश्वरा, मला मदत करण्यास त्वरा कर.
याच कारणास्तव प्रत्येक देवभक्त तू पावशील तेव्हा तुझी प्रार्थना करो.
संकटे जेव्हा महापुरासारखी येतात तेव्हा ती तुझ्या भक्तांपर्यंत नक्कीच जाणार नाहीत.
Livramento poderoso
Deus livrou Daniel dos leões, os jovens hebreus do fogo e Israel do Egito. Seu braço não é curto para salvar.
जर काही उत्तर आहे, तर ते हे की, ज्या देवाची आम्ही सेवा करतो तो आम्हास तप्त आग्नीच्या भट्टीतून काढण्यास समर्थ आहे, आणि महाराज तो आम्हास आपल्या हातून सोडवील. पण जर नाही तर महाराज हे आपणास माहित असावे की, आम्ही तुमच्या देवाची उपासना करणार नाही, आणि त्याच्या पुढे आम्ही पालथे पडून त्यास दंडवत करणार नाही."
शत्रू मला वरचढ होता. त्यांना माझा मत्सर वाटला. शत्रू बलाढ्य होता.
पण परमेश्वराने मला वाचवले.
तेव्हा त्यांनी त्या शेतात उभे राहून त्या पलिष्ट्यांना कापून काढले आणि रक्षण केले. परमेश्वराने त्यांची सुटका करून त्यांना मोठा विजय मिळवून दिला.
तुम्ही त्यांना कोणत्याही रीतीने जाचाल आणि ती मला हाक मारतील तर मी त्यांचे ओरडणे अवश्य ऐकेन;
यादिवसापासून मीच तो आहे,
आणि माझ्या हातातून कोणीही सोडवू शकणार नाही. मी कृती करतो आणि ती कोणाच्याने परत बदलू शकेल?
Redenção e restauração
Todo aquele que invocar o nome do Senhor será salvo. Deus livra do pecado, da morte e de todo mal aqueles que se humilham diante dele.
‘कारण जो कोणी प्रभूच्या नावाचा धावा करील त्याचे तारण होईल.’
तर आता उशीर का करितोस? ऊठ, त्याच्या नावाचा धावा करून बाप्तिस्मा घे आणि आपल्या पापांचे क्षालन कर.
आणि त्याचा पुत्र येशू याची स्वर्गांतून येण्याची वाट पाहण्यास, तो पुत्र म्हणजे येशू ज्याला देवाने मरण पावलेल्यातून उठवले व तो आपल्याला भावी क्रोधापासून सोडविणारा आहे.
आणि अशावेळी लोकांनी नम्र होऊन माझा धावा करून माझ्या दर्शनाची इच्छा बाळगली, दुराचाराचा त्याग केला तर मी स्वर्गातून त्यांच्या हाकेला उत्तर देईन. त्यांना त्यांच्या पापाची क्षमा करेन आणि त्यांची भूमी संकटमुक्त करीन.
पुत्राच्या ठायी पित्याचे गौरव व्हावे म्हणून तुम्ही जे काही माझ्या नावाने मागाल ते मी करीन. तुम्ही माझ्या नावाने माझ्याजवळ काही मागाल तर मी ते करीन.
पवित्र आत्मा मिळण्याबद्दल वचन
माझ्यावर तुमची प्रीती असली तर तुम्ही माझ्या आज्ञा पाळाल. मी पित्याला विनंती करीन, मग तो तुम्हास दुसरा कैवारी म्हणजे सत्याचा आत्मा देईल. अशासाठी की, त्याने तुम्हाबरोबर सर्वकाळ रहावे.
आपल्याला हे माहीत आहे की, देव पापी लोकांचे ऐकत नाही, तर जो मनुष्य देवाचा उपासक आहे आणि जो त्याच्या इच्छेप्रमाणे करतो त्याचे तो ऐकतो.
तुम्ही देवाच्या जवळ या म्हणजे तो तुमच्याजवळ येईल. अहो पाप्यांनो, तुम्ही हात शुद्ध करा; अहो द्विमनाच्या मनुष्यांनो, अंतःकरणे शुद्ध करा.
वाईट असूनही जर तुम्हास आपल्या मुलांना चांगल्या गोष्टी देण्याचे कळते तर तुमच्या स्वर्गातील पित्याकडे जे मागतात, त्यांच्या गरजा तो किती चांगल्या प्रकारे भागवील?
तो देवाची प्रार्थना करेल आणि देव त्यास दया देईल.
म्हणजे तो देवाचे मुख आनंदाने पाहील.
नंतर तो मनुष्य पुन्हा चांगले जीवन जगायला लागेल.
Este artigo te tocou? Faça uma oração!
+581 estão orando agora.
Junte-se à corrente de oração.