Mãe
A mãe é honrada na Bíblia como pilar da família. Seu amor incondicional, sua sabedoria e sua dedicação são celebrados como reflexo do próprio amor de Deus por seus filhos.
O amor de mãe
Pode uma mãe esquecer-se do filho do seu ventre? Ainda que ela se esquecesse, Deus nunca nos abandona. O amor materno reflete o divino.
आई जशी मुलाला सांत्वन देते, तसा मी तुम्हास सांत्वन देईन, आणि यरूशलेमेत तुम्ही सांत्वन पावाल."
पाहा, मुले ही परमेश्वरापासून मिळालेले वतन आहे,
आणि पोटचे फळ त्याच्यापासून मिळालेली देणगी आहे.
परमेश्वराचे भय धरणाऱ्याची धन्यता
जो प्रत्येकजन परमेश्वराचा आदर करतो,
जो त्याच्याच मार्गाने चालतो तो धन्यवादित आहे.
तू आपल्या हाताच्या श्रमाचे फळ खाशील, तू आनंदित होशील;
तू आशीर्वादित होऊन तुझी भरभराट होईल.
प्रीती सहनशील आहे, उपकारशील आहे, प्रीती हेवा करीत नाही; प्रीती बढाई मारीत नाही, फुगत नाही. प्रीती गैरशिस्तपणे वागत नाही, स्वहित पाहत नाही, चिडत नाही, अपकार स्मरत नाही. प्रीती अनीतीत आनंद मानीत नाही. परंतु सत्याविषयी ती आनंद मानते. प्रीती सर्व गोष्टी सहन करते, सर्व गोष्टींवर विश्वास ठेवते, सर्व गोष्टींची आशा करते, सर्व गोष्टी सहन करते.
Sabedoria e instrução
A mãe sábia instrui os filhos nos caminhos de Deus. Seu ensino é lei que guia e sua disciplina é expressão de amor verdadeiro.
आदेश आणि ताकीद
माझ्या मुला, तू तुझ्या वडिलांची शिकवण ऐक,
आणि तू तुझ्या आईचा नियम बाजूला टाकू नकोस;
ते तुझ्या शिराला सुशोभित वेष्टन
आणि तुझ्या गळ्यात लटकते पदक आहे.
मुलाने ज्या मार्गात चालावे त्याचे शिक्षण त्यास दे,
आणि जेव्हा तो मोठा होईल तेव्हा त्या मार्गांपासून तो मागे फिरणार नाही.
जर कोणी आपल्या मुलांना शिक्षा करत नाही तो त्यांचा द्वेष करतो,
पण जो कोणी आपल्या मुलांवर प्रेम करतो तो काळजीपूर्वक त्यांना शिस्त लावतो.
शहाणा मुलगा आपल्या वडिलांना आनंदीत करतो.
पण मूर्ख मनुष्य आपल्या आईला तुच्छ मानतो.
पण तुम्ही हे डोळ्यांत तेल घालून जपले पाहिजे. नाहीतर तुम्ही ज्या गोष्टी पाहिल्या आहेत त्या विसरून जाल. आपल्या मुला-नातवंडांना त्याची माहिती द्या.
Honrar a mãe
Honra teu pai e tua mãe. A mulher virtuosa é digna de louvor — seus filhos se levantam e a chamam bem-aventurada.
आपल्या बापाचा व आपल्या आईचा मान राख म्हणजे त्यामुळे परमेश्वर तुझा देव जो देश तुला देत आहे त्या देशात तू चिरकाळ राहशील.
पालक आणि मुले
मुलांनो, प्रभूमध्ये आपल्या आई-वडीलांच्या आज्ञा पाळा कारण हे योग्य आहे. "आपल्या वडिलांचा व आईचा मान राख, यासाठी की तुझे सर्वकाही चांगले व्हावे व तुला पृथ्वीवर दीर्घ आयुष्य लाभावे." अभिवचन असलेली हीच पहिली आज्ञा आहे.
सदगुणी स्त्री
हुशार व कार्यक्षम पत्नी कोणाला सापडेल?
पण तिचे मोल मौल्यवान खड्यांपेक्षा अधिक आहे.
बल व आदर तिचे वस्त्र आहेत,
आणि ती येणाऱ्या काळामध्ये आनंदी राहू शकते.
तिच्या मुखातून सुज्ञतेचे बोल निघतात.
आणि दयेचा नियम तिच्या जिभेवर आहे.
ती कधीही आळशी नसते;
ती आपल्या कुटुंबाच्या मार्गाकडे लक्ष देते,
आणि आळसाची भाकर खात नाही.
तिची मुले उठतात आणि ती त्यांना जे काही आनंद देईल ते देते;
तिचा पती तिची प्रशंसा करून, म्हणतो,
"पुष्कळ स्त्रियांनी चांगले केले आहे,
पण तू त्या सर्वांहून उत्कृष्ट आहेस."
लावण्य फसवे आहे आणि सौंदर्य हे व्यर्थ आहे,
पण तू जी स्त्री परमेश्वराचे भय धरते तिची प्रशंसा होते.
Este artigo te tocou? Faça uma oração!
+581 estão orando agora.
Junte-se à corrente de oração.