Maria
Maria, mãe de Jesus, é honrada nas Escrituras como a mulher escolhida por Deus para trazer ao mundo o Salvador. Sua fé, humildade e obediência são exemplo para todos os cristãos.
A escolhida de Deus
O anjo Gabriel anunciou a Maria que ela seria mãe do Filho do Altíssimo. Ela respondeu com fé: 'Faça-se em mim segundo a tua palavra.'
येशूंच्या जन्माचे भविष्यकथन
अलीशिबेला गर्भवती होऊन सहा महिने झाले असताना, परमेश्वराने गब्रीएल दूताला गालील प्रांतातील नासरेथ नावाच्या गावात, एका कुमारीकडे पाठविले, जिचा विवाह दावीद राजाच्या वंशावळीतील योसेफ नावाच्या मनुष्याबरोबर निश्चित झाला होता. त्या कुमारीचे नाव मरीया होते. गब्रीएल देवदूत मरीयेपुढे प्रगट झाला आणि तिला म्हणाला, "हे कृपा पावलेल्या स्त्रिये, अभिवादन! प्रभू तुझ्याबरोबर आहेत."
देवदूत तिला म्हणाला, "मरीये, भिऊ नकोस; कारण परमेश्वराची कृपा तुझ्यावर झाली आहे. तू गर्भधारण करून पुत्राला जन्म देशील आणि त्याचे नाव येशू ठेवावे. ते परमथोर होतील आणि त्यांना परात्पराचा पुत्र म्हणतील आणि प्रभू परमेश्वर त्यांना त्यांचा पूर्वज दावीदाचे सिंहासन देतील. ते याकोबाच्या संतानांवर सदासर्वकाळ राज्य करतील व त्यांच्या राज्याचा कधीच अंत होणार नाही."
योसेफ येशूंना स्वतःचा पुत्र म्हणून स्वीकारतो
येशू ख्रिस्ताचा जन्म अशाप्रकारे झाला: त्यांची आई मरीयाचा विवाह योसेफाबरोबर ठरला होता. परंतु ते दोघे एकत्र येण्यापूर्वीच, मरीया पवित्र आत्म्याद्वारे गर्भवती आहे असे आढळून आले.
O Magnificat
Maria cantou: 'Minha alma engrandece ao Senhor!' Seu cântico exalta a misericórdia, o poder e a fidelidade de Deus.
मरीयेचे गीत
मरीया म्हणाली:
"माझा आत्मा प्रभूचे गौरव करतो
माझा आत्मा माझ्या तारणार्या परमेश्वरामध्ये आनंद करतो,
कारण आता त्यांनी त्यांच्या
दासीच्या लीन अवस्थेकडे दृष्टी टाकली आहे.
यापुढे सर्व पिढ्या मला धन्य म्हणतील.
कारण ज्या सर्वशक्तिमान परमेश्वराने माझ्यासाठी महान कृत्ये केली आहेत,
त्यांचे नाव पवित्र आहे.
त्यांचे भय बाळगणार्यांवर त्यांची करुणा
एका पिढीपासून दुसर्या पिढीपर्यंत टिकून राहते.
त्यांनी आपल्या बाहूने महान कार्य केले आहेत;
जे अंतर्मनातील विचारांमध्ये गर्विष्ठ आहेत, त्यांना त्यांनी विखुरले आहे.
त्यांनी शासकांना त्यांच्या सिंहासनावरून खाली आणले आहे.
पण नम्रजनांस उच्च केले आहे.
भुकेल्यास त्यांनी उत्तम गोष्टींनी तृप्त केले आहे.
परंतु श्रीमंतांना रिकामे पाठविले आहे.
त्यांचा सेवक इस्राएलास दयाळू ते असल्याचे आठवून
त्याला साहाय्य पाठविले,
जसे आपल्या पूर्वजांना त्यांनी वचन दिले होते,
ते अब्राहाम आणि त्यांच्या संततीवर सदासर्वकाळ राहील."
योसेफसुद्धा दावीदाच्या घराण्यातील व वंशातील असल्यामुळे, तो यहूदीया प्रांतातील गालीलातील नासरेथ या दावीदाच्या गावी बेथलेहेम येथे वर गेला. नाव नोंदणीसाठी त्याने आपली भावी वधू मरीया हिला बरोबर घेतले कारण तिला लवकरच बाळ होणे अपेक्षित होते. जेव्हा ते त्या ठिकाणी होते, तेव्हा बाळाचा जन्म होण्याची वेळ आली, आणि तिने आपल्या प्रथमपुत्राला जन्म दिला. तिने त्याला गोठ्यातील गव्हाणीत ठेवले, कारण तिथे त्यांच्यासाठी विश्रांतिगृह उपलब्ध नव्हते.
परंतु मरीयेने ते सर्व आपल्या हृदयात साठवून ठेवले आणि त्यावर ती विचार करीत असे.
मग शिमोनाने त्यांना आशीर्वाद दिला आणि बाळाची आई मरीयाला म्हणाला: "इस्राएलमध्ये अनेकांचे पतन व पुन्हा उठणे आणि ज्या विरुद्ध लोक बोलतील, हा असे चिन्ह होईल, यासाठी या बालकाला नेमून ठेवले आहे. यावेळी अनेकांच्या हृदयातील विचार उघड केले जातील व तुझ्या जिवातून तलवार भोसकली जाईल."
त्यांना पाहून त्यांचे आईवडील विस्मित झाले. आईने विचारले, "मुला, तू आमच्याशी असा का वागलास? तुझे वडील आणि मी चिंतित होऊन तुला शोधत आहोत."
त्यांनी म्हटले, "तुम्ही माझा शोध का केला? मी माझ्या पित्याच्या घरामध्ये असावे, हे तुमच्या लक्षात कसे आले नाही?" परंतु ते त्यांना काय सांगत होते ते त्यांना समजले नाही.
नंतर ते आईवडिलांबरोबर नासरेथला आले आणि त्यांच्या आज्ञेत राहिले. त्यांच्या आईने या सर्वगोष्टी आपल्या हृदयात साठवून ठेवल्या.
Mãe fiel até o fim
Maria acompanhou Jesus desde o nascimento até a cruz. Ela estava entre os discípulos no Pentecostes, fiel em oração.
ज्यावेळी द्राक्षारस संपला, तेव्हा येशूंची आई त्यांना म्हणाली, "त्यांच्याजवळचा द्राक्षारस संपला आहे."
येशू म्हणाले, "बाई, तू मला यामध्ये भाग घ्यावयास का लावते? माझी घटका अजूनही आलेली नाही."
त्यांच्या आईने नोकरांस सांगितले, "हा जे काही तुम्हाला सांगेल ते करा."
क्रूसाच्या जवळ येशूंची आई व तिची बहीण, क्लोपाची पत्नी मरीया आणि मरीया मग्दालिया उभ्या होत्या. मग येशूंनी आपल्या आईला व ज्या शिष्यावर त्यांची प्रीती होती त्याला जवळ उभे राहिलेले पाहून आईला म्हटले, "बाई, पाहा, हा तुझा पुत्र!" आणि त्यांनी त्या शिष्याला म्हटले, "पाहा, ही तुझी आई!" त्या वेळेपासून त्या शिष्याने तिला आपल्या घरी ठेवून घेतले.
इतक्यात येशूंची आई आणि भाऊ येऊन बाहेर उभे राहिले आणि एकाला त्यांना बोलविण्यास पाठविले. त्यांच्या सभोवती समुदाय बसला होता आणि त्याने त्यांना सांगितले, "तुमची आई आणि तुमचे भाऊ बाहेर थांबले आहेत आणि ते तुमचा शोध घेत आहेत."
यावर त्यांनी म्हटले, "कोण माझी आई आणि कोण माझे भाऊ?"
नंतर सभोवतालच्या समुदायाकडे नजर फिरवित ते म्हणाले, "ही माझी आई आणि माझे भाऊ आहेत! जो कोणी परमेश्वराच्या इच्छेप्रमाणे करतो तोच माझा भाऊ, तीच माझी बहीण आणि आई आहे."
हा सुताराचा मुलगा नाही काय? याच्या आईचे नाव मरीया नाही काय, आणि याकोब, योसेफ, शिमोन आणि यहूदाह हे त्याचे भाऊ नाहीत काय? याच्या सर्व बहिणी आपल्यातच नाहीत का? मग या मनुष्याला या सर्वगोष्टी कुठून प्राप्त झाल्या?"
हे सर्वजण व येशूंची आई मरीया, त्यांचे भाऊ, इतर स्त्रिया एकत्र येऊन सतत प्रार्थनेत वेळ घालवित असत.
Este artigo te tocou? Faça uma oração!
+581 estão orando agora.
Junte-se à corrente de oração.