Meditação
A meditação na Palavra de Deus é prática espiritual essencial. Diferente da meditação oriental, a meditação bíblica é reflexão profunda sobre as Escrituras — ruminar a Palavra dia e noite.
Meditar na Palavra dia e noite
Bem-aventurado o homem que medita na lei do Senhor de dia e de noite. Ele é como árvore plantada junto a ribeiros de águas.
आशीर्वादित आहे तो मनुष्य, जो दुष्टांच्या सल्ल्याने चालत नाही,
किंवा पापी जनांच्या मार्गात उभा राहत नाही,
आणि थट्टा करणाऱ्यांच्या सभेत बसत नाही.
परंतु परमेश्वराच्या शास्त्रात तो आनंद मानतो,
आणि त्याच्या नियमशास्त्रावर तो रात्र व दिवस ध्यान लावतो.
नियमशास्त्राचा हा ग्रंथ तुझ्या मुखातून निघून जाऊ नये म्हणून रात्रंदिवस त्याचे मनन कर, त्या जे काही लिहिले आहे ते सर्व तू पाळ. मग तुझी भरभराट होईल आणि तू यशस्वी होशील.
अहाहा, तुझे नियमशास्त्र मला किती प्रिय आहेत!
दिवसभर मी त्याच्यावर मनन करतो.
तुझ्या आज्ञा मला माझ्या शत्रूंपेक्षा ज्ञानी करतात,
कारण तुझे नियम नेहमी माझ्याजवळ आहेत.
माझ्या सर्व शिक्षकांपेक्षा मला अधिक बुद्धी आहे.
कारण मी तुझ्या कराराच्या निर्बंधाचे मनन करतो.
वयोवृध्दापेक्षा मला अधिक कळते;
कारण मी तुझे विधी पाळतो.
मी तुझ्या नियमांचे मनन करीन,
आणि तुझ्या मार्गाकडे लक्ष देईन.
मी तुझ्या नियमांनी आनंदित होईन;
मी तुझे वचन विसरणार नाही.
मी तुझ्या आज्ञेत आनंद करीन,
ज्या मला अतिशय प्रिय आहेत.
ज्या तुझ्या आज्ञा मला प्रिय आहेत, त्याकडे मी आपले हात उंचावीन;
मी तुझ्या नियमांचे मनन करीन.
मी उजडण्यापूर्वी पहाटेस उठतो आणि मदतीसाठी आरोळी मारतो.
तुझ्या वचनात माझी आशा आहे.
तुझ्या वचनावर चिंतन करण्यासाठी
रात्रीच्या प्रत्येक प्रहरापूर्वी माझे डोळे उघडे असतात.
Frutos da meditação
A meditação produz entendimento, alegria e adoração. Quem medita na Palavra encontra direção, paz e renovação espiritual.
माझ्या तोंडचे शब्द आणि माझ्या हृदयाचे विचार तुझ्यासमोर मान्य असोत.
परमेश्वरा, तू माझा खडक आहेस, मला तारणारा तूच आहेस.
माझे मुख ज्ञान बोलेल,
आणि माझ्या हृदयातील विचार समंजसपणाचे असणार.
पण मी परमेश्वराच्या कृत्यांचे वर्णन करीन;
मी तुझ्या पुरातन काळच्या आश्चर्यकारक कृत्यांविषयी विचार करीन.
मी तुझ्या सर्व कृत्यावर चिंतन करीन,
आणि मी त्यावर काळजीपूर्वक विचार करीन.
मी पूर्वीचे दिवस आठवतो;
मी तुझ्या सर्व कृत्यांवर मनन करतो;
तुझ्या हाताने सिद्धीस नेलेल्या कामावर विचार करतो.
देवा, आम्ही तुझ्या मंदिरात तुझ्या प्रेमदयेचा विचार करतो.
मी माझ्या आयुष्यभर परमेश्वरास गाणे गाईन.
जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत माझ्या देवाचे मी गुणगान करीन.
माझे विचार त्यास गोड वाटो;
परमेश्वराजवळ मला आनंद होईल.