Meditação
A meditação na Palavra de Deus é prática espiritual essencial. Diferente da meditação oriental, a meditação bíblica é reflexão profunda sobre as Escrituras — ruminar a Palavra dia e noite.
Meditar na Palavra dia e noite
Bem-aventurado o homem que medita na lei do Senhor de dia e de noite. Ele é como árvore plantada junto a ribeiros de águas.
धन्य ते लोक,
जे दुष्टांच्या मसलतीने चालत नाहीत,
किंवा पापी लोकांच्या मार्गात उभे राहत नाहीत,
आणि थट्टा करणार्यांच्या संगतीमध्ये बसत नाहीत.
पण ज्यांचा आनंद याहवेहच्या नियमांचे पालन करणे,
आणि त्यांच्या नियमावर रात्रंदिवस ध्यान करणे असतो.
शास्त्रग्रंथातील हे नियम नेहमी तुझ्या मुखात असू दे; दिवसा आणि रात्री त्यांचे मनन कर, त्यात लिहिलेल्या सर्व गोष्टींचे काळजीपूर्वक पालन करशील, तर तुझी भरभराट होईल आणि तू यशस्वी होशील.
अहाहा, मी तुमच्या विधिनियमांवर कितीतरी प्रीती करतो!
मी दिवसभर त्यांचे चिंतन करतो.
तुमची वचने सतत माझ्यासह असतात,
आणि ती माझ्या शत्रूंपेक्षा मला अधिक ज्ञानी करतात.
मला माझ्या सर्व शिक्षकांहून अधिक शहाणपण आहे,
कारण तुमच्या नियमांचे मी सतत मनन करतो.
मी माझ्या वडीलजनांपेक्षाही अधिक सुज्ञ आहे,
कारण मी तुमच्या आज्ञा पाळतो.
मी तुमच्या नीति-सिद्धांताचे मनन करतो,
आणि तुमच्या मार्गाचा आदर करतो.
मी तुमच्या नियमांनी हर्षित होतो;
मी तुमच्या वचनांची उपेक्षा करणार नाही.
ג गिमेल
तुमच्या नियमात माझा आनंद आहे,
कारण ते मला प्रिय आहेत.
मला प्रिय असलेल्या तुमच्या आज्ञांकडे मी माझे हात पुढे करेन,
जेणेकरून मी तुमच्या नियमांचे मनन करू शकेन.
ז ज़ईन
सूर्योदयापूर्वी मी उठून मदतीसाठी तुमचा धावा करतो;
माझी संपूर्ण आशा तुमच्या वचनावर आहे.
मी रात्रभर माझे नेत्र उघडेच ठेवतो,
म्हणजे तुमच्या अभिवचनांचे चिंतन करू शकेन.
Frutos da meditação
A meditação produz entendimento, alegria e adoração. Quem medita na Palavra encontra direção, paz e renovação espiritual.
याहवेह, माझे खडक आणि माझे तारणहार,
माझ्या मुखातून निघालेले शब्द
आणि माझ्या अंतःकरणातील मनन तुमच्या नजरेत संतोष देणारे होवोत.
माझे मुख ज्ञानाचे शब्द बोलतात;
माझ्या अंतःकरणाचे मनन सुज्ञतेचे असणार.
मी याहवेहच्या कृत्यांचे स्मरण करेन;
पुरातन काळात त्यांनी केलेल्या अद्भुतकृत्यांची मी आठवण करेन.
मी तुमच्या सर्व कृत्यांचे मनन करेन
आणि मी तुमच्या सर्व महत्कार्यांचा विचार करेन."
मला पुरातन काळचे स्मरण होत आहे;
तुम्ही केलेल्या अद्भुत कृत्यांचे मी मनन करतो,
आणि तुमचे हस्तकौशल्य माझ्या विचारांचा विषय आहे.
परमेश्वरा, तुमच्या मंदिरात,
आम्ही तुमच्या प्रेमदयेचे चिंतन करतो.
मी आजीवन याहवेहचे स्तोत्र गाईन;
माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत मी माझ्या परमेश्वराचे स्तुतिगान करेन.
माझे चिंतन त्यांना संतुष्ट करो,
कारण याहवेहतच माझा आनंद परिपूर्ण आहे.