Mentira
A mentira é condenada pela Bíblia como pecado grave. Deus é verdade, e quem mente se alinha com o pai da mentira. O cristão é chamado a falar a verdade em amor.
Deus odeia a mentira
Os lábios mentirosos são abominação para o Senhor. A Bíblia adverte que todo mentiroso terá parte no lago de fogo.
असत्य बोलणार्या ओठांची याहवेह घृणा करतात,
परंतु विश्वसनीय लोक त्यांना प्रसन्न करतात.
परंतु भेकड, विश्वासहीन, अशुद्ध, खून करणारे, जारकर्मी, चेटकी, मूर्तिपूजक व सर्व लबाड—अशा माणसांच्या वाट्यास अग्नीचे व गंधकाचे सरोवर येईल. हेच ते दुसरे मरण होय."
याहवेह सहा गोष्टींचा द्वेष करतात,
त्यांना सात गोष्टींचा तिटकारा वाटतो:
गर्विष्ठ नजर,
खोटे बोलणारी जीभ,
हात, जे निष्पाप व्यक्तीचा रक्तपात करतात,
हृदय, जे दुष्ट योजना करते
पाय, जे दुष्कृत्य करण्यासाठी वेगाने धावतात.
खोटा साक्षीदार, जो असत्याचा वर्षाव करतो,
आणि जो व्यक्ती समाजात कलह निर्माण करतो.
एकमेकांशी लबाडी करू नका, कारण तुमचा जुना मनुष्य त्याच्या कृतींसह तुम्ही काढून टाकला आहे.
Falar a verdade
Despojai-vos da mentira e falai a verdade cada um com o próximo. Cristo é a verdade, e nos chama a ser testemunhas fiéis.
यास्तव तुम्ही प्रत्येकजण एकमेकांशी लबाडी करण्याचे सोडून, आपल्या शेजार्यांशी सत्य बोला, कारण आपण सर्व एकाच शरीराचे अवयव आहोत.
येशूंनी उत्तर दिले, "मार्ग आणि सत्य आणि जीवन मीच आहे. माझ्याद्वारे आल्याशिवाय पित्याकडे कोणीही येऊ शकत नाही.
तुम्ही तुमचा पिता सैतानापासून आहात आणि तुमच्या पित्याची इच्छा पूर्ण करावयास पाहता. तो आरंभापासून घात करणारा व सत्याला धरून न राहणारा आहे, कारण त्याच्यामध्ये सत्य नाही. तो जेव्हा लबाड बोलतो तेव्हा तो त्याची जन्मभाषा बोलतो, कारण तो लबाड आहे व लबाडांचा पिता आहे.
खोट्या साक्षीदाराला शिक्षा झाल्यावाचून राहणार नाही,
आणि खोटे शब्द ओतणार्याचा नाश होईल.
परंतु जे इतरांची फसवणूक करतात,
अशांना मी माझ्या घरात राहू देणार नाही,
आणि जे असत्य बोलतात,
ते माझ्यापुढे उपस्थित राहणार नाहीत.
Consequências da falsidade
A mentira destrói confiança e relacionamentos. As Escrituras alertam sobre os frutos amargos do engano e da falsidade.
लबाड बोलून मिळवलेली संपत्ती,
म्हणजे उडून जाणारी वाफ आणि प्राणघातक सापळा आहे.
सत्याची वाणी काळाच्या कसोटीला उतरते;
लबाड जिव्हा ही क्षणिक आहे.
लबाड बोलणारी जीभ ज्याचा द्वेष करते त्याला दुखविते,
आणि खुशामत करणारी जीभ नाशास कारणीभूत होते.
खोटे बोलणाऱ्यांचा तुम्ही त्यांना नाश करता.
खुनी आणि कपटींचा
याहवेहला तिरस्कार आहे.
" ‘तुम्ही चोरी करू नये.
" ‘खोटे बोलू नये.
" ‘एकमेकांना फसवू नये.