Milagres de Jesus
Os Evangelhos registram dezenas de milagres realizados por Jesus — curas, ressurreições, domínio sobre a natureza e libertações. Cada milagre revelava sua divindade e compaixão.
Curas de cegos e surdos
Jesus devolveu a visão aos cegos e a audição aos surdos, manifestando seu poder sobre toda enfermidade e deficiência.
दोन आंधळे
तेव्हा येशू तेथून जात असता दोन आंधळे त्याच्यामागे ओरडत चालले. म्हणू लागले, "हे दाविदाच्या पुत्रा, आम्हावर दया कर." येशू त्या घरात गेला तेव्हा ते आंधळेही त्याच्याकडे त्याच्यामागे आत आले. त्याने त्यांना विचारले, "मी तुम्हास दृष्टी देऊ शकेन असा तुमचा विश्वास आहे का?" "होय, प्रभू," त्यांनी उत्तर दिले. मग त्याने त्यांच्या डोळ्यांना स्पर्श केला आणि म्हणाला, "तुमच्या विश्वासाप्रमाणे तुमच्यासोबत घडो." आणि त्यांना पुन्हा दृष्टी आली. येशूने त्यांना सक्त ताकीद दिली, "पाहा, हे कोणाला कळू देऊ नका." परंतु ते बाहेर गेले आणि त्यांनी त्या सर्व प्रदेशात त्याची किर्ती गाजवली.
दोन आंधळ्यांना दृष्टिदान
ते यरीहो शहर सोडत असताना, मोठा लोकसमुदाय त्याच्यामागे आला. रस्त्याच्या कडेला दोन आंधळे बसले होते आणि जेव्हा त्यांनी ऐकले की, येशू तेथून जात आहे, तेव्हा ते मोठ्याने ओरडले, "प्रभू येशू, दाविदाच्या पुत्रा. आमच्यावर दया करा." जमावाने त्यांना दटावले व त्यांना शांत राहण्यास सांगितले. पण ते अधिकच मोठ्याने ओरडू लागले, "प्रभू, दाविदाच्या पुत्रा, आमच्यावर दया करा." मग येशू थांबला आणि त्यांच्याशी बोलला, त्याने विचारले, "मी तुमच्यासाठी काय करावे अशी तुमची इच्छा आहे?" त्या आंधळ्या मनुष्यांनी उत्तर दिले, "प्रभूजी, आम्हास दिसावे अशी आमची इच्छा आहे." येशूला त्यांच्यांबद्दल कळवळा आला आणि त्याने त्यांच्या डोळ्यांना स्पर्श केला. त्याच क्षणी त्यांना दिसू लागले आणि ते त्याच्यामागे गेले.
येशू बेथसैदा येथील आंधळ्याला दृष्टी देतो
ते बेथसैदा येथे आले. तेव्हा लोकांनी त्याच्याकडे एका आंधळ्याला आणले व आपण त्यास स्पर्श करावा अशी विनंती केली. मग त्याने आंधळ्याचा हात धरून त्यास गावाबाहेर नेले मग येशू त्या आंधळ्याच्या डोळ्यांवर थुंकून व त्याच्यावर हात ठेवून त्यास विचारले, "तुला काही दिसते काय?" त्याने वर पाहिले आणि म्हणाला, "मला माणसे दिसत आहेत असे वाटते कारण ती मला झाडांसारखी दिसत आहेत, तरीही ती चालत आहेत." नंतर येशूने पुन्हा आपले हात त्या मनुष्याच्या डोळ्यावर ठेवले. त्याने डोळे उघडले तेव्हा त्यास दृष्टी आली आणि त्यास सर्वकाही स्पष्ट दिसू लागले. येशूने त्याला, "त्या गावात पाऊल देखील टाकू नको" असे सांगून घरी पाठवून दिले.
येशू बहिऱ्या-तोतऱ्या मनुष्यास बरे करतो
येशू सोर भोवतालच्या प्रदेशातून परतला आणि सिदोनाहून दकापलीसच्या वाटेने गालीलच्या सरोवराकडे आला. तेथे काही लोकांनी एका बहिऱ्या-तोतऱ्या मनुष्यास येशूकडे आणले व आपण त्याच्यावर हात ठेवावा अशी विनंती केली. येशूने त्यास लोकांपासून एका बाजूस घेऊन त्याच्या कानात आपली बोटे घातली व थुंकून त्याच्या जीभेला स्पर्श केला. त्याने स्वर्गाकडे पाहून उसासा टाकला व तो म्हणाला, "इफ्फाथा." म्हणजे, "मोकळा हो." आणि त्याच क्षणी त्याचे कान मोकळे झाले आणि जीभेचा बंद सुटला व त्यास बोलता येऊ लागले. तेव्हा हे कोणाला सांगू नका असे त्याने त्यांना निक्षून सांगितले. परंतु तो त्यांना जसजसे सांगत गेला, तसतसे ते अधिकच जाहीर करत गेले. ते लोक फारच आश्चर्यचकित झाले व म्हणाले, "त्याने सर्वकाही चांगले केले आहे. तो बहिऱ्यांना ऐकण्यास आणि मुक्यांना बोलावयास लावतो."
आंधळ्या बार्तीमयाला दृष्टीदान
मग ते यरीहो शहरास आले. येशू आपले शिष्य व लोकसमुदायासह यरीहो सोडून जात असता तीमयाचा मुलगा बार्तीमय हा एक आंधळा भिकारी रस्त्याच्या कडेला बसला होता. जेव्हा त्याने ऐकले की, नासरेथकर येशू जात आहे तेव्हा तो मोठ्याने ओरडून म्हणू लागला, "येशू, दाविदाचे पुत्र माझ्यावर दया करा." तेव्हा त्याने गप्प बसावे म्हणून अनेकांनी त्यास दटावले. पण तो अधिक मोठ्याने ओरडून म्हणू लागला, "येशू दाविदाचे पुत्र मजवर दया करा." मग येशू थांबला आणि म्हणाला, "त्याला बोलवा," तेव्हा त्यांनी आंधळ्या मनुष्यास बोलावून म्हटले, "धीर धर, येशू तुला बोलवत आहे." त्या आंधळ्याने आपला झगा टाकला, उडी मारली व तो येशूकडे आला. येशू त्यास म्हणाला, "मी तुझ्यासाठी काय करावे अशी तुझी इच्छा आहे?" आंधळा मनुष्य त्यास म्हणाला, "रब्बी, मला पुन्हा दृष्टी प्राप्त व्हावी." मग येशू त्यास म्हणाला, "जा! तुझ्या विश्वासाने तुला बरे केले आहे." लगेचच तो पाहू लागला आणि रस्त्याने तो येशूच्या मागे चालू लागला.
येशूचे एका आंधळ्याला दृष्टीदान
येशू यरीहोजवळ येत असतांना एक आंधळा रस्त्यावर बसून भीक मागत होता. जेव्हा त्या आंधळ्या मनुष्याने जवळून जाणाऱ्या लोकांचा आवाज ऐकला तेव्हा त्याने विचारले, ही कशाची गडबड चालली आहे. लोकांनी त्यास सांगितले, "नासरेथकर येशू जवळून जात आहे." तो ओरडून म्हणाला, "अहो येशू, दाविदाचे पुत्र माझ्यावर दया करा." जे पुढे चालले होते त्यांनी त्यास शांत राहण्यास सांगितले. पण तो अजून मोठ्याने ओरडून म्हणाला, "दाविदाचे पुत्र माझ्यावर दया करा!" येशू थांबला आणि त्याने आंधळ्याला स्वतःकडे आणण्याची आज्ञा केली, तो आंधळा जवळ आल्यावर येशूने त्यास विचारले, "मी तुझ्यासाठी काय करावे म्हणून तुझी इच्छा आहे?" तो म्हणाला, "प्रभू मला पुन्हा दृष्टी यावी." येशू त्यास म्हणाला, "तुला दृष्टी येवो, तुझ्या विश्वासाने तुला चांगले केले आहे." ताबडतोब त्यास दिसू लागले आणि तो देवाचे गौरव करीत येशूच्या मागे गेला. सर्व लोकांनी हे पाहिले आणि देवाची स्तुती केली.
जन्मांधळ्याला दृष्टी देणे
तो तिकडून पुढे जात असता एक जन्मपासूनचा आंधळा मनुष्य त्याच्या दृष्टीस पडला. तेव्हा त्याच्या शिष्यांनी त्यास विचारले, "रब्बी, कोणाच्या पापामुळे हा असा आंधळा जन्मास आला? याच्या की याच्या आई-वडीलांच्या?" येशूने उत्तर दिले, "ह्याने किंवा याच्या आई-वडीलाने पाप केले असे नाही, तर याच्याठायी देवाची कार्ये प्रकट व्हावीत म्हणून हा असा जन्मास आला. ज्याने मला पाठवले त्याची कामे दिवस आहे तोपर्यंत आपल्याला केली पाहिजेत. रात्र येणार आहे. तिच्यात कोणालाही काम करता येणार नाही. मी जगात आहे तोपर्यंत मी जगाचा प्रकाश आहे." असे बोलून तो जमिनीवर थुंकला व थुंकीने त्याने चिखल केला, तो चिखल त्याच्या डोळ्यांस लावला. आणि त्यास म्हटले, "जा, शिलोहाच्या तळ्यात धू." (याचा अर्थ पाठवलेला) म्हणून त्याने जाऊन धुतले आणि तो डोळस होऊन पाहू लागला.
Curas de paralíticos e enfermos
Paralíticos caminharam, leprosos ficaram limpos e todo tipo de doença foi curada pelo toque e pela palavra de Jesus.
तेव्हा पाहा, एक कुष्ठरोगी त्याच्याकडे आला व त्यास नमन करून म्हणाला, "प्रभूजी, आपली इच्छा असल्यास आपण मला शुद्ध करायला समर्थ आहात." तेव्हा येशूने आपला हात पुढे करून त्यास स्पर्श केला व म्हटले, "माझी इच्छा आहे, शुद्ध हो;" आणि लगेचच त्याचा कुष्ठरोग जाऊन तो बरा झाला. मग येशूने त्यास म्हटले, "पाहा, हे कोणाला सांगू नको; तर जाऊन स्वतःस याजकाला दाखव आणि त्यांना सत्यतेची साक्ष पटावी म्हणून तुझ्या शुद्धीकरता, मोशेने नेमलेले अर्पण वाहा."
तेव्हा काही लोकांनी पक्षघात झालेल्या कोणाएका मनुष्यास येशूकडे आणले. तो मनुष्य बाजेवर पडून होता. येशूने त्यांचा विश्वास पाहून त्या पक्षघाती मनुष्यास म्हटले, "मुला, धीर धर. तुझी पापे क्षमा करण्यात आली आहेत." काही नियमशास्त्राच्या शिक्षकांनी हे ऐकले आणि ते आपसात म्हणाले, "हा मनुष्य तर देवाविरुद्ध दुर्भाषण करीत आहे." येशूला त्यांचे विचार कळाले व तो त्यांना म्हणाला, "तुमच्या अंतःकरणात तुम्ही वाईट विचार का करता? कारण, तुझी पापे क्षमा करण्यात आली आहे, असे म्हणणे किंवा उठ व चालू लाग, असे म्हणणे यातून कोणते सोपे आहे? परंतु, मनुष्याच्या पुत्राला पृथ्वीवर पापांची क्षमा करण्याचा अधिकार आहे, हे तुम्ही जाणावे म्हणून," मग येशू त्या पक्षघाती मनुष्यास म्हणाला, "ऊठ! आपली बाज उचलून घेऊन घरी जा." मग तो उठून आपल्या घरी गेला.
सभास्थानात हात वाळलेला एक मनुष्य होता. काही यहूद्यांनी येशूवर काही दोषारोप करता यावा या हेतूने त्यास विचारला, "शब्बाथ दिवशी रोग बरे करणे योग्य आहे काय?" येशूने त्यांना उत्तर दिले, "जर तुमच्यापैकी एखाद्याकडे मेंढरू असले व शब्बाथ दिवशी ते खड्ड्यात पडले, तर तो त्यास वर काढणार नाही काय? तर मग मनुष्य मेंढरापेक्षा कितीतरी अधिक मौल्यवान आहे. म्हणून नियमशास्त्र लोकांस शब्बाथ दिवशी चांगले करण्याची मोकळीक देते." मग येशू त्या वाळलेल्या हाताच्या मनुष्यास म्हणाला, "तुझा हात पुढे सरळ कर." त्या मनुष्याने हात लांब केला व तो हात बरा झाला आणि दुसऱ्या हातासारखाच चांगला झाला.
शिमोनाची सासू तापाने बिछान्यावर पडली होती. तेव्हा त्यांनी ताबडतोब येशूला तिच्याविषयी सांगितले. तेव्हा त्याने जवळ जाऊन तिच्या हाताला धरून तिला उठवले आणि तिचा ताप निघून गेला व ती त्यांची सेवा करू लागली.
येशू कुष्ठरोग्याला बरे करतो
एक कुष्ठरोगी येशूकडे आला व त्याच्यापुढे गुडघे टेकून त्याने स्वतःला बरे करण्याची त्यास विनंती केली. तो येशूला म्हणाला, "आपली इच्छा असली तर मला शुद्ध करण्यास आपण समर्थ आहात." येशूला त्याचा कळवळा आला, त्याने हात पुढे करून त्यास स्पर्श केला व म्हटले, "माझी इच्छा आहे, शुद्ध हो." आणि लगेच त्याचे कुष्ठ गेले व तो शुद्ध झाला.
मग काही लोक त्याच्याकडे पक्षघाती मनुष्यास घेऊन आले. त्यास चौघांनी उचलून आणले होते. परंतु गर्दीमुळे त्यांना त्या मनुष्यास येशूजवळ नेता येईना, मग तो जेथे उभा होता त्याच्यावरचे छप्पर त्यांनी काढले व ज्या खाटेवर तो मनुष्य होता, ती खाट त्यांनी छप्परातून खाली त्याच्यापुढे सोडली. त्यांचा विश्वास पाहून येशू पक्षघाती मनुष्यास म्हणाला, "मुला, तुझ्या पापांची क्षमा झाली आहे." तेथे काही नियमशास्त्राचे शिक्षक बसले होते. ते आपल्या मनात विचार करू लागले की, "हा मनुष्य असे का बोलत आहे? हा दुर्भाषण करीत आहे! देवाशिवाय कोण पापांची क्षमा करू शकतो?" आणि तेव्हा ते आपल्या अंतःकरणात असे विचार करीत आहेत, हे येशूने त्याच क्षणी आपल्या आत्म्यात ओळखून त्यांना म्हटले, "तुम्ही आपल्या मनात असले विचार का करता? तुझ्या पापांची क्षमा झाली आहे, असे या पक्षघाती मनुष्यास म्हणणे किंवा ऊठ आपला बाज उचलून घेऊन चाल असे म्हणणे; यातील कोणते सोपे आहे?" परंतु मनुष्याच्या पुत्राला पृथ्वीवर पापांची क्षमा करण्याचा अधिकार आहे हे त्यांना समजावे म्हणून, तो पक्षघाती मनुष्यास म्हणाला, "मी तुला सांगतो, ऊठ, तुझी खाट उचलून घेऊन आपल्या घरी जा." मग तो लगेच उठला. त्याने आपली खाट उचलून घेऊन सर्वाच्या देखत तो घराच्या बाहेर निघाला; यामुळे ते सर्व आश्चर्यचकित झाले व देवाचे गौरव करत म्हणाले, "आम्ही असे कधीच पाहिले नव्हते."
शब्बाथ दिवशी हात वाळलेल्या मनुष्यास बरे करणे
मग येशू पुन्हा एका सभास्थानात गेला, तेथे वाळलेल्या हाताचा एक मनुष्य होता. येशूवर आरोप करण्यासाठी कारण मिळावे म्हणून तो शब्बाथ दिवशी त्या मनुष्यास बरे करतो की काय हे पाहण्यासाठी ते त्याच्यावर बारकाईने नजर ठेवून होते. येशू वाळलेल्या हाताच्या मनुष्यास म्हणाला, "ऊठ आणि लोकांच्या समोर उभा राहा." नंतर तो त्यांना म्हणाला, "शब्बाथ दिवशी चांगले करणे किंवा वाईट करणे, जीव वाचवणे किंवा जीवे मारणे यांतील कोणते योग्य आहे?" पण ते गप्प राहीले. मग त्याने त्यांच्या मनाच्या कठीणपणामुळे खिन्न होऊन त्या सर्वांकडे रागाने पहिले व त्या मनुष्यास म्हणाला, "तुझा हात लांब कर," त्याने हात लांब केला आणि तो बरा झाला.
कुष्ठरोग्यास बरे करणे
आणि असे झाले की, येशू कोणाएका गावात असता तेथे कुष्ठाने भरलेला एक मनुष्य होता, जेव्हा त्याने येशूला पाहिले तेव्हा तो पालथा पडला आणि त्यास विनंती केली, "प्रभूजी, जर तुमची इच्छा असेल तर मला शुद्ध करण्यास आपण समर्थ आहात." तेव्हा येशूने आपला हात लांब करून त्यास स्पर्श केला आणि म्हटले, "माझी इच्छा आहे शुद्ध हो!" आणि ताबडतोब त्याचे कुष्ठ नाहीसे झाले.
काही लोक एका पक्षघात झालेल्या मनुष्यास बाजेवर घेऊन आले आणि त्यांनी त्यास आत आणण्याचा व येशूसमोर खाली ठेवण्याचा प्रयत्न केला. परंतु गर्दीमुळे आत आणण्याचा मार्ग त्यांना सापडेना, म्हणून त्यांनी घराच्या छतावर चढून त्यास बाजे सकट कौलारातून येशूच्या समोर खाली सोडले. त्यांचा विश्वास पाहून, येशू म्हणाला, "मुला, तुझ्या पापांची क्षमा झाली आहेत." नियमशास्त्राचे शिक्षक आणि परूशी स्वतःशी विचार करू लागले, "हा दुर्भाषण करणारा कोण? देवाशिवाय कोण पापांची क्षमा करू शकतो?" पण येशूने त्यांचे विचार जाणून त्यांना उत्तर देऊन म्हटले, "तुम्ही आपल्या अंतःकरणात असा विचार का करता? तुझ्या पापांची क्षमा झाली आहे किंवा ऊठ आणि चालू लाग यांतील कोणते म्हणणे सोपे आहे? पण तुम्हास हे कळावे की मनुष्याच्या पुत्राला पृथ्वीवर पापांची क्षमा करण्याचा अधिकार आहे, म्हणून तो पक्षघात झालेल्या मनुष्यास म्हणाला, मी तुला सांगतो ऊठ, आपली बाज उचलून घेऊन आपल्या घरी जा." ताबडतोब तो उभा राहिला व ज्या बाजेवर तो झोपला होता ती उचलून घेऊन देवाचे गौरव करीत आपल्या घरी गेला.
असे झाले की, दुसऱ्या एका शब्बाथ दिवशी येशू सभास्थानात गेला आणि शिकवू लागला. ज्याचा उजवा हात वाळलेला होता असा एक मनुष्य तेथे होता. येशू शब्बाथ दिवशी कोणाला बरे करतो की काय हे पाहण्यासाठी नियमशास्त्राचे शिक्षक व परूशी त्याच्यावर लक्ष ठेवून होते. यासाठी की त्यांना आरोप ठेवण्यासाठी काहीतरी कारण मिळावे. परंतु तो त्यांचे विचार जाणून वाळलेल्या हाताच्या मनुष्यास म्हणाला, "ऊठ आणि सर्वांसमोर उभा राहा," आणि तो मनुष्य उठून तेथे उभा राहिला. येशू त्यांना म्हणाला, "मी तुम्हास विचारतो, शब्बाथ दिवशी कोणत्या गोष्टी करायला परवानगी आहे? चांगले करणे की वाईट करणे? कोणते कायदेशीर आहे, एखाद्याचा जीव वाचवणे का त्याचा नाश करणे?" मग त्याने सभोवती त्या सर्वांकडे पाहीले आणि म्हणाला, "तू आपला हात लांब कर." तेव्हा त्याने तसे केले आणि त्याचा हात बरा झाला.
शताधिपतीचा चाकर
ऐकणाऱ्या लोकांस त्याने आपली सर्व वचने सांगणे संपवल्यानंतर त्याने कफर्णहूमात प्रवेश केला.
तेव्हा कोणाएका शताधीपतीचा आवडता दास आजारी होऊन मरणास टेकला होता. मग त्याने येशूविषयी ऐकून यहूद्यांच्या वडिलांना त्याच्याकडे पाठवून, तू येऊन माझ्या दासास वाचवावे, अशी त्यास विनंती केली. जेव्हा ते येशूजवळ आले तेव्हा त्यांनी त्यास आग्रहाने विनंती केली, ज्याच्यासाठी तू हे करावे, तो योग्य आहे. कारण तो आमच्या राष्ट्रावर प्रीती करतो आणि त्याने आमच्यासाठी आमचे सभास्थान बांधून दिले. त्यामूळे येशू त्यांच्याबरोबर मार्गात चालत गेला आणि तो घरापासून फार दूर नव्हता, तोच त्या शताधीपतीने मित्रांना त्यांच्याकडे पाठवून म्हटले, प्रभू, आपण त्रास करून घेऊ नका, कारण तुम्ही माझ्या घरी यावे असा मी योग्य नाही. त्यामुळे तुमच्याकडे येण्यासही मी स्वतःला योग्य मानले नाही, परंतु तुम्ही फक्त शब्द बोला, म्हणजे माझा सेवक बरा होईल. कारण मीही दुसऱ्याच्या अधिकाराखाली असलेला मनुष्य असून माझ्या हाताखाली शिपाई आहेत; आणि याला मी म्हणतो, जा, म्हणजे हा जातो व दुसऱ्याला ये म्हणतो, म्हणजे तो येतो आणि माझ्या दासास म्हणतो, हे कर, म्हणजे तो ते करतो. जेव्हा येशूने हे ऐकले तेव्हा त्यास त्याच्याविषयी आश्चर्य वाटले, तो त्याच्यामागे येणाऱ्या जमावाकडे वळून म्हणाला, "मी तुम्हास सांगतो, एवढा मोठा विश्वास मला इस्राएलात देखील आढळला नाही." आणि जे पाठवलेले होते, ते घरी परतले, तेव्हा त्यांना आढळून आले की, तो सेवक बरा झाला आहे.
तेथे एक स्त्री होती, तिला दुष्ट आत्म्याने अठरा वर्षांपासून अपंग केले होते. ती कुबडी होती व तिला सरळ उभे राहता येत नव्हते. येशूने तिला पाहून तिला बोलावले आणि तो तिला म्हणाला, "मुली, तुझ्या आजारापासून तू मुक्त झाली आहेस." नंतर त्याने आपले हात तिच्यावर ठेवले आणि ती तत्काळ नीट झाली आणि ती देवाची स्तुती करू लागली.
जलोदर झालेल्या मनुष्यास शब्बाथ दिवशी बरे करणे
एका शब्बाथ दिवशी तो परूश्यांच्या अधिकाऱ्यांपैकी एकाच्या घरी जेवावयास गेला, तेव्हा तेथे जमलेले लोक येशूवर बारकाईने नजर ठेवून होते. आणि तेथे त्याच्यासमोर जलोदर झालेला एक मनुष्य होता. येशूने नियमशास्त्र शिक्षकांना व परूश्यांना विचारले, "शब्बाथ दिवशी बरे करणे नियमशास्त्राला धरुन आहे की नाही?" परंतु ते गप्पच राहिले. तेव्हा येशूने त्या आजारी मनुष्यास धरुन त्यास बरे केले व त्यास पाठवून दिले.
दहा कुष्ठरोगी
मग असे झाले की, तो यरूशलेम शहराकडे चालला असता, शोमरोन व गालील प्रांताच्या सीमा यांमधून गेला. तो कोणाएका खेड्यात जात असताना तेथे त्यास कुष्ठरोगाने ग्रस्त दहा पुरूष भेटले आणि ते दूर उभे राहून मोठमोठ्याने ओरडून म्हणाले "येशू, स्वामी, आमच्यावर दया करा," असे बोलून त्यांनी त्याच्याकडे आरोळी केली. जेव्हा येशूने कुष्ठरोग्यांना पाहिले, तेव्हा तो त्यांना म्हणाला, "जा आणि स्वतःला याजकांना दाखवा." ते याजकाकडे जात असतांनाच शुद्ध झाले, जेव्हा त्यांच्यातील एकाने पाहिले की आपण बरे झालो आहोत तेव्हा तो परत आला व तो मोठ्याने ओरडून देवाचे गौरव करू लागला. तो येशूच्या पायाजवळ खाली पडला व त्याने त्यास नमन केले. तसेच त्याने त्याचे उपकार मानले. तो एक शोमरोनी होता. येशू त्यास म्हणाला, "दहाजण शुद्ध झाले नाहीत काय? बाकीचे नऊजण कोठे आहेत? या विदेशी मनुष्याशिवाय कोणीही देवाचे गौरव करण्यासाठी परत आला नाही काय?" तो त्यास म्हणाला, "ऊठ आणि जा, तुझ्या विश्वासाने तुला बरे केले आहे."
बेथसैदा तळ्याजवळचा पंगू मनुष्य
त्यानंतर यहूद्यांचा सण होता आणि येशू यरूशलेम शहरास वर गेला. यरूशलेम शहरास, मेंढरे दरवाज्याजवळ एक तळे आहे, ज्याला इब्री भाषेत बेथेसदा म्हणतात, त्याच्याजवळ पाच पडव्या आहेत. त्यामध्ये रोगी, आंधळे, लंगडे, लुळे यांचा मोठा समुदाय पडलेला असे. कारण की देवदूत वेळोवेळी तळ्यांत उतरून पाणी हलवत असे आणि पाणी हलवल्यानंतर त्यामध्ये प्रथम जो जाईल त्यास कोणताही रोग असला तरी तो बरा होत असे. तेथे अडतीस वर्षांपासून आजारी असलेला कोणीएक मनुष्य होता. येशूने त्यास पडलेले पाहिले व त्यास तसे पडून आता बराच काळ लोटला हे ओळखून त्यास म्हटले, "तुला बरे होण्याची इच्छा आहे काय?" त्या आजारी मनुष्याने त्यास उत्तर दिले, "साहेब, पाणी हालविले जाते तेव्हा मला तळ्यात सोडायला माझ्याजवळ कोणी नाही; आणि मी जातो न जातो तोच दुसरा कोणीतरी माझ्या आधी उतरतो." येशू त्यास म्हणाला, "ऊठ, आपली बाज उचलून घेऊन चालू लाग."
लगेच तो मनुष्य बरा झाला व आपली बाज उचलून चालू लागला.
तो दिवस शब्बाथ दिवस होता.
नंतर तो गालील प्रांतातील काना नगरात पुन्हा आला. तेथे त्याने पाण्याचा द्राक्षरस केला होता. त्या स्थळी कोणीएक अंमलदार होता, त्याचा मुलगा कफर्णहूमात आजारी होता. येशू यहूदीया प्रांतातून गालील प्रांतात आला आहे हे ऐकून तो त्याच्याकडे गेला आणि त्याने खाली येऊन आपल्या मुलाला बरे करावे अशी त्याने विनंती केली कारण तो मरायला टेकला होता. त्यावर येशू त्यास म्हणाला, "तुम्ही चिन्हे आणि अद्भूते बघितल्याशिवाय विश्वास ठेवणारच नाही." तो अंमलदार त्यास म्हणाला, "प्रभूजी, माझे मूल मरण्यापूर्वी आपण खाली येण्याची कृपा करा." येशू त्यास म्हणाला, "जा, तुमचा मुलगा वाचला आहे." तेव्हा तो मनुष्य, त्यास येशूने म्हटलेल्या वचनावर विश्वास ठेवून, आपल्या मार्गाने निघून गेला. आणि तो खाली जात असता त्याचे दास त्यास भेटून म्हणाले, "आपला मुलगा वाचला आहे." तेव्हा केव्हापासून त्याच्यात सुधारणा होऊ लागली म्हणून त्याने त्यांना प्रश्न केला आणि ते त्यास म्हणाले, "काल, दुपारी एक वाजता त्याचा ताप गेला." यावरुन ज्या ताशी येशूने त्यास सांगितले होते की, "तुमचा मुलगा वाचला आहे," त्याच ताशी हे झाले असे पित्याने ओळखले आणि त्याने स्वतः व त्याच्या सर्व घराण्याने विश्वास ठेवला. येशू यहूदीया प्रांतातून गालील प्रांतात आल्यावर त्याने पुन्हा जे दुसरे चिन्ह केले ते हे.
A mulher com fluxo de sangue
Uma mulher que sofria há doze anos tocou a orla do manto de Jesus e foi curada instantaneamente pela sua fé.
मग पाहा, वाटेत बारा वर्षापासून रक्तस्राव होत असलेली एक स्त्री येशूच्या मागे येऊन त्याच्या वस्त्राच्या काठाला शिवली. कारण ती आपल्या मनात म्हणत होती, "मी केवळ त्याच्या वस्त्राला शिवले तरी बरी होईन." तेव्हा येशूने मागे वळून तिला पाहून म्हणाला, "मुली, धीर धर! तुझ्या विश्वासाने तुला बरे केले आहे." आणि ती स्त्री त्याच क्षणी बरी झाली.
येशू एका स्त्रीचा रक्तस्राव नाहीसा करतो
आणि तेथे रक्तस्रावाने बारा वर्षे पीडलेली एक स्त्री होती. तिने बऱ्याच वैद्यांच्या हातून पुष्कळ हाल सोसून आपल्याजवळ जे काही होते ते सर्व खर्च केले होते तरी तिला काही गुण न येता तिचे दुखणे अधिकच झाले होते. येशूविषयीच्या गोष्टी ऐकून ती त्या गर्दीत शिरली आणि त्याच्यामागे येऊन त्याच्या वस्त्राला स्पर्श केला. कारण ती म्हणत होती, "केवळ याच्या वस्त्रांना स्पर्श जरी केला तरी मी बरी होईन." तेव्हा लगेचच तिचा रक्तस्राव थांबला आणि आपण त्या पीडेपासून बरे झालो आहोत असा तिला शरीरात अनुभव आला.
आणि बारा वर्षे रक्तस्राव होत असलेली कोणीएक स्त्री, जी (आपली सर्व उपजीविका वैद्यांवर खर्ची घालून) कोणाकडूनही निरोगी होईना, तिने त्याच्या पाठीमागे येऊन त्याच्या वस्त्राच्या काठाला स्पर्श केला आणि लागलीच तिचा रक्तस्राव बंद झाला. मग येशू म्हणाला, "मला कोणी स्पर्श केला?" तेव्हा सर्वजण नाकारीत असता पेत्र व जे त्याच्याबरोबर होते ते त्यास म्हणाले, हे गुरूजी, समुदाय दाटी करून तुम्हास चेंगरीत आहेत. तेव्हा येशू म्हणाला, "कोणीतरी मला स्पर्श केला, कारण माझ्यातून सामर्थ्य निघाले हे मला समजले." मग ती स्त्री, आपण गुप्त राहिलो नाही असे पाहून, थरथर कांपत आली आणि त्याच्यापुढे उपडी पडून आपण कोणत्या कारणासाठी स्पर्श केला व लागलीच आपण कसे बरे झालो, हे तिने सर्व लोकांच्या देखत सांगितले. तेव्हा त्याने तिला म्हटले, "मुली, तुझ्या विश्वासाने तुला तारले आहे. शांतीने जा."
Ressurreições
Jesus ressuscitou mortos — a filha de Jairo, o filho da viúva de Naim e Lázaro. Ele é Senhor sobre a morte.
याईराची कन्या व रक्तस्रावी स्त्री
येशू या गोष्टी त्यांना सांगत असता यहूद्यांच्या सभास्थानाचा एक अधिकारी त्याच्याकडे आला व येशूच्या पाया पडून म्हणाला, "माझी मुलगी आताच मरण पावली आहे. परंतु आपण येऊन आपला हात तिच्यावर ठेव म्हणजे ती पुन्हा जिवंत होईल." तेव्हा येशू उठून आपल्या शिष्यांबरोबर त्याच्यामागे जाऊ लागला.
मग येशू त्या यहूदी सभास्थानाच्या अधिकाऱ्याच्या घरात आला. तेव्हा त्याने बासरी वाजविणाऱ्या व रडून गोंधळ करणाऱ्या जमावाला पाहीले, तो म्हणाला, "वाट सोडा, कारण मुलगी मरण पावलेली नाही; ती झोपेत आहे." तेव्हा ते त्यास हसू लागले. मग त्या जमावाला बाहेर पाठवल्यावर त्याने आत जाऊन तिचा हात आपल्या हातात घेतला आणि ती मुलगी उठली.
तेव्हा याईर नावाचा सभास्थानाचा एक अधिकारी येथे आला व त्यास पाहून त्याच्या पाया पडला. त्याने आग्रहाने त्यास विनवणी केली की, "माझी लहान मुलगी मरायला टेकली आहे. तिने बरे होऊन जगावे म्हणून आपण येऊन तिच्यावर हात ठेवा." मग तो त्याच्याबरोबर निघाला तेव्हा पुष्कळ लोक त्याच्यामागून चालत होते आणि त्याच्याभोवती गर्दी करीत होते.
मग ते सभास्थानाच्या अधिकाऱ्याच्या घराजवळ आले, तेव्हा रडत असलेल्या व फारच आकांत करीत असलेल्या लोकांची गडबड त्याने पाहिली. तो आत जाऊन त्यास म्हणाला, "तुम्ही कशाला रडता व गडबड करता? मूल मरण पावले नाही, झोपी गेले आहे." तेव्हा ते त्यास हसू लागले. पण त्याने त्या सर्वांना बाहेर काढून दिले आणि मुलीचे आई-वडील व आपल्याबरोबरचे शिष्य यांना घेऊन मुलगी होती तेथे तो आत गेला. नंतर मुलीच्या हातास धरून तो म्हणाला, "तलीथा कूम," याचा अर्थ, "मुली, मी तुला सांगतो, ऊठ." आणि लगेच ती मुलगी उठून चालू लागली; (ती बारा वर्षाची होती.) ते अत्यंत आश्चर्यचकित झाले.
प्रभूने म्हटले, "तर मग मी या पिढीच्या मनुष्यांना कोणती उपमा देऊ? आणि ती कशासारखी आहेत? जी मुले बाजारामध्ये बसून एकमेकांना हाक मारतात त्यांच्यासारखी ती आहेत, ती म्हणतात, आम्ही तुमच्यासाठी पावा वाजवला तरी तुम्ही नाचला नाही, आम्ही विलाप केला तरी तुम्ही रडला नाही. कारण बाप्तिस्मा करणारा योहान भाकर न खाता आणि द्राक्षरस न पिता आला आहे आणि तुम्ही म्हणता, त्यास भूत लागले आहे. मनुष्याचा पुत्र खातपीत आला आहे आणि तुम्ही म्हणता, पाहा, हा खादाडा मनुष्य व दारूबाज, जकातदारांचा व पाप्यांचा मित्र! परंतु ज्ञान आपल्या सर्व लेकरांकडून न्यायी ठरलेले आहे."
येशूच्या चरणांस तैलाभ्यंग व दोन कर्जदारांचा दृष्टांत
तेव्हा परूश्यांपैकी कोणा एकाने, "तू माझ्याबरोबर जेवावे." अशी येशूला विनंती केली. मग तो परूश्याच्या घरात जाऊन जेवायला बसला. आणि पाहा, कोणीएक पापी स्त्री त्या नगरांत होती; येशू परूश्यांच्या घरात जेवायला बसला आहे हे ऐकू ती सुगंधी तेलाची अलाबास्त्र कुपी घेऊन आली.
तेव्हा पाहा, याईर नावाचा कोणी मनुष्य आला; तो तर सभास्थानाचा अधिकारी होता; आणि त्याने येशूच्या पाया पडून, तू माझ्या घरी यावे, अशी त्यास विनंती केली.
कारण त्यास सुमारे बारा वर्षाची एकुलती एक मुलगी होती व ती मरणास टेकली होती. मग तो जात असता लोकसमुदाय त्याच्याजवळ दाटी करीत होते.
तो अजून बोलत आहे इतक्यात सभास्थानाच्या अधिकाऱ्याच्या येथून कोणी आला व म्हणाला, तुझी मुलगी मरण पावली आहे; गुरूजीला आणखी श्रम देऊ नका. पण येशूने ते ऐकून त्यास उत्तर दिले, "भिऊ नको, विश्वास मात्र धर, म्हणजे ती बरी केली जाईल." मग घरात आल्यावर पेत्र व योहान व याकोब आणि मुलीचा पिता व तिची आई यांच्यावाचून कोणालाही आपणाबरोबर आत येऊ दिले नाही. आणि सर्व तिच्यासाठी रडत व शोक करीत होते, पण तो म्हणाला, "रडू नका, कारण ती मरण पावली नाही, तर झोपेत आहे." तरी ती मरण पावली आहे हे जाणून ते त्यास हसू लागले. पण त्याने तिचा हात आपल्या हातात घेऊन तिला हाक मारून म्हटले, "मुली, ऊठ." तेव्हा तिचा आत्मा परत आला व ती लागलीच उठली; मग तिला खायला द्यावे अशी त्याने आज्ञा केली. आणि तिचे आई-वडील थक्क झाले; परंतु जे झाले ते कोणाला सांगू नका असे त्याना निक्षून सांगितले.
मृत लाजराला जिवंत करणे
आता बेथानीतील लाजर नावाचा एक मनुष्य आजारी होता. हे मरीया व तिची बहीण मार्था या त्याच गावच्या होत्या. तिने सुवासिक तेल घेऊन प्रभूला लावले व आपल्या केसांनी त्याचे पाय धुतले ती हीच मरीया होती आणि तिचा भाऊ लाजर आजारी होता. म्हणून त्याच्या बहिणींनी येशूला निरोप पाठवून कळवले, "प्रभूजी, बघा, आपण ज्याच्यावर प्रीती करता तो आजारी आहे." पण ते ऐकून येशू म्हणाला, "हा आजार मरणासाठी नाही पण देवाच्या गौरवासाठी आहे; म्हणजे देवाच्या पुत्राचे त्याच्यायोगे गौरव व्हावे."
आता मरीया व तिची बहीण मार्था आणि लाजर यांच्यावर येशू प्रीती करीत होता. म्हणून तो आजारी आहे हे त्याने ऐकले तरी तो होता त्या ठिकाणीच आणखी दोन दिवस राहिला. मग त्यानंतर, त्याने शिष्यांना म्हटले, "आपण पुन्हा यहूदीया प्रांतात जाऊ या." शिष्य त्यास म्हणाले, "रब्बी, यहूदी लोक आपल्याला आताच दगडमार करू पाहत होते आणि आपण पुन्हा तिकडे जाता काय?" येशूने उत्तर दिले, "दिवसाचे बारा तास आहेत की नाहीत? दिवसा जर कोणी चालतो तर त्यास ठेच लागत नाही, कारण तो या जगाचा उजेड पाहतो; पण जर कोणी रात्री चालतो तर त्यास ठेच लागते कारण त्याच्याठायी उजेड नाही." येशू या गोष्टी बोलल्यावर, तो त्यांना म्हणाला, "आपला मित्र लाजर झोपला आहे, पण मी त्यास झोपेतून उठवावयास जातो." म्हणून त्याचे शिष्य त्यास म्हणाले, "प्रभूजी, त्यास झोप लागली असेल तर तो बरा होईल." आता येशू त्याच्या मरणाविषयी बोलला होता. झोपेतून मिळण्याऱ्या आरामाविषयी बोलतो असे त्यांना वाटले. मग येशूने उघडपणे सांगितले, "लाजर मरण पावला आहे.
Domínio sobre a natureza
Jesus acalmou a tempestade, andou sobre as águas e multiplicou pães. A natureza obedece à voz do seu Criador.
वादळ शांत करणे
मग तो तारवात चढल्यानंतर त्याचे शिष्यही त्याच्यामागे चढले. तेव्हा पाहा, सरोवरात एवढे मोठे वादळ उठले की ते तारू लाटांनी झाकू लागले; तेव्हा येशू तर झोपेत होता. तेव्हा ते त्याच्याजवळ येऊन त्यास जागे करून म्हणाले, प्रभूजी, वाचवा. आम्ही बुडत आहोत. तो त्यांना म्हणाला, "अहो अल्पविश्वासी, तुम्ही का घाबरला?" मग तो उठला आणि त्याने वारा व सरोवर यास धमकावले. मग सर्व अगदी शांत झाले. तेव्हा त्या मनुष्यांना फार आश्चर्य वाटले व ते म्हणाले, "हा कोणत्या प्रकारचा मनुष्य आहे की वारे व लाटा ही याचे ऐकतात."
मग संध्याकाळ झाल्यावर त्याचे शिष्य त्याच्याकडे आले आणि म्हणाले, "ही अरण्यातील जागा आहे आणि भोजनाची वेळ होऊन गेली आहे. लोकांनी गावामध्ये जाऊन स्वतःकरता अन्न विकत घ्यावे म्हणून त्यांना पाठवून द्या." परंतु येशू त्यांना म्हणाला, "त्यांना जाण्याची गरज नाही. तुम्हीच त्यांना काही खायला द्या." ते त्यास म्हणाले, आमच्याजवळ केवळ "पाच भाकरी व दोन मासे आहेत." तो म्हणाला, "ते माझ्याकडे आणा." मग लोकांस गवतावर बसण्याची आज्ञा केली. त्याने त्या पाच भाकरी व दोन मासे घेऊन वर आकाशाकडे पाहून त्यावर आशीर्वाद मागितला. नंतर त्याने भाकरी मोडून शिष्यांना दिल्या व शिष्यांनी लोकांस दिल्या. ते सर्व जेवून तृप्त झाले. मग त्या उरलेल्या तुकड्यांच्या त्यांनी बारा टोपल्या भरून घेतल्या. जेवणारे सुमारे पाच हजार पुरूष होते. शिवाय स्त्रिया व मुले होतीच.
तेव्हा रात्रीच्या चौथ्या प्रहरी येशू त्याच्याकडे आला. तो पाण्यावरून चालत होता.
चार हजारांना भोजन
मग येशूने आपल्या शिष्यांना आपल्याजवळ बोलावून म्हटले, "मला लोकांचा कळवळा येतो कारण ते आज तीन दिवसांपासून माझ्याबरोबर राहिले आहेत आणि त्यांच्याकडे खायला काही नाही, त्यांना उपाशी पाठवावे अशी माझी इच्छा नाही कारण ते वाटेत कदाचित कासावीस होतील." शिष्य त्यास म्हणाले, "एवढ्या मोठ्या लोकसमुदायाला तृप्त करावे इतक्या भाकरी या दूर रानात आमच्याजवळ कोठून असणार?" तेव्हा येशू म्हणाला, "तुमच्याजवळ किती भाकरी आहेत?" ते म्हणाले, "आमच्याकडे सात भाकरी आहेत व काही लहान मासे आहेत." मग त्याने लोकांस जमिनीवर बसविण्याची आज्ञा केली. मग त्या सात भाकरी व मासे घेऊन त्याने देवाचे उपकार मानले व त्या भाकरी मोडल्या व शिष्यांना दिल्या व शिष्यांनी लोकांस दिल्या. तेव्हा ते सर्व जेवून तृप्त झाले आणि त्यांनी उरलेल्या तुकड्यांनी भरलेल्या सात टोपल्या गोळा केल्या. आणि जेवणारे, स्त्रिया व लेकरे सोडून चार हजार पुरूष होते.
परमेश्वराच्या भवनाचा कर
येशू आणि त्याचे शिष्य कफर्णहूमास आले तेव्हा परमेश्वराच्या भवनाचा कर वसूल करणारे आले, ते पेत्राकडे येऊन म्हणाले, "तुमचे गुरू कर देत नाहीत काय?" त्याने म्हटले, "होय देतो." मग तो घरात आल्याबरोबर तो बोलण्या अगोदर येशू म्हणाला, "शिमोना, तुला काय वाटते? पृथ्वीवरील राजे जकात किंवा कर कोणाकडून घेतात, आपल्या मुलांकडून की परक्याकडून?" जेव्हा तो म्हणाला, "परक्याकडून." तेव्हा येशूने त्यास म्हटले, "तर मग मुले मोकळी आहेत. तरी आपण त्यांना अडखळण आणू नये, म्हणून सरोवराकडे जाऊन पाण्यात गळ टाक आणि पहिल्याने वर येईल तो मासा धरून त्याचे तोंड उघड म्हणजे तुला चांदीचे एक नाणे सापडेल. ते घेऊन माझ्याबद्दल व तुझ्याबद्दल त्यांना दे."
अंजीराचे निष्फळ झाड
दुसऱ्या दिवशी सकाळी तो शहराकडे पुन्हा येत असता त्यास भूक लागली. रस्त्याच्या कडेला त्यास अंजिराचे एक झाड दिसले. ते पाहून तो जवळ गेला. पण पानाशिवाय त्यास एकही अंजीर दिसले नाही. येशू त्या झाडाला म्हणाला, "यापुढे तुला, कधीही फळ न येवो!" आणि ते झाड लगेच वाळून गेले. शिष्यांनी हे पाहिले, तेव्हा त्यांना फार आश्चर्य वाटले. त्यांनी विचारले, "हे अंजिराचे झाड इतक्या लवकर वाळून कसे गेले?" येशू त्यांना म्हणाला, "मी तुम्हास खरे सांगतो, जर तुम्हास विश्वास असेल आणि तुम्ही संशय धरला नाही तर मी जे अंजिराच्या झाडाबाबतीत केले तेच नव्हे, तर या डोंगराला उपटून समुद्रात पड असे म्हणालात तरी ते घडेल. जर तुमचा विश्वास असेल तर जे काही तुम्ही प्रार्थनेत विश्वासाने मागाल ते तुम्हास मिळेल."
तेव्हा वाऱ्याचे मोठे वादळ सुटले आणि लाटा तारवावर अशा आदळू लागल्या की, ते पाण्याने भरू लागले. परंतु येशू मागच्या बाजूस वरामावर उशास घेऊन झोपी गेला होता. ते त्यास जागे करून म्हणाले, "गुरुजी, आपण बुडत आहोत तरी आपणास काळजी वाटत नाही काय?" मग तो उठला आणि त्याने वाऱ्याला धमकावले आणि समुद्राला म्हणाला, "शांत हो! स्तब्ध राहा." मग वारा थांबला व तेथे मोठी शांतता पसरली. तो त्यांना म्हणाला, "तुम्ही का भिता? तुमच्याकडे अजूनही विश्वास कसा काय नाही?" परंतु ते अतिशय घाबरले आणि एकमेकास म्हणाले, "हा आहे तरी कोण, वारा आणि समुद्रदेखील याचे ऐकतात." असा हा आहे तरी कोण?
दिवस बराच उतरल्यावर त्याचे शिष्य त्याच्याकडे येऊन म्हणाले, "ही अरण्यातली जागा आहे व आता दिवस फार उतरला आहे. लोकांस जाऊ द्या म्हणजे ते भोवतालच्या शेतात व खेड्यात जाऊन त्यांच्यासाठी काहीतरी खायला विकत आणतील." परंतु त्याने त्यास उत्तर दिले, "तुम्हीच त्यांना काहीतरी खावयास द्या." ते त्यास म्हणाले, "आम्ही जाऊन त्यांना खाण्यासाठी दोनशे चांदीच्या नाण्याच्या भाकरी विकत आणाव्या काय?" तो त्यांना म्हणाला, "जा आणि पाहा की तुमच्याजवळ किती भाकरी आहेत?" पाहिल्यावर ते म्हणाले, "आमच्याजवळ पाच भाकरी आणि दोन मासे आहेत."
येशूने सर्व लोकांस आज्ञा केली की गटागटाने हिरवळीवर बसावे. तेव्हा ते शंभर शंभर व पन्नास पन्नास असे पंक्तीपंक्तीने बसले. येशूने पाच भाकरी आणि दोन मासे घेऊन वर स्वर्गाकडे पाहून, आशीर्वाद दिला आणि भाकरी मोडल्या व त्या लोकांस वाढण्यासाठी आपल्या शिष्यांजवळ दिल्या आणि दोन मासेसुद्धा वाटून दिले. मग ते सर्व जेवन करून तृप्त झाले. आणि त्यांनी उरलेल्या तुकड्यांच्या बारा टोपल्या भरून घेतल्या आणि माशांचेही तुकडे नेले. भाकरी खाणारे पाच हजार पुरूष होते.
मग त्यांना वल्ही मारणे अवघड जात आहे असे त्यास दिसले, कारण वारा त्यांच्या विरुद्धचा होता. नंतर पहाटे तीन ते सहाच्या दरम्यान येशू सरोवरावरून चालत त्यांच्याकडे आला, त्यांच्याजवळून पुढे जाण्याचा त्याचा बेत होता. पण त्यास सरोवरातील पाण्यावरून चालतांना पाहिले, तेव्हा त्यांना ते भूत आहे असे वाटले व ते ओरडले. कारण त्या सर्वांनी त्यास पाहिले व ते घाबरून गेले. तो लगेच त्यांना म्हणाला, "धीर धरा, भिऊ नका, मी आहे." नंतर तो त्यांच्याकडे तारवात गेला तेव्हा वारा शांत झाला. ते अतिशय आश्चर्यचकित झाले.
चार हजारांना भोजन
त्या दिवसात पुन्हा लोकांचा मोठा समुदाय जमला व त्यांच्याजवळ खावयास काही नव्हते. येशूने आपल्या शिष्यांना बोलावले आणि त्यांना म्हणाला, "मला या लोकांचा कळवळा येतो, कारण आज तीन दिवस ते माझ्याबरोबर आहेत आणि त्यांच्याजवळ खावयास काही नाही. मी जर त्यांना उपाशी घरी पाठवले तर ते रस्त्यातच कासावीस होऊन पडतील आणि त्यांच्यातील काही तर दुरून आले आहेत." त्याच्या शिष्यांनी उत्तर दिले, "येथे अरण्यात हे तृप्त होतील इतक्या भाकरी कोठून आणाव्यात?" त्याने त्यांना विचारले, "तुमच्याजवळ किती भाकरी आहेत?" ते म्हणाले, "सात." त्याने लोकांस जमिनीवर बसण्याची आज्ञा केली. त्याने सात भाकरी घेतल्या, आभार मानले व त्या मोडल्या व आपल्या शिष्यांजवळ त्या वाढण्यास दिल्या आणि त्यांनी त्या लोकांस वाढल्या. त्यांच्याजवळ थोडे लहान मासे होते, त्यास त्याने आशीर्वाद देऊन तेही वाढावयास सांगितले. ते जेवून तृप्त झाले व उरलेल्या तुकड्यांच्या सात टोपल्या त्यांनी भरल्या. तेथे सुमारे चार हजार पुरूष होते. मग येशूने त्यांना घरी पाठवले.
अंजिराचे निष्फळ झाड
दुसऱ्या दिवशी, ते बेथानीहून निघाल्यानंतर येशूला भूक लागली. त्यास पानांनी भरलेले अंजिराचे एक झाड दुरून दिसले. त्यावर काही मिळेल या आशेने तो पाहावयास गेला पण तेथे त्यास पानांशिवाय काही आढळले नाही कारण तो अंजिराचा हंगाम नव्हता. नंतर तो त्यास म्हणाला, "यापुढे सर्वकाळ तुझे फळ कोणीही खाणार नाही." त्याच्या शिष्यांनी हे ऐकले.
विश्वासाचे सामर्थ्य
सकाळी येशू आणि त्याचे शिष्य जात असता त्यांनी ते अंजिराचे झाड मुळापासून वाळून गेलेले पाहिले. पेत्राला आठवण झाली. तो येशूला म्हणाला, "रब्बी, पाहा! ज्या अंजिराच्या झाडाला आपण शाप दिला ते वाळून गेले आहे."
येशूने उत्तर दिले, "देवावर विश्वास ठेवा. मी तुम्हास खरे सांगतो की, जो कोणी या डोंगराला ‘उपटून समुद्रात टाकाला जा’ असे म्हणेल व तो आपल्या मनात संशय धरणार नाही आपण जे म्हणतो तसे घडेलच असा विश्वास धरील तर त्याच्या शब्दाप्रमाणे घडून येईल. म्हणून मी तुम्हास सांगतो जे काही तुम्ही प्रार्थनेत मागाल ते मिळालेच आहे असा विश्वास धरा आणि ते तुम्हास मिळेल. जेव्हा तुम्ही प्रार्थना करीत उभे राहता तेव्हा तुमच्या मनात जर कोणाच्या विरुद्ध काही असेल तर त्याची क्षमा करा. यासाठी की, तुमच्या स्वर्गातील पित्याने तुमच्या पापांची क्षमा करावी.
पहिल्या शिष्यांस पाचारण
मग असे झाले की, तो गनेसरेत सरोवराच्या काठी उभा असता लोक देवाचे वचन ऐकण्यासाठी येशूभोवती गर्दी करू लागले, तेव्हा त्याने सरोवरात दोन होड्या पाहिल्या, पण होडीतील मासे पकडणारे बाहेर होते व त्यांची जाळी धूत होते. त्यातील एका होडीत येशू गेला जी शिमोनाची होती आणि त्याने किनाऱ्यापासून थोडे दूर नेण्यास सांगितले. नंतर तो होडीत बसला व लोकांस शिक्षण देऊ लागला. त्याने बोलणे संपविल्यावर तो शिमोनाला म्हणाला, "होडी खोल पाण्यात घेऊन चल आणि मासे पकडण्यासाठी तुझे जाळे खाली सोड." शिमोनाने उत्तर दिले, "साहेब, संपूर्ण रात्र आम्ही खूप कष्ट घेतले पण काहीच मासे पकडू शकलो नाही. तरी तुझ्या शब्दावरून मी जाळी खाली सोडतो." मग त्यांनी तसे केल्यावर त्यांच्या जाळ्यात माश्यांचा मोठा घोळका सापडला आणि त्यांची जाळी फाटू लागली तेव्हा त्यांनी दुसऱ्या होडीतील आपल्या सहकाऱ्यांना मदत करण्यासाठी बोलावले. ते आले आणि त्या दोन्ही होड्या माश्यांनी इतक्या भरल्या की, त्या बुडू लागल्या. हे पाहून शिमोन पेत्र येशूच्या पाया पडून म्हणाला, "प्रभू, माझ्यापासून दूर जा कारण मी पापी मनुष्य आहे." कारण त्यांनी धरलेल्या माश्यांचा घोळका पाहून तो व त्याच्याबरोबर असलेले सर्वजण आश्चर्यचकित झाले होते. तसेच शिमोनाचे भागीदार जब्दीचे पुत्र याकोब व योहान हेही त्यांच्याप्रमाणे आश्चर्यचकित झाले. मग येशू शिमोनाला म्हणाला, "भिऊ नको, कारण येथून पुढे तू माणसे धरणारा होशील." मग तारवे किनाऱ्याला लावल्यावर त्यांनी सर्वकाही सोडले आणि त्याच्यामागे गेले.
येशू वादळ शांत करतो
आणि त्या दिवसात असे झाले की, तो आपल्या शिष्यांबरोबर होडीत बसला आणि "आपण सरोवराच्या पलीकडे जाऊ" असे तो त्यांना म्हणाला आणि त्यांनी होडी हाकारली. नंतर ते जहाज हाकारत असता येशू झोपी गेला. मग सरोवरात वाऱ्याचे वादळ सुटले आणि होडी पाण्याने भरू लागले व ते संकटात पडले. तेव्हा ते त्याच्याजवळ येऊन त्यास जागे करून म्हणाले, गुरुजी, आम्ही बुडत आहोत. तेव्हा त्याने झोपेतून उठून वाऱ्याला व खवळलेल्या पाण्याला धमकावले; मग ते बंद होऊन अगदी निवांत झाले. तेव्हा तो त्यांना म्हणाला, "तुमचा विश्वास कोठे आहे?" आणि ते भयभीत होऊन थक्क झाले व एकमेकांना म्हणाले, हा आहे तरी कोण? की, वारा व पाणी यांना देखील हा आज्ञा करतो व ती यांचे ऐकतात.
येशू वादळ शांत करतो
आणि त्या दिवसात असे झाले की, तो आपल्या शिष्यांबरोबर होडीत बसला आणि "आपण सरोवराच्या पलीकडे जाऊ" असे तो त्यांना म्हणाला आणि त्यांनी होडी हाकारली. नंतर ते जहाज हाकारत असता येशू झोपी गेला. मग सरोवरात वाऱ्याचे वादळ सुटले आणि होडी पाण्याने भरू लागले व ते संकटात पडले. तेव्हा ते त्याच्याजवळ येऊन त्यास जागे करून म्हणाले, गुरुजी, आम्ही बुडत आहोत. तेव्हा त्याने झोपेतून उठून वाऱ्याला व खवळलेल्या पाण्याला धमकावले; मग ते बंद होऊन अगदी निवांत झाले. तेव्हा तो त्यांना म्हणाला, "तुमचा विश्वास कोठे आहे?" आणि ते भयभीत होऊन थक्क झाले व एकमेकांना म्हणाले, हा आहे तरी कोण? की, वारा व पाणी यांना देखील हा आज्ञा करतो व ती यांचे ऐकतात.
गरसेकराच्या प्रदेशातील भूतग्रस्त
मग ते गालील सरोवराच्या समोरील गरसेकरांच्या प्रदेशास पोहोचले.
दिवस संपत आला, तेव्हा बारा जण जवळ येऊन त्यास म्हणाले, "समुदायाला निरोप दे, म्हणजे ते आसपासच्या गावांत व खेड्यांत जाऊन उतरतील व खाण्याची सोय करतील; कारण आपण येथे रानातल्या ठिकाणी आहो." पण तो त्यांना म्हणाला, "तुम्हीच त्यांना खायला द्या." ते म्हणाले, "आम्ही जाऊन या लोकांसाठी अन्न विकत आणले नाही, तर पाच भाकरी व दोन मासे एवढ्याशिवाय आम्हाजवळ काही नाही." कारण ते सुमारे पाच हजार पुरूष होते. तेव्हा त्याने आपल्या शिष्यांना सांगितले, "पन्नास पन्नास जणांच्या पंक्ती करून त्यास बसवा," मग त्यांनी सांगितल्याप्रमाणे करून सर्वांस बसवले. त्याने त्या पांच भाकरी व ते दोन मासे घेतले आणि वर स्वर्गाकडे पाहून त्यास आशीर्वाद दिला आणि त्यांचे तुकडे करून ते लोकसमुदायाला वाढण्याकरता शिष्यांजवळ दिले. तेव्हा ते सर्व जेवून तृप्त झाले; आणि त्यांनी मोडलेल्या तुकड्यांतले उरले ते बारा टोपल्या भरून त्यांनी उचलून घेतले.
काना येथील लग्न
नंतर तिसर्या दिवशी गालील प्रांतातील काना नगरात एक लग्न होते आणि येशूची आई तेथे होती. येशूला व त्याच्या शिष्यांनाही लग्नाचे आमत्रंण होते. मग द्राक्षरस संपला तेव्हा, येशूची आई त्यास म्हणाली, "त्यांच्याजवळ द्राक्षरस नाही." येशू तिला म्हणाला, "मुली, याच्याशी तुझा माझा काय संबंध आहे? माझी वेळ अजून आली नाही." त्याची आई नोकरांना म्हणाली, "हा तुम्हास जे काही सांगेल ते करा." तेथे पाण्याचे सहा दगडी रांजण, यहूद्यांच्या शुद्धीकरणाच्या रीतीप्रमाणे ठेवलेले होते, त्यामध्ये दोन दोन, तीन तीन मण पाणी मावेल असे ते होते. येशू त्यांना म्हणाला, "रांजण पाण्याने भरा." आणि त्यांनी ते काठोकाठ भरले. मग त्याने नोकरांना सांगितले, "आता आता त्यातले काढून भोजनकारभार्याकडे घेऊन जा," तेव्हा त्यांनी ते नेले. द्राक्षरस बनलेले पाणी? भोजनकारभार्याने जेव्हा चाखले आणि तो कुठला होता हे त्यास माहीत नव्हते, पण ज्या नोकरांनी पाणी काढले त्यांना माहीत होते, तेव्हा भोजनकारभारी वराला बोलावून, त्यास म्हटले, "प्रत्येक मनुष्य अगोदर चांगला द्राक्षरस वाढतो आणि लोक यथेच्छ प्याले मग बेचव वाढतो, पण तू तर चांगला द्राक्षरस आतापर्यंत ठेवला आहेस." येशूने गालील प्रांतातील काना नगरात आपल्या अद्भुत चिन्हांचा हा प्रारंभ करून आपले गौरव प्रकट केले आणि त्याच्या शिष्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवला.
हे तर त्याने त्याची परीक्षा पाहण्याकरता म्हटले; कारण आपण काय करणार आहोत हे त्यास ठाऊक होते. फिलिप्पाने त्यास उत्तर दिले, "त्यांच्यातल्या प्रत्येकाने थोडे थोडे घेतले तरी दोनशे चांदीच्या नाण्याच्या भाकरी पुरणार नाहीत." त्याच्या शिष्यांतला एकजण, शिमोन पेत्राचा भाऊ अंद्रिया त्यास म्हणाला, "येथे एक लहान मुलगा आहे. त्याच्याजवळ पाच जवाच्या भाकरी आणि दोन मासळ्या आहेत; परंतु इतक्यांना त्या कशा पुरणार?" येशू म्हणाला, "लोकांस बसवा." त्या जागी पुष्कळ गवत होते, तेव्हा तेथे जे सुमारे पाच हजार पुरूष होते ते बसले. येशूने त्या पाच भाकरी घेतल्या आणि त्याने उपकार मानल्यावर त्या बसलेल्याना वाटून दिल्या. तसेच त्या मासळ्यांतून त्यांना हवे होते तितके दिले. ते तृप्त झाल्यावर त्याने आपल्या शिष्यांना सांगितले, "उरलेले तुकडे गोळा करा, म्हणजे काही वाया जाऊ नये." मग जेवणार्यांना पुरे झाल्यावर त्यांनी जवाच्या पाच भाकरींचे उरलेले तुकडे गोळा करून बारा टोपल्या भरल्या.
मग त्यांनी सुमारे सहा किलोमीटर वल्हवून गेल्यावर येशूला पाण्यावरून तारवाजवळ चालत येताना पाहिले आणि त्यांना भय वाटले. पण तो त्यांना म्हणाला, "मी आहे, भिऊ नका." म्हणून त्यास तारवात घेण्याची त्यांना इच्छा झाली. तेवढ्यात त्यांला जायचे होते त्याठिकाणी तारू किनाऱ्यास लावले.
येशूचे तिबिर्या सरोवराजवळ सात शिष्यांस दर्शन
आणि या यानंतर पुन्हा तिबिर्याच्या सरोवराजवळ येशूने शिष्यांना स्वतःस प्रकट झाला; आणि अशाप्रकारे स्वतःस प्रकट केले. शिमोन पेत्र व ज्याला दिदुम म्हणत तो थोमा, गालील प्रांतातील काना नगरातील नथनेल व जब्दीचे पुत्र आणि त्याच्या शिष्यांतील दुसरे दोघे जण हे बरोबर होते. शिमोन पेत्र त्यांना म्हणाला, "मी मासे धरावयला जातो." ते त्यास म्हणतात, "आम्ही पण तुझ्याबरोबर येतो." तेव्हा ते निघून तारवात चढले आणि त्या रात्री त्यांनी काहीही धरले नाही.
पण आता पहाट होते वेळी येशू समुद्र किनार्याजवळ उभा होता, पण तो येशू होता हे शिष्यांना समजले नाही. तेव्हा येशूने त्यांना म्हटले, "मुलांनो, तुमच्याजवळ काही खावयाला आहे काय?" ते त्यास म्हणाले, "नाही." आणि तो त्यांना म्हणाला, "तारवाच्या उजवीकडे जाळे टाका आणि तुम्हास मिळेल." म्हणून त्यांनी टाकले आणि माशांच्या घोळक्यामुळे ते त्यांना आता ओढवेना.
तेव्हा ज्या शिष्यावर येशूची प्रीती होती तो पेत्राला म्हणाला, "तो प्रभू आहे." शिमोन पेत्राने ऐकले की, तो "प्रभू आहे, प्रभू आहे" तेव्हा तो उघडा असल्यामुळे (त्याने बाहेरील वस्त्र, झगा, न घातल्यामुळे) त्याने कमरेला झगा गुंडाळला आणि सरोवरात उडी घेतली. आणि दुसरे शिष्य त्या लहान मचव्याने ते माशांचे जाळे ओढीत ओढीत आले कारण ते किनार्यापासून फार दूर नव्हते, पण सुमारे दोनशे हातावर होते.
तेव्हा ते किनार्यावर बाहेर आल्यावर तेथे कोळशांचा विस्तव आणि त्यावर ठेवलेली मासळी आणि भाकरी पाहिली. येशूने त्यांना म्हटले, "तुम्ही आता धरलेल्या मासळीमधून काही आणा." तेव्हा शिमोन पेत्राने मचव्यावर चढून एकशे त्रेपन्न मोठ्या माशांनी भरलेले जाळे किनार्यावर ओढून आणले. ते तितके असतानाही जाळे फाटले नाही.
Libertações
Jesus expulsou demônios com autoridade. Os espíritos impuros não resistiam à sua palavra e saíam imediatamente.
शताधिपतीचा चाकर
मग येशू कफर्णहूम शहरात आल्यावर एक शताधिपती त्याच्याकडे आला व त्यास विनंती करत म्हणाला, "प्रभूजी, माझा चाकर पक्षाघाताने अतिशय आजारी होऊन घरात पडून आहे." येशू त्यास म्हणाला, "मी येऊन त्यास बरे करीन." तेव्हा शताधिपतीने उत्तर दिले की, "प्रभूजी, आपण माझ्या छपराखाली यावे अश्या योग्यतेचा मी नाही; पण आपण शब्द मात्र बोला म्हणजे माझा चाकर बरा होईल. कारण मीही एक अधिकारी असून माझ्या हाताखाली शिपाई आहेत. मी एकाला ‘जा’ म्हणले की तो जातो, दुसर्याला ‘ये’ म्हणले की तो येतो आणि माझ्या दासास ‘हे कर’ म्हणले की तो ते करतो." हे ऐकून येशूला आश्चर्य वाटले व आपल्यामागे येत असलेल्या लोकांस तो म्हणाला, "मी तुम्हास खरे सांगतो, मला इस्राएलात एवढा विश्वास आढळला नाही. मी तुम्हास सांगतो की, पूर्वेकडून व पश्चिमेकडून पुष्कळजण येतील आणि स्वर्गाच्या राज्यात अब्राहाम, इसहाक व याकोब याच्या पंक्तीस बसतील; परंतु राज्याचे पुत्र बाहेरील अंधारात टाकले जातील, तेथे रडणे व दात खाणे चालेल." मग येशू शताधिपतीला म्हणाला, "जा, तू जसा विश्वास ठेवला तसे तुला मिळाले आहे." आणि त्याच घटकेस तो चाकर बरा झाला.
गदरेकरांच्या प्रदेशातील भूतग्रस्त
मग तो पलीकडे गदरेकरांच्या देशात गेल्यावर त्यास दोन भूतग्रस्त कबरांतून निघून येत असतांना भेटले; ते भयंकर हिंसक होते म्हणून त्या वाटेने कोणालाही जाणे शक्य नव्हते. तेव्हा पाहा, ते ओरडून म्हणाले, "हे देवाच्या पुत्रा, तू मध्ये का पडतोस? नेमलेल्या समयापूर्वी तू आम्हास पीडा द्यायला येथे आलेला आहेस काय?" तेथे त्यांच्यापासून दूर अंतरावर डुकरांचा मोठा कळप चरत होता. मग ती दुष्ट आत्मे त्यास विनंती करू लागली की, तू जर आम्हास काढीत असलास तर त्या डुकरांच्या कळपात आम्हास पाठवून दे. त्याने त्यास म्हटले, "जा," मग ती निघून डुकरांत शिरली; आणि पाहा, तो संपुर्ण कळप कड्यावरून धडक धावत जाऊन समुद्रात पाण्यात बुडून मरण पावला. मग त्या डुकरांना चारणारे नगरांत पळाले आणि त्यांनी जाऊन भूतग्रस्तांच्या गोष्टीसकट सर्व वर्तमान जाहीर केले. तेव्हा पाहा, सर्व नगर येशूला भेटावयास निघाले आणि त्यास सीमेबाहेर जाण्याची विनंती केली.
मुका भूतग्रस्त
मग ते दोघे तेथून निघून जात असताना लोकांनी एका मुक्या, भूतबाधा झालेल्या मनुष्यास येशूकडे आणले. जेव्हा येशूने भूत काढून टाकले तेव्हा पूर्वी मुका असलेला तो मनुष्य बोलू लागला. लोकांस याचे आश्चर्य वाटले व ते म्हणाले, "इस्राएलामध्ये यापूर्वी असे घडलेले कधीही पाहण्यात आले नव्हते."
सैतानाचे साहाय्य घेतल्याचा आरोप
मग काही मनुष्यांनी एकाला येशूकडे आणले. तो मनुष्य आंधळा व मुका होता व त्याच्यामध्ये भूत होते. येशूने त्या मनुष्यास बरे केले व तो बोलू लागला व पाहू लागला.
एक परराष्ट्रीय भूतग्रस्त मुलगी
नंतर येशू तेथून निघून सोर व सिदोनाच्या भागात गेला. तेव्हा एक कनानी स्त्री त्या भागातून येशूकडे आली. ती स्त्री ओरडून म्हणाली, "प्रभू, दाविदाच्या पुत्रा, माझ्यावर दया करा. माझी मुलगी भूताने फार पिडलेली आहे." पण येशूने तिला एका शब्दानेही उत्तर दिले नाही, तेव्हा त्याच्या शिष्यांनी येऊन त्यास विनंती केली, "तिला पाठवून द्या, कारण ती आमच्या मागे ओरडत येत आहे." पण येशूने उत्तर दिले, "मला देवाने फक्त इस्राएलाच्या हरवलेल्या मेंढरांकडे पाठवले आहे." मग ती स्त्री पुन्हा येशूकडे आली, ती येशूच्या पाया पडली व म्हणाली, "प्रभूजी, मला मदत करा." परंतु त्याने म्हटले, "मुलाची भाकर घेऊन कुत्र्यास टाकणे योग्य नाही." ती स्त्री म्हणाली, "होय प्रभूजी, परंतु तरीही कुत्रीही आपल्या धन्याच्या मेजावरून पडलेला चूरा खातात." तेव्हा येशूने तिला उत्तर दिले, "मुली, तुझा विश्वास मोठा आहे. तुझ्या इच्छेप्रमाणे तुला प्राप्त होवो." आणि त्याचवेळी तिची मुलगी बरी झाली.
भूतग्रस्त मुलाला बरे करणे
नंतर येशू व शिष्य लोकसमुदायाजवळ आल्यावर एक मनुष्य त्याच्याकडे आला आणि त्याच्यापुढे गुडघे टेकून म्हणाला, "प्रभूजी, माझ्या मुलावर दया करा. त्यास फेफरे येतात व त्याचे फार हाल होतात कारण तो सारखा विस्तवात आणि पाण्यात पडतो. मी त्यास आपल्या शिष्यांकडे आणले पण त्यांना त्यास बरे करता येईना." येशूने उत्तर दिले, "अहो अविश्वासू व विपरीत पिढीच्या लोकांनो, मी तुमच्याबरोबर आणखी कोठवर राहू? मी तुमचे किती सहन करू? त्यास माझ्याकडे आणा." येशूने त्या भूताला धमकावले, तेव्हा ते भूत त्याच्यातून निघून गेले आणि त्याच घटकेला तो मुलगा बरा झाला.
त्याचवेळी त्यांच्या सभास्थानात अशुद्ध आत्मा लागलेला एक मनुष्य होता, तो एकदम मोठ्याने ओरडला, आणि म्हणाला, "नासरेथच्या येशू, तू आमच्यामध्ये का पडतोस? तू आमचा नाश करावयास आला आहेस काय? तू कोण आहेस हे मला माहीत आहे, जो देवाचा पवित्र तो तूच." परंतु येशूने त्यास धमकावून म्हटले, "शांत राहा व याच्यातून नीघ." "नंतर अशुद्ध आत्म्याने त्यास पिळले व तो मोठ्याने ओरडून त्याच्यातून बाहेर निघून गेला."
गरसेकर भूतग्रस्ताला येशू बरे करतो
मग येशू आणि त्याचे शिष्य सरोवराच्या पलीकडे, गरसेकरांच्या प्रदेशात आले. तो तारवातून उतरताच अशुद्ध आत्मा लागलेला एक मनुष्य कबरांतून निघून त्यास भेटला. तो कबरांमध्ये राहत असे व त्यास साखळदंडाने आणखी बांधून ठेवणे आता कोणाला शक्य नव्हते. कारण त्यास पुष्कळ वेळा बेड्यांनी व साखळदंडांनी बांधले असताही, त्याने साखळदंड तोडून टाकले होते व बेड्यांचे तुकडे तुकडे केले होते आणि त्यास ताब्यात ठेवण्याचे सामर्थ्य कोणालाही नव्हते. तो नेहमी रात्रंदिवस कबरांमध्ये व डोंगरांमध्ये राहून ओरडत असे व टोकदार दगडांनी आपले अंग ठेचून घेत असे. येशूला दुरून पाहताच, तो धावत आला व त्याच्या पाया पडला. आणि मोठ्याने ओरडून म्हणाला, "हे येशू, परात्पर देवाच्या पुत्रा, तू मध्ये का पडतोस? मी तुला देवाची शपथ घालतो, मला छळू नकोस." कारण येशू त्यास म्हणत होता, "अरे अशुद्ध आत्म्या, या मनुष्यातून निघ." त्याने त्यास विचारले, "तुझे नाव काय?" त्याने उत्तर दिले, "माझे नाव सैन्य, कारण आम्ही पुष्कळ आहोत. आणि आम्हास या देशातून घालवू नकोस" अशी तो त्यास आग्रहाने विनंती करत होता. तेथे डोंगराच्या कडेला डुकरांचा एक मोठा कळप चरत होता. तेव्हा अशुद्ध आत्म्यांनी त्यास विनंती केली की, "आम्ही त्या डुकरांत शिरावे, म्हणून त्यांच्याकडे आम्हास लावून दे." मग त्याने त्यास परवानगी दिली. तेव्हा ते अशुद्ध आत्मे निघून डुकारात शिरले आणि तो सुमारे दोन हजार डुकरांचा कळप तडक धावत जाऊन कड्यावरून सरोवरात पडला व पाण्यात गुदमरून मरण पावला. डुकरे राखणारे पळाले व त्यांनी गावात व शेतमळ्यांत हे वर्तमान सांगितले, तेव्हा काय झाले हे पाहण्यास लोक आले.
परंतु तुम्ही शिकविता, एखादा मनुष्य आपल्या वडिलांना व आईला असे म्हणू शकतो की, ‘तुम्हास मदत करण्यासाठी माझ्याकडे थोडे फार आहे, परंतु तुम्हास मदत करण्यासाठी मी ते वापरणार नाही, मी ते देवाला अर्पण करण्याचे ठरवले आहे.’ तर तुम्ही त्यास त्याच्या वडिलांसाठी किंवा आईसाठी पुढे काहीच करू देत नाही. अशाप्रकारे तुम्ही आपला संप्रदाय चालू ठेवून देवाचे वचन रद्द करता आणि यासारख्या पुष्कळ गोष्टी करता."
अंतर्यामीची भ्रष्टता
तेव्हा येशूने लोकसमुदायाला पुन्हा बोलावून म्हटले, "प्रत्येकाने माझे ऐका व हे समजून घ्या.
बाहेरून मनुष्याच्या आत जाऊन त्यास अपवित्र करील असे काही नाही, तर मनुष्याच्या आतून जे निघते तेच त्यास अपवित्र करते. ज्या कोणाला ऐकण्यास कान आहेत तो ऐको."
येशू सुरफुनीकी स्त्रीची मुलगी बरी करतो
येशू त्या ठिकाणाहून निघून सोर आणि सिदोन प्रांतात गेला. तेथे तो एका घरात गेला व हे कोणाला कळू नये अशी त्याची इच्छा होती. तरी त्यास गुप्त राहणे शक्य नव्हते. पण जिच्या लहान मुलीला अशुद्ध आत्मा लागला होता अशा एका स्त्रीने त्याच्याविषयी लगेच ऐकले व ती येऊन त्याच्या पाया पडली. ती स्त्री ग्रीक होती व सिरीयातील फिनीशिया येथे जन्मली होती. तिने येशूला आपल्या मुलीतून भूत काढण्याची विनंती केली. तो तिला म्हणाला, "प्रथम मुलांना तृप्त होऊ दे कारण मुलांची भाकरी घेऊन कुत्र्याला टाकणे योग्य नव्हे." परंतु ती त्यास म्हणाली, "प्रभू, कुत्रीसुद्धा मुलांच्या हातून मेजाखाली पडलेला चुरा खातात." तो त्या स्त्रीला म्हणाला, "तुझ्या या बोलण्यामुळे जा, तुझ्या मुलीतून भूत निघून गेले आहे." मग ती घरी आली तेव्हा तिची मुलगी अंथरूणावर पडली आहे व तिच्यातून भूत निघून गेले आहे. असे तिने पाहिले.
तेव्हा समुदायातील एकाने त्यास उत्तर दिले, "गुरुजी, मी माझ्या मुलाला आपणाकडे आणले. त्यास दुष्ट आत्मा लागला असून तो बोलू शकत नाही. आणि जेव्हा तो त्यास धरतो तेव्हा त्यास खाली आपटतो व तोंडाला फेस आणतो, दात चावतो व नंतर ताठ होतो. मी आपल्या शिष्यांना त्यास काढावायास सांगितले परंतु ते काढू शकले नाहीत."
येशू भूतग्रस्त मुलाला बरे करतो
येशू त्यांना म्हणाला, "हे विश्वासहीन पिढी, मी कोठवर तुमच्याबरोबर असणार? मी तुमच्याबरोबर कोठवर सहन करू? मुलाला इकडे आणा." नंतर त्यांनी मुलाला येशूकडे आणले आणि जेव्हा त्या दुष्ट आत्म्याने येशूकडे पाहिले तेव्हा लगेच त्या मुलाला पिळून टाकले आणि तो जमिनीवर पडून तोंडाला फेस आणून लोळू लागला. नंतर येशूने त्याच्या वडिलांना विचारले, "किती काळ हा असा आहे?" वडीलांनी उत्तर दिले, "बाळपणापासून हा असा आहे. पुष्कळदा ठार करण्यासाठी त्याने त्यास अग्नीत किंवा पाण्यात टाकले. जर आपल्या हातून काही होणे शक्य असेल तर आम्हावर दया करा व आम्हास मदत करा." येशू त्यास म्हणाला, "शक्य असेल तर, असे कसे म्हणतोस? विश्वास ठेवणाऱ्याला सर्वकाही शक्य आहे." तेव्हा लागलेच मुलाचे वडील मोठ्याने ओरडून म्हणाले, "मी विश्वास करतो, माझा अविश्वास घालवून टाका." येशूने लोकसमुदाय त्याच्याकडे धावत येत आहे असे पाहिले तेव्हा येशू त्या दुष्ट आत्म्याला धमकावून म्हणाला, "अरे मुक्या बहिऱ्या आत्म्या, मी तुला आज्ञा करतो की, याच्यातून बाहेर नीघ आणि पुन्हा कधीही याच्यात शिरू नको." नंतर तो ओरडून व त्यास अगदी पिळून बाहेर निघाला व मुलगा मृतासारखा झाला आणि लोकांस वाटले, तो मरण पावला. परंतु येशूने त्यास हातास धरून त्यास उठवले आणि तो उभा राहिला.
शिमोनाची सासू व इतर काही रोगी
येशू सभास्थानातून निघून शिमोनाच्या घरी गेला. शिमोनाची सासू तापाने आजारी होती. त्यांनी तिला बरे करण्याविषयी त्यास विनंती केली. येशू तिच्याजवळ उभा राहिला व त्याने तापाला धमकावले आणि तिच्यातून ताप निघाला. ताबडतोब उठून ती त्यांची सेवा करू लागली.
आणि तो जमिनीवर उतरला, तेव्हा नगरातील कोणीएक मनुष्य त्यास भेटला; त्यास पुष्कळ भूते लागली होती व त्याने बऱ्याच काळापासून कपडे घातली नव्हती व घरात न राहता तो थडग्यांमध्ये राहत होता. तेव्हा तो येशूला पाहून फार ओरडला व त्याच्यापुढे पडून मोठ्याने म्हणाला, हे येशू, परात्पर देवाच्या पुत्रा, माझा तुझा काय संबध? मी तुला विनंती करतो, मला पिडू नकोस. कारण तो त्या अशुद्ध आत्म्याला त्या मनुष्यांतून निघून जाण्याची आज्ञा करीत होता; कारण त्याने त्यास पुष्कळ वेळा धरले होते; आणि लोक त्यास पहाऱ्यात ठेवून साखळ्यांनी व बेड्यांनी बांधीत असत पण तो ती बंधने तोडून भूताकडून रानांमध्ये हाकून लावला जात असे. आणि येशूने त्यास विचारले, "तुझे नाव काय?" तेव्हा त्याने म्हटले, सैन्य, कारण त्याच्यामध्ये पुष्कळ भूते शिरली होती. आणि तू आम्हास अगाधकूपात जाण्याची आज्ञा करू नको, अशी ती भूते त्यास विनंती करीत होती. तेव्हा तेथे पुष्कळ डुकरांचा कळप डोंगरावर चरत होता; आणि त्यांमध्ये शिरायला तू आम्हास परवानगी द्यावी, अशी त्यांनी विनंती केली. मग त्याने त्यांना परवानगी दिली. तेव्हा ती भूते त्या मनुष्यांतून निघून त्या डुकरांमध्ये शिरली आणि तो कळप कड्यावरून धडक धावंत जाऊन खाली सरोवरात पडला व गुदमरून मरण पावला. मग कळप चारणारे जे घडले ते पाहून पळाले व त्यांनी ते नगरांमध्ये व शेतांमध्ये जाऊन सांगितले. तेव्हा जे झाले ते पाहायला ते लोक बाहेर निघाले आणि येशूकडे आले आणि ज्या मनुष्यांतून भूते निघाली होती तो वस्त्र पांघरलेला व शुद्धीवर आलेला असा येशूच्या पायांजवळ बसलेला त्यांना आढळला; आणि ते भ्याले.
आणि मी तुम्हास खरे सांगतो की, येथे उभे राहणाऱ्यांतले काही असे आहेत की, ते देवाचे राज्य पाहतील तोपर्यंत त्यांना मरणाचा अनुभव येणारच नाही."
येशूचे रुपांतर
आणि या गोष्टी सांगितल्यानंतर सुमारे आठ दिवसानी असे झाले की, पेत्र व योहान व याकोब यांना बरोबर घेऊन तो प्रार्थना करायला डोंगरावर गेला. तेव्हा तो प्रार्थना करीत असता त्याच्या मुखाचे रूप पालटले व त्याचे वस्त्र पांढरे शुभ्र लखलखीत झाले. आणि पाहा, दोन पुरूष त्याच्याशी संभाषण करीत होते; हे मोशे व एलीया होते, ते तेजस्वी दिसत होते आणि जे त्याचे प्रयाण तो यरूशलेम शहरात पूर्ण करणार होता, त्याविषयी ते बोलत होते.
तेव्हा पेत्र व त्याच्याबरोबर जे होते ते झोपेने भारावले होते, परंतु ते पूर्णपणे जागे झाले तेव्हा त्यांचे तेज आणि जे दोन पुरूष त्याच्याजवळ उभे राहिले होते त्यांनाही पहिले. मग असे झाले की ते त्याच्यापासून दूर होत असता पेत्राने येशूला म्हटले, "हे गुरु, येथे असणे आम्हास बरे आहे; तर आम्ही तीन मंडप करू, तुझ्यासाठी एक व मोशेसाठी एक व एलीयासाठी एक." आपण काय बोलत आहोत याचे त्यास भान नव्हते.
तेव्हा पाहा, समुदायातील एक मनुष्य मोठ्याने ओरडून म्हणाला, हे गुरु, मी तुला विनंती करतो, माझ्या मुलाकडे पाहा, कारण तो माझे एकुलते मूल आहे. आणि पाहा, कोणी आत्मा त्यास धरतो आणि हा एकाएकी ओरडतो, मग तो याला असा पिळतो की त्याच्या तोंडाला फेस येतो, तो याला पुष्कळ त्रास देतो व याला मोठ्या प्रयासाने सोडून जातो. आणि तो काढावा म्हणून मी तुझ्या शिष्यांना विनंती केली, परंतु त्यांच्याने तो निघेना. तेव्हा येशूने उत्तर देऊन म्हटले, "हे अविश्वासी व विपरीत पिढी, मी कोठेपर्यंत तुमच्याबरोबर राहू व तुमचे सोसू? तू आपल्या मुलाला इकडे आण." मग तो जवळ येत आहे इतक्यात भूताने त्यास खाली आपटले व भारी पिळून टाकले, पण येशूने त्या अशुद्ध आत्म्याला धमकावले व मुलाला बरे करून त्याच्या पित्याजवळ परत दिले.
येशूचे स्वतःच्या मरणाविषयीचे दुसरे भविष्य
मग देवाचे हे महान सामर्थ्य पाहून सर्व लोक थक्क झाले आणि तो जी कामे करीत होता त्या सर्वांवरून सर्वजण आश्चर्य करीत असता तो आपल्या शिष्यांना म्हणाला,
सैतानाच्या साहाय्याने येशू आपली कामे करतो या आरोपाला त्याने दिलेले उत्तर
येशू एक भूत काढीत होता. ते मुके होते. मग असे झाले की, जो मनुष्य बोलू शकत नव्हता ते, भूत बाहेर आल्यावर, तो बोलू लागला व लोकांचा जमाव आश्चर्यचकित झाला.
त्यांच्यापैकी एकाने महायाजकाच्या नोकरावर वार केला आणि त्याचा उजवा कान कापला. येशूने उत्तर दिले, "हे पुरेसे असू द्या." आणि त्याने त्याच्या कानाला स्पर्श केला व त्यास बरे केले.
मग योहानाचे निरोपे गेल्यावर तो योहानाविषयी समुदायांशी बोलू लागला, "तुम्ही काय पाहायला बाहेर रानात गेला? वाऱ्याने हलवलेला बोरू काय? तर तुम्ही काय पाहायला बाहेर गेला? मऊ वस्त्रे घातलेल्या मनुष्यास काय? पाहा, भडक पोषाख घातलेले व चैनीत असणारे लोक राजवाड्यांत असतात. तर तुम्ही काय पाहायाला बाहेर गेला? संदेष्ट्याला काय? होय, मी तुम्हास सांगतो, संदेष्ट्याहूनही जो अधिक मोठा आहे त्याला.
पाहा, ‘मी आपल्या दूताला तुझ्या मुखापुढे पाठवतो;
तो तुझ्यापुढे तुझी वाट तयार करील,’
असे ज्याच्याविषयी लिहिले आहे तो हाच आहे.
मी तुम्हास सांगतो की स्त्रियांपासून जे जन्मले त्यांच्यांमध्ये योहानापेक्षा मोठा असा कोणी नाही, तरी देवाच्या राज्यांत जो अगदी लहान आहे, तो त्याच्यापेक्षा मोठा आहे." आणि जकातदारांसह सर्व लोकांनी ऐकून ‘देव न्यायी आहे’ असे ठरवले कारण त्यांनी योहानाचा बाप्तिस्मा घेतला होता. परंतु परूशी व नियमशास्त्राचे शिक्षक यांनी त्याच्यापासून बाप्तिस्मा न घेऊन आपल्या संबंधीची देवाची योजना धिक्कारली.