Morte de Jesus
A morte de Jesus é o sacrifício supremo do amor de Deus. Na cruz, o Cordeiro de Deus carregou os pecados do mundo, satisfez a justiça divina e abriu o caminho da salvação para todos.
O sacrifício na cruz
Jesus disse: 'Está consumado!' Na cruz, Ele cumpriu toda a lei, pagou o preço do pecado e reconciliou a humanidade com Deus.
यानंतर सर्वगोष्टी पूर्ण झाल्या आहेत हे जाणून शास्त्रलेख पूर्ण व्हावा म्हणून येशूंनी म्हटले, "मला तहान लागली आहे." तिथे शिरक्यात भिजविलेला एक स्पंज एजोबाच्या काठीवर ठेवून व काठी उंच करून त्यांनी येशूंच्या ओठांना लावला. तो चाखल्यावर, येशू म्हणाले, "पूर्ण झाले आहे," आणि त्यांनी मस्तक लववून प्राण सोडला.
सैनिकांनी येशूंना क्रूसावर खिळल्यानंतर, त्यांनी त्यांची वस्त्रे घेतली आणि एकाएका सैनिकाला एक असे त्याचे चार विभागामध्ये वाटप केले, फक्त अंतर्वस्त्रे ठेवली. हा अंगरखा शिवलेला नसून वरपासून खालपर्यंत संपूर्ण विणलेला होता.
ते एकमेकांना म्हणाले, "त्याचा अंगरखा आपण फाडू नये, आपणापैकी तो कोणाला मिळावा, हे पाहण्यासाठी आपण चिठ्ठ्या टाकू या."
यामुळे पुढील शास्त्रलेख पूर्ण झाला:
"त्यांनी माझी वस्त्रे आपसात वाटून घेतली,
आणि माझ्या वस्त्रासाठी चिठ्ठ्या टाकल्या."
म्हणूनच त्या सैनिकांनी याप्रमाणे केले.
क्रूसाच्या जवळ येशूंची आई व तिची बहीण, क्लोपाची पत्नी मरीया आणि मरीया मग्दालिया उभ्या होत्या. मग येशूंनी आपल्या आईला व ज्या शिष्यावर त्यांची प्रीती होती त्याला जवळ उभे राहिलेले पाहून आईला म्हटले, "बाई, पाहा, हा तुझा पुत्र!" आणि त्यांनी त्या शिष्याला म्हटले, "पाहा, ही तुझी आई!" त्या वेळेपासून त्या शिष्याने तिला आपल्या घरी ठेवून घेतले.
जेव्हा ते कवटी म्हटलेल्या जागी आले, तिथे त्यांनी त्याला अपराध्यांबरोबर क्रूसावर खिळले, एक त्यांच्या उजवीकडे आणि दुसरा त्यांच्या डावीकडे होता. तेव्हा येशू म्हणाले, "हे पित्या, यांना क्षमा कर, कारण ते काय करीत आहेत, ते त्यांना समजत नाही." आणि येशूंची वस्त्रे सैनिकांनी चिठ्ठ्या टाकून वाटून घेतली.
लोक उभे राहून पाहत होते आणि शासक त्यांची थट्टा करीत होते. ते म्हणत होते, "त्याने दुसर्यांचे तारण केले, तो परमेश्वराचा निवडलेला म्हणजे ख्रिस्त असेल तर त्याने स्वतःचा बचाव करावा."
सैनिकांनीही त्यांना शिरक्यात भिजविलेला आंब पिण्यास दिला आणि त्यांचा उपहास केला. ते त्याला म्हणाले, "जर तू यहूद्यांचा राजा असशील तर स्वतःला वाचव."
त्यांच्या डोक्याच्या वर एक लेखपत्रक लावण्यात आले. त्यावर लिहिले होते:
हा यहूद्यांचा राजा आहे.
गुन्हेगारांपैकी एकजण त्यांची निंदा करून म्हणाला, "तू ख्रिस्त आहेस ना? तर मग स्वतःला आणि आम्हालाही वाचव."
पण दुसर्या गुन्हेगाराने पहिल्याला दटावून म्हटले, "तुला परमेश्वराचे भय वाटत नाही काय, तू सुद्धा तीच शिक्षा भोगीत आहेस? आपल्या दुष्ट कृत्यांमुळे आपणास झालेली मरणाची शिक्षा अगदी यथायोग्य आहे. पण याने तर काहीही चूक केली नाही."
मग तो येशूंना म्हणाला, "अहो येशू, आपण आपल्या राज्यात याल, तेव्हा माझी आठवण ठेवा."
येशूंनी त्याला उत्तर दिले, "मी तुला निश्चित सांगतो की आज तू मजबरोबर सुखलोकात असशील."
संपूर्ण देशावर दुपारच्या तीन वाजेपर्यंत अंधार पडला. आणि दुपारी तीन वाजता, येशूंनी मोठ्याने आरोळी मारली, "एलोई, एलोई, लमा सबकतनी," म्हणजे "माझ्या परमेश्वरा माझ्या परमेश्वरा, तुम्ही माझा त्याग का केला?"
त्याच क्षणाला, पवित्रस्थानातील पडदा वरपासून खालपर्यंत दोन भागात फाटला, पृथ्वी हादरली, खडक फुटले आणि कबरा उघडल्या. मृत पावलेल्या अनेक पवित्र लोकांची शरीरे पुन्हा उठविली गेली. येशूंच्या पुनरुत्थानानंतर ते कबरेच्या बाहेर आले आणि पवित्र शहरात गेले आणि पुष्कळ लोकांनी त्यांना पाहिले.
जेव्हा शताधिपतीने आणि त्याच्याबरोबर येशूंवर पहारा करणारे रोमी शिपायांनी भूकंप आणि घडलेल्या इतर सर्वगोष्टी पाहिल्या, तेव्हा ते अत्यंत भयभीत झाले आणि त्यांनी उद्गार काढले, "खरोखरच हा परमेश्वराचा पुत्र होता!"
परंतु तो आमच्या अपराघांमुळे भोसकला गेला,
तो आमच्या पापामुळे चिरडला गेला;
आम्हाला शांती देणारी शिक्षा त्याच्यावर आली,
आणि त्याच्या जखमांद्वारे आम्हाला आरोग्य प्राप्त झाले.
आम्ही सर्व मेंढराप्रमाणे भटकून गेलो होतो,
आम्हा प्रत्येकाने स्वतःचेच मार्ग धरले होते;
आणि याहवेहने आम्हा सर्वांचा दोष
त्याच्यावर लादला.
त्याला छळले व जाचले,
तरीही त्याने आपले मुख उघडले नाही;
वधावयाला नेणाऱ्या कोकराप्रमाणे त्याला नेण्यात आले,
आणि लोकर कातरणार्यांसमोर मेंढरू जसे स्तब्ध राहते,
तसेच त्याने आपले मुख उघडले नाही.
मला कुत्र्यांनी वेढले आहे,
दुष्कर्म्यांची टोळी मला घेरून आहे;
त्यांनी माझ्या हातापायाला विंधले आहे.
माझ्या शरीरातील हाडे मी मोजू शकतो,
हे लोक माझ्याकडे कसे टक लावून पाहत आहेत.
ते माझी वस्त्रे आपसात वाटून घेतात
आणि माझ्या वस्त्रासाठी चिठ्ठ्या टाकतात.
मला पाहून ते माझा उपहास करतात;
ते माझा अपमान करतात, आपले डोके हालवीत,
ते म्हणतात, "त्याने याहवेहवर आपला भरवसा ठेवला आहे,
याहवेह त्याला मुक्त करो.
तेच त्याची सुटका करो,
कारण त्यांच्याठायी त्याला संतोष आहे."
O amor que se entrega
Ninguém tem maior amor do que aquele que dá a vida pelos amigos. Deus prova seu amor em que Cristo morreu por nós quando ainda éramos pecadores.
आपल्या मित्रासाठी स्वतःचे प्राण अर्पण करावे, यापेक्षा कोणतीही प्रीती मोठी नाही.
कारण परमेश्वराने जगावर एवढी प्रीती केली की त्यांनी आपला एकुलता एक पुत्र दिला, यासाठी की, जो कोणी त्यांच्यावर विश्वास ठेवतो, त्याचा नाश होऊ नये तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे.
आपण परमेश्वराचे शत्रू असताना, त्यांच्या पुत्राच्या मरणाद्वारे आपला समेट झाला, त्याअर्थी समेट झाल्यानंतर, कितीतरी अधिक त्यांच्या जीवनाद्वारे तारले जाऊ!
प्रीती काय आहे हे यावरून आपल्याला समजते की, येशू ख्रिस्ताने त्यांचे जीवन आपल्यासाठी दिले आणि म्हणून आपणही आपल्या भावांसाठी आणि बहिणींसाठी आपले जीवन दिले पाहिजे.
तेच आपल्या पापांसाठी प्रायश्चिताचा यज्ञ आहेत आणि केवळ आपल्यासाठीच नाही तर सर्व जगाच्या पापांसाठीसुद्धा आहेत.
मानवी रूप धारण करून
त्यांनी स्वतःस लीन केले,
येथपर्यंत की आज्ञापालन करून ते मरावयास,
आणि तेही क्रूसावरील मरण पत्करण्यास तयार झाले.
Morte e ressurreição
Jesus morreu e ressuscitou, e a morte não mais tem domínio sobre Ele. Pelo batismo, participamos de sua morte e ressurreição.
कारण आपल्याला ठाऊक आहे की, ख्रिस्त मरणातून उठविले गेले ते पुन्हा मरू शकत नाहीत; यापुढे त्यांच्यावर मरणाची सत्ता चालणार नाही. त्यांचे हे मरण पापासाठी एकदाच होते; पण आता जे जीवन ते जगतात, ते परमेश्वराकरिता जगतात.
ज्या आपण सर्वांनी ख्रिस्त येशूंमध्ये बाप्तिस्मा घेतला, त्यांच्या मृत्यूमध्येही बाप्तिस्मा घेतला हे तुम्हाला माहीत नाही का? यास्तव बाप्तिस्म्याद्वारे मरणाने आपण ख्रिस्ताबरोबर पुरले गेलो यासाठी की, ज्याप्रमाणे ख्रिस्त पित्याच्या गौरवी शक्तीने मरणातून उठविले गेले, त्याचप्रमाणे आपणही पूर्णतः नवीन जीवन जगावे.
जसे माणसांना एकदाच मरणे व त्यानंतर न्यायाला तोंड देणे हे नेमून ठेवले आहे, तसेच अनेकांचे पाप वाहून नेण्यासाठी बली म्हणून ख्रिस्त एकदाच मरण पावले आणि ते दुसर्या वेळेस प्रकट होणार, ते पाप वाहण्यासाठी नाही, तर जे त्यांची धीराने वाट पाहतात, त्यांचे तारण आणण्यासाठी येतील.
"अहो इस्राएली लोकहो! आता हे लक्ष देऊन ऐका: तुम्हाला चांगलेच माहीत आहे की, परमेश्वराने नासरेथकर येशूंना अधिकृत मान्यता देऊन त्यांच्याद्वारे तुमच्यामध्ये चमत्कार, अद्भुत गोष्टी व चिन्हे केली. परमेश्वराच्या पूर्वनियोजित योजनेप्रमाणे व त्यांच्या पूर्वज्ञानानुसार या मनुष्यास तुमच्या हातात सोपवून दिले आणि तुम्ही दुष्ट लोकांच्या मदतीने, त्यांना क्रूसावर खिळे ठोकून जिवे मारले. परंतु परमेश्वराने त्यांची मृत्यूच्या वेदनांपासून सुटका केली व त्यांना मरणातून पुन्हा उठविले, कारण मृत्यूला येशूंवर अधिकार चालविणे अशक्य होते.
"मीच उत्तम मेंढपाळ आहे. उत्तम मेंढपाळ आपल्या मेंढरांकरिता आपला जीव देतो.
कारण ज्यावेळी तुम्ही ही भाकर खाता आणि हा प्याला पिता, तेव्हा प्रत्येक वेळी त्यांचे पुनरागमन होईपर्यंत प्रभूच्या मृत्यूची घोषणा करता.