A mulher sábia
A mulher sábia constrói sua casa sobre o fundamento do temor do Senhor. Sua sabedoria abençoa a família, a comunidade e as gerações futuras.
A sabedoria que edifica
A mulher sábia edifica sua casa. O temor do Senhor é o princípio da sabedoria e a instrução que conduz à honra.
सुज्ञ स्त्री आपले घर बांधते,
पण मूर्ख स्त्री आपल्या स्वतःच्या हाताने ते खाली पाडते.
परमेश्वराचे भय ज्ञानाचा उगम आहे,
आणि परमपवित्र देवाला ओळखणे हीच सुज्ञता आहे.
परमेश्वराचे भय हे सुज्ञतेचे शिक्षण देते,
आणि आदरापूर्वी नम्रता येते.
म्हणून जर तुमच्यातील कोणी ज्ञानाने उणा असेल तर त्याने देवाकडे मागावे म्हणजे ते त्यास मिळेल कारण तो दोष न लावता सर्वांस उदारपणे देतो.
परमेश्वरास व त्याच्या सामर्थ्याला शोधा.
निरंतर त्याच्या समक्षतेचा शोध करा.
Virtude e excelência
A mulher virtuosa é coroada de força e dignidade. Ela abre a boca com sabedoria e a instrução da bondade está na sua língua.
सदगुणी स्त्री
हुशार व कार्यक्षम पत्नी कोणाला सापडेल?
पण तिचे मोल मौल्यवान खड्यांपेक्षा अधिक आहे.
बल व आदर तिचे वस्त्र आहेत,
आणि ती येणाऱ्या काळामध्ये आनंदी राहू शकते.
तिच्या मुखातून सुज्ञतेचे बोल निघतात.
आणि दयेचा नियम तिच्या जिभेवर आहे.
तिची मुले उठतात आणि ती त्यांना जे काही आनंद देईल ते देते;
तिचा पती तिची प्रशंसा करून, म्हणतो,
"पुष्कळ स्त्रियांनी चांगले केले आहे,
पण तू त्या सर्वांहून उत्कृष्ट आहेस."
लावण्य फसवे आहे आणि सौंदर्य हे व्यर्थ आहे,
पण तू जी स्त्री परमेश्वराचे भय धरते तिची प्रशंसा होते.
सद्गुणी पत्नी आपल्या पतीचा मुकुट आहे,
परंतु जी कोणी लाज आणणारी ती त्याची हाडे सडविणाऱ्या रोगासारखी आहे.
कृपाळू स्त्रीस आदर मिळतो,
परंतु निर्दयी लोक संपत्ती घट्ट पकडतात.
घर व संपत्ती आईवडीलांकडून आलेले वतन आहे,
पण समंजस पत्नी परमेश्वरापासून आहे.
Exemplo e influência
A mulher sábia é exemplo de fé e bom testemunho. Suas atitudes inspiram e seu legado abençoa as gerações que virão.
वृद्ध स्त्रियांनी, त्याचप्रमाणे, आपल्या आचरणात पवित्रेस शोभणाऱ्या असाव्या; चुगलखोर, मद्य पिणाऱ्या नसाव्या; चांगले शिक्षण देणार्या असाव्या; आणि आपल्यातील तरुण स्त्रियांना असे शिक्षण द्यावे की, त्यांनी आपल्या पतींवर व मुलांवर प्रेम करावे. आणि त्यांनी समंजस, शुद्धाचरणी, घर संभाळणार्या, ममताळू व पतीच्या अधीन राहणार्या व्हावे; म्हणजे देवाच्या वचनाची निंदा होणार नाही.
त्याचप्रमाणे, स्त्रियांनीही गंभीर असावे, त्या चहाडखोर नसाव्यात. तर सभ्य व प्रत्येक बाबतीत विश्वसनीय असाव्यात.
दहा कुमारीचा दृष्टांत
तेव्हा त्या दिवसात स्वर्गाचे राज्य दहा कुमारींसारखे असेल, त्यांनी त्यांचे दिवे घेतले व वराला भेटण्यास गेल्या. त्यांच्यातल्या पाच मूर्ख होत्या आणि पाच शहाण्या होत्या. मूर्ख कुमारींनी आपले दिवे घेतले, पण दिव्यासाठी तेल घेतले नाही. शहाण्या कुमारींनी दिव्याबरोबर आपल्या भांड्यात तेल घेतले. आता वराला उशीर झाल्याने त्या सर्वांना डुलक्या लागल्या व त्या झोपी गेल्या मध्यरात्री कोणीतरी घोषणा केली, वर येत आहे! बाहेर जाऊन त्यास भेटा!
सर्व कुमारिका जाग्या झाल्या आणि त्यांनी आपले दिवे तयार केले. तेव्हा मूर्ख शहाण्यांना म्हणाल्या, तुमच्या तेलातून आम्हास द्या. आमचे दिवे विझत आहेत. पण शहाण्यांनी उत्तर देऊन म्हणले; ते तुम्हास आणि आम्हास कदाचित पुरणार नाही; त्यापेक्षा तुम्ही विकणाऱ्यांकडे जा आणि तुमच्यासाठी विकत घ्या. त्या तेल विकत घ्यायला गेल्या तेव्हा वर आला. तेव्हा ज्या तयार होत्या त्या मेजवानीसाठी त्याच्याबरोबर आत गेल्या. मग दरवाजा बंद झाला. नंतर दुसऱ्या कुमारींकाही आल्या आणि म्हणाल्या, प्रभूजी प्रभूजी आमच्यासाठी दरवाजा उघडा पण त्याने उत्तर देऊन म्हटले, मी तुम्हास खरे सांगतो, मी तुम्हास ओळखत नाही. म्हणून नेहमी तयार असा, कारण मनुष्याचा पुत्र कधी येणार तो दिवस व ती वेळ तुम्हास माहीत नाही.