A mulher virtuosa
A mulher virtuosa de Provérbios 31 é um retrato de excelência. Seu valor excede o de rubis — ela é sábia, trabalhadora, generosa e teme ao Senhor acima de tudo.
Uma joia rara
Mulher virtuosa, quem a achará? Seu valor excede o de rubis. Ela é o coração da família e a força do lar.
सद्गुणी पत्नी कोणाला मिळेल?
तर तिचे मोल माणकाहूनही अधिक आहे.
सद्गुणी पत्नी कोणाला मिळेल?
तर तिचे मोल माणकाहूनही अधिक आहे.
तिचा पती तिच्यावर पूर्ण भरवसा ठेवतो,
आणि त्याला कोणत्याही मोलवान वस्तूची उणीव पडत नाही.
आयुष्यभर ती त्याच्या हितासाठी झटते,
त्याचे अहित करीत नाही.
ती लोकर व ताग मिळविते
आणि कामात गर्क राहून ते पिंजते.
ती एका व्यापारी जहाजासारखी आहे,
तिची भोजनसामुग्री ती फार लांब जाऊन आणते.
ती रात्र सरताच उठते;
आणि तिच्या कुटुंबीयांच्या भोजनाचा प्रबंध करते
आणि दासींना त्यांचा वाटा पुरविते.
ती शेत घेण्याचा विचार करते, आणि ते विकत घेते;
तिच्या मिळकतीमधून ती द्राक्षमळा लावते.
ती उत्साही व कष्टाळू आहे.
कामे पूर्ण करण्यासाठी तिचे बाहू सशक्त आहेत.
तिचा व्यापार लाभदायक व्हावा यासाठी ती सतर्क असते,
आणि तिचा दिवा रात्रीही मालवत नाही.
ती तिच्या हातांमध्ये चाती धरते,
आणि ती बोटांनी चरकी चालविते.
ती गरिबांना उदारहस्ते देते
आणि गरजूंना सढळ हाताने देते.
सद्गुणी स्त्री ही आपल्या पतीला मुकुटासारखी आहे,
परंतु लज्जास्पद आचरणाची स्त्री त्याच्या हाडातील कुजकेपणासारखी आहे.
आणि आता, माझ्या मुली, घाबरू नकोस. तू जे काही मागशील ते मी सर्व तुझ्यासाठी करेन. माझ्या नगरातील सर्व लोकांना माहीत आहे की, तू एक नीतिमान चरित्र असलेली स्त्री आहेस.
Caráter acima da aparência
Enganosa é a graça e vã é a formosura, mas a mulher que teme ao Senhor será louvada. A verdadeira beleza é interior.
मोहकपणा फसवा असू शकतो आणि सौंदर्य टिकाऊ नसते,
परंतु याहवेहचे भय बाळगून त्यांचा आदर करणारी स्त्री प्रशंसनीय असते.
स्त्रियांनीही वागणुकीत शांत, समजूतदार, आदरणीय आणि वस्त्रे प्रावरणांत संयमी असावे. वेशभूषा, सोने किंवा मोती किंवा मोलवान पोशाख यामध्ये नव्हे, तर जे परमेश्वराची भक्ती करणार्यांना शोभेल, अशा आचरणामुळे त्यांच्याकडे लक्ष वेधले जावे.
सुज्ञ स्त्री तिचे घर बांधते,
परंतु मूर्ख स्त्री स्वतःच्याच हातांनी ते जमीनदोस्त करते.
पूर्वजांपासून वारसांना घरेदारे व संपत्ती मिळते,
परंतु समंजस पत्नी याहवेहपासून मिळते.
त्याचप्रमाणे वयस्क स्त्रिया आदरयुक्त असाव्या; त्या इतरांच्या चहाड्या करीत फिरणार्या किंवा मद्यपानासक्त नसाव्या; त्या सुशिक्षण देणार्या असाव्या; म्हणजे त्या तरुण स्त्रियांस त्यांच्या पतींवर आणि मुलांवर प्रीती करण्यास, आत्मसंयमी, शुद्धाचरणी, घरकामात मग्न, मायाळू व आपल्या पतींच्या अधीन राहण्यास शिकविता येईल, म्हणजे परमेश्वराच्या वचनाची निंदा होणार नाही.