Mulher
A Bíblia celebra a mulher como obra-prima da criação divina. Ela é elogiada por sua sabedoria, força, beleza interior e papel fundamental na família e na sociedade.
A mulher na criação
Deus criou o homem e a mulher à sua imagem. A mulher foi formada como ajudadora idônea — parceira de igual dignidade e valor.
देवाने आपल्या प्रतिरूपाचा मनुष्य निर्माण केला.
त्याच्या स्वतःच्या प्रतिरूपाचा असा देवाने तो निर्माण केला.
नर व नारी असे त्यांना निर्माण केले.
तेव्हा परमेश्वर देवाने मनुष्यास गाढ झोप लागू दिली, आणि तो झोपला असता परमेश्वराने मनुष्याच्या शरीरातून एक बरगडी काढली व ती जागा मांसाने बंद केली. परमेश्वर देवाने मनुष्याची बरगडी काढून तिची स्त्री बनवली आणि तिला मनुष्याकडे आणले. तेव्हा मनुष्य म्हणाला,
"आता ही मात्र माझ्या हाडातले हाड व माझ्या मांसातले मांस आहे;
मी तिला स्त्री म्हणजे नारी असे नाव देतो,
कारण ती नरापासून बनवलेली आहे."
Virtude e caráter
A beleza é vã e a formosura passageira, mas a mulher que teme ao Senhor é digna de louvor. Seu caráter é seu maior tesouro.
लावण्य फसवे आहे आणि सौंदर्य हे व्यर्थ आहे,
पण तू जी स्त्री परमेश्वराचे भय धरते तिची प्रशंसा होते.
सुज्ञ स्त्री आपले घर बांधते,
पण मूर्ख स्त्री आपल्या स्वतःच्या हाताने ते खाली पाडते.
सद्गुणी पत्नी आपल्या पतीचा मुकुट आहे,
परंतु जी कोणी लाज आणणारी ती त्याची हाडे सडविणाऱ्या रोगासारखी आहे.
कृपाळू स्त्रीस आदर मिळतो,
परंतु निर्दयी लोक संपत्ती घट्ट पकडतात.
घर व संपत्ती आईवडीलांकडून आलेले वतन आहे,
पण समंजस पत्नी परमेश्वरापासून आहे.
भांडखोर आणि खूप तक्रार करून अशांती निर्माण करणाऱ्या पत्नीबरोबर राहाण्यापेक्षा
वाळवंटात राहाणे अधिक चांगले.
तर मुली भिऊ नकोस, तू म्हणतेस तसे मी तुझ्यासंबंधाने करतो; कारण माझ्या गावच्या सर्व लोकांस माहीत आहे की तू सदगुणी स्त्री आहेस.
Sabedoria e serviço
As mulheres da Bíblia foram líderes, profetisas e discípulas fiéis. Jesus honrou as mulheres e as incluiu em seu ministério.
येशूची सेवा करण्याऱ्या स्त्रिया
त्यानंतर लवकरच असे झाले की, तो उपदेश करीत व देवाच्या राज्याची सुवार्ता सांगत नगरोनगरी व गांवोगांवी फिरत होता, तेव्हा ते बारा शिष्य त्याच्याबरोबर होते. दुष्ट आत्मे व दुखणी यांपासून मुक्त केलेल्या अशा कित्येक स्त्रिया त्याच्याबरोबर होत्या, म्हणजे मग्दालीया नगराची मरीयेतून सात भूते निघाली होती, ती, हेरोदाचा कारभारी खुजा याची पत्नी योहान्ना तसेच सूसान्ना व इतर पुष्कळ स्त्रिया, या आपल्या द्रव्याने त्यांची सेवा करीत असत.
पती व पत्नी
आणि तुम्ही विवाहित स्त्रियांनो, आपल्या पतीच्या अधीन रहा; म्हणजे कोणी वचनाला अमान्य असेल, तरी तुमचे भीडस्तपणाचे निर्मळ वर्तन पाहून ते वचनांवाचून आपल्या स्त्रियांच्या वर्तनाने मिळवून घेतले जावे कारण ते तुमचे शुद्ध, आदराचे आचरण पाहतील.
पतींनो, तुम्हीही आपल्या पत्नीला अधिक नाजूक पात्राप्रमाणे, आपल्या ज्ञानानुसार, मान द्या आणि जीवनाच्या कृपेचे जोडीचे वारीस म्हणून एकत्र रहा, म्हणजे तुमच्या प्रार्थनेत व्यत्यय येवू नये.
त्याचप्रमाणे, स्त्रियांनीही गंभीर असावे, त्या चहाडखोर नसाव्यात. तर सभ्य व प्रत्येक बाबतीत विश्वसनीय असाव्यात.
वृद्ध स्त्रियांनी, त्याचप्रमाणे, आपल्या आचरणात पवित्रेस शोभणाऱ्या असाव्या; चुगलखोर, मद्य पिणाऱ्या नसाव्या; चांगले शिक्षण देणार्या असाव्या; आणि आपल्यातील तरुण स्त्रियांना असे शिक्षण द्यावे की, त्यांनी आपल्या पतींवर व मुलांवर प्रेम करावे. आणि त्यांनी समंजस, शुद्धाचरणी, घर संभाळणार्या, ममताळू व पतीच्या अधीन राहणार्या व्हावे; म्हणजे देवाच्या वचनाची निंदा होणार नाही.