Mundo
A Bíblia tem muito a dizer sobre o mundo e nossa relação com ele. Cristãos estão no mundo, mas não são do mundo — chamados a ser luz e sal sem se conformar com os padrões seculares.
Não ameis o mundo
Não ameis o mundo nem o que nele há. A cobiça da carne, a cobiça dos olhos e a soberba da vida não vêm do Pai, mas do mundo.
जगावर प्रेम करू नये यासाठी
जगावर किंवा जगातील गोष्टींवर प्रीती करू नका. जर कोणी जगावर प्रीती करतात तर त्यांच्यामध्ये पित्यासाठी प्रीती वसत नाही.
जगावर प्रेम करू नये यासाठी
जगावर किंवा जगातील गोष्टींवर प्रीती करू नका. जर कोणी जगावर प्रीती करतात तर त्यांच्यामध्ये पित्यासाठी प्रीती वसत नाही. कारण जगात जे सर्व आहे ते म्हणजे, देहाची वासना, डोळ्याची वासना व जीवनाचा गर्व या सर्वगोष्टी पित्यापासून नाहीत तर जगापासून आहेत.
कारण जगात जे सर्व आहे ते म्हणजे, देहाची वासना, डोळ्याची वासना व जीवनाचा गर्व या सर्वगोष्टी पित्यापासून नाहीत तर जगापासून आहेत.
जग आणि त्याच्या सर्व वासना नाहीशा होतील, परंतु जी व्यक्ती परमेश्वराच्या इच्छेप्रमाणे करते, ती सदासर्वकाळ जगते.
व्यभिचारी लोकांनो,. जगाशी मैत्री परमेश्वराबरोबर वैर आहे हे तुम्हाला समजत नाही काय? यास्तव, जो कोणी जगाचा मित्र होण्याचे पसंत करतो तो परमेश्वराचा शत्रू झाला आहे.
व्यभिचारी लोकांनो,. जगाशी मैत्री परमेश्वराबरोबर वैर आहे हे तुम्हाला समजत नाही काय? यास्तव, जो कोणी जगाचा मित्र होण्याचे पसंत करतो तो परमेश्वराचा शत्रू झाला आहे.
O amor de Deus pelo mundo
Porque Deus amou o mundo de tal maneira que deu seu Filho. O mesmo mundo que rejeita a Deus é amado por Ele e objeto de sua redenção.
कारण परमेश्वराने जगावर एवढी प्रीती केली की त्यांनी आपला एकुलता एक पुत्र दिला, यासाठी की, जो कोणी त्यांच्यावर विश्वास ठेवतो, त्याचा नाश होऊ नये तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे.
कारण परमेश्वराने जगावर एवढी प्रीती केली की त्यांनी आपला एकुलता एक पुत्र दिला, यासाठी की, जो कोणी त्यांच्यावर विश्वास ठेवतो, त्याचा नाश होऊ नये तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे.
निर्णय हाच आहे: प्रकाश या जगात आला आहे, परंतु लोकांनी प्रकाशाऐवजी अंधकाराची अधिक आवड धरली; कारण त्यांची कर्मे दुष्ट होती.
तेच आपल्या पापांसाठी प्रायश्चिताचा यज्ञ आहेत आणि केवळ आपल्यासाठीच नाही तर सर्व जगाच्या पापांसाठीसुद्धा आहेत.
पित्याने आपण परमेश्वराची लेकरे म्हणून संबोधले जावे म्हणून पित्याने आपणावर किती मोठा अगाध प्रीतीचा वर्षाव केला आहे! आणि आपण तसे आहोतच! जग आपल्याला ओळखत नाही कारण जगाने त्यांना ओळखले नाही.
पित्याने आपण परमेश्वराची लेकरे म्हणून संबोधले जावे म्हणून पित्याने आपणावर किती मोठा अगाध प्रीतीचा वर्षाव केला आहे! आणि आपण तसे आहोतच! जग आपल्याला ओळखत नाही कारण जगाने त्यांना ओळखले नाही.
Vencer o mundo
Jesus venceu o mundo e nos dá sua paz e vitória. A fé é a vitória que vence o mundo — e aquele que nasceu de Deus o vence.
"मी या सर्वगोष्टी तुम्हाला सांगितल्या, ते यासाठी की माझ्यामध्ये तुम्हाला शांती मिळावी. या जगात तुम्हाला त्रास सहन करावा लागेल. परंतु धीर धरा! कारण मी जगावर विजय मिळविला आहे."
"मी या सर्वगोष्टी तुम्हाला सांगितल्या, ते यासाठी की माझ्यामध्ये तुम्हाला शांती मिळावी. या जगात तुम्हाला त्रास सहन करावा लागेल. परंतु धीर धरा! कारण मी जगावर विजय मिळविला आहे."
कारण प्रत्येकजण जे परमेश्वरापासून जन्मले आहेत त्यांनी या जगावर मात केली आहे. आमच्या विश्वासाच्याद्वारे आम्ही या जगावर मात करून विजय मिळविला आहे.
कारण प्रत्येकजण जे परमेश्वरापासून जन्मले आहेत त्यांनी या जगावर मात केली आहे. आमच्या विश्वासाच्याद्वारे आम्ही या जगावर मात करून विजय मिळविला आहे.
जगावर मात करणारे असे ते कोण आहेत? फक्त तेच आहेत जे येशू हेच परमेश्वराचे पुत्र आहेत असा विश्वास धरतात.
प्रिय लेकरांनो, तुम्ही परमेश्वराचे आहात आणि जे ख्रिस्ताचे विरोधक आहेत, त्यांच्याशी झगडून तुम्ही विजय मिळविला आहे, कारण जगात जो आहे, त्याच्यापेक्षा जे तुम्हामध्ये आहेत, ते श्रेष्ठ आहेत.
No mundo sem ser do mundo
Jesus orou: não peço que os tires do mundo, mas que os guardes do mal. Somos enviados ao mundo como embaixadores do Reino.
मी त्यांना तुमचे वचन सांगितले आहे आणि जगाने त्यांचा द्वेष केला, कारण जसा मी जगाचा नाही तसे तेही या जगाचे नाहीत.
तुम्ही त्यांना जगातून काढून घ्यावे यासाठी मी प्रार्थना करीत नाही, परंतु त्यांचे दुष्टापासून रक्षण करावे.
तुम्ही त्यांना जगातून काढून घ्यावे यासाठी मी प्रार्थना करीत नाही, परंतु त्यांचे दुष्टापासून रक्षण करावे. जसा मी या जगाचा नाही तसे तेही या जगाचे नाहीत." सत्याने त्यांना पवित्र करा; तुमचे वचन सत्य आहे. जसे तुम्ही मला जगात पाठविले, तसे मीही त्यांना जगात पाठविले आहे.
"हे नीतिमान पित्या, जग तुम्हाला ओळखत नाही, परंतु मी तुम्हाला ओळखतो आणि तुम्ही मला पाठविले हे त्यांना समजले आहे. मी तुमच्या नाव त्यांच्यासमोर प्रकट केले आहे, मी तुम्हाला प्रकट करीतच राहीन, जेणे करून जी तुमची प्रीती मजवर आहे ती त्यांच्यामध्ये असावी आणि मी त्यांच्यामध्ये असावे."
आता या जगाचा न्यायनिवाडा होण्याची वेळ आहे आणि जगाच्या अधिपतीला बाहेर टाकण्यात येईल.
शांती मी तुम्हासाठी ठेऊन जातो; माझी शांती मी तुम्हाला देतो. ज्याप्रमाणे जग देते त्याप्रमाणे मी तुम्हाला देत नाही. तुमची मने अस्वस्थ होऊ देऊ नका व भिऊ नका.
जग शिष्यांचा द्वेष करते
"जर जगाने तुमचा द्वेष केला, तर हे लक्षात ठेवा की त्यांनी प्रथम माझाही द्वेष केला आहे. जर तुम्ही जगाचे असता, तर स्वतःवर करावी अशी त्यांनी तुमच्यावर प्रीती केली असती. परंतु तुम्ही जगाचे नाही, या जगातून मी तुमची निवड केली आहे. त्या कारणाने जग तुमचा द्वेष करते.
Sal e luz
Vós sois o sal da terra e a luz do mundo. O cristão transforma o ambiente onde está, sem se conformar com os padrões mundanos.
मीठ आणि दिवे
"तुम्ही पृथ्वीचे मीठ आहात, पण मिठाचा खारटपणा गेला तर त्याचा खारटपणा परत कशाने आणू शकता? ते बाहेर टाकून दिले पाहिजे व असे मीठ पायदळी तुडविण्याच्या लायकीचे आहे.
"तुम्ही जगाचा प्रकाश आहात. डोंगरावर वसलेले शहर लपू शकत नाही.
सर्व जगामध्ये साक्ष म्हणून राज्याच्या शुभवार्तेचा प्रचार सर्व राष्ट्रांमध्ये झाला पाहिजे आणि मगच शेवट होईल.
कोणी सर्व जग मिळविले आणि आपला आत्मा गमविला तर त्यातून काय चांगले निष्पन्न होणार? आपल्या आत्म्याच्या मोबदल्यात मनुष्याला दुसरे काही देता येईल का?
कोणी सर्व जग मिळविले आणि आपला आत्मा गमविला तर त्यातून काय चांगले निष्पन्न होणार? आपल्या आत्म्याच्या मोबदल्यात मनुष्याला दुसरे काही देता येईल का?
ज्याच्यामुळे लोकांना अडखळण येतात त्या जगाचा धिक्कार असो! अडखळण येणारच नाही हे अशक्य आहे, परंतु ज्याच्याद्वारे अडखळण येईल, त्याला धिक्कार असो.
ते त्यांना म्हणाले, "सर्व सृष्टीमध्ये जाऊन प्रत्येकाला शुभवार्तेचा प्रचार करा.
ते त्यांना म्हणाले, "सर्व सृष्टीमध्ये जाऊन प्रत्येकाला शुभवार्तेचा प्रचार करा.
कोणी सारे जग मिळविले आणि आपला आत्मा गमावला तर त्यातून चांगले काय निष्पन्न होणार?
Não se conformar
Não vos conformeis com este mundo. A religião pura é guardar-se da corrupção do mundo e viver segundo o Espírito de Deus.
या जगाशी समरूप होऊ नका; तर आपल्या मनाच्या नवीनीकरणाने स्वतःचे रूपांतर होऊ द्या, यासाठी की परमेश्वराची जी उत्तम, ग्रहणीय व परिपूर्ण इच्छा, ती काय आहे, हे तुम्ही समजून घ्यावे.
या जगाशी समरूप होऊ नका; तर आपल्या मनाच्या नवीनीकरणाने स्वतःचे रूपांतर होऊ द्या, यासाठी की परमेश्वराची जी उत्तम, ग्रहणीय व परिपूर्ण इच्छा, ती काय आहे, हे तुम्ही समजून घ्यावे.
कारण जगाच्या उत्पत्तीपासून, परमेश्वराचे अदृश्य गुण व त्यांचे दैवी अस्तित्व व सनातन सामर्थ्य्याचे ज्ञान, त्यांच्या निर्मीतीद्वारे झालेले आहे, म्हणून त्यांना कोणतीही सबब राहिली नाही.
कारण जगाच्या उत्पत्तीपासून, परमेश्वराचे अदृश्य गुण व त्यांचे दैवी अस्तित्व व सनातन सामर्थ्य्याचे ज्ञान, त्यांच्या निर्मीतीद्वारे झालेले आहे, म्हणून त्यांना कोणतीही सबब राहिली नाही.
आपल्याला माहीत आहे की, जे काही नियमशास्त्र सांगते ते नियमाच्या अधीन असणार्यांना सांगते, यासाठी की प्रत्येक तोंड बंद होईल व सर्व जगाला परमेश्वरासमोर हिशोब द्यावा लागेल.
परमेश्वर पित्याच्या दृष्टीने शुद्ध व निर्दोष भक्ती हीच आहे की अनाथ व विधवांची त्यांच्या दुःखात काळजी घेणे आणि जगाच्या मलिनतेपासून स्वतःला अलिप्त राखणे.
परमेश्वर पित्याच्या दृष्टीने शुद्ध व निर्दोष भक्ती हीच आहे की अनाथ व विधवांची त्यांच्या दुःखात काळजी घेणे आणि जगाच्या मलिनतेपासून स्वतःला अलिप्त राखणे.
कारण आता सर्वांना तारण देणारी परमेश्वराची कृपा प्रकट झाली आहे. ती कृपा आपल्याला असे शिकविते की, आम्ही अभक्ती व ऐहिक वासनांना "नाही" म्हणून, आताच्या युगात आत्मसंयमाने, नीतीने व सुभक्तीने जगावे;
A batalha espiritual
A nossa luta não é contra carne e sangue. Os poderes do mundo são reais, mas o que está em nós é maior que o que está no mundo.
कारण आपले युद्ध मांस आणि रक्त यांच्याविरुद्ध नाही, तर सत्ताधारी, अधिपतींविरुद्ध, अंधकाराच्या शक्तीविरुद्ध, आणि आकाशमंडळातील दुष्ट आत्मे यांच्याविरुद्ध आहे.
हे लक्षात असू द्या की पोकळ व फसवे तत्वज्ञान जे ख्रिस्तावर नव्हे तर मानवी परंपरा आणि ऐहिक तत्वांवर आधारित आहे, याद्वारे कोणी तुम्हाला बंधनात पाडू नये म्हणून जपा.
आम्ही या जगामध्ये राहतो तरीपण ऐहिक लोक जसे युद्ध करतात तसे आम्ही करीत नाही.
आपल्याला जगाचा आत्मा मिळाला नाही, परंतु जो आत्मा परमेश्वरापासून आहे तो मिळाला आहे, यासाठी की परमेश्वराने आपल्याला जे विनामूल्य दिले आहे, ते आपण समजून घ्यावे.
मग ज्ञानी लोक कुठे आहेत? नियमशास्त्र शिक्षक कुठे आहेत? या युगाचे तत्वज्ञानी कुठे आहेत? जे मूर्ख आहेत त्यांना परमेश्वराने जगाचे ज्ञान असे केले नाही का? कारण परमेश्वराच्या ज्ञानामध्ये असतानाही जगाला त्याच्या ज्ञानाद्वारे परमेश्वराला ओळखता आले नाही, जो प्रचार मुर्खपणाद्वारे केला होता त्यावर विश्वास ठेवणार्या सर्वांचे परमेश्वराने आनंदाने तारण केले.
तरी जगाच्या दृष्टीने जे सुज्ञ आहेत अशांना लाजविण्याकरिता परमेश्वराने मूर्खपणाच्या गोष्टी निवडल्या; आणि सशक्तांना लाजविण्याकरिता त्यांनी जगातील दुर्बल गोष्टी निवडल्या.
परमेश्वराने जगातील धिक्कारलेले, अकुलीन यांना निवडले, जेणे करून त्यांना शून्यवत करावे. आणि म्हणूनच परमेश्वरासमोर कोणत्याही मनुष्याने बढाई मारू नये.
तुम्ही स्वतःची फसवणूक करून घेऊ नका. जर तुमच्यापैकी कोणी या युगाच्या रीतीप्रमाणे स्वतःला ज्ञानी समजत असेल, तर ज्ञानी होण्यासाठी त्याला "मूर्ख" व्हावे लागेल,
कारण आपण जगात काही आणले नाही आणि आपण जाताना बरोबर काहीही घेऊन जाणार नाही. म्हणून आपल्याजवळ पुरेसे अन्नवस्त्र असले की त्यामध्ये आपण तृप्त असावे.
कारण आपण जगात काही आणले नाही आणि आपण जाताना बरोबर काहीही घेऊन जाणार नाही. म्हणून आपल्याजवळ पुरेसे अन्नवस्त्र असले की त्यामध्ये आपण तृप्त असावे.
Pertencemos a Deus
Do Senhor é a terra e tudo o que nela existe. Vivemos neste mundo como peregrinos, desejando a pátria celestial.
पृथ्वी व तिच्यातील सर्वकाही याहवेहचे आहे.
जग आणि त्यात राहणारे सारे त्यांचेच आहेत.
कारण त्यांनीच तिचा पाया महासागरांवर घातला,
आणि त्यांनीच तिला जलप्रवाहांवर स्थिर केले.
स्वर्गाचे तुम्ही स्वामी आहात व पृथ्वीही तुमचीच आहे;
कारण तुम्हीच ते आणि त्यामधील सगळे काही प्रस्थापित केले आहे.
तुमचा चांगुलपणा किती विपुल आहे,
जो तुम्ही तुमच्या भय धरणार्यांसाठी राखून ठेवला आहे,
आणि जे लोक तुमच्या ठायी आश्रय घेतात
त्यांच्यावर त्याचा सर्वांसमक्ष वर्षाव करता.
याहवेह सिंहासनावर सदासर्वकाळ विराजमान आहेत;
न्यायनिवाडा करण्याकरिता त्यांनी आपले सिंहासन स्थापिले आहे.
ते नीतिमत्तेने जगावर राज्य करतात
आणि समानतेने लोकांना रास्त न्याय देतात.
जो खरा प्रकाश प्रत्येकाला प्रकाश देतो तो जगात येणार होता. तो जगात होता आणि जगाची निर्मिती त्यांच्याद्वारे झाली, तरी जगाने त्यांना ओळखले नाही.
तो जगात होता आणि जगाची निर्मिती त्यांच्याद्वारे झाली, तरी जगाने त्यांना ओळखले नाही.
येशूंच्या साक्षीवरून वाद
येशू पुन्हा लोकांशी बोलले आणि म्हणाले, "मी जगाचा प्रकाश आहे. जो कोणी माझ्यामागे येतो तो कधीही अंधारात चालणार नाही, परंतु त्याच्याजवळ जीवनाचा प्रकाश राहील."
माझी मेंढरे माझी वाणी ऐकतात; मी त्यांना ओळखतो आणि ती माझ्यामागे येतात. मी त्यांना सार्वकालिक जीवन देतो आणि त्यांचा कधीही नाश होणार नाही; कोणीही त्यांना माझ्या हातातून हिरावून घेणार नाही.
परंतु खरी गोष्ट सांगतो की, माझे जाणे हे तुमच्या हितासाठीच आहे. मी जर गेलो नाही, तर कैवारी तुमच्याकडे येणार नाही; पण मी जर गेलो तर मी त्याला तुमच्याकडे पाठवेन. जेव्हा तो येईल, तेव्हा पापाविषयी, नीतिमत्त्वाविषयी व न्यायनिवाड्या विषयी जग कशी चूक करत आहे हे तो सिद्ध करेल. पापाविषयी, कारण जगातले लोक मजवर विश्वास ठेवीत नाहीत; नीतिमत्त्वाविषयी, कारण मी पित्याकडे जात आहे आणि तुम्ही मला यापुढे पाहणार नाही; न्यायनिवाड्या विषयी, कारण या जगाच्या अधिपतीला दोषी ठरविण्यात आले आहे.
याद्वारे त्यांनी आपल्याला त्यांची अतिमहान आणि मोलवान अभिवचने दिली आहेत, यासाठी की त्याद्वारे त्यांच्या दैवीस्वभावात आपण सहभागी व्हावे व जगाच्या भ्रष्टतेतून निर्माण होणार्या वाईट वासनेपासून आपली सुटका व्हावी.
सर्वात प्रथम तुम्ही हे समजून घ्या की, शेवटच्या दिवसात थट्टा करणारे येतील, थट्टा करतील आणि स्वतःच्या वाईट वासनांच्या मागे लागतील. ते म्हणतील, "त्यांच्या येण्याचे दिलेले ‘येत आहे’ हे वचन आता कुठे आहे? आमचे पूर्वज मरण पावले, तरी सर्वकाही उत्पत्तीच्या प्रारंभापासून होते तसेच चालू आहे." परंतु ते बुद्धिपुरस्सर हे विसरतात की, फार पूर्वी परमेश्वराच्या शब्दाने आकाशमंडळ अस्तित्वात आले आणि पृथ्वी पाण्यातून व पाण्याद्वारे घडविली गेली. याच पाण्यामुळे त्यावेळेच्या जगाचा महाप्रलयाने नाश झाला होता. आता अस्तित्वात असलेले आकाश व पृथ्वी ही त्याच परमेश्वराच्या शब्दाने अग्नीत नष्ट करण्यासाठी राखलेली आहेत, अनीतिमान लोकांच्या न्यायाच्या दिवसासाठी आणि नाशासाठी ती राखून ठेवलेली आहेत.
कारण दैवी दुःखाने पश्चात्ताप व त्याचा परिणाम तारण, परंतु ऐहिक दुःखाने मरण येते.
मी जगाला त्याच्या दुष्टाईबद्दल
दुष्टांना त्यांच्या पापांबद्दल शिक्षा करेन.
मी गर्विष्ठांचा अहंकार नाहीसा करेन
आणि निर्दयी अभिमानींना मी लीन करेन.
म्हणून प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो जगाने तुमचा द्वेष केला, तर आश्चर्य करू नका.
आपल्याला हे माहीत आहे की, आपण परमेश्वराची लेकरे आहोत आणि संपूर्ण जग त्या सैतानाच्या नियंत्रणाखाली आहे.
पिढ्या येतात आणि पिढ्या जातात,
परंतु पृथ्वी सर्वकाळ अस्तित्वात राहते.
सूर्य उगवतो आणि अस्त पावतो,
आणि आपल्या उगवतीच्या स्थानाकडे घाईने परत जातो.
वारा दक्षिणेकडे वाहतो
आणि उत्तरेकडे वळतो;
तो गोल गोल भ्रमण करीत
आपल्या ठिकाणी परत जातो.
सर्व प्रवाह समुद्रास मिळतात,
तरीही समुद्र कधी भरलेला नाही.
नद्या पुन्हा त्या स्थानाकडून वाहू लागतात,
जिथून त्यांचा उगम होतो,
आकाश व पृथ्वी नाहीशी होतील, पण माझी वचने नाहीशी होणार नाहीत.
येशू ख्रिस्त काल, आज आणि युगानुयुग सारखेच आहेत.
हे ऐकताच येशू याईराला म्हणाले, "भिऊ नकोस, फक्त विश्वास ठेव आणि ती बरी होईल."
कारण जर एका मनुष्याच्या अपराधामुळे, त्याच मनुष्याच्या द्वारे मरणाने राज्य केले, तर ज्यांना कृपेची व नीतिमत्वाची विपुल दाने मिळाली आहेत, ते येशू ख्रिस्त जे एक मानव आहेत, त्यांच्याद्वारे जीवनात किती विशेषकरून राज्य करतील!
तो कपटाचा उपयोग समृद्ध होण्यास करेल आणि तो स्वतःला श्रेष्ठ समजेल. जेव्हा त्यांना सुरक्षित वाटेल तेव्हा तो अनेकांचा नाश करेल आणि राजपुत्रांच्या राजपुत्राच्या विरोधात उभा राहील. तरीही तो नष्ट होईल, परंतु मनुष्याच्या सामर्थ्याने नाही.