Namoro e sexo
Namoro e sexo são temas que a Bíblia trata com clareza e sem tabus. Deus criou o sexo como bênção dentro do casamento e nos chama à pureza fora dele.
Pureza sexual
A vontade de Deus é a santificação. Cada um saiba controlar seu próprio corpo em santidade e honra, não na paixão do desejo.
कारण देवाची इच्छा ही आहे की, तुमचे पवित्रीकरण व्हावे, म्हणजे तुम्ही जारकर्मापासून दूर रहावे आणि तुमच्यातील प्रत्येकाला समजावे की, ज्याने त्याने आपल्या देहाला पवित्रतेने व आदरबुद्धीने आपल्या स्वाधीन कसे करून घ्यावे. देवाला न ओळखऱ्या परराष्ट्रीयांप्रमाणे वासनेच्या लोभाने करू नये.
अन्न पोटासाठी आहे आणि पोट अन्नासाठी आहे पण देव त्या दोघांचाही नाश करील. पण व्यभिचारासाठी शरीर नाही, तर शरीर प्रभूसाठी आहे आणि शरीरासाठी प्रभू आहे.
आणि ज्या प्रत्येकाने ही आशा ख्रिस्तावर ठेवली आहे, जसा ख्रिस्त शुद्ध आहे, तसा तो आपणाला शुद्ध करतो.
Arrependimento e restauração
Bem-aventurado aquele cujo pecado é perdoado. Deus restaura os que se arrependem e cria neles um coração limpo e renovado.
क्षमेची थोरवी
ज्याच्या अपराधांना क्षमा केली गेली आहे, ज्याचे अपराध झाकले गेले आहेत
ते आशीर्वादित आहेस.
परमेश्वर ज्याच्या ठायी काही अपराध गणत नाही, आणि ज्याच्या आत्म्यात कपट नाही तो सुखी आहे.
मी गप्प राहिलो, तेव्हा पूर्ण दिवस माझ्या,
ओरडण्याने माझी हाडे जर्जर झाली.
कारण रात्रंदिवस तुझा हात माझ्यावर भारी होता.
उन्हाळ्यात उष्णतेमुळे माझी शक्ती सुकून गेली आहे.
तेव्हा मी परमेश्वरासमोर माझे अपराध कबूल केले,
आणि मी माझा अपराध लपवला नाही,
मी म्हणालो, परमेश्वरासमोर मी आपले पाप कबूल करीन,
आणि तू मला माझ्या सर्व अपराधांबद्दल क्षमा केलीस.
याच कारणास्तव प्रत्येक देवभक्त तू पावशील तेव्हा तुझी प्रार्थना करो.
संकटे जेव्हा महापुरासारखी येतात तेव्हा ती तुझ्या भक्तांपर्यंत नक्कीच जाणार नाहीत.
देवा माझे अपराध धुऊन टाक,
आणि मला माझ्या पापांपासून शुद्ध कर.
कारण माझे अपराध मला माहित आहेत.
आणि माझी पातके नित्य माझ्यासमोर आहेत.
तुझ्याविरूद्ध, फक्त तुझ्याविरूद्ध मी पाप केले आहे,
आणि तुझ्या दृष्टीने जे वाईट ते मी केले आहे.
जेव्हा तू बोलतोस तर तू सत्य बोलतो.
तू न्याय करतो तेव्हा योग्य करतो.
मला शुध्द करण्यासाठी तू एजोब वनस्पती वापर,
मी शुद्ध होईन, मला धुऊन शुद्ध कर आणि मी बर्फापेक्षा शुद्ध होईन.
आनंद व हर्ष मला ऐकू दे,
म्हणजे तू मोडलेली माझी हाडे हर्ष करतील.
माझ्या पापांकडे बघू नकोस,
माझ्या सर्व अपराधांचे डाग पुसून टाक.
देवा, माझ्याठायी पवित्र हृदय निर्माण कर.
आणि माझ्या मध्ये स्थीर असा आत्मा पुन्हा घाल.
तुझ्या उपस्थितीतून मला दूर लोटू नकोस,
आणि तुझा पवित्र आत्मा माझ्यातून काढून घेऊ नकोस.
तू केलेल्या तारणाचा आनंद मला पुन्हा होऊ दे,
आणि उत्सुक आत्म्याने मला सावरून धर.