Orgulho
O orgulho é um dos pecados mais condenados na Bíblia. Deus resiste aos soberbos, mas dá graça aos humildes. A humildade é o caminho da honra verdadeira.
Deus resiste ao soberbo
A soberba precede a ruína e o orgulho antecede a queda. Deus abomina o coração altivo e promete humilhar quem se exalta.
नाशापूर्वी गर्व येतो,
आणि मनाचा ताठा अधःपाताचे मूळ आहे.
प्रत्येक गर्विष्ठ मनाच्या मनुष्याचा परमेश्वरास वीट आहे,
जरी ते हातात हात घालून उभे राहिले, तरी त्यांना शिक्षा झाल्यावाचून राहणार नाही.
मनुष्यास एक मार्ग सरळ दिसतो,
पण त्याचा शेवट मृत्यूमार्गाकडे आहे.
परमेश्वराचे भय म्हणजे वाईटाचा द्वेष करणे आहे;
मी गर्व, अभिमान, वाईट मार्ग
व कुटिल वाणी यांचा मी द्वेष करते.
जेव्हा गर्व येतो नंतर अप्रतिष्ठा येते,
पण विनम्रते बरोबर ज्ञान येते.
जेव्हा गर्व येतो नंतर अप्रतिष्ठा येते,
पण विनम्रते बरोबर ज्ञान येते.
गर्व मनुष्यास खाली आणतो,
पण जो कोणी विनम्र आत्म्याचा असतो त्याचा आदर होतो.
गर्व मनुष्यास खाली आणतो,
पण जो कोणी विनम्र आत्म्याचा असतो त्याचा आदर होतो.
मनुष्याच्या नाशापूर्वी त्याचे अंतःकरण गर्विष्ठ असते,
पण गौरवापूर्वी विनम्रता येते.
मनुष्याच्या नाशापूर्वी त्याचे अंतःकरण गर्विष्ठ असते,
पण गौरवापूर्वी विनम्रता येते.
परमेश्वर गर्विष्ठांची मालमत्ता फाडून काढेल,
परंतु तो विधवेच्या मालमत्तेचे रक्षण करतो.
Humildade como caminho
Humilhai-vos diante do Senhor e Ele vos exaltará. A grandeza no Reino vem pelo serviço humilde, não pela autopromoção.
पण तो अधिक कृपा करतो, म्हणून शास्त्रलेख असे म्हणतो की, "देव गर्विष्ठांना विरोध करतो, पण लीनांवर कृपा करतो."
परमेश्वरासमोर नम्र व्हा, म्हणजे तो तुम्हास उच्च करील.
दीन असलेल्या बंधूने, आपल्या उच्चपणाविषयी अभिमान बाळगावा. आणि श्रीमंत बंधूने आपल्या दीन स्थितीविषयी अभिमान बाळगावा कारण तो एखाद्या गवताच्या फुलासारखा नाहीसा होईल.
तसेच तरुणांनो, तुम्ही वडिलांच्या अधीन रहा आणि तसेच तुम्ही सगळे जण एकमेकांची सेवा करण्यास नम्रतारूप वस्त्र घेऊन कमरेस गुंडाळा; कारण देव गर्विष्ठांना विरोध करतो पण लीनांना कृपा पुरवतो.
सर्वसामान्य बोध
म्हणून देवाच्या पराक्रमी हाताखाली लीन व्हा ह्यासाठी की त्याने तुम्हास योग्यवेळी उंच करावे. तुम्ही आपली सर्व चिंता त्याच्यावर टाका, कारण तो तुमची काळजी करतो.
कारण जो कोणी स्वतःला उंच करतो तो नमवला जाईल व जो स्वतःला नमवतो तो उंच केला जाईल."
नम्रतेप्रीत्यर्थ विनंती
आणि तुम्ही विरोधाने किंवा पोकळ अभिमानाने काही करू नका, पण मनाच्या लीनतेने आपल्यापेक्षा एकमेकांना मोठे मानावे. तुम्ही कोणीही आपलेच हित पाहू नका, तर दुसर्यांचेहि पाहा.
प्रभू येशूच्या नम्रतेचे व त्यागाचे उदाहरण
अशी जी चित्तवृत्ती ख्रिस्त येशूच्या ठायी होती ती तुमच्याठायीही असो.
Os perigos do orgulho
O orgulho cega, gera contendas e afasta de Deus. A Escritura adverte contra a soberba da vida e a vã glória mundana.
कारण जगात जे सर्व आहे ते, म्हणजे देहाची वासना, डोळ्यांची वासना व संसाराविषयीची फुशारकी ही पित्यापासून नाहीत, तर जगापासून आहेत.
म्हणून मी खंबीरपणे उभा आहे असा जो विचार करतो त्याने आपण पडू नये म्हणून जपावे.
आणि जरी मी माझे सर्व धन गरजवंताच्या अन्नदानासाठी दिले आणि माझे शरीर होमार्पणासाठी दिले पण जर माझ्याठायी प्रीती नसली तर मला काही लाभ नाही.
कारण जगातील देवाने दीन, तुच्छ मानलेले, जे "नगण्य" त्यांना निवडले. यासाठी की जे "काहीतरी" आहेत त्यांना नगण्य करावे. यासाठी की कोणाही मनुष्याने देवासमोर बढाई मारू नये.
पवित्र शास्त्र सांगते,
"पण जो कोणी अभिमान मिरवतो त्याने प्रभूविषयी अभिमान मिरवावा." कारण स्वतःची प्रशंसा करणारा स्वीकृत नाही पण प्रभू ज्याची प्रशंसा करतो तोच स्वीकृत आहे.
आणखी तो म्हणाला, "जे मनुष्याच्या अंतःकरणातून बाहेर पडते ते मनुष्यास अपवित्र करते. कारण आतून म्हणजे अंतःकरणातून वाईट विचार बाहेर पडतात. जारकर्म, चोरी, खून, व्यभिचार, लोभ, वाईटपणा, कपट, असभ्यता, मत्सर, शिव्यागाळी, अहंकार आणि मूर्खपणा, या सर्व वाईट गोष्टी आतून बाहेर पडतात आणि मनुष्यास अपवित्र करतात."
गर्वामुळे भांडण मात्र उत्पन्न होतात,
पण जो चांगला सल्ला ऐकतो त्याच्याजवळ ज्ञान असते.
परमेश्वराचे भय नम्रता आणि संपत्ती, मान
आणि जीवन आणते.
या युगातील श्रीमंतास आज्ञा कर की, गर्विष्ठ होऊ नका. पैसा जो चंचल आहे त्यावर त्यांनी आशा ठेवू नये, परंतु देव जो विपुलपणे उपभोगासाठी सर्व पुरवतो त्यावर आशा ठेवावी.
O olhar de Deus
O Senhor não olha como o homem. Ele vê o coração e se agrada dos quebrantados de espírito e dos que tremem diante da sua Palavra.
परंतु परमेश्वराने शमुवेलाला म्हटले, "की त्याच्या स्वरूपाकडे व त्याच्या देहाच्या उंचीकडे पाहू नको कारण मी त्यास नाकारीले आहे. जसे मनुष्य पाहतो तसे परमेश्वर पाहत नाही. कारण की, मनुष्य बाहेरील स्वरूप पाहतो परंतु परमेश्वर हृदय पाहतो."
अति गर्विष्ठपणाने आणखी बढाई मारू नका;
तुमच्या तोंडातून उद्धटपणाचे भाषण न निघो.
कारण परमेश्वर ज्ञानाचा देव आहे;
त्याच्याकडून कृत्ये तोलली जातात.
"सर्व गोष्टी माझ्या हाताने निर्माण केल्या, या प्रकारे गोष्टी घडल्या आहेत." परमेश्वर असे म्हणतो.
"पण जो दीन व अनुतापी आत्म्याचा आहे, आणि माझ्या वचनाने थरथर कापतो अशा मनुष्यास मी मान्य करतो."
आता मी, नबुखद्नेस्सर, स्वर्गीय राजास गौरव देवून त्याची खूप स्तुती करतो, कारण त्याची सर्व कामे सभ्यतेची आणि त्याचे मार्ग न्यायाचे आहेत. जे गर्वाने चालतात त्यास तो नम्र करतो.
इस्राएलच्या राजाचे त्यास उत्तर गेले. त्यामध्ये म्हटले होते. "बेन-हदादला जाऊन सांगा की, जो चिलखत चढवतो त्याने, जो ते उतरवण्याइतक्या दीर्घ काळापर्यंत जगतो त्याने इतकी फुशारकी मारू नये."
एकमेकांशी एकमनाचे व्हा, उंच गोष्टींवर मन ठेवू नका, पण दीन अवस्थेत असलेल्यांकडे ओढले जा. स्वतःला समजते तेवढ्यात शहाणे होऊ नका.
पवित्र आत्म्याच्याद्वारे निष्पन्न होणारे फळही आहेत प्रीती, आनंद, शांती, सहनशीलता, ममता, चांगुलपणा, विश्वासूपणा, सौम्यता, इंद्रियदमन हे आहे; अशांविरूद्ध नियमशास्त्र नाही.