Orgulho
O orgulho é um dos pecados mais condenados na Bíblia. Deus resiste aos soberbos, mas dá graça aos humildes. A humildade é o caminho da honra verdadeira.
Deus resiste ao soberbo
A soberba precede a ruína e o orgulho antecede a queda. Deus abomina o coração altivo e promete humilhar quem se exalta.
नाशापूर्वी गर्व
आणि अधःपातापूर्वी मग्रूरी येते.
याहवेह गर्विष्ठ अंतःकरण असलेल्यांचा सर्वांचा तिरस्कार करतात.
याची खात्री असू द्या: त्यांना शिक्षा झाल्यावाचून राहणार नाही.
एक मार्ग असा आहे जो योग्य वाटतो;
परंतु तो शेवटी मृत्यूकडे नेतो.
याहवेहचे भय धरणे म्हणजे वाईटाचा द्वेष करणे होय.
गर्विष्ठपणा आणि उद्धटपणा,
वाईट आचरण आणि विकृत भाषण यांचा मी तिरस्कार करते.
जेव्हा गर्विष्ठपणा येतो, तेव्हा अप्रतिष्ठा येते,
परंतु विनम्रपणामुळे सुज्ञता प्राप्त होते.
जेव्हा गर्विष्ठपणा येतो, तेव्हा अप्रतिष्ठा येते,
परंतु विनम्रपणामुळे सुज्ञता प्राप्त होते.
अहंकार व्यक्तीच्या अधःपतनाचे कारण ठरतो;
परंतु जो आत्म्याने नम्र आहे, त्याला सन्मान मिळतो.
अहंकार व्यक्तीच्या अधःपतनाचे कारण ठरतो;
परंतु जो आत्म्याने नम्र आहे, त्याला सन्मान मिळतो.
मनुष्याचा नाश होण्याआधी त्याचे हृदय गर्वाने भरते,
परंतु सन्मान मिळण्याआधी मनुष्यास नम्रता येते.
मनुष्याचा नाश होण्याआधी त्याचे हृदय गर्वाने भरते,
परंतु सन्मान मिळण्याआधी मनुष्यास नम्रता येते.
गर्विष्ठांच्या घराचा याहवेह नाश करतात,
परंतु ते विधवांची दगडी सीमा सुरक्षित ठेवतात.
Humildade como caminho
Humilhai-vos diante do Senhor e Ele vos exaltará. A grandeza no Reino vem pelo serviço humilde, não pela autopromoção.
परंतु ते आपल्याला अधिक कृपा देतात, यामुळे शास्त्रवचन सांगते,
"परमेश्वर गर्विष्ठांचा विरोध करतात
परंतु नम्रजनावर कृपा करतात."
प्रभूसमोर तुम्ही स्वतःला नम्र करा आणि ते तुम्हाला उंच करतील.
दीन परिस्थितीतील विश्वासू जणांनी आपल्या उच्च पदाबद्दल अभिमान बाळगावा. परंतु जे श्रीमंत आहेत त्यांनी आपल्या दीन अवस्थेबद्दल अभिमान बाळगावा; कारण ते रान फुलांसारखे नाहीसे होतील.
त्याच प्रकारे तुम्ही जे तरुण आहात, तुमच्या वडीलधार्यांच्या अधीन राहा. तुम्ही सर्वजण एकमेकांबरोबर नम्रता परिधान करून राहा, कारण,
"परमेश्वर गर्विष्ठांचा विरोध करतात
परंतु नम्रजनावर कृपा करतात."
परमेश्वराच्या पराक्रमी हाताखाली स्वतःला नम्र करा, म्हणजे ते तुम्हाला योग्य वेळी उंच करतील. तुमच्या सर्व चिंता त्याच्यावर टाका, कारण ते तुमची काळजी घेतात.
कारण जे सर्व स्वतःला उच्च करतात, त्यांना नम्र केले जाईल आणि जे स्वतःला नम्र करतात, ते उंच केले जातील."
स्वार्थी महत्त्वाकांक्षा, किंवा बढाई मारण्याच्या हेतूंनी तुम्ही काहीही करू नये, तर प्रत्येकाने नम्रतेने इतरांना आपल्यापेक्षा अधिक श्रेष्ठ मानावे. तुम्ही केवळ स्वतःचेच हित नव्हे, तर इतरांचेही हित पाहावे.
ख्रिस्त येशूंमध्ये जी मनोवृत्ती होती, तीच वृत्ती तुम्ही एकमेकांच्या संबंधात बाळगा:
Os perigos do orgulho
O orgulho cega, gera contendas e afasta de Deus. A Escritura adverte contra a soberba da vida e a vã glória mundana.
कारण जगात जे सर्व आहे ते म्हणजे, देहाची वासना, डोळ्याची वासना व जीवनाचा गर्व या सर्वगोष्टी पित्यापासून नाहीत तर जगापासून आहेत.
म्हणून जर तुम्हाला वाटत असेल की तुम्ही स्थिर उभे आहात, तर आपण पडू नये म्हणून खबरदारी घ्या.
माझ्याजवळ जी संपत्ती आहे ती सर्व मी गरिबांना दिली आणि माझे शरीर कष्ट सहन करण्यासाठी अर्पण केले, परंतु माझ्याठायी प्रीती नसली, तर मला काही लाभ नाही.
परमेश्वराने जगातील धिक्कारलेले, अकुलीन यांना निवडले, जेणे करून त्यांना शून्यवत करावे. आणि म्हणूनच परमेश्वरासमोर कोणत्याही मनुष्याने बढाई मारू नये.
"जो प्रौढी मिरवतो त्याने प्रभूमध्ये प्रौढी मिरवावी." कोणी स्वतःची प्रशंसा करतो तर त्यास मान्यता मिळेल असे नाही, परंतु ज्याची प्रशंसा प्रभू करतात त्यास मान्यता मिळेल.
ते पुढे म्हणाले, "मनुष्यामधून जे बाहेर पडते तेच मनुष्याला अशुद्ध करते. कारण आतून, मनुष्याच्या हृदयातून, दुष्ट विचार, खून, जारकर्म, व्यभिचार, चोरी, लैंगिक पापे, बदफैलीपणा, दुष्कृत्ये, फसवेगिरी, कामातुरपणा, मत्सर, निंदा, गर्विष्ठपणा आणि मूर्खपणा या सर्व अमंगळ गोष्टी आतून निघतात आणि मनुष्याला अशुद्ध करतात."
जिथे भांडण आहे, तिथे गर्व उपस्थित आहे,
परंतु जे सल्ला स्वीकारतात त्यांच्यामध्ये सुज्ञता दिसून येते.
याहवेहचे भय ही नम्रता आहे;
त्याचे वेतन संपत्ती, सन्मान व दीर्घायुष्य आहे.
जगातील श्रीमंतांना निक्षून सांग की त्यांनी गर्विष्ठ आणि उद्धट होऊ नये; त्या धनावर विसंबून राहू नये. तर परमेश्वर जे आपल्या उपभोगासाठी सर्वकाही विपुल देतात, त्याचा अभिमान बाळगा व त्यांच्यावर भरवसा ठेवा.
O olhar de Deus
O Senhor não olha como o homem. Ele vê o coração e se agrada dos quebrantados de espírito e dos que tremem diante da sua Palavra.
परंतु याहवेह शमुवेलला म्हणाले, "त्याचे रूप किंवा त्याची उंची यानुसार जाऊ नकोस, कारण मी त्याला नाकारले आहे. मनुष्य पाहतात त्याप्रमाणे याहवेह पाहत नाहीत. मनुष्य बाहेरील रूप पाहतात, परंतु याहवेह हृदय पारखतात."
"फार गर्वाने बोलत राहू नका,
किंवा तुमच्या मुखाला उद्धट बोलणे करू देऊ नका,
कारण ते याहवेह परमेश्वर आहेत जे सर्वज्ञानी आहेत,
आणि त्यांच्याद्वारे कृत्ये तोलली जातात.
माझ्या हाताने हे सर्व घडवले
आणि म्हणून ते अस्तित्वात आले नाहीत काय?"
अशी याहवेह घोषणा करतात.
"ज्यांच्यावर मी प्रसन्न होतो ते असे असतात:
जे लीन व भग्न आत्म्याचे आहेत,
आणि जे माझ्या वचनांनी कंपित होतात.
आता मी, नबुखद्नेस्सर, स्वर्गाच्या राजाधिराजाची स्तुती, गौरव व सन्मान करतो, कारण ते जे काही करतात ते योग्य करतात आणि त्यांचे सर्व मार्ग न्याय्य आहेत. आणि जे गर्वाने चालतात त्यांना ते नम्र करण्यास समर्थ आहेत.
इस्राएलच्या राजाने उत्तर दिले, "त्याला सांगा: ‘युद्धासाठी शस्त्रधारण करणार्याने शस्त्र उतरविणार्याप्रमाणे फुशारकी मारू नये.’ "
एकमेकांशी ऐक्याने राहा. गर्विष्ठ होऊ नका. तर अगदी सामान्य लोकांच्या सहवासात आनंद माना, अहंकार बाळगू नका.
परंतु आत्म्याचे फळ प्रीती, आनंद, शांती, सहनशीलता, दयाळूपणा, चांगुलपणा, विश्वासूपणा, सौम्यता व आत्मसंयमन; अशांविरुद्ध नियमशास्त्र नाही.