Ouvir
Ouvir é uma disciplina espiritual essencial. A Bíblia exorta: 'Quem tem ouvidos, ouça.' A fé vem pelo ouvir, e ouvir é mais que escutar — é obedecer e agir.
A fé vem pelo ouvir
Sem ouvir a Palavra, não há fé. A pregação do evangelho gera fé nos corações de quem ouve com disposição e humildade.
तर मग ऐकण्यामुळे विश्वास होतो आणि ख्रिस्ताच्या वचनामुळे ऐकणे होते.
तर मग ऐकण्यामुळे विश्वास होतो आणि ख्रिस्ताच्या वचनामुळे ऐकणे होते.
मग ज्याच्यावर त्यांनी विश्वास ठेवला नाही त्याचा ते कसा धावा करतील? आणि ज्याच्याविषयी त्यांनी ऐकले नाही त्याच्यावर ते कसा विश्वास ठेवतील? आणि घोषणा करणार्याशिवाय ते कसे ऐकतील?
ज्याला कान आहेत तो ऐको."
यशयाचा संदेश त्याच्याविषयी पूर्ण होत आहे, तो असा की,
तुम्ही ऐकाल तर खरे, परंतु तुम्हास समजणारच नाही,
व पाहाल तर खरे, परंतु तुम्हास दिसणारच नाही;
कारण या लोकांचे अंतःकरण जड झाले आहे,
ते कानानी मंद ऐकतात आणि त्यांनी डोळे मिटून घेतले आहेत;
यासाठी की, त्यांनी डोळ्यांनी पाहू नये,
कानांनी ऐकू नये,
अंतःकरणाने समजून नये
आणि वळू नये
आणि मी त्यांना बरे करू नये.
Ouvir e obedecer
Não basta ouvir — é preciso praticar. Quem ouve a Palavra e a pratica é como o homem sábio que edificou sobre a rocha.
वचनाप्रमाणे आचरण करणारे असा व फक्त ऐकणारेच असू नका तर त्याप्रमाणे करा कारण जर तुम्ही फक्त ऐकता तर तुम्ही स्वतःची फसवणूक करता.
वचनाप्रमाणे आचरण करणारे असा व फक्त ऐकणारेच असू नका तर त्याप्रमाणे करा कारण जर तुम्ही फक्त ऐकता तर तुम्ही स्वतःची फसवणूक करता.
माझ्या प्रिय बंधूंनो, हे लक्षात ठेवा प्रत्येक मनुष्य ऐकण्यास तत्पर असावा, बोलण्यात सावकाश असावा आणि रागास मंद असावा.
माझ्या प्रिय बंधूंनो, हे लक्षात ठेवा प्रत्येक मनुष्य ऐकण्यास तत्पर असावा, बोलण्यात सावकाश असावा आणि रागास मंद असावा. कारण मनुष्याच्या रागामुळे देवाचे नीतिमत्त्वाचे कार्य घडत नाही.
जो कोणी माझ्या सांगण्याप्रमाणे आचारण करतो तो शहाण्या मनुष्यासारखा आहे, अशा शहाण्या मनुष्याने आपले घर खडकावर बांधले.
जो कोणी माझ्या सांगण्याप्रमाणे आचारण करतो तो शहाण्या मनुष्यासारखा आहे, अशा शहाण्या मनुष्याने आपले घर खडकावर बांधले. मग जोराचा पाऊस झाला आणि पूर आला. जोराचा वारा आला. वादळात घर सापडले, पण ते पडले नाही कारण त्याचा पाया खडकावर बांधला होता. जो कोणी माझीही वचने ऐकून त्याप्रमाणे आचरण करीत नाही तो कोणाएका मूर्ख मनुष्यासारखा आहे, त्याने आपले घर वाळूवर बांधले. मग जोराचा पाऊस आला आणि पूर आला. जोराचा वारा सुटला. वादळवाऱ्यात ते घर सापडले आणि कोसळून पडले."
परंतु येशूंनी उत्तर दिले, "कारण पवित्र शास्त्रात असे लिहिले आहे की,
‘मनुष्य केवळ भाकरीने जगेल असे नाही तर,
देवाच्या मुखातून निघणाऱ्या प्रत्येक वचनाने जगेल.’"
परंतु तो म्हणाला, "जे देवाचे वचन ऐकतात आणि पाळतात तेच खरे धन्य आहेत!"
परंतु तो म्हणाला, "जे देवाचे वचन ऐकतात आणि पाळतात तेच खरे धन्य आहेत!"
माझ्यापासून जे तुम्ही शिकला, जे स्वीकारले व माझे जे ऐकले व पाहिले ते तुम्ही आचरीत राहा आणि शांतीदाता देव तुमच्याबरोबर राहील.
Deus ouve nossas orações
O Senhor ouve os que clamam a Ele de coração sincero. Ele inclina os ouvidos para as nossas súplicas e responde com fidelidade.
मी परमेश्वरावर प्रेम करतो कारण तो
माझी वाणी आणि माझ्या विनंत्या दयेसाठी ऐकतो.
कारण तो माझे ऐकतो,
म्हणून मी जिवंत आहे तोपर्यंत मी त्यास हाक मारीन.
मी संकटात असता, मी परमेश्वरास हाक मारली; मी देवाला माझ्या मदतीसाठी हाक मारली. त्याने त्याच्या पवित्र मंदिरातून माझी वाणी ऐकली.
परमेश्वराची दृष्टी नितीमानांवर आहे,
त्याचे कान त्याच्या आरोळीकडे असतात.
परमेश्वरा, सकाळी तू माझे रडणे ऐकशील,
सकाळी मी माझी विनंती तुझ्याकडे व्यवस्थीत रीतीने मांडीन व अपेक्षेने वाट पाहीन.
आनंद व हर्ष मला ऐकू दे,
म्हणजे तू मोडलेली माझी हाडे हर्ष करतील.
सकाळी मला तुझ्या वात्सल्याचे शब्द ऐकू दे,
कारण मी तुझ्यावर भरवसा ठेवला आहे.
ज्या मार्गाने मी चालावे तो मला दाखव,
कारण मी आपला जीव तुझ्याकडे उंचावतो.
आणि आम्हास देवामध्ये धैर्य आहे की, आपण त्याच्या इच्छेप्रमाणे काही मागितले तर तो आपले ऐकेल.
आणि आपण जे काही मागतो ते तो ऐकतो, हे आपल्याला ठाऊक आहे म्हणून ज्या मागण्या आपण त्याच्याजवळ केल्या आहेत त्या आपल्याला मिळाल्या आहेत हेही आपल्याला ठाऊक आहे.
मग तुम्ही माझा धावा कराल आणि जाऊन माझी प्रार्थना कराल आणि तेव्हा मी तुमचे ऐकेन.
मला हाक मार आणि मी तुला उत्तर देईन. ज्या तुला समजत नाही अशा महान, गहन गोष्टी मी तुला दाखवीन.
पाहा, तारण करवत नाही इतका परमेश्वराचा हात लहान झालेला नाही, आणि ऐकू येत नाही इतका त्याचा कान मंद झाला नाही.
Ouvir a voz de Deus
Jesus disse: 'As minhas ovelhas ouvem a minha voz.' Deus fala através da Palavra, do Espírito e das circunstâncias — cabe a nós ouvir.
माझी मेंढरे माझी वाणी ऐकतात, मी त्यांना ओळखतो आणि ती माझ्यामागे येतात.
मी तुम्हास खरे खरे सांगतो, जो माझे वचन ऐकतो आणि ज्याने मला पाठवले त्याच्यावर विश्वास ठेवतो त्यास सार्वकालिक जीवन प्राप्त झाले आहे आणि त्याच्यावर न्यायाचा प्रसंग येणार नाही; तो मरणातून जीवनात पार गेला आहे.
मी तुम्हास खरे खरे सांगतो की, मरण पावलेले लोक देवाच्या पुत्राचा आवाज ऐकतील व जे ऐकतील ते जिवंत होतील, अशी वेळ येत आहे, किंबहुना आता आलीच आहे.
पाहा, मी दाराजवळ उभा आहे व दरवाजा ठोकीत आहे. जर कोणी माझा आवाज ऐकतो आणि दरवाजा उघडतो, तर मी आत येईन आणि त्याच्याबरोबर भोजन करेन व तोसुध्दा माझ्याबरोबर भोजन करेल.
पाहा, मी दाराजवळ उभा आहे व दरवाजा ठोकीत आहे. जर कोणी माझा आवाज ऐकतो आणि दरवाजा उघडतो, तर मी आत येईन आणि त्याच्याबरोबर भोजन करेन व तोसुध्दा माझ्याबरोबर भोजन करेल.
तेव्हा तुम्ही आपल्या परमेश्वर देवालाच अनुसरा. त्याचे भय बाळगा त्याच्या आज्ञा पाळा. त्याची वाणी ऐका, त्याची सेवा करा आणि त्यालाच बिलगूण राहा.
म्हणून जो तुम्हास देवाचा आत्मा पुरवतो आणि तुमच्यात चमत्कार करतो तो हे जे सर्व करतो ते नियमशास्त्रातील कृत्यांनी करतो की, सुवार्ता ऐकून विश्वास ठेवल्यामुळे ते तो करतो?
Sabedoria no ouvir
Seja pronto para ouvir e tardio para falar. A sabedoria começa com a disposição de ouvir instrução e aceitar correção.
जो कोणी ऐकण्यापूर्वी उत्तर देतो,
त्याचे ते करणे मूर्खपणाचे आणि लज्जास्पद असते.
जो कोणी जे काही चांगले आहे ते शोधतो,
त्यास शिकवीले त्याचे निरीक्षण करतो,
आणि जो परमेश्वरावर विश्वास ठेवतो तो आनंदीत होतो.
माझ्या मुला, तुझ्या वडिलांची आज्ञा पाळ,
आणि तुझ्या आईची शिकवण विसरु नकोस.
जो कोणी शिस्तीचे अनुसरण करतो तो जीवनाच्या मार्गात आहे,
पण जो दोषारोपाला नकार देतो तो चुकीच्या मार्गाने जातो.
जर एखाद्याने आपला कान नियम ऐकण्यापासून दूर फिरवला,
त्याची प्रार्थनासुद्धा वीट आणणारी होईल.
मूर्खाचे गायन ऐकण्यापेक्षा
शहाण्याची निषेध वाणी ऐकणे उत्तम आहे.
सर्व गोष्टी कष्टमय आहेत.
आणि कोणीही त्याचे स्पष्टीकरण करू शकत नाही.
डोळे जे काय पाहतात त्याने त्यांचे समाधान होत नाही,
किंवा जे काय कानाने ऐकतो त्यानेही त्यांची पूर्तता होत नाही.
तरीसुध्दा तुम्ही माझ्याविरूद्ध वागाल व माझ्या आज्ञा पाळण्यास नकार द्याल तर मी तुम्हावर तुमच्या पापांच्या मानाने सातपट अधिक संकटे आणीन.
सेनाधीश परमेश्वर म्हणतो, जर तुम्ही ऐकले नाही, आणि माझ्या नावाला महिमा देण्याचे तुम्ही आपल्या हृदयांत आणले नाही, तर मी तुम्हावर शाप पाठवीन आणि तुमच्या आशीर्वादांना शापीत करीन, खचित मी त्यास आधीच शाप दिला आहे. कारण तू माझ्या आज्ञा आपल्या हृदयात पाळत नाहीस.
पण जेव्हा मी तुझ्याशी बोलेन तेव्हा तुझे तोंड मी उघडीन व परमेश्वर देव असे म्हणतो त्यांना सांग, ज्याला ऐकायचे असेल त्याने ऐकावे ज्याला ऐकावयाचे नसेल त्याने ऐकू नये कारण ते फितुर घराणे आहे.
परमेश्वर म्हणतो,
"पाहा! मी देशात दुष्काळ पाठवीन,
ते दिवस येतच आहेत,
तेव्हा भाकरीचा दुष्काळ नसेल,
पाण्याचा दुष्काळ नसेल,
परंतू परमेश्वराची वचने ऐकण्याचा दुष्काळ असेल."
मध्यरात्रीच्या सुमारास पौल व सीला हे प्रार्थना करीत असता व गाणे गाऊन देवाची स्तुती करीत असता बंदिवान त्यांचे ऐकत होते.
मग यहोशवा इस्राएल लोकांस म्हणाला, "इकडे या! आणि देव परमेश्वर याची वचने ऐका!
म्हणून तुम्ही जे काही अंधारात बोलाल ते उजेडात ऐकले जाईल आणि तुम्ही कोणाच्या कानात जे काही एकांतात सांगाल ते घराच्या छतावरुन घोषित केले जाईल."
जर तुझा भाऊ तुझ्यावर अन्याय करील, तर जा अणि त्यास तुझ्यावर काय अन्याय झाला ते एकांतात सांग. जर त्यांने तुझे ऐकले तर त्यास आपला बंधू म्हणून परत मिळवला आहेस.
जर तुझा भाऊ तुझ्यावर अन्याय करील, तर जा अणि त्यास तुझ्यावर काय अन्याय झाला ते एकांतात सांग. जर त्यांने तुझे ऐकले तर त्यास आपला बंधू म्हणून परत मिळवला आहेस. पण जर तो किंवा ती तुझे ऐकत नसेल तर एकाला किंवा दोघांना तुझ्याबरोबर घे, यासाठी की जे काही झाले त्याविषयी साक्ष द्यायला दोन किंवा तीन जण तेथे असतील, जर तो मनुष्य लोकांचेही ऐकणार नाही तर मंडळीलाही गोष्ट कळव. जर तो मनुष्य मंडळीचेही ऐकणार नाही, तर मग तो तुला परराष्ट्रीय किंवा एखाद्या जकातदारासारखा समज.
परमेश्वराने इस्राएल लोकांसाठी ज्या चांगल्या गोष्टी केल्या त्या ऐकल्यावर आणि मिसराच्या लोकांपासून परमेश्वराने इस्राएल लोकांस स्वतंत्र केले म्हणून इथ्रोला फार आनंद झाला.
शत्रूंना माझा जीव घ्यायचा होता.
मृत्यूच्या लाटा माझ्याभोवती थैमान घालत होत्या.
मृत्युसदनाला नेणाऱ्या पुराच्या लोंढ्यात मी सापडलो होतो.
अधोलोकाचे पाश माझ्या भोवती आवळले होते.
मृत्यूचा सापळा माझ्यासमोर तयार होता.
तेव्हा मी परमेश्वराचा धावा केला. होय,
मी त्यालाच शरण गेलो देव त्याच्या मंदिरात होता त्याने माझा धावा ऐकला.
मदतीसाठी केलेला माझा आक्रोश त्याने ऐकला.