Paciência
A paciência é fruto do Espírito e virtude essencial da vida cristã. Deus é paciente conosco, e nos chama a ser pacientes com os outros e nas provações.
A paciência de Deus
Deus é clemente e tardio em irar-se. Sua paciência revela seu desejo de que todos se arrependam e cheguem ao conhecimento da verdade.
याहवेह कृपावान व करुणामय आहेत,
ते मंदक्रोध व प्रीतीने विपुल आहेत.
कित्येक लोक ज्याला संथपणा म्हणतात, तसे प्रभू आपल्या वचनाविषयी करीत नाहीत, तर ते तुमच्याबरोबर सहनशीलतेने वागतात. कोणाचाही नाश व्हावा, अशी त्यांची इच्छा नाही, तर प्रत्येकाने पश्चात्ताप करावा अशी त्यांची इच्छा आहे.
प्रिय मित्रांनो, एक गोष्ट तुम्ही विसरू नका: प्रभूसाठी एक दिवस हजार वर्षांसारखा आहे आणि हजार वर्षे एका दिवसासारखी आहेत.
तुमची वस्त्रे फाडून नव्हे,
तर तुमचे अंतःकरण फाडा.
याहवेह तुमच्या परमेश्वराकडे परत या,
कारण ते कृपाळू व दयाळू आहेत.
ते मंदक्रोध आणि अधिक प्रीती करणारे आहेत,
आणि ते विपत्तीविषयी अनुताप करतात.
परंतु माझ्यावर दया झाली की, ख्रिस्त येशूंनी माझा उदाहरणादाखल उपयोग करावा आणि माझ्यासारख्या मोठ्या पातक्यांबाबतही परमेश्वराने किती सहनशीलता दाखविली, म्हणजे इतरांनाही विश्वासाने सार्वकालिक जीवन मिळू शकते.
तरीसुद्धा याहवेह तुमच्यावर कृपा करण्यास आतुरलेले असतात;
त्यामुळे तुमच्यावर दया दाखविण्यास ते उभारतील.
कारण याहवेह हे न्यायी परमेश्वर आहेत.
धन्य आहेत ते सर्व जे त्यांची वाट पाहतात!
Esperar com paciência
Os que esperam no Senhor renovam as forças. A paciência produz caráter, e o caráter produz esperança que não decepciona.
याहवेहची प्रतीक्षा कर;
हिंमत बांध, धैर्य धर;
आणि याहवेहचीच प्रतीक्षा कर.
याहवेहसमोर निश्चिंत राहा
व धीराने त्यांची वाट पाहा;
जेव्हा लोकांना त्यांच्या मार्गात यश मिळते,
त्यांच्या दुष्ट योजना सफल होतात, तेव्हा तू संतापू नकोस.
याहवेह, दररोज सकाळी तुम्ही माझी वाणी ऐकता;
सकाळी मी माझ्या प्रार्थना तुम्हाला सादर करतो
व अपेक्षेने तुमची वाट पाहतो.
पण जे अद्यापि प्राप्त झाले नाही त्याबद्दल आशा ठेवतो, तर आपण धीराने वाट पाहतो.
आशेमध्ये हर्षित, संकटात सहनशील आणि प्रार्थनेमध्ये विश्वासू असा.
याहवेह तुमच्यासाठी लढतील; तुम्ही केवळ स्तब्ध राहा."
Paciência nas provações
O amor é paciente. A paciência é marca de maturidade espiritual e nos permite perseverar mesmo quando as circunstâncias são adversas.
प्रीती सहनशील आहे, प्रीती दयाळू आहे. ती कधीही हेवा किंवा मत्सर करीत नाही, कधीही अभिमान बाळगत नाही, गर्व करीत नाही. ती कधीही इतरांचा अपमान करीत नाही, स्वार्थ पाहत नाही किंवा सहज चिडत नाही. ती अयोग्य गोष्टींची कधीही नोंद ठेवीत नाही.
योग्य ते करण्याचा आपल्याला कंटाळा येऊ नये, कारण आपण थकलो नाही तर योग्य वेळी पिकांची कापणी करू.
धीर व प्रोत्साहन देणारा परमेश्वर तुम्हाला एकमेकांबरोबर एकचित्ताने राहण्यास साहाय्य करो. प्रत्येकाने एकमेकांशी ख्रिस्त येशूंच्या ठायी असलेल्या वृत्तीने व विचाराने वागावे,
पूर्ण नम्रतेने आणि सौम्यतेने; सहनशीलतेने, प्रीतीने एकमेकांचे सहन करा.
यास्तव, परमेश्वराचे निवडलेले लोक, पवित्र आणि अतिप्रिय या नात्याने करुणा, दया, लीनता, सौम्यता आणि सहनशीलता ही परिधान करा.
तू वचनाची घोषणा करीत राहा. वेळी अवेळी त्यामध्ये तत्पर राहा. सर्व सहनशीलतेने व शिक्षणाने दोष दाखव, निषेध कर आणि बोध कर.
Perseverança até o fim
Quem perseverar até o fim será salvo. O domínio próprio é maior que a conquista de uma cidade.
परंतु जो शेवटपर्यंत स्थिर राहील त्याचे मात्र तारण होईल.
"यास्तव तुम्ही जागृत राहा, कारण तुमच्या प्रभूच्या आगमनाचा दिवस कोणता, हे तुम्हाला ठाऊक नाही.
योद्धा असण्यापेक्षा शांत स्वभावी असणे बरे,
शहर जिंकून घेणार्यापेक्षा स्वतःवर ताबा ठेवणारा उत्तम.
जो सहनशील आहे, तो मोठा शहाणा आहे;
पण उतावळ्या स्वभावाचा मनुष्य मूर्खता प्रकट करतो.
मी लवकर येत आहे. तुमचा मुकुट कोणी घेऊ नये म्हणून जे तुमच्याजवळ आहे, ते दृढ धरून ठेवा.
त्यांचा क्रोध क्षणभर टिकतो,
पण त्यांची कृपा जन्मभर राहते.
विलाप करणे केवळ रात्रभर राहील,
परंतु प्रातःकाल उगवताच आनंद होईल.