Pais e filhos
A relação entre pais e filhos é uma das mais preciosas na Bíblia. Deus estabeleceu a família como escola de fé, amor e formação de caráter.
Honrar pai e mãe
Honrar os pais é o primeiro mandamento com promessa. Os filhos são chamados a obedecer, respeitar e cuidar de seus pais.
आपल्या बापाचा व आपल्या आईचा मान राख म्हणजे त्यामुळे परमेश्वर तुझा देव जो देश तुला देत आहे त्या देशात तू चिरकाळ राहशील.
पालक आणि मुले
मुलांनो, प्रभूमध्ये आपल्या आई-वडीलांच्या आज्ञा पाळा कारण हे योग्य आहे. "आपल्या वडिलांचा व आईचा मान राख, यासाठी की तुझे सर्वकाही चांगले व्हावे व तुला पृथ्वीवर दीर्घ आयुष्य लाभावे." अभिवचन असलेली हीच पहिली आज्ञा आहे.
मुलांनो, तुम्ही सर्व गोष्टींत आपल्या आई-वडीलांच्या आज्ञा पाळा कारण हे प्रभूला संतोष देणारे आहे.
तू आपल्या जन्मदात्या पित्याचे ऐक,
तुझी आई म्हातारी झाली म्हणून तिचा तिरस्कार करू नको.
जो कोणी आपल्या पित्याला लुटतो, व आईला हाकलून लावतो,
तो मुलगा लाज आणि दोष आणणारा आहे.
जर एखादा मनुष्य आपल्या आईला किंवा वडिलांना शाप देईल,
तर त्याचा दीप अंधारात विझून जाईल.
पण जर एखाद्या विधवेला मुले किंवा नातवंडे असतील तर त्यांनी प्रथम आपल्या घरच्यांशी धार्मिकतेने वागायला व आपल्या वडिलांचे उपकार फेडायला शिकावे कारण हे देवाच्या दृष्टीने चांगले आहे.
Instruir os filhos
Os pais devem instruir os filhos no caminho certo. A educação começa cedo, com disciplina amorosa e ensino constante da Palavra.
मुलाने ज्या मार्गात चालावे त्याचे शिक्षण त्यास दे,
आणि जेव्हा तो मोठा होईल तेव्हा त्या मार्गांपासून तो मागे फिरणार नाही.
मी आज दिलेल्या आज्ञा तुमच्या कायम लक्षात असू द्या. त्या आपल्या मुलाबाळांनाही शिकवा. घरी-दारी, झोपता उठता त्याविषयी बोलत राहा.
आदेश आणि ताकीद
माझ्या मुला, तू तुझ्या वडिलांची शिकवण ऐक,
आणि तू तुझ्या आईचा नियम बाजूला टाकू नकोस;
ते तुझ्या शिराला सुशोभित वेष्टन
आणि तुझ्या गळ्यात लटकते पदक आहे.
आणि वडिलांनो, तुम्ही आपल्या मुलांना चिडीस आणू नका पण तुम्ही त्यांना प्रभूच्या शिस्तीत व शिक्षणात वाढवा.
वडिलांनो, तुम्ही आपल्या मुलांना चिडीस आणू नका; नाही तर, कदाचित ती निरुत्साही होतील.
छडी आणि सुबोध ज्ञान देतात,
पण मोकळे सोडलेले मूल आपल्या आईला लाज आणते.
जर कोणी आपल्या मुलांना शिक्षा करत नाही तो त्यांचा द्वेष करतो,
पण जो कोणी आपल्या मुलांवर प्रेम करतो तो काळजीपूर्वक त्यांना शिस्त लावतो.
हा कठीण समय आहे म्हणून शिस्त सहन करा. ते असे दर्शवते की, देव तुम्हास मुलांसारखी वागणूक देत आहे; कारण असा कोणता मुलगा आहे ज्याला वडील शिस्त लावीत नाहीत?
Filhos como bênção
Os filhos são herança do Senhor. A coroa dos velhos são os filhos dos filhos, e a glória dos filhos são seus pais.
पाहा, मुले ही परमेश्वरापासून मिळालेले वतन आहे,
आणि पोटचे फळ त्याच्यापासून मिळालेली देणगी आहे.
तरुणपणाची मुले हे वीराच्या
हातातील बाणांसारखी आहेत.
ज्या मनुष्याचा भाता अशांनी भरला आहे, तो धन्य!
तो वेशीवर शत्रूंशी त्याची बोलाचाली होत असता,
ते फजीत होणार नाहीत.
नातवंडे वृद्धांचा मुकुट आहेत,
आणि आईवडील आपल्या मुलांस वैभव आणतात.
नीतिमानाचा पिता फार उल्लासेल,
आणि सुज्ञ मुलास जन्म देणारा त्याच्याविषयी आनंदित होईल.
सात्त्विक आणि दुष्ट ह्यांची तुलना
ही शलमोनाची नितीसूत्रे आहेत.
शहाणा मुलगा आपल्या वडिलांना सुखी करतो,
पण मूर्ख मुलगा आपल्या आईला दु:खी करतो.
तुम्हामध्ये असा कोण पिता आहे की, त्याच्या मुलाने त्यास मासा मागितला असता त्यास माशाऐवजी साप देईल? किंवा जर मुलाने अंडे मागितले तर कोणता पिता त्यास विंचू देईल? जर तुम्ही वाईट असतांनाही तुम्हास तुमच्या मुलांना चांगल्या देणग्या देण्याचे कळते, तर मग स्वर्गीय पित्याजवळ जे मागतात त्यांना तो किती विशेषकरून पवित्र आत्मा देईल?"
पण जर कोणी त्याच्या स्वतःच्या नातेवाईकासाठी आणि विशेषतः त्याच्या कुटुंबातील जवळच्यांसाठी तरतूद करीत नाही, तर त्याने विश्वास नाकारलेला आहे व तो अविश्वासू मनुष्यापेक्षा वाईट आहे.
जर परमेश्वर देवाची सेवा करणे हे जर तुम्हाला वाईट वाटते, तर तुम्ही ज्याची सेवा कराल, त्यास आज आपल्यासाठी निवडून घ्या; फरात नदीच्या पूर्वेकडे तुमच्या पूर्वजांनी ज्या देवांची सेवा केली, त्यांची सेवा करा, किंवा ज्या अमोऱ्यांच्या देशात तुम्ही राहता त्यांच्या देवांची सेवा करा, परंतु मी व माझ्या घरची माणसे आम्ही परमेश्वराचीच सेवा करू."
म्हणून मनुष्य आपल्या आई वडीलांस सोडून आपल्या पत्नीला जडून राहील आणि ती दोघे एक देह होतील.
मुलांच्या वागणुकीची शिक्षा म्हणून आई-वडीलांना देहान्तशासन होऊ नये. तसेच आई-वडीलांच्या दुष्कृत्याची सजा म्हणून मुलांना ठार करु नये. ज्याच्या त्याच्या दुष्कृत्याची सजा ज्याला त्यास मिळावी.