Pais
Deus é nosso Pai celestial — amoroso, provedor, disciplinador e fiel. As Escrituras também honram os pais terrenos e os chamam a criar os filhos na instrução do Senhor.
O Pai celestial
Deus é Pai de misericórdias. Ele nos adotou como filhos, nos ama incondicionalmente e cuida de cada detalhe da nossa vida.
पित्याने आपण परमेश्वराची लेकरे म्हणून संबोधले जावे म्हणून पित्याने आपणावर किती मोठा अगाध प्रीतीचा वर्षाव केला आहे! आणि आपण तसे आहोतच! जग आपल्याला ओळखत नाही कारण जगाने त्यांना ओळखले नाही.
पित्याने आपण परमेश्वराची लेकरे म्हणून संबोधले जावे म्हणून पित्याने आपणावर किती मोठा अगाध प्रीतीचा वर्षाव केला आहे! आणि आपण तसे आहोतच! जग आपल्याला ओळखत नाही कारण जगाने त्यांना ओळखले नाही.
पुन्हा भीती बाळगावी असा दास्यतेचा आत्मा तुम्हाला मिळालेला नाही; याउलट असा आत्मा मिळाला आहे की ज्यामुळे तुम्ही दत्तकपुत्र झाला आहात आणि, "अब्बा, बापा" अशी हाक मारू शकता. कारण पवित्र आत्मा स्वतः आपल्या आत्म्याबरोबर साक्ष देतो की आपण परमेश्वराची मुले आहोत.
परंतु ज्या सर्वांनी त्यांना स्वीकारले, त्यांच्या नावावर विश्वास ठेवला, त्यांना परमेश्वराची मुले होण्याचा अधिकार दिला—
परमेश्वर आपला पिता व प्रभू येशू ख्रिस्त यांच्याकडून तुम्हास कृपा आणि शांती असो.
जशी पित्याची करुणा त्याच्या लेकरांवर असते,
तसे त्यांचे भय बाळगणार्यांसाठी याहवेह कोमलहृदयी व सहानुभूतीने भरलेले आहेत.
जशी पित्याची करुणा त्याच्या लेकरांवर असते,
तसे त्यांचे भय बाळगणार्यांसाठी याहवेह कोमलहृदयी व सहानुभूतीने भरलेले आहेत.
कारण आम्ही कसे निर्माण झालो हे ते जाणतात,
आम्ही धूळ आहोत याचे त्यांना स्मरण आहे.
परमेश्वर पितृहीनांचे पिता आणि विधवांचे न्यायदाता आहेत,
ते आपल्या पवित्र निवासस्थानी आहेत.
परंतु हे याहवेह, तुम्हीच आमचे पिता आहात.
आम्ही माती आहोत, तुम्ही कुंभार आहात;
आम्ही सर्व तुमची हस्तकृती आहोत.
परंतु तुम्हीच आमचे पिता आहात,
जरी अब्राहाम आम्हाला ओळखत नाही
इस्राएलने आम्हाला नाकारले आहे;
तरी तुम्ही, हे याहवेह, आमचे पिता आहात,
आमचे युगायुगांचे उद्धारकर्ता, हेच तुमचे नाव आहे.
कारण आम्हासाठी एक बाळ जन्मले आहे,
आमच्यासाठी एक पुत्र दिला आहे,
आणि सत्ता त्यांच्या खांद्यावर असेल.
आणि त्यांना
अद्भुत सल्लागार, पराक्रमी परमेश्वर,
सार्वकालिक पिता, शांतीचा राजकुमार असे म्हणतील.
कारण आम्हासाठी एक बाळ जन्मले आहे,
आमच्यासाठी एक पुत्र दिला आहे,
आणि सत्ता त्यांच्या खांद्यावर असेल.
आणि त्यांना
अद्भुत सल्लागार, पराक्रमी परमेश्वर,
सार्वकालिक पिता, शांतीचा राजकुमार असे म्हणतील.
O cuidado paterno de Deus
O Pai celestial sabe do que precisamos antes de pedirmos. Ele dá boas dádivas aos filhos que pedem e cuida até dos passarinhos.
आकाशातील पाखरांकडे पाहा; ते धान्य पेरीत नाही, कापणी करीत नाही व कोठारात साठवित नाही आणि तरी देखील तुमचे स्वर्गीय पिता त्यांना खायला घालतात. तुम्ही त्यांच्यापेक्षा कितीतरी अधिक मोलवान नाही का?
दोन चिमण्या एका पैशात विकत नाहीत काय? तरी त्यापैकी एकही चिमणी तुमच्या पित्याच्या इच्छेविना जमिनीवर पडणार नाही. आणि तुमच्या डोक्याचे सर्व केसही मोजलेले आहेत. म्हणून भीती बाळगू नका, कारण तुम्ही पुष्कळ चिमण्यांपेक्षा अधिक मोलवान आहात.
तुम्ही प्रार्थना करता, तेव्हा आपल्या खोलीत जा, दार बंद करा आणि मग तुमच्या अदृश्य पित्याची प्रार्थना करा. तुम्ही गुप्त प्रकारे केलेली प्रार्थना तुमचा पिता ऐकेल, तेव्हा ते तुम्हाला प्रतिफळ देतील.
तुम्ही उपास करता तेव्हा डोक्याला तेल लावा व आपले तोंड धुवा, म्हणजे तुम्ही उपास करीत आहात असे लोकांना समजणार नाही. पण केवळ तुमच्या अदृश्य पित्याला समजेल आणि मग तुमचा पिता जे तुम्ही गुप्त प्रकारे केलेल्या गोष्टी पाहतात ते तुम्हाला प्रतिफळ देतील.
"तुमच्यातील कोण असे वडील आहेत, जर तुमच्या मुलाने तुमच्याजवळ मासा मागितला, तर तुम्ही त्याला साप द्याल? किंवा जर त्याने अंडे मागितले, तर त्याला विंचू द्याल? तर तुम्ही दुष्ट असताना तुमच्या लेकरांना चांगल्या देणग्या देण्याचे तुम्हाला समजते, तर मग स्वर्गीय पित्याजवळ जे मागतात, त्यांना ते कितीतरी विपुलतेने पवित्र आत्मा देणार!"
"हे लहान कळपा, तू भिऊ नकोस कारण तुम्हाला राज्य देण्यास पित्याला आनंद होतो.
प्रत्येक उत्तम व परिपूर्ण दान वरून आहे, ते स्वर्गातील प्रकाशाचे पिता जे छायेसारखे बदलत नाहीत, त्यांच्यापासून येते.
ज्यांनी स्वतःच्या पुत्रास राखून न ठेवता आपणा सर्वांकरिता त्यांना दिले, तर ते आपल्याला त्यांच्यासोबत सर्वकाही उदारतेने देणार नाहीत काय?
Conhecer o Pai
Jesus é o caminho para o Pai. Ninguém conhece o Pai senão o Filho e aquele a quem o Filho quiser revelar.
येशूंनी उत्तर दिले, "मार्ग आणि सत्य आणि जीवन मीच आहे. माझ्याद्वारे आल्याशिवाय पित्याकडे कोणीही येऊ शकत नाही.
माझ्या पित्याच्या घरात राहण्याच्या अनेक खोल्या आहेत आणि तसे नसते तर, मी तुमच्यासाठी जागा तयार करण्यासाठी जात आहे असे तुम्हाला सांगितले असते का?
आणि तुम्ही जे काही माझ्या नावाने मागाल ते मी करेन, यासाठी की पुत्रामध्ये पित्याचे गौरव व्हावे.
ज्याच्याजवळ माझ्या आज्ञा आहेत व जो त्या पाळतो तोच मजवर प्रीती करतो. जो मजवर प्रीती करतो त्यावर माझे पिताही प्रीती करतील आणि मी देखील त्याजवर प्रीती करेन व स्वतः त्यांना प्रकट होईन."
येशूंनी उत्तर दिले, "कारण जो कोणी मजवर प्रीती करतो तो माझे शिक्षण आचरणात आणेल. माझे पितादेखील त्यांच्यावर प्रीती करतील आणि आम्ही त्यांच्याकडे येऊ व त्यांच्याबरोबर वस्ती करू.
परमेश्वराला कोणी कधीही पाहिलेले नाही, परंतु त्यांचा एकुलता एक पुत्र, जे स्वतः परमेश्वर आहेत आणि पित्याच्या निकट सहवासात राहतात, त्या पित्याने त्यांना प्रकट केले आहे.
मी त्यांना सार्वकालिक जीवन देतो आणि त्यांचा कधीही नाश होणार नाही; कोणीही त्यांना माझ्या हातातून हिरावून घेणार नाही. ज्या माझ्या पित्याने ती मला दिली आहेत तो सर्वश्रेष्ठ आहे; कोणीही त्यांना माझ्या पित्याच्या हातातून हिसकून घेऊ शकत नाही. मी आणि माझे पिता एक आहोत."
"हे पित्या, जगाची उत्पत्ती होण्यापूर्वी तुम्ही मजवर प्रीती करून मला गौरव दिले. आता त्यांना माझे गौरव पाहता यावे म्हणून तुम्ही जे लोक मला दिले, त्यांनी जिथे मी आहे, तिथे माझ्याजवळ असावे अशी माझी इच्छा आहे.
"माझ्या पित्याने माझ्याकडे सर्वकाही सोपविले आहे. पित्याशिवाय पुत्राला कोणी ओळखत नाही, आणि पिता कोण आहे हे पुत्राशिवाय, आणि पुत्र ज्यांना प्रकट करण्यास निवडतो त्यांच्याशिवाय कोणालाही माहीत नाही.
म्हणून जसा तुमचा स्वर्गीय पिता परिपूर्ण आहे, तसे तुम्हीही परिपूर्ण असावे."
"परंतु तुम्ही स्वतः ‘रब्बी,’ म्हणून घेऊ नका, कारण तुमचा गुरू एकच आहे आणि तुम्ही सर्व एकमेकांचे भाऊ आहात. आणि या पृथ्वीवर कोणालाही ‘पिता’ म्हणून संबोधू नका, कारण तुम्हाला एकच पिता आहेत व ते स्वर्गात आहेत.
मी माझ्या पित्याला विनंती केली तर, ते देवदूतांच्या बारापेक्षा अधिक सैन्यतुकड्या ताबडतोब पाठविणार नाहीत काय?
जसा तुमचे पिता कनवाळू आहेत, तसे तुम्हीही व्हा.
खरोखर, आता परमेश्वर जे आपला पिता त्यांना सदासर्वकाळ गौरव असो. आमेन.
Disciplina e amor paterno
O Pai disciplina os filhos que ama. A correção divina produz fruto de justiça e paz para aqueles que foram exercitados por ela.
तुम्ही धीराने शिस्त सहन करत आहात; परमेश्वर तुम्हाला पुत्राप्रमाणे वागवितात आणि लेकरांना शिस्त लावत नाही असा कोण पिता आहे? जर तुम्हाला शिस्त लावली नाही तर—सर्वांनाच शिस्तीला सामोरे जावे लागते—तुम्ही अनौरस आहात, तुम्ही या कुटुंबातील खरे पुत्र किंवा कन्या नाहीत. आपल्या सर्वांना शिस्त लावणारे मानवी पिता होते आणि त्यासाठी आपण त्यांचा मान राखतो, तर मग आपण आत्म्यांच्या पित्याच्या कितीतरी अधिक स्वाधीन होऊन जगावे! त्यांनी थोडे दिवस त्यांना योग्य वाटली तशी शिस्त लावली; परंतु परमेश्वर आपल्या हितासाठी शिस्त लावतात, म्हणजे आपण त्यांच्या पवित्रतेचे वाटेकरी व्हावे.
माझ्या पुत्रा, याहवेहच्या शिस्तीचा अनादर करू नकोस;
आणि त्यांनी निषेध केल्यास चिडू नकोस;
कारण जसा पिता मुलामध्ये आनंद मानतो, तसाच त्याला शिस्तही लावतो,
याहवेह ज्यांच्यावर प्रीती करतात त्यालाच ते शिस्त लावतात!
माझ्या पुत्रा, याहवेहच्या शिस्तीचा अनादर करू नकोस;
आणि त्यांनी निषेध केल्यास चिडू नकोस;
कारण जसा पिता मुलामध्ये आनंद मानतो, तसाच त्याला शिस्तही लावतो,
याहवेह ज्यांच्यावर प्रीती करतात त्यालाच ते शिस्त लावतात!
Pais terrenos
A Bíblia honra os pais que criam os filhos nos caminhos de Deus. Honrar pai e mãe é mandamento com promessa de vida longa.
लेकरांनो, प्रभूमध्ये तुम्ही आपल्या आईवडिलांची आज्ञा पाळा, कारण हे योग्य आहे. "तुमच्या आई आणि वडिलांचा मान राखा" अभिवचन असलेली ही पहिली आज्ञा आहे. "यासाठी की तुमचे कल्याण व्हावे आणि तुम्हाला पृथ्वीवर दीर्घायुष्याचा लाभ घेता यावा."
पित्यांनो, तुम्ही आपल्या मुलांना प्रकोपित करू नका; याउलट प्रभूच्या शिक्षणात व बोधवचनात त्यांना वाढवा.
पित्यांनो, तुम्ही आपल्या मुलांना प्रकोपित करू नका; याउलट प्रभूच्या शिक्षणात व बोधवचनात त्यांना वाढवा.
आपल्या वडिलांचा व आपल्या आईचा सन्मान करा, म्हणजे जो देश याहवेह तुमचे परमेश्वर तुम्हाला देत आहे, त्यात तुम्ही दीर्घकाळ राहाल.
पापी लोकांच्या आमंत्रणाविषयी सावधान
माझ्या मुला, तुझ्या वडिलांचे शिक्षण ऐकून घे
आणि तुझ्या आईची शिकवण विसरू नकोस.
ती तुझ्या मस्तकाला अलंकृत करणारी माळ आहे
आणि तुझ्या गळ्यातील सुशोभित हार आहे.
नीतिमान मुलाच्या वडिलांना फार आनंद होतो;
जो मनुष्य सुज्ञ पुत्राचा पिता आहे त्यामध्ये तो उल्लसित असतो.
मूर्ख पुत्र आपल्या आईवडिलांचा सल्ला तुच्छ मानतो,
पण जो सुधारणा अंमलात आणतो, तो सुज्ञपणा दाखवितो.
वयस्क माणसांची नातवंडे त्यांचे गौरवी भूषण आहेत;
आणि मुलांचे भूषण त्यांचे मातापिता आहेत.
जो आपल्या आईवडिलांना शिव्याशाप देतो,
त्याचा दीप गडद अंधारात विझून जाईल.
लेकरांनो, तुम्ही सर्व गोष्टीत आपल्या आईवडिलांची आज्ञा पाळा, कारण त्यामुळे प्रभूला संतोष होतो.
वडिलांनो, तुम्ही आपल्या मुलांना प्रकोपित करू नका, नाही तर त्यांचे धैर्य खचेल.
मुले, ही याहवेहकडून मिळालेला वारसा आहे,
प्रसवशील कूस, हे याहवेहकडून लाभणारे प्रतिफळ आहे.
तरुणपणी झालेली मुले,
शूरवीराच्या हातातील बाणांप्रमाणे आहेत.
ज्या पुरुषाचा भाता
अशा बाणांनी भरलेला आहे, तो धन्य!
असे पुरुष वेशीत आपल्या शत्रूशी न्यायालयात वाटाघाटी करतील,
तेव्हा ते लज्जित होणार नाहीत.
जिवंत, जे जिवंत आहेत—ते तुमची स्तुती करतात,
जसे मी आज करीत आहे;
पालक त्यांच्या मुलांना
तुमच्या विश्वासूपणाबद्दल सांगतात.
आईवडिलांना त्यांच्या मुलांच्या कारणामुळे जिवे मारू नये, तसेच आईवडिलांच्या कारणामुळे त्यांच्या मुलांना जिवे मारू नये. प्रत्येकजण स्वतःच्या पापासाठी मरतील.
कारण परमेश्वर आपल्या लेकरांना प्रकट करेल, त्या दिवसाची अखिल सृष्टी वाट पाहत आहे.
पित्यांनो मी तुम्हाला लिहित आहे,
कारण जे आरंभापासून आहेत त्यांना तुम्ही ओळखता.
तरुणांनो, मी तुम्हाला लिहित आहे,
कारण तुम्ही त्या दुष्टावर विजय मिळविला आहे.
प्रिय मुलांनो मी तुम्हाला लिहितो,
कारण तुम्ही पित्याला ओळखता.
वडिलांनो मी तुम्हाला लिहितो,
कारण तुम्ही त्यांना ओळखता जे सुरुवातीपासून आहेत.
तरुणांनो मी तुम्हाला लिहितो,
कारण तुम्ही सशक्त आहात
आणि परमेश्वराचे वचन तुम्हामध्ये राहते,
आणि तुम्ही त्या दुष्टावर विजय मिळविला आहे.
जगावर प्रेम करू नये यासाठी
जगावर किंवा जगातील गोष्टींवर प्रीती करू नका. जर कोणी जगावर प्रीती करतात तर त्यांच्यामध्ये पित्यासाठी प्रीती वसत नाही.