Palavras de conforto
Deus é o Deus de todo conforto. Ele consola os que choram, restaura os quebrantados e promete que a dor presente dará lugar à alegria eterna.
O Deus de toda consolação
Bendito seja o Deus e Pai de nosso Senhor Jesus Cristo, Pai das misericórdias e Deus de toda consolação, que nos consola em todas as tribulações.
आपला प्रभू येशू ख्रिस्ताचा देव आणि पिता, जो दयाळू पिता व सर्व सांत्वन करणारा देव तो धन्यवादित असो. तो आमच्या सर्व संकटात आमचे सांत्वन करतो; यासाठी की, ज्या सांत्वनाने आमचे स्वतःचे देवाकडून सांत्वन होते. त्या सांत्वनाने आम्ही, जे कोणी कोणत्याही संकटात आहेत त्यांचे सांत्वन करण्यास समर्थ व्हावे.
आपला प्रभू येशू ख्रिस्ताचा देव आणि पिता, जो दयाळू पिता व सर्व सांत्वन करणारा देव तो धन्यवादित असो. तो आमच्या सर्व संकटात आमचे सांत्वन करतो; यासाठी की, ज्या सांत्वनाने आमचे स्वतःचे देवाकडून सांत्वन होते. त्या सांत्वनाने आम्ही, जे कोणी कोणत्याही संकटात आहेत त्यांचे सांत्वन करण्यास समर्थ व्हावे. कारण ख्रिस्ताची दुःखे जशी आमच्यावर पुष्कळ येतात तसे ख्रिस्ताकडून आमचे सांत्वनही पुष्कळ होते. आणि आम्हावर संकट येते ते तुमचे सांत्वन व तारण व्हावे म्हणून येते आणि आम्हास सांत्वन मिळते ते तुमचे सांत्वन व्हावे म्हणून मिळते; म्हणजे असे की, जी दुःखे आम्ही सोशीत आहोत, ती धीराने सहन करण्यास तुम्हास सामर्थ्य मिळते. आणि तुमच्याविषयीची आमची आशा बळकट आहे कारण आम्ही हे जाणतो की, तुम्ही दुःखांचे भागीदार आहात तसेच सांत्वनाचेही भागीदार आहात.
कारण ख्रिस्ताची दुःखे जशी आमच्यावर पुष्कळ येतात तसे ख्रिस्ताकडून आमचे सांत्वनही पुष्कळ होते.
कारण परमेश्वराने संकटात सापडलेल्यांच्या दु:खाला तुच्छ मानले नाही आणि किळस केला नाही.
आणि त्यांनी आपले मुख त्यांच्यापासून लपवले नाही.
जेव्हा पिडीतांनी त्यास आरोळी केली, त्याने ऐकले.
जे हृदयाने तुटलेले आहेत, त्यांच्याजवळ परमेश्वर आहे.
आणि तो खिन्न झालेल्या आत्म्यास तारतो.
Promessas de restauração
Deus sarará o quebrantado de coração e atará as suas feridas. Quem semeia em lágrimas, colherá com júbilo.
तो भग्नहृदयी जनांना बरे करतो,
आणि त्यांच्या जखमांस पट्टी बांधतो.
कारण त्याचा राग काही क्षणाचा आहे, परंतु त्याचा अनुग्रह आयुष्यभर आहे.
रडने कदाचीत रात्रभर असेल, परंतु सकाळी हर्ष होईलच.
देव आमचा आश्रय व आमचे सामर्थ्य
देव आमचा आश्रय आणि सामर्थ्य आहे,
जो संकटात मदत करण्यास सिध्द असतो.
तू आपला भार परमेश्वरावर टाक,
म्हणजे तो तुला आधार देईल.
तो नितीमानाला कधी पडू देणार नाही.
तू माझ्या भटकण्याची ठिकाणे मोजली आहेत
आणि माझे अश्रू आपल्या बाटलित ठेवली आहेत;
तुझ्या पुस्तकात त्याची नोंद नाही का?
परमेश्वर पीडितांना आश्रयदुर्ग आहे,
संकटकाळी तो बळकट दुर्ग असा आहे.
परमेश्वर माझा खडक माझा गढ आहे, जो मला सुरक्षा देतो, तो माझा देव, माझा खडक आहे, त्याच्यात मी आश्रय घेतो.
तो माझी ढाल आहे, माझ्या तारणाचे शिंग आणि माझा बळकट दुर्ग आहे.
Paz e descanso
Jesus disse: 'Vinde a mim, todos os cansados e sobrecarregados, e eu vos aliviarei.' A paz de Deus que excede todo entendimento guarda o coração.
अहो जे थकलेले व ओझ्याने लादलेले असे सर्व तुम्ही मजकडे या आणि मी तुम्हास विसावा देईन.
अहो जे थकलेले व ओझ्याने लादलेले असे सर्व तुम्ही मजकडे या आणि मी तुम्हास विसावा देईन. मी अंतःकरणाने लीन व नम्र आहे, म्हणून माझे जू आपणावर घ्या, माझ्यापासून शिका, म्हणजे तुमच्या जीवास विसावा मिळेल.
‘जे शोक करतात’, ते धन्य आहेत,
कारण ‘त्यांचे सांत्वन करण्यात येईल.’
मी तुम्हास शांती देऊन ठेवितो; मी आपली शांती तुम्हास देतो जसे जग देते तसे मी तुम्हास देत नाही; तुमचे अंतःकरण अस्वस्थ किंवा भयभीत होऊ नये,
माझ्याठायी तुम्हास शांती मिळावी म्हणून मी या गोष्टी सांगितल्या आहेत. जगात तुम्हास क्लेश होतील; तरी धीर धरा, मी जगाच्या शक्तीला जिकले आहे."
आणि म्हणून, आता तुम्हास दुःख झाले आहे; तरी मी तुम्हास पुन्हा भेटेन आणि तुमचे अंतःकरण आनंदित होईल आणि तुमच्यापासून तुमचा आनंद कोणीही हिरावून घेणार नाही.
कशा ही विषयाची काळजी करू नका पण प्रार्थना आणि विनंती करून आभारप्रदर्शनासह आपली मागणी देवाला कळवा;
म्हणजे सर्व बुद्धीसामर्थ्याच्या पलीकडे असलेली देवाची दिलेली शांती तुमची अंतःकरणे व तुमचे विचार ख्रिस्त येशूच्या ठायी राखील.
Esperança eterna
Deus enxugará toda lágrima. A dor presente é momentânea, mas a glória futura é eterna. O Senhor transforma luto em dança.
आणि मी राजासनातून एक मोठी वाणी ऐकली; ती म्हणालीः "पाहा, देवाचा मंडप मनुष्यांत आहे, तो त्यांच्याबरोबर वस्ती करील; ते त्याचे लोक होतील आणि देव स्वतः त्यांच्याबरोबर राहील तो त्यांच्या डोळ्यांतले सर्व अश्रू पुसेल; आणि ह्यापुढे मरण राहणार नाही; दुःख, आक्रोश, किंवा क्लेशही होणार नाहीत; कारण पहिल्या गोष्टी होऊन गेल्या आहेत."
तेव्हा राजासनावर बसलेला म्हणालाः "पाहा, मी सर्वकाही नवीन करतो आणि तो मला म्हणाला, लिही; कारण ही वचने विश्वसनीय आणि खरी आहेत."
आणि आता आशेचा देव तुम्हास तुमच्या विश्वासाद्वारे आनंदाने व शांतीने भरो, म्हणजे पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने तुम्ही आशेत वाढत जावे.
आणि या जगाशी समरूप होऊ नका पण तुमच्या मनाच्या नवीनीकरणाने तुमचे रूपांतर होऊ द्या; म्हणजे देवाची उत्तम व त्यास संतोष देणारी परिपूर्ण इच्छा काय आहे ती तुम्ही ओळखावी.
भिऊ नकोस, कारण मी तुझ्याबरोबर आहे. चिंतातुर होऊ नकोस, कारण मी तुझा देव आहे. मी तुला शक्ती देईन, आणि मी तुला मदत करीन, मी आपल्या विजयाच्या उचित उजव्या हाताने तुला आधार देईन.
सीयोनेच्या उद्धाराचे शुभवृत्त
प्रभू परमेश्वराचा आत्मा माझ्यावर आहे, कारण त्याने मला अभिषेक केला आहे.
ह्यासाठी की दिनांस सुवार्ता सांगावी आणि भग्नहृदयाच्या लोकांस बरे करावे.
पाडाव केलेल्यास मुक्तता आणि बंदिवानांस मोकळीक गाजवून सांगावी.
परमेश्वराच्या कृपासमयाचे वर्ष व त्याच्या प्रतिकाराचा दिवस घोषणा करून सांगायला,
आणि शोक करणाऱ्या सर्वांना सांत्वन करायला त्याने मला पाठवले आहे.
सियोनेच्या शोक करणाऱ्यांस राखेच्या ऐवजी शोभा, शोकाच्या ठिकाणी आनंदाचे तेल,
खिन्न आत्म्याच्या ठिकाणी प्रशंसेचे वस्र नेमून द्यायला त्याने मला पाठवले आहे.
आणि त्याचा महिमा व्हावा म्हणून त्यांना न्यायीपणाची वृक्षे, परमेश्वराने लावलेले असे म्हणतील.
आई जशी मुलाला सांत्वन देते, तसा मी तुम्हास सांत्वन देईन, आणि यरूशलेमेत तुम्ही सांत्वन पावाल."
Nunca sozinhos
Deus nunca nos abandona. Ele está ao nosso lado em cada vale, segura nossa mão e promete que o choro não durará para sempre.
परमेश्वर तुमच्या सोबतीला तुमच्यापुढेच चालणार आहे. तो तुम्हास सोडून जाणार नाही, तुम्हास अंतर देणार नाही. तेव्हा भिऊ नको आणि निर्भय राहा."
आपले जीवन पैशाच्या लोभापासून दूर ठेवा व तुमच्याकडे जे आहे त्यामध्येच समाधान माना कारण देवाने असे म्हणले आहे, "मी कधीही तुला सोडणार नाही, मी कधीही तुला त्यागणार नाही"
परमेश्वर चांगला आहे, संकटसमयी तो शरणदुर्ग आहे आणि जे त्याच्या ठायी आश्रय घेतात त्यांना तो जाणतो.
परमेश्वर तुझा देव, तुझ्यामध्ये आहे, तो तुला वाचवायला पराक्रमी असा आहे; तो हर्षाने तुझ्याविषयी आनंद करील,
तो त्याच्या प्रेमासोबत तुझ्याकडे शांती घेऊन येईल.
तो गायनाने तुझ्याविषयी आनंद करील.
कारण परमेश्वर असे म्हणतो की, तुमच्याविषयी माझ्या मनात ज्या योजना आहेत त्या मी जाणतो; त्या योजना तुमच्या हिताच्या आहेत आणि अनिष्टासाठी नाहीत, त्या तुम्हास भविष्य व आशा देणाऱ्या आहेत.
म्हणून कोणी मनुष्य ख्रिस्तात असेल तर तो नवी उत्पत्ती आहे; जुने होऊन गेले आहे, बघा, ते नवे झाले आहे;
म्हणून जे देवाच्या इच्छेप्रमाणे सोसतात त्यांनी चांगले करीत राहून, जो विश्वासू निर्माणकर्ता आहे त्याच्याहाती आपले जीव सोपवावेत.
सर्वसामान्य बोध
म्हणून देवाच्या पराक्रमी हाताखाली लीन व्हा ह्यासाठी की त्याने तुम्हास योग्यवेळी उंच करावे. तुम्ही आपली सर्व चिंता त्याच्यावर टाका, कारण तो तुमची काळजी करतो.
मी जरी अंधकाराने भरलेल्या दरीत चालत असलो तरी,
मला कसल्याही संकटाचे भय वाटणार नाही,
कारण तू माझ्याबरोबर आहेस, तुझी आकडी आणि काठी माझे सांत्वन करतात.
मी परमेश्वरास एक गोष्ट मागितली, तीच मी शोधीन,
परमेश्वराची सुंदरता पाहण्यास व त्याच्या मंदिरात
ध्यान करण्यास मी माझ्या आयुष्याचे सर्व दिवस घालवेन,
परमेश्वराच्या घरात मी वस्ती करीन.
कारण माझ्या संकट समयी तो माझे लपण्याचे ठिकाण आहे;
तो मला त्याच्या तंबूत लपवेल,
तो मला खडकावर उंच करील.
माझ्या दुःखात माझे सांत्वन हे आहे की,
तुझे वचन मला नवजीवन देते;
तो नम्र लोकांस उच्चस्थानी बसवतो
आणि जे राखेत बसून शोक करतात त्यांना तो सुरक्षीत उठवतो.
येशू म्हणाला, "मी तुम्हास खरे सांगतो, ज्याने ज्याने माझ्याकरिता व सुवार्तेकरता घरदार, बहिण, भाऊ, आईवडील, मुलेबाळे किंवा शेतीवाडी सोडली आहे, अशा प्रत्येकाला शेवटच्या काळी छळणुकीबरोबर शंभरपटीने घरे, भाऊ, बहिणी, आया, मुले, शेते आणि येणाऱ्या युगात सार्वकालिक जीवन मिळाल्याशिवाय राहणार नाही.
मी पित्याला विनंती करीन, मग तो तुम्हास दुसरा कैवारी म्हणजे सत्याचा आत्मा देईल. अशासाठी की, त्याने तुम्हाबरोबर सर्वकाळ रहावे. तो सत्याचा आत्मा आहे, जग त्यास ग्रहण करू शकत नाही, कारण ते त्यास पाहत नाही अथवा त्यास ओळखीत नाही; तुम्ही त्यास ओळखता, कारण तो तुम्हाबरोबर राहतो आणि तो तुम्हामध्ये वस्ती करील. मी तुम्हास अनाथ असे सोडणार नाही; मी तुम्हाकडे येईन.