Palavras de conforto
Deus é o Deus de todo conforto. Ele consola os que choram, restaura os quebrantados e promete que a dor presente dará lugar à alegria eterna.
O Deus de toda consolação
Bendito seja o Deus e Pai de nosso Senhor Jesus Cristo, Pai das misericórdias e Deus de toda consolação, que nos consola em todas as tribulações.
सर्व सांत्वन करणार्या परमेश्वराची स्तुती
आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताचे पिता आणि आपला परमेश्वर, करुणेचा पिता आणि सर्व सांत्वन करणारे परमेश्वर यांची स्तुती असो. ते आपल्या सर्व दुःखांमध्ये आपले सांत्वन करतात, यासाठी की जे सांत्वन आम्हाला परमेश्वराकडून मिळाले आहे, त्या सांत्वनाने जे कोणत्याही दुःखात आहेत त्यांचे सांत्वन करावे.
सर्व सांत्वन करणार्या परमेश्वराची स्तुती
आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताचे पिता आणि आपला परमेश्वर, करुणेचा पिता आणि सर्व सांत्वन करणारे परमेश्वर यांची स्तुती असो. ते आपल्या सर्व दुःखांमध्ये आपले सांत्वन करतात, यासाठी की जे सांत्वन आम्हाला परमेश्वराकडून मिळाले आहे, त्या सांत्वनाने जे कोणत्याही दुःखात आहेत त्यांचे सांत्वन करावे. ज्याप्रकारे आम्ही ख्रिस्ताच्या अगणित दुःखांमध्ये सहभागी आहोत, त्याच प्रकारे आमचे सांत्वनही ख्रिस्ताद्वारे विपुल होते. जर आम्ही दुःखी आहोत तर ते तुमच्या सांत्वनासाठी व तारणासाठी; जर आम्हाला सांत्वन लाभले आहे, तर ते तुमच्या सांत्वनासाठी, यासाठी की जी दुःखे आम्ही सोसतो व जी तुम्हीही सोसत आहात, त्यामुळे तुम्हामध्ये धीर व सहनशीलता उत्पन्न व्हावी आणि तुमच्याबद्दलची आमची आशा स्थिर आहे व जसे तुम्ही आमच्या दुःखामध्ये तसेच आमच्या सांत्वनातही सहभागी झाला आहात.
ज्याप्रकारे आम्ही ख्रिस्ताच्या अगणित दुःखांमध्ये सहभागी आहोत, त्याच प्रकारे आमचे सांत्वनही ख्रिस्ताद्वारे विपुल होते.
कारण त्यांनी दुःखितांचे दुःख,
तुच्छ जाणले नाही किंवा त्यांचा तिरस्कार केला नाही;
त्यांनी आपले मुख त्यांच्यापासून फिरविले नाही
परंतु त्यांचा मदतीचा धावा त्यांनी ऐकला.
याहवेह भग्नहृदयी लोकांच्या अगदी जवळ असतात
आणि जे पश्चात्तापी आत्म्याचे आहेत त्यांचे ते तारण करतात.
Promessas de restauração
Deus sarará o quebrantado de coração e atará as suas feridas. Quem semeia em lágrimas, colherá com júbilo.
भग्नहृदयी लोकांना ते बरे करतात,
आणि त्यांच्या जखमांवर पट्टी बांधतात.
त्यांचा क्रोध क्षणभर टिकतो,
पण त्यांची कृपा जन्मभर राहते.
विलाप करणे केवळ रात्रभर राहील,
परंतु प्रातःकाल उगवताच आनंद होईल.
परमेश्वर आमचे आश्रय व सामर्थ्य आहेत;
संकटात साहाय्य करण्यास ते सदा सिद्ध असतात.
तू आपला भार याहवेहवर टाक
आणि ते तुला आधार देतील;
नीतिमानाला ते कधीही
विचलित होऊ देणार नाही.
तुम्ही माझ्या भटकण्याची ठिकाणे मोजली आहेत;
तुम्ही माझे अश्रू तुमच्या कुपीमध्ये ठेवले आहेत;
तुमच्या चर्मपत्राच्या गुंडाळीत त्यांची नोंद नाही काय?
याहवेह, पीडितांसाठी आश्रय आहेत,
संकटकाळी तेच आश्रयाचे दुर्ग आहेत.
याहवेह माझे खडक, माझे दुर्ग आणि मला सोडविणारे;
माझे परमेश्वर माझे खडक आहेत, ज्यांच्या ठायी मी आश्रय घेतो,
माझी ढाल आणि माझ्या तारणाचे शिंग ते माझे शरणस्थान आहेत.
Paz e descanso
Jesus disse: 'Vinde a mim, todos os cansados e sobrecarregados, e eu vos aliviarei.' A paz de Deus que excede todo entendimento guarda o coração.
"जे तुम्ही थकलेले आणि भाराक्रांत आहात, ते तुम्ही सर्वजण माझ्याकडे या, मी तुम्हाला विश्रांती देईन.
"जे तुम्ही थकलेले आणि भाराक्रांत आहात, ते तुम्ही सर्वजण माझ्याकडे या, मी तुम्हाला विश्रांती देईन. माझे जू आपणावर घ्या आणि माझ्याकडून शिका; कारण मी सौम्य व लीन मनाचा आहे आणि तुमच्या आत्म्याला विसावा मिळेल.
धन्य आहेत ते, जे शोकग्रस्त आहेत,
कारण त्यांना सांत्वन मिळेल.
शांती मी तुम्हासाठी ठेऊन जातो; माझी शांती मी तुम्हाला देतो. ज्याप्रमाणे जग देते त्याप्रमाणे मी तुम्हाला देत नाही. तुमची मने अस्वस्थ होऊ देऊ नका व भिऊ नका.
"मी या सर्वगोष्टी तुम्हाला सांगितल्या, ते यासाठी की माझ्यामध्ये तुम्हाला शांती मिळावी. या जगात तुम्हाला त्रास सहन करावा लागेल. परंतु धीर धरा! कारण मी जगावर विजय मिळविला आहे."
त्याच प्रकारे आता दुःख करण्याची तुमची वेळ आहे, परंतु मी तुम्हाला पुन्हा भेटेन तेव्हा तुमचे हृदय आनंदी होईल आणि तुमचा आनंद तुमच्यापासून कोणीही हिरावून घेणार नाही.
कशाविषयीही चिंताक्रांत होऊ नका, तर सर्व परिस्थितीत, प्रार्थना व विनवणी करीत, उपकारस्तुतीसह आपल्या मागण्या परमेश्वराला कळवा.
आणि परमेश्वराची शांती, जी आपल्या सर्व बुद्धीच्या पलीकडे आहे, ती तुमचे विचार आणि तुमची मने ख्रिस्त येशूंमध्ये राखील.
Esperança eterna
Deus enxugará toda lágrima. A dor presente é momentânea, mas a glória futura é eterna. O Senhor transforma luto em dança.
राजासनावरून मला एक मोठी वाणी ऐकू आली. ती म्हणाली, "पाहा! परमेश्वराचे वसतिस्थान आता मनुष्यांबरोबर आहे; ते स्वतः त्यांच्याबरोबर राहतील; ते त्यांचे लोक होतील; आणि ते त्यांचे परमेश्वर होतील. ‘ते त्यांच्या डोळ्यांतील प्रत्येक अश्रू पुसून टाकतील आणि आता मृत्यू,’ दुःख, रडणे व वेदना अस्तित्वात राहणार नाहीत. या सर्व जुन्या गोष्टी कायमच्या नाहीशा झाल्या आहेत."
जे राजासनावर बसले होते ते म्हणाले, "मी सर्वकाही नवीन करीत आहे!" मग ते म्हणाले, "हे लिहून घे; कारण ही वचने विश्वसनीय आणि सत्य आहेत."
तुम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवल्यामुळे आशेचे परमेश्वर तुम्हाला सर्व आनंदाने आणि शांतीने भरो, यासाठी की तुमच्यामध्ये असणार्या पवित्र आत्म्याच्या सामर्थ्यात विपुल आशेमध्ये तुम्ही वाढत जावे.
या जगाशी समरूप होऊ नका; तर आपल्या मनाच्या नवीनीकरणाने स्वतःचे रूपांतर होऊ द्या, यासाठी की परमेश्वराची जी उत्तम, ग्रहणीय व परिपूर्ण इच्छा, ती काय आहे, हे तुम्ही समजून घ्यावे.
भिऊ नका, कारण मी तुम्हाबरोबर आहे;
हिंमत खचू देऊ नका, कारण मी तुमचा परमेश्वर आहे.
मी तुम्हाला समर्थ करेन व तुम्हाला मदत करेन;
मी माझ्या नीतिमत्तेच्या उजव्या हाताने तुम्हाला उचलून धरेन.
याहवेहच्या कृपेचे वर्ष
सार्वभौम याहवेहचा आत्मा मजवर आहे,
कारण गरिबांना शुभवार्ता सांगण्यासाठी
याहवेहने माझा अभिषेक केला आहे.
भग्नहृदयी लोकांचे सांत्वन करण्यासाठी,
कैद्यांना सुटका जाहीर करण्यासाठी
व अंधकारातून बंदिवानांना मुक्त करण्यासाठी त्यांनी मला पाठविले आहे.
याहवेहच्या कृपेचे वर्ष
आणि परमेश्वराचा सूड घेण्याचा दिवस आला आहे, हे जाहीर करण्यास,
आणि जे सर्व विलाप करतात त्यांचे सांत्वन करण्यासाठी त्यांनी मला पाठविले आहे.
सीयोनातील जे सर्व शोक करतात त्यांना—
राखेऐवजी सौंदर्याचा मुकुट,
विलापाऐवजी
आनंदाचे तेल,
निराशेच्या आत्म्याऐवजी
स्तुतीचे वस्त्र
बहाल करण्यासाठी.
कारण त्यांचे गौरव प्रकट करण्यासाठी
ते नीतिमत्तेचे एला वृक्ष
याहवेहने स्वतः रोपलेले असे संबोधले जातील.
जसे आई तान्ह्या बाळाचे सांत्वन करते,
तसे मी तुमचे सांत्वन करेन;
आणि तुम्ही यरुशलेमाप्रीत्यर्थ सांत्वन पावाल."
Nunca sozinhos
Deus nunca nos abandona. Ele está ao nosso lado em cada vale, segura nossa mão e promete que o choro não durará para sempre.
याहवेह स्वतः तुझ्यापुढे चालतील आणि तुझ्याबरोबर राहतील; ते तुला कधीही सोडणार नाही किंवा त्यागणार नाहीत. भिऊ नकोस; निरुत्साही होऊ नकोस."
द्रव्यलोभापासून दूर राहा; जवळ असेल तेवढ्यात तुम्ही समाधानी असावे. कारण परमेश्वराने म्हटले आहे,
"मी तुला कधीच सोडणार नाही
व तुला कधीच टाकणार नाही."
याहवेह चांगले आहेत,
संकटसमयी आश्रयस्थान आहेत.
त्यांच्यावर भरवसा ठेवणार्या प्रत्येकाची ते काळजी घेतात.
महाप्रतापी योद्धा जे रक्षणकर्ता आहेत,
ते याहवेह तुझे परमेश्वर तुझ्यासह आहेत.
त्यांना तुझ्यामुळे अत्यंत आनंद होतो;
तुझ्यावरील प्रीतीमुळे ते तुजवर दोषारोपण करणार नाहीत.
त्याऐवजी तुझ्याबद्दल ते गीत गाऊन उल्हास व्यक्त करतील."
याहवेह असे जाहीर करतात, "कारण मी तुमच्यासाठी केलेल्या योजना मला माहीत आहेत, त्या योजना तुमच्या भल्यासाठी आहेत, वाईटासाठी नाहीत, तुम्हाला आशा व उज्वल भविष्यकाळ देण्याच्या त्या योजना आहेत.
जर कोणी ख्रिस्तामध्ये आहे, तर तो नवी सृष्टी झाला आहे; जुने संपले आहे व सर्व नवीन झाले आहे.
म्हणून जे परमेश्वराच्या इच्छेप्रमाणे दुःख सहन करतात त्यांनी स्वतःला त्यांच्या विश्वासू निर्माणकर्त्याकडे सोपवून द्यावे आणि नेहमी चांगली कामे करीत राहवे.
परमेश्वराच्या पराक्रमी हाताखाली स्वतःला नम्र करा, म्हणजे ते तुम्हाला योग्य वेळी उंच करतील. तुमच्या सर्व चिंता त्याच्यावर टाका, कारण ते तुमची काळजी घेतात.
मृत्युछायेच्या दरीतूनही
मी जात असलो,
तरी कोणत्याही अरिष्टाला भिणार नाही,
कारण तुम्ही माझ्याबरोबर आहात;
तुमची आकडी व तुमची काठी
मला धीर देतात.
मी याहवेहला एक याचना केली,
हीच माझी आकांक्षा आहे:
मी आयुष्यभर याहवेहच्या
भवनात वस्ती करावी जेणेकरून
मी याहवेहचे सौंदर्य बघून त्यांच्या
मंदिरात ध्यान करावे.
कारण संकटाच्या दिवसात
ते मला त्यांच्या वसतिस्थानात सुरक्षित ठेवतील;
तेच मला आपल्या निवासमंडपात लपवून ठेवतील;
उंच खडकावर मला सुरक्षा देतील.
माझ्या संकटात माझे सांत्वन हे आहे:
तुमचे अभिवचन माझ्या जीवनाचे जतन करते.
नम्र लोकांना ते उंचस्थानी ठेवतात,
जे विलाप करतात त्यांना सुरक्षित स्थळी नेतात.
येशूंनी उत्तर दिले, "मी तुम्हाला निश्चित सांगतो की, ज्यांनी मला अनुसरण्यासाठी व शुभवार्तेसाठी आपले घर, भाऊ, बहीण, आई, पिता, मुले आणि जमिनीचा त्याग केला आहे. या वर्तमान युगात त्याला शंभरपट मोबदला तर मिळेलच, घरे, भाऊ बहीण, आई, मुले आणि जमीन आणि याबरोबरच छळ आणि येणार्या युगात त्याला सार्वकालिक जीवनही मिळाल्याशिवाय राहणार नाही.
आणि मी पित्याजवळ मागेन, ते तुम्हाला मदत करण्यासाठी दुसरा कैवारी देतील, जो तुम्हाबरोबर सर्वकाळ राहील— सत्याचा आत्मा. त्याला जग स्वीकारणार नाही, कारण जग त्याला पाहत नाही व ओळखत नाही. परंतु तुम्ही त्याला ओळखता, कारण तो तुम्हाबरोबर राहतो आणि तुम्हामध्ये राहील. मी तुम्हाला अनाथ सोडणार नाही; मी तुमच्याकडे येईन.