A Palavra de Deus
A Palavra de Deus é viva, eficaz e eterna. Desde 'No princípio era o Verbo' até 'O céu e a terra passarão, mas as minhas palavras não hão de passar', ela é a revelação suprema do Criador.
No princípio era o Verbo
A Palavra é Deus encarnado. No princípio era o Verbo, o Verbo estava com Deus, e o Verbo era Deus. Todas as coisas foram feitas por Ele.
अनंतकालीक शब्द
प्रारंभी शब्द होता, शब्द देवासह होता आणि शब्द देव होता.
अनंतकालीक शब्द
प्रारंभी शब्द होता, शब्द देवासह होता आणि शब्द देव होता.
शब्द देह झाला व त्याने आमच्यात वस्ती केली आणि आम्ही त्याचे गौरव पाहीले, ते पित्यापासून आलेल्या एकुलत्या एकाचे गौरव असावे असे कृपेने व सत्याने परिपूर्ण होते.
शब्द देह झाला व त्याने आमच्यात वस्ती केली आणि आम्ही त्याचे गौरव पाहीले, ते पित्यापासून आलेल्या एकुलत्या एकाचे गौरव असावे असे कृपेने व सत्याने परिपूर्ण होते.
देव बोलला, "प्रकाश होवो" आणि प्रकाश झाला.
पुत्र हा देवाच्या गौरवाचे तेज आहे. तो देवाच्या स्वभावाचे तंतोतंत प्रतिरूप असा आहे. पुत्र आपल्या सामर्थ्यशाली शब्दाने सर्व गोष्टी राखतो. पुत्राने लोकांस त्यांच्या पापांपासून शुद्ध केले, नंतर तो स्वर्गातील सर्वश्रेष्ठ देवाच्या उजव्या बाजूला बसला.
विश्वासाने आपल्याला समजते की, देवाच्या शब्दाने विश्व निर्माण झाले; म्हणजे ज्या गोष्टी दिसतात त्या दृश्य गोष्टींपासून झाल्या नाहीत.
परमेश्वराच्या शब्दाकडून आकाशे निर्माण झाली
आणि त्याच्या मुखातील श्वासाने सर्व तारे निर्माण झाले आहेत.
A Palavra é viva e eficaz
A Palavra de Deus é mais cortante que espada de dois gumes. Ela julga pensamentos e intenções do coração, transforma e liberta.
कारण देवाचे वचन सजीव, सक्रीय कोणत्याही दुधारी तलवारीपेक्षा अधिक धारदार असून जीव, सांधे व मज्जा यांना भेदून आरपार जाणारे आणि मनातील विचार व हेतू ह्यांची पारख करणारे असे आहे.
कारण देवाचे वचन सजीव, सक्रीय कोणत्याही दुधारी तलवारीपेक्षा अधिक धारदार असून जीव, सांधे व मज्जा यांना भेदून आरपार जाणारे आणि मनातील विचार व हेतू ह्यांची पारख करणारे असे आहे.
माझा संराष्ट्र अग्नीप्रमाणे नाही काय? परमेश्वर असे म्हणतो. आणि तो खडक फोडणाऱ्या हातोड्याप्रमाणे नाही काय?
आणि तारणाचे शिरस्राण व आत्म्याची तलवार, जी देवाच वचन आहे, ती घ्या,
Toda Escritura é inspirada
Toda a Escritura é inspirada por Deus e útil para ensino, correção e instrução na justiça. Ela é perfeita e imutável.
प्रत्येक शास्त्रलेख देवाच्या प्रेरणेने लिहिला असल्यामुळे तो शिकवण्यास, वाईटाचा निषेध करण्यास, चुका सुधारण्यास व योग्य जीवन जगण्याचे मार्गदर्शन करण्यास उपयुक्त आहे.
प्रत्येक शास्त्रलेख देवाच्या प्रेरणेने लिहिला असल्यामुळे तो शिकवण्यास, वाईटाचा निषेध करण्यास, चुका सुधारण्यास व योग्य जीवन जगण्याचे मार्गदर्शन करण्यास उपयुक्त आहे. यासाठी की, देवाचा मनुष्य तरबेज होऊन पूर्णपणे प्रत्येक चागंल्या कामासाठी सज्ज व्हावा.
प्रत्येक शास्त्रलेख देवाच्या प्रेरणेने लिहिला असल्यामुळे तो शिकवण्यास, वाईटाचा निषेध करण्यास, चुका सुधारण्यास व योग्य जीवन जगण्याचे मार्गदर्शन करण्यास उपयुक्त आहे. यासाठी की, देवाचा मनुष्य तरबेज होऊन पूर्णपणे प्रत्येक चागंल्या कामासाठी सज्ज व्हावा.
Luz para o caminho
A Palavra é lâmpada para os pés e luz para nosso caminho. Ela ilumina, orienta e protege o que nela medita dia e noite.
नून
तुझे वचन माझ्या पावलाकरता दिवा आहे,
आणि माझ्या मार्गासाठी प्रकाश आहे.
नून
तुझे वचन माझ्या पावलाकरता दिवा आहे,
आणि माझ्या मार्गासाठी प्रकाश आहे.
तुझ्या वचनाच्या उलगड्याने प्रकाश प्राप्त होतो;
त्याने अशिक्षितास ज्ञान प्राप्त होते.
लामेद
हे परमेश्वरा, तुझे वचन स्वर्गात सर्वकाळ स्थिर आहे;
तुझे वचन स्वर्गात ठामपणे प्रस्थापित आहे.
बेथ
तरुण मनुष्य आपला मार्ग कशाने शुध्द राखील?
तुझ्या वचनाचे पालन करण्याने.
मी तुझ्याविरुध्द पाप करू नये
म्हणून तुझे वचन आपल्या हृदयात साठवून ठेवले आहे.
तुझ्या वचनाचे मर्म सत्य आहे;
तुझ्या न्यायीपणाचा प्रत्येक निर्णय सर्वकाळ आहे.
Obedecer a Palavra
Seja praticante da Palavra e não apenas ouvinte. Jesus disse que quem ouve e pratica é como o homem sábio que edificou sobre a rocha.
वचनाप्रमाणे आचरण करणारे असा व फक्त ऐकणारेच असू नका तर त्याप्रमाणे करा कारण जर तुम्ही फक्त ऐकता तर तुम्ही स्वतःची फसवणूक करता.
वचनाप्रमाणे आचरण करणारे असा व फक्त ऐकणारेच असू नका तर त्याप्रमाणे करा कारण जर तुम्ही फक्त ऐकता तर तुम्ही स्वतःची फसवणूक करता.
वचनाप्रमाणे आचरण करणारे असा व फक्त ऐकणारेच असू नका तर त्याप्रमाणे करा कारण जर तुम्ही फक्त ऐकता तर तुम्ही स्वतःची फसवणूक करता. जो कोणी देवाचे वचन ऐकतो परंतु त्यानुसार वागत नाही, तो आरशामध्ये आपले शारीरिक तोंड पाहणाऱ्या मनुष्यासारखा आहे. तो मनुष्य स्वतःकडे लक्षपूर्वक पाहतो. नंतर निघून जातो आणि आपण कसे होतो ते लगेच विसरून जातो.
म्हणून तुमच्यासभोवतीच्या सर्व अमंगळ गोष्टींपासून पूर्णपणे स्वतःची सुटका करून घ्या आणि जी तुमच्या आत्म्याचे तारण करण्यास समर्थ आहे ती देवाची शिकवण तुमच्या अंतःकरणात मुळावलेली आहे ती लीनतेने स्वीकारा.
दोन पाये
जो कोणी माझ्या सांगण्याप्रमाणे आचारण करतो तो शहाण्या मनुष्यासारखा आहे, अशा शहाण्या मनुष्याने आपले घर खडकावर बांधले.
परंतु येशूंनी उत्तर दिले, "कारण पवित्र शास्त्रात असे लिहिले आहे की,
‘मनुष्य केवळ भाकरीने जगेल असे नाही तर,
देवाच्या मुखातून निघणाऱ्या प्रत्येक वचनाने जगेल.’"
परंतु येशूंनी उत्तर दिले, "कारण पवित्र शास्त्रात असे लिहिले आहे की,
‘मनुष्य केवळ भाकरीने जगेल असे नाही तर,
देवाच्या मुखातून निघणाऱ्या प्रत्येक वचनाने जगेल.’"
परंतु तो म्हणाला, "जे देवाचे वचन ऐकतात आणि पाळतात तेच खरे धन्य आहेत!"
येशूने त्यास उत्तर दिले, "पवित्र शास्त्रात असे लिहिले आहे की, मनुष्य फक्त भाकरीनेच जगेल असे नाही."
तेव्हा सर्वजण आश्चर्यचकित झाले व एकमेकांशी बोलू लागले, हे कोणत्या प्रकारचे शब्द आहेत? अधिकाराने आणि सामर्थ्याने तो अशुद्ध आत्म्याना देखील आज्ञा करतो व ते बाहेर येतात.
A Palavra que permanece
Céus e terra passarão, mas as palavras de Jesus jamais passarão. A Palavra do Senhor permanece para sempre — eterna e infalível.
आकाश आणि पृथ्वी नाहीशी होतील पण माझी वचने कधीही नष्ट होणार नाहीत.
स्वर्ग आणि पृथ्वी नाहीशी होतील पण माझी वचने नाहीशी होणारच नाहीत.
"गवत सुकते आणि फुल कोमेजते पण आमच्या देवाचे वचन सदासर्वकाळ उभे राहते."
कारण परमेश्वरचे वचन सरळ आहे,
आणि तो जे करतो ते प्रामाणिकपणाने करतो.
कारण परमेश्वरचे वचन सरळ आहे,
आणि तो जे करतो ते प्रामाणिकपणाने करतो.
देवाचा प्रत्येक शब्द पारखलेला आहे,
जे त्याच्या आश्रयास येतात त्यांची तो ढाल आहे.
कारण परमेश्वर ज्ञान देतो,
त्याच्या मुखातून सुज्ञता आणि ज्ञान येतात.
कारण परमेश्वर ज्ञान देतो,
त्याच्या मुखातून सुज्ञता आणि ज्ञान येतात.
O poder da Palavra
A Palavra transforma, sara e liberta. Quem permanece na Palavra de Jesus conhece a verdade, e a verdade o liberta.
ज्या यहूद्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवला त्यांना येशू म्हणाला, "तुम्ही माझ्या वचनात राहिला तर खरोखर माझे शिष्य आहात.
ज्या यहूद्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवला त्यांना येशू म्हणाला, "तुम्ही माझ्या वचनात राहिला तर खरोखर माझे शिष्य आहात. तुम्हास सत्य समजेल आणि सत्य तुम्हास बंधनमुक्त करील."
मी तुम्हास खरे खरे सांगतो, जर कोणी माझे वचने पाळील तर त्यास मरणाचा अनुभव कधीही येणार नाही."
मी तुम्हास खरे खरे सांगतो, जो माझे वचन ऐकतो आणि ज्याने मला पाठवले त्याच्यावर विश्वास ठेवतो त्यास सार्वकालिक जीवन प्राप्त झाले आहे आणि त्याच्यावर न्यायाचा प्रसंग येणार नाही; तो मरणातून जीवनात पार गेला आहे.
येशूने त्यास उत्तर दिले, "ज्याची माझ्यावर प्रीती असेल तो माझे वचन पाळील; माझा पिता त्याच्यावर प्रीती करील आणि आम्ही त्याच्याकडे येऊन, त्याच्याबरोबर वस्ती करून राहू.
जे वचन मी तुम्हास सांगितले त्यामुळे, तुम्ही आता शुद्ध झालाच आहात.
तू त्यांना सत्यात पवित्र कर. तुझे वचन हेच सत्य आहे.
म्हणून तो असे म्हणत असे हे तो मरण पावलेल्यातून उठल्यावर त्याच्या शिष्यांना आठवले आणि त्यांनी शास्त्रलेखावर व येशूने उच्चारलेल्या वचनावर विश्वास ठेवला.
आणखी कितीतरी लोकांनी त्याच्या वचनावरून विश्वास धरला.
जो माझ्यावर विश्वास ठेवतो त्याच्या अंतःकरणातून शास्त्रलेखात सांगितल्याप्रमाणे जिवंत पाण्याच्या नद्या वाहतील."
Meditar na Palavra
A meditação na Palavra traz prosperidade e bom sucesso. Ela é fonte de sabedoria, consolo e orientação para toda a vida.
नियमशास्त्राचा हा ग्रंथ तुझ्या मुखातून निघून जाऊ नये म्हणून रात्रंदिवस त्याचे मनन कर, त्या जे काही लिहिले आहे ते सर्व तू पाळ. मग तुझी भरभराट होईल आणि तू यशस्वी होशील.
मला तुझी वचने सापडली, आणि ती मी खाल्ली.
तुझे वचन माझ्या हृदयाचा आनंद आणि हर्ष अशी झाली. कारण तुझे नाव मला ठेवले आहे, ‘सेनाधीश परमेश्वर असे म्हणतो.
कारण येशू प्रभू आहे असे जर तू आपल्या मुखाने कबूल करशील आणि देवाने त्यास मरण पावलेल्यांमधून उठवले असा आपल्या अंतःकरणात विश्वास ठेवशील तर तुझे तारण होईल. कारण जो अंतःकरणाने विश्वास ठेवतो तो नीतिमान ठरतो व जो मुखाने कबूल करतो त्याचे तारण होते.
मी देवाच्या मदतीने, त्याच्या वचनाची स्तुती करीन,
मी देवावर भरवसा ठेवला आहे; मी भिणार नाही.
मनुष्य माझे काय करील?
देवाचा मार्ग परिपूर्ण आहे. परमेश्वराचे वचन शुद्ध आहे.
जे त्याच्यात आश्रय घेतात, त्यांच्यासाठी तो ढाल असा आहे.
तू मला तुझ्या तारणाची ढाल दिली आहेस, तुझा उजवा हात मला आधार देतो आणि तुझ्या अनुग्रहाने मला थोर केले आहे.
तू माझ्या पायांखाली विस्तीर्ण असे स्थान केले आहे, म्हणजे माझे पाय कधीही घसरणार नाहीत.
सुख पाहण्यासाठी आयुष्याची इच्छा धरतो आणि दिवसाची आवड धरतो तो मनुष्य कोण आहे?
तर वाईट बोलण्यापासून आवर,
आणि तुझे ओठ खोटे बोलण्यापासून आवर.
परमेश्वराने तुम्हास लीन केले, तुमची उपासमार होऊ दिली आणि मग, तुम्ही व तुमचे पूर्वज यांना माहीत नसलेला मान्ना तुम्हास खाऊ घातला. मनुष्य फक्त भाकरीवर जगत नाही, तर परमेश्वराच्या मुखातून निघणाऱ्या हर एक वचनाने जगतो हे तुम्हास कळावे, म्हणून त्याने हे सर्व केले.
परमेश्वर कृपाळू आहे, असा तुम्ही अनुभव घेतला आहे तर तुम्ही त्याद्वारे तारणासाठी तुमची वाढ व्हावी म्हणून नूतन जन्मलेल्या बालकांसारखे आध्यात्मिक निऱ्या दुधाची इच्छा धरा.
ऐक्याप्रीत्यर्थ विनंती
ह्यावरून ख्रिस्ताच्या ठायी काही आश्वासन, प्रीतीचे काही सांत्वन, आत्म्याची काही सहभागिता, काही कळवळा व करूणा ही जर आहेत, तर तुम्ही समचित्त व्हा, एकमेकांवर सारखीच प्रीती करा आणि एकजीव होऊन एकमनाचे व्हा. अशाप्रकारे माझा आनंद पूर्ण करा.
नम्रतेप्रीत्यर्थ विनंती
आणि तुम्ही विरोधाने किंवा पोकळ अभिमानाने काही करू नका, पण मनाच्या लीनतेने आपल्यापेक्षा एकमेकांना मोठे मानावे. तुम्ही कोणीही आपलेच हित पाहू नका, तर दुसर्यांचेहि पाहा.
प्रभू येशूच्या नम्रतेचे व त्यागाचे उदाहरण
अशी जी चित्तवृत्ती ख्रिस्त येशूच्या ठायी होती ती तुमच्याठायीही असो. तो देवाच्या स्वरूपाचा असूनही, त्याने आपण देवाच्या बरोबरीचे असणे हा लाभ आहे असे त्याने मानले नाही, तर स्वतःला रिकामे केले, म्हणजे मनुष्याच्या प्रतिरूपाचे होऊन दासाचे स्वरूप धारण केले, आणि मनुष्य प्रकृतीचे असे प्रकट होऊन त्याने स्वतःला लीन केले आणि त्याने मरण आणि तेही वधस्तंभावरचे मरण सोसले; येथपर्यंत आज्ञापालन करून त्याने स्वतःला लीन केले. ह्यामुळे देवाने त्यास सर्वांहून उंच केले आहे आणि सर्व नावांहून श्रेष्ठ नाव ते त्यास दिले आहे. ह्यात हेतू हा की, स्वर्गात, पृथ्वीवर व पृथ्वीखाली प्रत्येक गुडघा येशूच्या नावाने टेकला जावा, आणि हे देवपिताच्या गौरवासाठी प्रत्येक जीभेने येशू ख्रिस्त हा प्रभू आहे असे कबूल करावे.
सत्शील तारणप्राप्तीचा पुरावा आहे
म्हणून माझ्या प्रियांनो, जे तुम्ही सर्वदा आज्ञापालन करीत आला आहा, ते तुम्ही मी जवळ असता केवळ नव्हे तर विषेशकरून आता, म्हणजे मी जवळ नसताही, भीत व कांपत आपले तारण साधून घ्या. कारण इच्छा करणे आणि कार्य करणे तुमच्या ठायी आपल्या सुयोजनेसाठी साधून देणारा तो देव आहे.
जे काही तुम्ही कराल कुरकुर आणि वादविवाद न करता करा; ह्यासाठी की, या कुटिल आणि विपरीत पिढीमध्ये तुम्ही निर्दोष व निरुपद्रवी देवाची निष्कलंक मुले असे व्हावे; त्या लोकांमध्ये तुम्ही जीवनाचे वचन पुढे करून दाखवतांना ज्योतीसारखे जगात दिसता. जीवनाच्या वचनास दृढ धरुन राहा, असे झाले तर माझे धावणे व्यर्थ झाले नाही व माझे श्रमही व्यर्थ झाले नाहीत असा अभिमान मला ख्रिस्ताच्या दिवशी बाळगण्यास कारण होईल.
तुमच्या विश्वासाचा यज्ञ व सेवा, होतांना जरी मी अर्पिला जात आहे तरी मी त्याबद्दल आनंद मानतो व तुम्हा सर्वांबरोबर आनंद करतो; आणि त्याचाच तुम्हीही आनंद माना व माझ्याबरोबर आनंद करा.
तीमथ्य
प्रभू येशूमध्ये मी आशा करतो की, लवकरच मी तीमथ्याला तुमच्याकडे पाठवेन म्हणजे, तुम्हा विषयीच्या गोष्टी जाणून माझे समाधान होईल. कारण तुमच्या विषयीच्या गोष्टीची खरी काळजी करील असा, दुसरा कोणी समान वृतीचा माझ्याजवळ नाही; कारण, सगळे स्वतःच्याच गोष्टी पाहतात, ख्रिस्त येशूच्या पाहत नाहीत. पण तुम्ही त्याचे शील हे जाणता की, जसा मुलगा पित्याबरोबर सेवा करतो, तशी त्याने शुभवर्तमानासाठी माझ्याबरोबर सेवा केली. म्हणून माझे काय होईल ते दिसून येताच, त्यास रवाना करता येईल अशी मी आशा करतो. पण मीही स्वतः लवकरच येईन असा प्रभूमध्ये मला विश्वास आहे.
एपफ्रदीत
तरी मला माझा बंधू आणि सहकारी व सहसैनिक आणि तुमचा प्रेषित आणि माझी गरज भागवून माझी सेवा करणारा एपफ्रदीत ह्याला तुमच्याकडे पाठविण्याचे आवश्यक वाटले. कारण तो आजारी आहे हे तुम्ही ऐकले होते असे त्यास समजल्यावर त्यास तुम्हा सर्वांची हुरहुर लागून तो चिंताक्रांत अस्वस्थ झाला होता; तो खरोखर, मरणाजवळ आला होता पण देवाने त्याच्यावर दया केली आणि केवळ त्याच्यावर नाही तर, मला दुःखावर दुःख होऊ नये म्हणून माझ्यावरही केली. म्हणून, मी त्यास पाठविण्याची अधिक घाई केली, म्हणजे त्यास पुन्हा भेटून तुम्ही आनंद करावा आणि माझे दुःख कमी व्हावे म्हणून हे केले. ह्यावरून पूर्ण आनंदाने तुम्ही त्याचे प्रभूमध्ये स्वागत करा. अशांचा मान राखा. कारण माझी सेवा करण्यांत तुमच्या हातून जी कसूर झाली ती भरून काढावी म्हणून ख्रिस्त सेवेसाठी त्याने स्वतःचा जीव धोक्यात घातला व तो मरता मरता वाचला.
Palavras de vida
As palavras de Deus são espírito e vida. Quem fala deve falar como oráculos de Deus, com verdade, sabedoria e edificação.
कोणी असा असतो की, तलवार भोसकावी तसे अविचाराचे भाषण करतो,
पण सुज्ञाची जिव्हा आरोग्य आणते.
मनुष्याचे हृदय काळजीच्या भाराने त्यास खाली दाबून टाकते,
पण चांगला शब्द त्यास आनंदित करतो.
नितीमानाचे मुख जीवनाचा झरा आहे,
परंतु बलात्कार दुष्टाचे मुख झाकतो.
शांतीच्या उत्तराने राग निघून जातो,
पण कठोर शब्दामुळे राग उत्तेजित होतो.
मनुष्याचे पोट त्याच्या मुखाच्या फळाने भरेल,
तो आपल्या ओठांच्या पीकाने तृप्त होईल.
जीवन किंवा मरण ही जीभेच्या अधिकारात आहेत;
आणि ज्या कोणाला ती प्रिय आहे तो तिचे फळ खातो.
परंतु ज्या गोष्टी तोंडातून बाहेर निघतात त्या अंतःकरणातून येतात व त्याच मनुष्यास अशुद्ध करतात. कारण वाईट विचार, खून, व्यभिचार, जारकर्मे, खोट्या साक्षी, निंदा ही अंतःकरणातून बाहेर निघतात.
आणखी मी तुम्हास सांगतो की. जो प्रत्येक व्यर्थ शब्द लोक बोलतील त्याचा हिशोब ते न्यायाच्या दिवशी देतील. कारण तू आपल्या बोलण्यावरून न्यायी ठरशील आणि आपल्या बोलण्यावरूनच दोषी ठरशील."
अहो सापाच्या पिल्लांनो, तुम्ही वाईट असता तुम्हास चांगल्या गोष्टी कशा बोलता येतील? जे अंतःकरणात आहे तेच तोंडावाटे बाहेर पडते.
कारण पुष्कळ गोष्टीत आपण सर्वजण अडखळतो. कोणी जर बोलण्यात चुकत नसेल तर तो पूर्ण मनुष्य आहे; तो आपले सर्व शरीरही नियंत्रणात ठेवण्यास समर्थ आहे.
पहा, आपण घोड्यांच्या तोंडांत लगाम घालतो की, त्यांनी आपले ऐकावे; आणि त्याद्वारे आपण त्यांचे सर्व शरीर वळवतो. तारवेही बघा; ती इतकी मोठी असतात आणि प्रचंड वार्याने लोटली जातात, पण ती चालवणार्या सुकाणदाराची इच्छा असते तिकडे एका लहान सुकाणूने पाहिजे तिकडे वळवता येतात. त्याचप्रमाणे जीभ एक लहान अवयव आहे आणि मोठ्या गोष्टींची फुशारकी मारते. पहा, लहानशी आग किती मोठे रान पेटवते. आणि जीभ एक आग आहे, एक अनीतीचे भुवन आहे. जीभ ही सर्व अवयवात अशी आहे की, ती सर्व शरीराला अमंगळ करते, सृष्टीक्रमाला आग लावते; आणि नरकाने पेटलेली अशी आहे. कारण प्रत्येक जातीचे पशू व पक्षी आणि सरपटणारे व जलचर प्राणी, कह्यात येतात आणि मनुष्याने कह्यात आणले आहेत. पण कोणीही मनुष्य आपली जीभ कह्यात आणू शकत नाही. ती अनावर व अपायकारक असून, ती प्राणघातक विषाने भरलेली आहे.
तर मग ऐकण्यामुळे विश्वास होतो आणि ख्रिस्ताच्या वचनामुळे ऐकणे होते.
पण मी म्हणतो की त्यांनी ऐकले नव्हते काय? हो, खचित ऐकले;
‘सर्व पृथ्वीवर त्यांचा आवाज आणि
जगाच्या टोकापर्यंत त्यांचे शब्द पोहोचले आहेत.’