Palavras de consolo
A Bíblia é repleta de palavras de consolo para os aflitos. Deus está perto dos que sofrem e promete enxugar toda lágrima, renovar a esperança e restaurar o coração partido.
Deus está conosco
O Senhor é refúgio e fortaleza. Mesmo no vale da sombra da morte, não precisamos temer — Ele está ao nosso lado para nos consolar.
मृत्युछायेच्या दरीतूनही
मी जात असलो,
तरी कोणत्याही अरिष्टाला भिणार नाही,
कारण तुम्ही माझ्याबरोबर आहात;
तुमची आकडी व तुमची काठी
मला धीर देतात.
याहवेह माझे प्रकाश व माझे तारण आहेत—
मी कोणाचे भय बाळगू?
याहवेह माझ्या जीवनाचे दुर्ग आहेत—
मला कोणाचे भय आहे?
याहवेह, पीडितांसाठी आश्रय आहेत,
संकटकाळी तेच आश्रयाचे दुर्ग आहेत.
मी याहवेहला एक याचना केली,
हीच माझी आकांक्षा आहे:
मी आयुष्यभर याहवेहच्या
भवनात वस्ती करावी जेणेकरून
मी याहवेहचे सौंदर्य बघून त्यांच्या
मंदिरात ध्यान करावे.
कारण संकटाच्या दिवसात
ते मला त्यांच्या वसतिस्थानात सुरक्षित ठेवतील;
तेच मला आपल्या निवासमंडपात लपवून ठेवतील;
उंच खडकावर मला सुरक्षा देतील.
प्रभू याहवेह, केवळ तुम्हीच माझे आशास्थान आहात;
तारुण्यापासून मी तुमच्यावर भरवसा ठेवला आहे.
Consolação e esperança
Deus consola os humildes e exalta os abatidos. Ele nunca nos desamparará.
याहवेह स्वतः तुझ्यापुढे चालतील आणि तुझ्याबरोबर राहतील; ते तुला कधीही सोडणार नाही किंवा त्यागणार नाहीत. भिऊ नकोस; निरुत्साही होऊ नकोस."
त्यांना तू भिऊ नको; कारण याहवेह तुझे परमेश्वर स्वतः तुझ्यासाठी त्यांच्याशी लढतील."
मी तुला आज्ञापिले नाही का? खंबीर हो आणि धैर्यवान हो. भिऊ नको; निराश होऊ नको, कारण तू जिथे जाशील तिथे याहवेह तुझे परमेश्वर तुझ्याबरोबर असतील."
नम्र लोकांना ते उंचस्थानी ठेवतात,
जे विलाप करतात त्यांना सुरक्षित स्थळी नेतात.
ज्यांनी कृपेद्वारे आपल्यावर प्रीती केली आणि युगानुयुगाचे प्रोत्साहन व चांगली आशा आपल्याला दिली, ते परमेश्वर आपले पिता व स्वतः आपले प्रभू येशू ख्रिस्त,
Descanso e renovação
Bem-aventurados os que choram, pois serão consolados. A Bíblia nos convida a descansar nos braços do Pai e encontrar paz para a alma.
धन्य आहेत ते, जे शोकग्रस्त आहेत,
कारण त्यांना सांत्वन मिळेल.
परमेश्वराच्या पराक्रमी हाताखाली स्वतःला नम्र करा, म्हणजे ते तुम्हाला योग्य वेळी उंच करतील. तुमच्या सर्व चिंता त्याच्यावर टाका, कारण ते तुमची काळजी घेतात.
तुमची माझ्यावरील कृपा दाखविणारे चिन्ह मला द्या,
म्हणजे माझे शत्रू ते पाहतील व लज्जित होतील,
कारण हे याहवेह, तुम्ही मला साहाय्य केले आणि माझे समाधान केले.
तुमच्या अभिवचनानुसार
तुमची अक्षय प्रीती माझे सांत्वन करो;
तू जेव्हा विसावा घेशील, तेव्हा तुला भीती वाटणार नाही;
जेव्हा तू झोपशील, तुला गोड झोप लागेल.
प्रत्येक गोष्टींसाठी निर्धारित समय
प्रत्येक गोष्टींसाठी निश्चित वेळ आहे,
आणि पृथ्वीवर प्रत्येक कामासाठी एक ऋतू ठरलेला असतो:
जन्म होण्याची वेळ आणि मृत्यू येण्याची वेळ,
पेरणीची वेळ आणि कापणीची वेळ,
ठार मारण्याची वेळ आणि बरे करण्याची वेळ आहे;
विध्वंसाची वेळ आणि बांधण्याची वेळ आहे;
रडण्याची वेळ आणि हसण्याची वेळ आहे;
शोक करण्याची आणि नाचण्याची वेळ आहे;
दगड पसरून टाकण्याची वेळ आणि दगड गोळा करण्याची वेळ;
आलिंगन देण्याची वेळ व आलिंगन टाळण्याची वेळ;
शोधण्याची वेळ आणि सोडण्याची वेळ;
साठविण्याची वेळ व टाकून देण्याची वेळ;
फाडण्याची वेळ व दुरुस्त करण्याची वेळ;
मौन धरण्याची वेळ व बोलण्याची वेळ;
प्रेम करण्याची वेळ व द्वेष करण्याची वेळ;
युद्ध करण्याची वेळ आणि शांती राखण्याची वेळ.