O papel da mulher
A Bíblia honra a mulher como colaboradora essencial no plano de Deus. De Provérbios 31 às mulheres do Novo Testamento, a Escritura celebra a sabedoria, a força e a fé feminina.
A mulher virtuosa
Mulher virtuosa, quem a achará? Seu valor excede o de rubis. Ela é sábia, trabalhadora, generosa e temida pelo Senhor.
सदगुणी स्त्री
हुशार व कार्यक्षम पत्नी कोणाला सापडेल?
पण तिचे मोल मौल्यवान खड्यांपेक्षा अधिक आहे.
तिच्या पतीचे मन तिच्यावर भरवसा ठेवते,
तो कधीही गरीब होणार नाही.
ती आपल्या आयुष्याच्या सर्व दिवशी
त्याच्यासाठी चांगल्या गोष्टी करते आणि अनिष्ट करत नाही.
ती लोकर आणि ताग निवडते,
आणि आपल्या हातांनी आनंदाने काम करते.
ती व्यापाऱ्याच्या जहाजासारखी आहे,
ती आपले अन्न दुरून आणते.
रात्र गेली नाही तोच ती उठून,
आपल्या कुटुंबासाठी अन्न शिजवते,
आणि नोकर मुलींना काय करायचे ते काम वाटून देते.
ती शेताविषयी विचार करून ते विकत घेते,
ती आपल्या हातांच्या श्रमाने द्राक्षाचे मळे लावते.
ती स्वतःला बलरुप पोशाख घालते,
आणि आपले बाहू बळकट करते.
आपला उद्योग फायदेशीर आहे हे तिला कळते;
सर्व रात्री तिचा दिवा विझत नाही.
ती आपला हात चातीला लावते,
आणि ती गुंडाळलेला दोरा धरते.
ती आपला हात नेहमी गरीबांसाठी उघडते;
ती गरजवंतास देण्यास आपला हात पुढे करते.
ती तागाची वस्त्रे करते आणि ते विकते,
ती व्यापाऱ्यांना कमरबंध पुरवते.
बल व आदर तिचे वस्त्र आहेत,
आणि ती येणाऱ्या काळामध्ये आनंदी राहू शकते.
तिच्या मुखातून सुज्ञतेचे बोल निघतात.
आणि दयेचा नियम तिच्या जिभेवर आहे.
ती कधीही आळशी नसते;
ती आपल्या कुटुंबाच्या मार्गाकडे लक्ष देते,
आणि आळसाची भाकर खात नाही.
सुज्ञ स्त्री आपले घर बांधते,
पण मूर्ख स्त्री आपल्या स्वतःच्या हाताने ते खाली पाडते.
आदेश आणि ताकीद
माझ्या मुला, तू तुझ्या वडिलांची शिकवण ऐक,
आणि तू तुझ्या आईचा नियम बाजूला टाकू नकोस;
Beleza interior
A beleza verdadeira não é exterior, mas o caráter incorruptível de um espírito manso e tranquilo. Isso tem grande valor diante de Deus.
पती व पत्नी
आणि तुम्ही विवाहित स्त्रियांनो, आपल्या पतीच्या अधीन रहा; म्हणजे कोणी वचनाला अमान्य असेल, तरी तुमचे भीडस्तपणाचे निर्मळ वर्तन पाहून ते वचनांवाचून आपल्या स्त्रियांच्या वर्तनाने मिळवून घेतले जावे कारण ते तुमचे शुद्ध, आदराचे आचरण पाहतील. तुमची शोभा ही केस गुंफणे, सोन्याची दागिने घालणे आणि उंची वस्त्रे वापरणे ह्यांची बाहेरची शोभा असू नये; पण अंतःकरणात गुप्त राहणार्या मानवी स्वभावात, म्हणजे देवाच्या दृष्टीने बहुमोल असलेल्या, सौम्य आणि शांत आत्म्याच्या अविनाशी भूषणात ती असावी. कारण देवावर आशा ठेवणार्या, प्राचीन काळच्या, पवित्र स्त्रियांनीही अशाप्रकारे आपल्या पतीच्या अधीन राहून स्वतःला शोभवत असत. उदाहरणार्थ, सारेनेही अब्राहामाला धनी म्हणून त्याच्या आज्ञा पाळल्या. तुम्ही चांगले करीत असाल आणि कोणत्याही भयाला भीत नसाल तर तुम्ही तिच्या मुली झाला आहात.
पतींनो, तुम्हीही आपल्या पत्नीला अधिक नाजूक पात्राप्रमाणे, आपल्या ज्ञानानुसार, मान द्या आणि जीवनाच्या कृपेचे जोडीचे वारीस म्हणून एकत्र रहा, म्हणजे तुमच्या प्रार्थनेत व्यत्यय येवू नये.
त्याचप्रमाणे, माझी अशी इच्छा आहे की, स्त्रियांनी स्वतःला केस गुंफणे, सोने किंवा मोती किंवा महाग कपडे यांनी नव्हे तर सभ्य वेशाने विनयाने व मर्यादेने सुशोभित करावे.
त्याचप्रमाणे, स्त्रियांनीही गंभीर असावे, त्या चहाडखोर नसाव्यात. तर सभ्य व प्रत्येक बाबतीत विश्वसनीय असाव्यात.
Parceria e dignidade
Deus criou homem e mulher à sua imagem. A mulher não é inferior, mas parceira e co-herdeira da graça da vida.
देवाने आपल्या प्रतिरूपाचा मनुष्य निर्माण केला.
त्याच्या स्वतःच्या प्रतिरूपाचा असा देवाने तो निर्माण केला.
नर व नारी असे त्यांना निर्माण केले.
देवाने त्यांना आशीर्वाद दिला, आणि त्यांना म्हटले, "फलद्रूप व्हा, बहुगुणित व्हा आणि पृथ्वी व्यापून टाका. ती आपल्या सत्तेखाली आणा; समुद्रातील मासे, आकाशातील पक्षी आणि पृथ्वीवर फिरणारा प्रत्येक सजीव प्राणी यांवर सत्ता चालवा."
नंतर परमेश्वर देव बोलला, "मनुष्याने एकटे असावे हे बरे नाही; मी त्याच्यासाठी सुसंगत मदतनीस निर्माण करीन."
परमेश्वर देव स्त्रीस म्हणाला, "मुलांना जन्म देते वेळी तुझ्या वेदना मी खूप वाढवीन तरी तुझी ओढ तुझ्या नवऱ्याकडे राहील; आणि तो तुझ्यावर अधिकार चालवील."
तरीही प्रभूमध्ये स्त्री पुरुषापासून स्वतंत्र नाही व पुरूष स्त्रीपासून स्वतंत्र नाही. कारण स्त्री जशी पुरुषापासून आहे, तसा पुरुषही स्त्रीपासून जन्माला येतो. परंतु सर्व गोष्टी देवापासून आहेत.
ख्रिस्ती कुंटुंबाचा जीवनक्रम
पत्नींनो, जशा तुम्ही प्रभूच्या अधीन होता, तशा आपल्या पतीच्या अधीन असा. कारण ख्रिस्त जसा मंडळीचे मस्तक आहे, तसा पती पत्नीचे मस्तक आहे आणि ख्रिस्त विश्वास ठेवणाऱ्या शरीराचा तारणारा आहे. ज्याप्रमाणे मंडळी ख्रिस्ताला शरण जाते, त्याचप्रमाणे पत्नीने प्रत्येक बाबतीत आपल्या पतीच्या अधीन असावे.
वृद्ध स्त्रियांनी, त्याचप्रमाणे, आपल्या आचरणात पवित्रेस शोभणाऱ्या असाव्या; चुगलखोर, मद्य पिणाऱ्या नसाव्या; चांगले शिक्षण देणार्या असाव्या; आणि आपल्यातील तरुण स्त्रियांना असे शिक्षण द्यावे की, त्यांनी आपल्या पतींवर व मुलांवर प्रेम करावे. आणि त्यांनी समंजस, शुद्धाचरणी, घर संभाळणार्या, ममताळू व पतीच्या अधीन राहणार्या व्हावे; म्हणजे देवाच्या वचनाची निंदा होणार नाही.