Páscoa
A Páscoa é a celebração suprema da redenção. Do cordeiro pascal no Egito ao Cordeiro de Deus que tira o pecado do mundo, ela aponta para o sacrifício e a vitória de Cristo.
A caminhada para a cruz
Jesus entrou em Jerusalém como Rei humilde, e a multidão o aclamou. Ele sabia do sofrimento que viria, mas caminhou em obediência até o fim.
मग जमावातील जे लोक त्यांच्यापुढे गेलेले आणि जे त्यांच्यामागून चालले, ते मोठ्याने ओरडून म्हणाले,
"दावीदाच्या पुत्राला होसान्ना!" वचनामध्ये
"प्रभूच्या नावाने येणारा धन्यवादित असो."
"सर्वोच्च स्वर्गात होसान्ना!" पाहा.
याहवेह, आमचे तारण करा!
याहवेह, आम्हाला यशस्वी करा!
याहवेहच्या नावाने येणारे धन्यवादित असो.
आम्ही याहवेहच्या मंदिरातून तुम्हाला आशीर्वाद देतो.
सीयोनकन्ये, फार आनंद कर!
यरुशलेमकन्ये, गर्जना कर!
पाहा, तुझा राजा तुझ्याकडे येत आहे,
तो नीतिमान व विजयी आहे,
तरी तो लीन आहे व गाढवीवर बसून तो येत आहे
होय, एका गाढवीच्या शिंगरावर बसून तो येत आहे!
"आपण यरुशलेमात जात आहोत आणि तिथे मानवपुत्राला महायाजक व नियमशास्त्र शिक्षक यांच्या हवाली करण्यात येईल. ते त्याच्यावर आरोप करून त्याला मृत्युदंड देतील आणि नंतर त्याला गैरयहूदीयांच्या हाती सोपवून देण्यात येईल. ते लोक त्याची थट्टा करतील, त्याला फटके मारतील व क्रूसावर खिळतील; परंतु तीन दिवसानंतर तो मरणातून पुन्हा उठेल."
A paixão de Cristo
Jesus foi zombado, açoitado e crucificado. Ele orou no Getsêmani e entregou sua vida voluntariamente, dizendo: 'Está consumado!'
तिथे त्यांनी त्यांचे कपडे काढले आणि त्यांना किरमिजी रंगाचा झगा घातला. मग त्यांनी काट्यांचा एक मुकुट गुंफला आणि त्यांच्या मस्तकांवर घातला. राजदंड म्हणून त्यांनी त्यांच्या उजव्या हातात एक काठी दिली आणि त्यांनी गुडघे टेकले आणि त्यांचा उपहास करीत ते त्यांना म्हणाले, "हे यहूद्यांच्या राजा, तुझा जयजयकार असो!"
त्यांच्या डोक्याच्या वरच्या बाजूला दोषपत्राचा लेख लावण्यात आला होता, त्यावर लिहिले होते:
हा येशू, यहूद्यांचा राजा आहे.
"अब्बा! पित्या!" ते म्हणाले, "आपल्याला शक्य असल्यास, हा प्याला दूर करा. तरीपण माझ्या इच्छेप्रमाणे नव्हे, तर आपल्या इच्छेप्रमाणे होवो."
तेव्हा येशूंनी पुन्हा एकदा मोठी आरोळी मारून म्हटले, "हे पित्या, मी माझा आत्मा तुमच्या स्वाधीन करतो." हे शब्द बोलल्यानंतर त्यांनी शेवटचा श्वास घेतला.
तो चाखल्यावर, येशू म्हणाले, "पूर्ण झाले आहे," आणि त्यांनी मस्तक लववून प्राण सोडला.
A ressurreição gloriosa
Ele não está aqui — ressuscitou! O túmulo vazio é a prova de que a morte foi derrotada e Cristo vive para sempre.
देवदूत त्या स्त्रियांना म्हणाला, "भिऊ नका, क्रूसावर खिळलेल्या येशूंना तुम्ही शोधीत आहात, हे मला माहीत आहे. ते येथे नाहीत; त्यांनी सांगितल्याप्रमाणे ते उठले आहेत. या आणि ज्या ठिकाणी त्यांना ठेवले होते ती जागा पाहा.
"भिऊ नका," तो म्हणाला, "क्रूसावर खिळलेल्या ज्या नासरेथकर येशूंना तुम्ही शोधीत आहात. ते येथे नाहीत, ते पुन्हा उठले आहेत. त्यांना ठेवले होते ती जागा पाहा!
ते येथे नाही, ते पुन्हा उठले आहेत! गालीलात असताना त्यांनी तुम्हाला काय सांगितले होते याची आठवण करा. ‘मानवपुत्र दुष्ट लोकांच्या हाती विश्वासघाताने धरून दिला जाईल, त्यांना क्रूसावर खिळून मारण्यात येईल आणि ते तिसर्या दिवशी पुन्हा उठतील.’ "
शेवटी दुसरा शिष्य, जो प्रथम कबरेजवळ पोहोचला होता, तोही आत गेला. त्याने पाहिले आणि विश्वास ठेवला. कारण त्यांनी मेलेल्यातून पुन्हा उठावे हा शास्त्रलेख तोपर्यंत त्यांना समजला नव्हता.