Planejamento
O planejamento é sábio, mas deve sempre se submeter à vontade de Deus. A Bíblia ensina que devemos planejar com prudência, mas confiar que Deus dirige nossos passos.
Planejar com sabedoria
Contar nossos dias nos ensina a ter coração sábio. O planejamento prudente é elogiado na Escritura como expressão de bom senso.
म्हणून आम्हास आमचे आयुष्य असे
मोजण्यास शिकव की आम्ही ज्ञानाने जगण्यास शिकू.
जर तुम्हापैकी कोणाला बुरुज बांधायचा असेल तर तो अगोदर बसून खर्चाचा अंदाज करून तो पूर्ण करावयास त्याच्याजवळ पुरेसे पैसे आहे की नाही हे पाहणार नाही काय?
जेथे सल्ला नसतो तेथे योजना बिघडतात,
पण पुष्कळ सल्ला देणाऱ्यांबरोबर ते यशस्वी होतात.
आपली कामे परमेश्वराच्या स्वाधीन करा,
आणि म्हणजे तुमच्या योजना यशस्वी होतील.
श्रीमंत होण्यासाठी खूप कष्ट करू नको;
तुम्ही आपल्या ज्ञानाने कोठे थांबावे समजून घे.
Deus dirige os passos
O coração do homem planeja, mas a resposta certa vem do Senhor. Seus caminhos são mais altos que os nossos, e seus planos prevalecem.
मनुष्याचे मन त्याच्या मार्गाची योजना करते,
पण परमेश्वर त्याच्या पावलांना वाट दाखवतो.
मनुष्याच्या मनात बऱ्याच योजना येतात,
पण परमेश्वराचे उद्देश स्थिर राहतील.
कारण माझे विचार तुमचे विचार नाहीत, किंवा तुमचे मार्ग माझे मार्ग नाहीत. हे परमेश्वराचे म्हणणे आहे.
कारण जसे आकाश पृथ्वीपेक्षा उंच आहे तसे माझे मार्ग तुमच्या मार्गाहून आणि माझे विचार तुमच्या विचांरापेक्षा उंच आहेत.
सेनाधीश परमेश्वर, जो संकल्पात सुंदर आहे आणि ज्ञानाने श्रेष्ठ आहे. त्याच्याकडून हे आहे.
Confiança no plano de Deus
Os planos do Senhor são de paz e esperança. Ele revela seus segredos aos seus servos e guia com fidelidade cada caminho confiado a Ele.
कारण परमेश्वर असे म्हणतो की, तुमच्याविषयी माझ्या मनात ज्या योजना आहेत त्या मी जाणतो; त्या योजना तुमच्या हिताच्या आहेत आणि अनिष्टासाठी नाहीत, त्या तुम्हास भविष्य व आशा देणाऱ्या आहेत.
खरोखर आपला बेत त्याच्या सेवकांना
म्हणजेच संदेष्ट्यांना प्रगट केल्यावचून,
प्रभू परमेश्वर काहीच करणार नाही.
तो तुझ्या हृदयाच्या इच्छा मान्य करो,
आणि तुझ्या सर्व योजना पूर्ण करो.
सकाळी मला तुझ्या वात्सल्याचे शब्द ऐकू दे,
कारण मी तुझ्यावर भरवसा ठेवला आहे.
ज्या मार्गाने मी चालावे तो मला दाखव,
कारण मी आपला जीव तुझ्याकडे उंचावतो.
प्रत्येक गोष्टीस उचित काळ
प्रत्येक गोष्टीला नेमलेला समय असतो आणि आकाशाखाली प्रत्येक कार्याला समय असतो.
ते देवाने आत्म्याच्याद्वारे आपणांस प्रकट केले आहे कारण हा आत्मा प्रत्येक गोष्टींचा व देवाच्या खोल गोष्टींचाही शोध घेतो.
तू हिंसाचारी मनुष्याचा हेवा करू नको
किंवा त्याचे कोणतेही मार्ग निवडू नकोस.
कारण परमेश्वर कुटिल मनुष्याचा तिरस्कार करतो;
परंतु सरळांना तो त्याच्या आत्मविश्वासात आणतो.